वदनी कवळ घेता.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
30 Jul 2008 - 8:27 pm


स्वाद नावाच्या एका हॉटेल मध्ये गुरुवारी मी न विसरता (विसरणार कसा? उपास असतो ना) साबुदाण्याची खिचडी खायला जातो. कर्व्यांचा , हॉटेलच्या मालकांचा हात सढळ आहे. भरपूर खिचडी देतात. वर्षभरापूर्वी स्वाद चा डायनींग हॉलचं इंटेरीयर परत झालं तेव्हा मी हे पेंटींग मी पाह्यलं. एव्हढं जिवंत चित्र. मी या पेटींगच्या प्रेमात पडलो. कर्व्यांच्या पाठी पडून चित्रकाराचा फोन नंबर मिळवला. भेटीची वेळ ठरवली . आणि ...
माय गॉड ! मला अलीबाबाची गुहा सापडली.पुढचे तीन तास मी मंत्रमुग्ध अवस्थेत!
बाहेर पडलो आणि त्या किमयागारावर लेख लिहायला सुरुवात केली.
तो लेख पूर्ण होईपर्यंत या पेटींगचा आस्वाद घ्या.
या बसा जेवायला.वाफाळते मोदक तुमची वाट बघतायत.
वदनी कवळ घेता......

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

शितल's picture

30 Jul 2008 - 8:35 pm | शितल

लाजबाब
नजर बांधुन ठेवणारे चित्र आहे.
खर्ंच कोणत्या हॉटेल मध्ये आहे आणि चित्रकाराचे नाव काय.
राजा रवि वर्मा यांच्या पेटींग मध्ये ही अशीच नजर बाधुंन ठेवण्याची ताकद होती. :)

नारायणी's picture

30 Jul 2008 - 8:41 pm | नारायणी

अगदी खरं!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 8:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्र खरंच सुरेख आहे .... पण लेखाचं नाव पाहून मी वाचावं का न वाचावं असा विचार करत होते थोडा वेळ ... काही उपदेशपूर्ण लेख निघाला तर अशी भीती वाटत होती. पण हा तर सुखद धक्का बसला.

अदिती

छोटा डॉन's picture

30 Jul 2008 - 8:55 pm | छोटा डॉन

रामदाससाहेब, काय बोलु आता ?
अतिशय जबरदस्त चित्र, ती शैली वगैरे काही मला कळत नाही पण नजर खिळुन राहते हे नक्की ...
अगदी लहानामधले लहान बारकावे पण अगदी व्यवस्थीत टिपले आहेत. कदाचित त्यामुळेच "नजरबंदी" करणारे ...

एखाद्या घरंदाज व जुन्या वळणाच्या ब्राम्हणकुटुंबातील रात्रीच्या भोजनाचे सुरेख चित्रण ...
संस्कॄती किंवा रितीरिवाज काय आहेत ते आपण हे चित्र पाहुन लगेच सांगु शकतो ...

वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।।
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणी जे यज्ञकर्म ।।

वाह, क्या बात है. धन्यवाद !!!

अवांतर : हे चित्र पाहुन मला आमच्या गावाकडे कधीकाळी होत असलेल्या "सहस्त्र ब्राम्हणाभोजनाची" आठवण झाली.
तेच वातावरण फक्त हे स्वयंपाकघरात आणि ते प्रशस्त दिवाणखान्यात हाच फरक ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्राजु's picture

30 Jul 2008 - 9:27 pm | प्राजु

किती सुंदर आहे हे चित्र! इतका जीवंतपणा!
सुंदर. हे चित्र बघून मला आमच्या तासगावच्या वाड्यातल्या माजघराची आठवण झाली...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्नेहश्री's picture

30 Jul 2008 - 9:55 pm | स्नेहश्री

Wow............Solid..... माझ्या काकुच्या(बुरंबाडची) व तसेच आत्याच्या दापोलीची ..प्रकर्षाने आठ्वण झाली...पुण्यात पण आईच्या माहेरी अशीच पंगत असायची अस आई नेहमी सांगते.
कलाकार नक्कीच ठाण्याचाच असणार्....खात्रीपुर्वक...!!! :)

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

यशोधरा's picture

30 Jul 2008 - 10:26 pm | यशोधरा

खरोखरच सुंदर चित्र आहे, आता तुमचा लेख वाचायचीही उत्सुकता आहे...

