बुक स्टाँल

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
6 Jul 2014 - 4:40 pm

समोर खिडकीतुन त्या पुस्तकवाल्या बाबुकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते?हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती.
दोन दिवसानी आम्ही ते घर सोडले,बाबाची जेथे बदली झाली तेथे आम्ही गेलो.खुपच आठवणी घेऊन गेलो,शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले.
आज त्या शहरात मी बर्याच वर्षानी आलो,काही कामानिमित्त.
त्या शहरात व परिसरात खुप बदल दिसला, पण त्या पुस्तकवाल्या बाबुच्या चेहर्यात काहीच बदल दिसत नव्हता,तो मला ओळखत नसेल पण मी त्याला चांगला ओळखतो.त्यच्या केसात व चेहर्यात बदल झाला आसला तरी त्याच्या कामा वरुन मला जसा मी खिडकीतुन पाहत होतो तसाच वाटत होता.
तो पुस्तके लावण्यात गुंग होता,
शिलाचे लग्न झाले आसे मला कळाले पण मला त्याचे दु:ख वाटले नाही.ते माझ्या बालपणाचे प्रेम होते.त्यावेळी दोघेही आम्ही बालक होतो.
पण आज मी ठरविले की त्या पुस्तकवाल्या बाबुचे पुस्तक परत करायचे,पण कसे? पंधरा सोळा वर्षापुर्वीचे पुस्तक तो ओळखणार ही नाही आपणाला? मग मीच ठरिवले.सध्याची परस्थिती पाहता त्याला दहा रुपये देण्या ऐवजी शभंर रुपये द्यायचे.
मी त्या बुक स्टाँलवर गेलो,मी एकटाच होतो त्यामुळे मी कोणत्या पुस्तकाला हात लावतो ते पाहत होता.
मी त्याची नजर ओळखली व मीच म्हणालो,'काय राव पुस्तकाबरोबर पैसे ही वाटता की काय?,'
तो गोधंळलेल्या नजरेन माझ्याकडे पाहिले,व म्हणाला,'म्हणजे?,'
'माझे एक मित्र येथुन पुस्तक घेतले व त्या पुस्तकात त्याना शंभर रुपये मिळाले,तेच त्यानी तुम्हाला परत करायला सांगुन गावी गेलेत,'मी म्हणालो,
'हे कसं काय?,'बाबु म्हणाला,
'ते मला माहीत नाही पुन्हा जेव्हा येतील तेव्हा त्याना विचारा,' आसे म्हणुन मी त्यच्या हातात शंभराची नोट ठेवली,
'आहो पण कोण ती व्यक्ती? नाव तर सांगा?,'
आता मात्र मी सापडलो,काय सांगावे प्रश्न मला पडला,
'तेच तुम्हाला येऊन सांगतील,' आसे म्हणुन तेथुन मी निघालो,
मला पुस्तक काही परत करता आले नाही पण पैसे दिल्याचे मला समाधान वाटु लागले.
दुसर्या सकाळी मी ते शहर सोडुन निघालो, खुप वेळ होता,रेल्वेला म्हणुन त्या सकाळी सकाळी बाबु बुक स्टाँल कडे लाबुनच पाहीले, आज बहुतेक तो गडबडीत पुस्तकाची पाने पलटत होता, त्याची मुलगी ही पुस्तके चाळत होती.
एक तासानी मी रेल्वे स्टेशनकडे जाण्यास रिक्षा केली,शेवटची एक नजर मी त्या बुक स्टाँलच्या बाबु कडे पाहिले,तर आजुन ही तो पुस्तकाची पाने पलटत होता.
*

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Jul 2014 - 4:58 pm | मुक्त विहारि

मी पहिला

सानिकास्वप्निल's picture

6 Jul 2014 - 5:03 pm | सानिकास्वप्निल

मी दुसरी...

