नमस्कार.
माझी लहान बहीण २९ जुन ते २९ जुले ह्या कालावधीत कंपनी तर्फे stuttgart जर्मनीत प्रोजेक्ट साठी जातेय्.त्यासाठी काही महिती हवि आहे,जसे की काय काळजी घ्यावी,तिथे आजुबाजुला काय काय फिरन्यासरखी ठीकाणे आहेत, आणी कही सुचना असल्यास जरुर सांगाव्यात.
आभारी आहे
प्रतिक्रिया
7 Jun 2014 - 12:58 pm | मधुरा देशपांडे
सध्या इकडचा उन्हाळा सुरु झाला आहे, जुलै मध्ये अंदाजे सर्वसाधारण तापमान २५ ते ३० डिग्री असू शकते.
फिरण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उत्तम आहेत. जमेल तेवढे नक्की फिरायला सांगा. फिरण्यासाठी काही जवळची आणि चांगली ठिकाणे -
१. मर्सिडीज संग्रहालय - केवळ भारी गाड्या बघणे यापेक्षाही अजून काही. जर्मनीतील वाहन उद्योगाची सुरुवात ते आताच्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास अत्यंत माहितीपूर्ण आणि उत्तम रित्या दाखवला आहे.
२. पोर्शे संग्रहालय - वरील प्रमाणेच परंतु छोट्या स्वरुपात.
३. हायडेलबर्ग - स्टूटगार्ट हून ट्रेन आहेत. एक छोटेसे, टुमदार आणि सुंदर गाव.
४. ब्लॅक फॉरेस्ट - फ्रायबुर्ग, ओफेन्बुर्ग ही प्रमुख स्थळे आणि शिवाय येथे संपूर्ण भागाची सफर घडवून आणणाऱ्या ट्रेन आहेत. एका दिवसात फिरण्यासाठी उत्तम.
५.जवळच जर्मनी फ्रान्स बॉर्डर वर असलेले स्ट्रासबुर्ग शहर.
हे सगळे साधारण २ तासांच्या अंतरावर असलेले पर्याय. स्टूटगार्ट मध्ये अजूनही काही जागा असतील ज्या त्यांच्या तेथील कलीग्स कडून कदाचित कळू शकतील.
जर्मनी हा अत्यंत सुरक्षित देश आहे. काळजी घेण्यासारखे वेगळे असे काही नाही. एक पर्यटक म्हणून इतरत्र कुठेही फिरताना घ्यावी तशीच. म्हणजे मोठ्या शहरात पाकीटमारी तत्सम प्रकार घडू शकतात पण प्रमाण अगदी कमी.
मोठ्या शहरात इंग्रजी सहज चालून जाइल. स्टूटगार्ट मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपनीज असल्याने तेवढा त्रास होत नाही. परंतु तरीही बरेचदा दुकानात किंवा कुठेही स्वतःहून सुरुवात जर्मन मध्येच होईल. मला जर्मन येत नाही, कृपया इंग्रजीतून सांगू शकाल का असे सांगण्याची वेळ येऊ शकते. किंबहुना येतेच. लहान गावांमध्ये लोक इंग्रजी बोलण्यास उत्सुक नसतील. काहींना इंग्रजी येत नसेल तर काही जण येत असूनही बोलणार नाहीत. पर्यटक म्हणून फिरताना ज्या प्रमुख गोष्टी लागतील, उदा. तिकीट काढणे वगैरे त्यासाठी बहुतांशी काही प्रश्न येणार नाही.
अजून काही आठवले तर लिहीतेच. तुमच्या बहिणीला शुभेच्छा.
अधिक माहिती लागल्यास व्यनि/खव द्वारा संपर्क साधू शकता.
7 Jun 2014 - 1:07 pm | vrushali n
धन्यवाद तै.