अरुण मनोहर's picture

31 Jul 2008 - 4:36 am | अरुण मनोहर

ऍपॅटायझर तर मस्तच आहे. आता मेन कोर्स येउद्या. जिभल्या चाटत वाट पहात आहे.

घाटावरचे भट's picture

31 Jul 2008 - 4:49 am | घाटावरचे भट

रामदास साहेब, अत्यंत उत्तम चित्र आहे.
मोठ्या लेखाची वाट पाहातोय. लवकर येउ द्यात.....

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥

विसोबा खेचर's picture

31 Jul 2008 - 7:38 am | विसोबा खेचर

रामदासराव,

सुरेख चित्र आहे. हे चित्र मीदेखील स्वादमध्येच पाहिलं होतं. मंडळी छानपैकी जेवायला बसली आहेत. आणि घरची लक्ष्मी चुलीवर गरमागरम भाकर्‍या करत आहे. क्या बात है! साला, लाईफमध्ये आणि काय पाहिजे? :)

रामदासराव, आज गुरुवार आहे. आज स्वादमध्ये खिचडी खायला किती वाजता येणार आहात? :) मला फोन कराल का प्लीज? आपल्याला भेटायची मनिषा आहे.

तात्या.
९८२०४९४७२०.

धमाल मुलगा's picture

31 Jul 2008 - 12:27 pm | धमाल मुलगा

अहो काय सुंदर चित्र आहे.
ज्यानं कोणि हे चित्र काढलं आहे, त्याच्या जादू आहे बॉ हातात !!!!

वडिलांशेजारी रांगणार्‍या त्या लहान मुलाचे भाव काय सही पकडलेत चित्रात.

आणि चूल, जातं, तांब्याच्या कळशा,हंडे...लाकडी दार, गणपतीचा फोटो, कोनाडा...सगळं सगळं कसं माझ्या आजोळची आठवण करुन देतंय.
वडिलांच्या आजोळीही हे असंच. मग पणजी जेवण्यापुर्वी हा श्लोक म्हण, तो म्हण करायची, आणि जो चित्राहुती घालायला विसरेल त्याला शिक्षा म्हणून खारातली मिरची नाही वाढायची :( एकदम आठवण झाली तिची.

एकदम फर्मास!!!
येऊद्या आणखी चित्रं आणि त्या जादूगारावरचा लेख पटकन :)

नंदन's picture

31 Jul 2008 - 12:32 pm | नंदन

चित्र. लेखाची वाट पाहतो आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jul 2008 - 12:37 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच चित्र आहे साहेब. हुबेहूब. कारागिरी तर आहेच पण डीटेलींग पण छान आहे.

आमचा वाडा पडला आता, पण मागे लहानपणी जायचो तेव्हाचे आठवते आहे. सकाळी सकाळी जागच यायची ती चुलीवर पाणी तापत असायचं, त्या धुराच्या वासाने. मग न्याहरी. दुपारचे जेवण पण असेच चुलीसमोर बसून. आणि चूल शांत झाली (विझली नाही म्हणायचं) की त्या धुमसणार्‍या राखेत भुईमूगाच्या शेंगा टरफलासकट टाकायच्या. सगळ्यांची जेवणं आटोपे पर्यंत त्या शेंगा मस्त भाजून निघायच्या. मग गप्पा मारत मारत त्या एक एक फोडून खायच्या.

एका क्षणात सगळ्या आठवणी जाग्या करून दिल्या तुम्ही, साहेब. धन्यवाद. आता पुढच्या भागांची वाट बघतो आहे.

बिपिन.

स्वाती दिनेश's picture

31 Jul 2008 - 12:42 pm | स्वाती दिनेश

काय जिवंत चित्र आहे! लेखाची वाट पाहत आहेत सगळेच..लवकर येऊ दे..
स्वाती

अन्जलि's picture

31 Jul 2008 - 1:33 pm | अन्जलि

स्वाद कोठे आहे ? फोटोच इत़का छान आहे तर ...प्रत्यक्श जाउन बघण्याचि तिव्र इछा आहे. खुप छान.