जीमो आले( चाल-अप्सरा आली)
बालपणी चे प्रेम केले तेव्हा दोघेही बालक होते *ROFL*

सानिकास्वप्निल's picture

6 Jul 2014 - 5:07 pm | सानिकास्वप्निल

=))

विजुभाऊ's picture

6 Jul 2014 - 5:08 pm | विजुभाऊ

आज मी ठरविले की त्या पुस्तकवाल्या बाबुचे पुस्तक परत करायचे,

शेवटची एक नजर मी त्या बुक स्टाँलच्या बाबु कडे पाहिले,तर आजुन ही तो पुस्तकाची पाने पलटत होता.

वरील वाक्यांत पुस्तकवाल्याचे नाव जर बाबू असेल तर वाक्यरचना चुकलेली आहे. मराठीत नुसते "पुस्तकवाला " म्हंटले असते तरी चालले असते. हिन्दीचे मराठीत रूपाम्तर करायचे असेल तर स्वैर करा शब्दशः नको

दोन दिवसानी आम्ही ते घर सोडले,बाबाची जेथे बदली झाली तेथे आम्ही गेलो.खुपच आठवणी घेऊन गेलो,शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले.

जिमो साहेब तुम्ही हिन्दी चे सरळ सरळ शब्दशः भाषांतर केलेले आहे. किंवा तुम्हीच अगोदर हिंदीत कथा लिहून ती नम्तर मराठीत केली.
असो.
एक प्रश्नः "आय लव्ह यू " असे लिहीलेले पुस्तक बाबूला देऊन टाकण्यामागे नक्की काय उद्देश असेल?

संजय क्षीरसागर's picture

6 Jul 2014 - 9:52 pm | संजय क्षीरसागर

असा अर्थ आहे.

एसमाळी's picture

6 Jul 2014 - 5:25 pm | एसमाळी

कथा वाचुन कनफ्युज झालेय.

मुक्त विहारि's picture

6 Jul 2014 - 5:45 pm | मुक्त विहारि

त्या कूट कथा असतात.

बर्याच कालावधीनंतर जीवनभौंची कथा आली. :)

सूड's picture

6 Jul 2014 - 6:34 pm | सूड

गहन कथा !!

तुमचा अभिषेक's picture

6 Jul 2014 - 6:50 pm | तुमचा अभिषेक

बिचारा बाबू, सोरट सारखे आता प्रत्येक पुस्तक बघत बसला...

एक प्रश्न (शंका) - पुस्तक वाचायला म्हणून घेतले असले तरी मग त्याचे डिपॉजिट घेतले जाते ना?

संजय क्षीरसागर's picture

6 Jul 2014 - 9:58 pm | संजय क्षीरसागर

डिपॉझीटच जप्त झालं असण्याची शक्यता आहे! त्यावर शीलानं टू असं लिहिल्यानं तिचं सभासदत्व रद्द झालं.

या बालपणीच्या कटू आठवणींचा बदला, म्हणजे बाबूला जन्मभर पुस्तकाची पानं पलटत राहाण्याची शिक्षा!

प्यारे१'s picture

6 Jul 2014 - 7:55 pm | प्यारे१

दिलविच ठंडक पा गयी!

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jul 2014 - 8:01 pm | अत्रुप्त आत्मा

जिवण भौ आले...मि.पा.-महान झाले! =))

कवितानागेश's picture

6 Jul 2014 - 8:20 pm | कवितानागेश

मालापण स्टाँल पायजेल.

