(दूर आहे डेडलाईन अजूनि)

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जे न देखे रवी...
31 Jul 2008 - 2:15 am

मिपावर एक से एक विडंबने वाचून काही महिन्यांपूर्वी लिहिलेले एक विडंबन इथे पोस्ट करावे असे वाटले :)
-----------------------
('तरूण आहे रात्र अजूनि' हे गाणं एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरच्या नजरेतूनि ...)

दूर आहे डेडलाईन अजूनि, साहेबा पेटलास का रे....
एवढ्यातच मानगुटीवर, तू असा बसलास का रे....

अजूनही सुकल्या न कागदी, रिक्वायरमेंटच्या ओळी
अजून मी लिहले कुठे रे, हाय तू रूसलास का रे ....

सांग या शेजारच्या चटक चांदणीला काय सांगू
तिला पहाया जमती सारे, आणि तू बसलास का रे ....

बघ तुला मिळतोच आहे, पश्चिमेचा मार गोरा
रूपया नि डॉलरमधला फरक तू लुटलास का रे ....

उसळती पीसीवर ह्या, क्रिकेटच्या स्कोअर लाटा
तू भुतासारखा पण एकटा डोकावलास का रे ....

डोळे अजूनि बंद का रे, श्वास ही मग मंद का रे
बोल रिक्रुटरच्या थापेवर, तू असा फसलास का रे ...
------------------------------------------
(टीपः 'डोळे अजूनि बंद...' ही ओळ मूळ गाण्यातली आहे)
------------------------------------------
www.atakmatak.blogspot.com

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

शितल's picture

31 Jul 2008 - 7:03 pm | शितल

अरे सह्ही विडंबन केले आहेस.
दूर आहे डेडलाईन अजूनि, साहेबा पेटलास का रे....
एवढ्यातच मानगुटीवर, तू असा बसलास का रे....
:)

प्राजु's picture

31 Jul 2008 - 7:05 pm | प्राजु

उसळती पीसीवर ह्या, क्रिकेटच्या स्कोअर लाटा
तू भुतासारखा पण एकटा डोकावलास का रे ....

हे मस्त आहे.

काही ठिकाणी लय थोडी चुकते आहे. पण ओव्हर ऑल विडंबन सह्ही..
तरूण आहे रात्र अजूनी हे माझे अतिशय आवडते गाणे आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

31 Jul 2008 - 7:07 pm | शितल

प्राजु हे गाणे तु परवा कट्याला म्हणणार होतीस.
हाय तु विसरलीस का ग ! ;)

प्राजु's picture

31 Jul 2008 - 8:47 pm | प्राजु

विसरले... तू आठवण नाही केलीस.
असो.. आवांतर बोलणे इथे नको.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

1 Aug 2008 - 12:29 am | विसोबा खेचर

मस्त विडंबन रे! :)