झकासराव's picture

31 Jul 2008 - 2:06 pm | झकासराव

चित्र अप्रतिमच आहे.
ह्या चित्रात त्या बाबांच्या मांडीवर दोन्ही हात ठेवुन एक बाळ कुतुहलाने बाबांच्या चेहर्‍याकडे बघत आहे. अगदि डिट्टो माझा पोरगा (वय दहा महिने) करतो. :)
फक्त तो एवढा स्वस्थ नसतो. चुळबुळ करुन माझ्या मांडीवरुन पलिकडे माझ्या ताटात त्याला उडी मारायची असते. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वटवाघूळ's picture

31 Jul 2008 - 2:32 pm | वटवाघूळ

रामदासराव
लहानपनिचि आटवण झालि मजा आलि

वटवाघुळ
Batman

पद्मश्री चित्रे's picture

31 Jul 2008 - 2:48 pm | पद्मश्री चित्रे

चित्र सुन्दर आहे अगदी. जिवंत वाटतं..
स्वाद्-ठाण्य्यत रेल्वे क्वार्टेर्स मधुन ब्राम्हण सोसायटी त जाताना आहे ते का?
जायला हवं-चित्र पहायला नि खिचडी खायला...

चित्तरंजन भट's picture

31 Jul 2008 - 2:59 pm | चित्तरंजन भट

चित्र अगदी पंगतीला बसावेसे वाटायला लावणारे, भूक चाळवणारे आहे. चांदोबाच्या काळात गेलो. प्रकाशाचा वापर छान. चूल, कळश्या वाव्वा. भट आणि भटीण छान. मुलांच्या चेहर्‍यांच्या रेखाटनात बारकावे नीट आणि स्पष्ट नाहीत. त्या बाळाचे हातपाय आणि डोके जरा अजून व्यवस्थित रेखाटता आले असते बहुधा. किमान ह्या छोट्या प्रतिमेवरून तरी असेच वाटते. मोठी चित्रप्रतिमा बघायला मिळाल्यास आवडेल.

नीता's picture

31 Jul 2008 - 3:13 pm | नीता

चित्र खुप् मस्त आहे.....चतुर्थि चा उपास सोडताहेत बहुदा......
खूप आवड्ले......

लेखाची वाट पहात आहे....

शार्दुलक्दम's picture

1 Aug 2008 - 12:36 am | शार्दुलक्दम

ओघवति भाशा , आहे.
मला लिखान आवड्ले.

मदनबाण's picture

1 Aug 2008 - 11:33 am | मदनबाण

काका तुम्ही म्हणता:-- पुढचे तीन तास मी मंत्रमुग्ध अवस्थेत!
आम्हालाही ते क्षण अनुभवायचे आहेत तेव्हा लवकर दुसरा भाग टाका..

(मोदक प्रेमी)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मनस्वी's picture

1 Aug 2008 - 11:56 am | मनस्वी

खरोखरीच अप्रतिम आणि अतिशय बोलकं चित्र आहे. चुलीतील निखारे, चूल, तांब्याच्या कळशा, तांब्याचा बंब, कढईतील आमटी आणि इतर सर्व पदार्थ, पितळी परात, पातेलं आणि सगळी भांडी.. म्हणजे आख्खा संसारच जिवंत वाटतोय!

मी या पेटींगच्या प्रेमात पडलो. कर्व्यांच्या पाठी पडून चित्रकाराचा फोन नंबर मिळवला.

मानलं तुम्हाला रामदास काका!

किमयागार आणि त्याची अलीबाबाची गुहा बघायला उत्सुक आहे! लवकर येउद्यात!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

प्रमोद देव's picture

1 Aug 2008 - 12:09 pm | प्रमोद देव

हे ह्या चित्राचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे असे मला वाटते. त्यामुळे चित्र जीवंत वाटतेय.
स्वयंपाक घरातली भांडी,त्यातले पदार्थ वगैरे अगदी खरेखुरे वाटताहेत.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

चतुरंग's picture

1 Aug 2008 - 9:28 pm | चतुरंग

चित्राची मांडणी, रंगसंगती, बारकावे टिपणे, व्यक्तींच्या चेहेर्‍यावरचे भाव सगळेच वेगळे आहे. चित्रात एकप्रकारची शुचिर्भूतता अनुभवाला येते आहे.
अजून मोठ्या आकारात बघायला आवडेल आणि लेखही पटकन येऊदे रामदास!

चतुरंग