किसन शिंदे's picture

6 Jul 2014 - 8:50 pm | किसन शिंदे

जीमो... जीमो...जीमो आले आले आले (जिम्मी जिम्मी जिम्मी आजा आजा आजच्या तालावर) *ok*
तुम्ही कुठे गेला होतात जीवन भौ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Jul 2014 - 9:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

जीवनभौ परत आल्याचे पाहुन डोळे पाणावले. त्यांची तीच पुर्वीची हिट्ट्ट्ट्ट्ट लेखनशैली टिकुन आहे हे बघुन तर भडभडुन आले.
जीवनभौ तुम्ही लिखो हम तुम्हारे साथ हय

प्यारे१'s picture

6 Jul 2014 - 9:49 pm | प्यारे१

>>> जीवनभौ तुम्ही लिखो हम तुम्हारे साथ हय

नाही म्हणजे भावना पोचल्या खर्‍या पण थोडं कटू सांगायचं झालं तर जीवन भौंच्या साथ मध्ये आपण कुणीच असू शकत नाही.

हमारी सोच जिधर संपती हय उधरसे उनकी सोच चालू होती हय!
त्यामुळं घोषणा बदलने के सिवाय पर्याय नही हय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Jul 2014 - 1:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

अगदी अगदी
पर्यायी घोषणा सुचवा :)

वाटण्याइतपत, (गेल्या १५/१६ वर्षात) प्रगती झाली आहे, हे आडवळणानं सांगण्याचा प्रयत्न.

२) `शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो, तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले'

याचा अर्थ `तू दोन नंबरवर आहेस', हे न समजल्यानं निष्कारण भावना उर्देक झाला... आणि शंभर रुपये वाया गेले.

३) शिलाचे लग्न झाले आसे मला कळाले पण मला त्याचे दु:ख वाटले नाही.ते माझ्या बालपणाचे प्रेम होते.त्यावेळी दोघेही आम्ही बालक होतो.

थोडक्यात `अल्पवयीन मुलीला फूस लावणे' हा गुन्हा आहे, याची अगदी बालपणीच कल्पना होती.

३) 'तेच तुम्हाला येऊन सांगतील,' आसे म्हणुन तेथुन मी निघालो,

न जाणो, शीला तिथे मिस्टरांबरोबर उगवली तर काय? ही खरी भीती.

४) सकाळी सकाळी बाबु बुक स्टाँल कडे लाबुनच पाहीले, आज बहुतेक तो गडबडीत पुस्तकाची पाने पलटत होता, त्याची मुलगी ही पुस्तके चाळत होती.

ला वरचा अनुस्वार, तरंगत तरंगत, स्टॉ वर गेला आहे, पण तो केवळ डोळे पाणावल्यामुळे.

५) एक तासानी मी रेल्वे स्टेशनकडे जाण्यास रिक्षा केली,शेवटची एक नजर मी त्या बुक स्टाँलच्या बाबु कडे पाहिले,तर आजुन ही तो पुस्तकाची पाने पलटत होता.

थोडक्यात, आयुष्याची पानं पलटत राहा. शंभरी आली तरी नाद सोडू नका. शीला एक दिवस नक्की येईल!

ही कथा नसून मुक्तक आहे अशी शंका आहे. तथापि जीवनाच्या सखोल तत्वज्ञानाचा सकस अविष्कार इथे व्यक्त झाला आहे. भावनिक स्तरावरून तार्किक स्तरावर येताना कथानायकाच्या मनोवस्थेत जी स्थित्यंतरे झाली त्यांचे धारदार चित्रण कथेच्या शब्दाशब्दात उतरले आहे.
झालंच तर पुस्तकवाल्या प्रती जी अथांग करुणेची भावना साकार झाली आहे, त्यास तोड नाही...
इत्के बोलून मी माझ्या तीन ओळी संपवते.
जै हिंद जै म्हाराष्ट्र !

कवितानागेश's picture

6 Jul 2014 - 11:30 pm | कवितानागेश

ही समिक्षा वाचून माझी झोपच उडाली. आता मी पुस्तकाची पाने पलटत बसते.......

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jul 2014 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा

@कथानायकाच्या मनोवस्थेत जी स्थित्यंतरे झाली त्यांचे धारदार चित्रण कथेच्या शब्दाशब्दात उतरले आहे.>>> *ROFL*

एस's picture

7 Jul 2014 - 10:16 am | एस

@कथानायकाच्या मनोवस्थेत जी स्थित्यंतरे झाली त्यांचे धारदार चित्रण कथेच्या शब्दाशब्दात उतरले आहे.>>>

आणि स्थित्यंतरांच्या चित्रणाची प्रतिबिंबे कथेतील विरामचिन्हांमध्ये पडली आहेत. ;-)

खटपट्या's picture

6 Jul 2014 - 10:38 pm | खटपट्या

पिंपात मेले ओल्या उंदीर

भिकापाटील's picture

6 Jul 2014 - 10:52 pm | भिकापाटील

वरिल प्रतिक्रिया वाचून मान शरमेने खालीगेली. एक मिप्पाकर म्हणून शर्म लगी.
जीवन बौ लगे रहो

आयुर्हित's picture

7 Jul 2014 - 12:20 am | आयुर्हित

"हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती."
खरेच किती उच्च विचार आहेत.

मान गये जिवनभाऊ! जुग जुग जियो!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Jul 2014 - 7:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

समोर खिडकीतुन त्या पुस्तकवाल्या बाबुकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते?

ठ्ठो!!!!!!!

ते लुनावाले ब्रम्हे तुम्हीच काय हो?

खफ वरुन
@खटपट्या: "त्यात मोजीना १० रुपये सापडले." हे चुकिचे वाचले आपण.

१)शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या )पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले.
२)हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती.
३)पण आज मी ठरविले की त्या पुस्तकवाल्या बाबुचे पुस्तक परत करायचे,पण कसे? पंधरा सोळा वर्षापुर्वीचे पुस्तक तो ओळखणार ही नाही आपणाला? मग मीच ठरिवले.सध्याची परस्थिती पाहता त्याला दहा रुपये देण्या ऐवजी शभंर रुपये द्यायचे.

वाचण्या वाचण्यात देखिल कसा फरक पडतो नाही?
त्याला डेल्टा म्ह्णतात का?
@अरुण जोशी सर सांगतीलच याचा स्थिरांक व एकक काय असेल ते.
@माऊ सांगेलच परस्परसंबंधही तसेच तितकेच रहाणार कि नाही आणि केवढा मोठा स्टॉल लागेल ह्या डेल्टाला!

खटपट्या's picture

7 Jul 2014 - 10:55 am | खटपट्या

अहो मी एकटाच नाहीये. बऱ्याच लोकांच्या डोक्यावरून (का डोक्यात ?) गेली आहे हि कथा.
खुलाशा बाद्दल धन्यवाद. पण खुलासाही डोक्यावरून गेलाय

संजय क्षीरसागर's picture

7 Jul 2014 - 11:17 am | संजय क्षीरसागर

ते अधूनमधून विनोद करण्याचा प्रयत्न करतात!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2014 - 12:12 pm | अत्रुप्त आत्मा

*ROFL*

विजुभाऊ's picture

7 Jul 2014 - 11:37 am | विजुभाऊ

पुस्तकाची अ‍ॅप्रीसिएशन व्हॅल्यू कशी काढायची हा नायकाला पडलेला प्रश्न आहे.
शीला ने आय लव्ह यू च्या पुढे २ आकडा लिहून त्या प्रेमकथेचा सीक्वेल काढायचे सुचवले होते. लेखकाने त्या सिक्वेलवर पुढे नक्की काय काम केले ते समजले नाही. बहुतेक रश प्रिन्ट्स बघितल्यावर कल्पना निगेटीव्हसह सगळे हक्क दुसर्‍या डारेक्टरला हस्तांतरीत केले असावेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jul 2014 - 11:53 am | ज्ञानोबाचे पैजार

जीवनाविषयीचादॄष्टीकोनामुलाग्रबदलणारीएकजबरदस्तआशयघनकथामीहीकथाप्रिंटकरुनफ्रेमकरुनमाझ्याघराच्याहॉलमधेलाउनठेवणारआहेवरोजसकाळदुपारसंध्याकाळवाचणाराअहेयामहानकथेच्यामहानलेखकालाशिरसाष्टांगनमस्कारपैजारबुवा

स्क्रिन छोटा पडला वाचायला.
मिपावरचा रेकॉर्डतोड मोठ्ठा शब्द!

संपूर्णकथाअशीचेकाओळीत्प्रिंट्करुन्लावणार्काखूपमोठाहॉलआणिखूपमोठीभिंतआणिखूपमोठीफ्रेमलागेल.

अरेअरेअरेमिपाकरांनोकायकळतंयकीनैधागाकायकथाकशीगंभीरआणिप्रतिक्रियाकशादेतायएकमिपाकरम्हणूनमानशरमेनेखालीगेलीतीपरतझोपआल्यामुळेतशीचराहिलीzzzzzzzzzzzzzzzz..........

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2014 - 3:45 pm | प्रसाद गोडबोले

अवघड आहे .

ही कथा इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमातील नरेन्दबासां भेटि अनुसरण ह्या धड्या इतकी अवघड आहे समजायला !

मोजींचिये दादुलेपनाचा उबारा| न साहावेचि मिपा-माबो-करा|| ....

मोजींचिये दादुलेपनाचा उबारा| न साहावेचि मिपा-माबो-करा|| ....

ठ्ठो =)) =)) =)) धन्य. _/\_

एस's picture

10 Jul 2014 - 10:37 am | एस

ज्जे बात!

जीवन्भौन्सा पोटि: अनुपचन ;-)

बॅटमॅन's picture

11 Jul 2014 - 1:01 pm | बॅटमॅन

अथ पूर्वाख्यानम्

मिपावरी अनेक लेखक-कवी: येकदा बहुत वादु जाहला: त्वां चांगला की म्यां याजवरोनि: बहुत गदारोळु माजला: तेव्हा मिपावाणी जाहाली: आक्रंदो नका, नका जनहो: येकचि आहे वादा: नाम तयासी जीवनदादा: तेहाची कथा वाचोनु: मगच ठरवा उत्तम कोणु: मिपाकरें 'हां' भणितले: मग तेणे जीवने आनेक कथामंडित कथाख्यान नाम ग्रंथु लिहिला: तो आपुलाले मिपाकरांपुढा टाकिजला: वाचोनी तेथ जें ही बैसले होते: येकसरिसे मूर्च्छित पावले: तेव्हा गोडबोलियांचिया प्रसादे भणितले: मोजींचिया दादुलेपनाचा उबारा: न साहावेचि मिपा-माबो-करां: भेण वोसरोनि धीर करा: वाचाल तर्‍हीं परौते::

यावरि जनलोकें भणितले: या ग्रंथाचा अभंगु मज देयावा: म्या जेतुकीया कथा तेतुकी विडंबने आणिक चौथरीया प्रतिसादू देईनः त्यासि जीवनभावू उत्तरले: 'ना मिपाकरहो: आमुचेया जीवनकुळा बोलु लागैलः' मिपाकरांचा गर्वु हरिला: तयांसी थोर चमत्कारू जाहला: येकच कोलाहलू जाहला: ग्रंथाचा अभंगुही न घेता: पदरी वोवाळणि घातली असे: समस्त मिपानगरीचिया ढवळारी येकचि शब्दु: सकळा लेखकांपरीस, हा लेखकू चतुरः

-इति जीवनभाऊंचा दृष्टांतु: मूळप्रत पानशेत-पुरी: गेली चिरकालिक अंधारी:

प्रचेतस's picture

11 Jul 2014 - 1:31 pm | प्रचेतस

=))

मुक्त विहारि's picture

12 Jul 2014 - 2:39 pm | मुक्त विहारि

जबरा...

टवाळ कार्टा's picture

12 Jul 2014 - 3:31 pm | टवाळ कार्टा

_/|\_

चित्रगुप्त's picture

12 Jul 2014 - 5:10 pm | चित्रगुप्त

आहेत बहु, होतिल बहु, परि ब्याट्यासम ब्याट्याच.

मुक्त विहारि's picture

12 Jul 2014 - 7:11 pm | मुक्त विहारि

+ दहा हजार

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2014 - 12:24 am | डॉ सुहास म्हात्रे

१०० % सहमत !

नाखु's picture

24 Jul 2014 - 12:46 pm | नाखु

बॅट्या हे संशोधन अर्धवट ठेऊ नका आणखी ग्रंथ संपदा खुली करा पामरांसाठी.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2014 - 10:34 am | अत्रुप्त आत्मा

@-इति जीवनभाऊंचा दृष्टांतु: मूळप्रत पानशेत-पुरी: गेली चिरकालिक अंधारी:>>> http://www.smileyvault.com/albums/CBSA/smileyvault-cute-big-smiley-animated-013.gif
अरे खाटुक! मेल्या,मारशील एखाद दिवस हसवून हसवून!!! =))

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2014 - 10:36 am | अत्रुप्त आत्मा

@-इति जीवनभाऊंचा दृष्टांतु: मूळप्रत पानशेत-पुरी: गेली चिरकालिक अंधारी:>>> http://www.smileyvault.com/albums/CBSA/smileyvault-cute-big-smiley-animated-013.gif
अरे खाटुक! मेल्या,मारशील एखाद दिवस हसवून हसवून!!! =))

धाग्यापेक्षा प्रतिसाद खतरनाक!

यसवायजी's picture

9 Jul 2014 - 10:08 pm | यसवायजी

बस कर पगले, अब रुलाएगा क्या?

भृशुंडी's picture

10 Jul 2014 - 12:00 am | भृशुंडी

विनोदी समीक्षा वगैरेचा प्रयत्न होता का?
जमलं नाहीये. लिखाणात जीवनभौंची उंची गाठायला बराच वेळ लागेल..

थॉर माणूस's picture

10 Jul 2014 - 10:27 am | थॉर माणूस

तीन दिवस उलटून गेल्यावरही जीवनभौंच्या धाग्याने शंभरी पार न केल्याचे पाहून एक.... वगैरे वगैरे.

जीव़नभौ तुम़ लिख़ते रहो, हम़ तुम्हारे फ़ँन हय़.

संवेदनशील मनाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण देणार्‍या कथा लिहीणे हा जीवनभौंचा हातखंडा आहे. अवतीभवती घडणार्‍या घटनांकडे ज्या निर्वीकारपणे ते बघतात त्याच निर्वीकारपणे ते कथा लिहीतात ह्यातच त्यांच्या लिखाणाचे यश सामावले आहे.

'अ‍ॅबस्ट्रॅक्ट किंवा अमूर्त' शैलीत कसे लिहावे ह्याचा वस्तूपाठ ठरावा अशी ही कथावस्तु साध्या साध्या घटनांमधे जीवनाची मुल्ये शोधण्याचा जो अमूर्त प्रयत्न करते तो मराठी साहित्याला अनोख्या उंचीवर नेण्याचा स्तुत्य प्रयोगच म्हणावा लागेल. असे प्रयोग करणे ही जीवनभौंची खासियत आहे.

- (अ‍ॅबस्ट्रॅक्ट झालेला) सोकाजी

जीवंभौंना माणाचा मुजरा...

नशिब अनुस्वार स्टाँल वर दिलाय. बाबू वर दिला असता तर मिपाकरांनी जीवनभौंना डोक्यावरच घेतलं असतं!

प्यारे१'s picture

23 Jul 2014 - 1:26 am | प्यारे१

गाडीवर (अनु)स्वाराला बसवलं नाही हे तर मिपाकरांवर केवढे उपकार =))

प्रसाद गोडबोले's picture

23 Jul 2014 - 12:01 pm | प्रसाद गोडबोले

=))