7 Jun 2014 - 2:35 pm | कंजूस
रेल्वे म्युझिअम पाहाच .मी काही जर्मनीला गेलो नाही पण जर्मनीचा DW TV चानेल रोज बघतो .यात 'डिस्कवर जर्मनी' कार्यक्रमात अर्धा तासभर निरनिराळी ठिकाणे दाखवतात .dw-tv.de/english येथे नेटवरती दिसेल .एकदा क्रिसमस निमित्ताने हे रे०म्यु० पूर्ण दाखवले होते (बहूतेक २०११ डिसेंबर) .दोन भावांनी स्वत: बनवले आहे .जगातल्या मोठ्या रे० स्टे०च्या हुबेहुब प्रतिकृती खऱ्या छोट्या गाड्या त्यांच्या वेळेवर धावतात .आजूबाजूच्या इमारती पण तशाच आहेत .एवढेच नाही तर कुठे तरी आग लागते ,बंब येतात ,विझवतात ,ट्राफिकजाम पण होते .जगात एकमेव आहे .
अडीचशे किमी वेगासाठीच्या ऑटोबानवर प्रवास आणि इतक्याच वेगाने रेल्वेने जाण्यासाठी (खरं तर चारशे किमीसाठी चा ट्रैक आहे) वेगाची वाराणसी डॉषलैंड (=जर्मनी) गाठावी लागते .नुकतेच जर्मन अंतराळवीर अलेक्झानडर गेस्ट ची निवड पुढील चंद्र आणि मंगळयानासाठी नासाने केली आहे .
7 Jun 2014 - 8:34 pm | आत्मशून्य
7 Jun 2014 - 9:48 pm | भाते
निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी, दिव्यश्री आणि प्रभाकर पेठकर यांना व्यनि करून झोपेतुन जागे करा. त्यांच्याकडुन बरीच माहिती मिळेल.
8 Jun 2014 - 1:25 am | निनाद मुक्काम प...
स्टूटगार्ड
आतच माझ्या पत्नीस विचारले , हे शहर तिच्या गावापासून तासाच्या अंतरावर आहे ,
येथे पाहण्यासारखे आहे प्राणी संग्रहालय
विल हेल्मर
जर्मनी मधील म्युनशन ,स्टूटगार्ड . बर्लिन चे प्राणी संग्रहालय पाहण्यासारखे आहेत.
8 Jun 2014 - 2:13 am | प्रभाकर पेठकर
माझे जर्मनीतील मार्गदर्शक निनाद आणि दिव्यश्री. दोघांचेही मौल्यवान मार्गदर्शन मला लाभले.
माझ्या आवडीनुसार हिटलरकालीन यातनागृह (कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स) पाहण्यासाठी मी निनाद आणि दिव्यश्री समवेत डकावला गेलो होतो.
यातनागृह मला आवडले असे, मीच काय, कोणीही म्हणू शकणार नाही. पण भेटीचे सार्थक झाले. तसेच बर्लीन भिंत पाहिली. ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची इच्छा असेल तर ह्या दोन्ही ठिकाणांना भेट द्यावी. जागतिक इतिहासात ह्या दोन्ही स्थळांना अनन्यसाधारण महत्व आहे. पुन्हा कधी जर्मनीस गेलो तर, पुन्हा एकदा डकाव आणि इतर हिटलरकालीन स्थळं आणि त्याच बरोबर आधुनिक जर्मनीची ओळख दाखविणारी आणि निसर्गरम्य स्थळं पाहायला मी आवर्जून जाईन.
ह्या निमित्ताने माझे जर्मनी आणि इटलीचे लेख बाकी आहेत ते टाकण्यासाठी वेळातवेळ काढावा लागणार ह्याची मला जाणीव आहे.
8 Jun 2014 - 3:04 am | निनाद मुक्काम प...
आणि हो ,
काकांनी म्हटले तसे जर ऐतिहासिक , परंपरा व आधुनिकता जेथे एकाचवेळी नांदते अश्या आमच्या म्युनशन ला भेट देणार असाल तर मला व दिव्यश्री ला जरूर कळवावे ,
ता, क
काका परत युरोप दौरा करणार असाल तर एखाद्या अनोळख्या देशात तुमच्यासारख्या मी सुद्धा भटकंती करेल.
8 Jun 2014 - 10:23 am | प्रभाकर पेठकर
>>>>काका परत युरोप दौरा करणार असाल तर एखाद्या अनोळख्या देशात तुमच्यासारख्या मी सुद्धा भटकंती करेल.
नक्की कळवेन निनाद. आम्हालाही तुम्हा दोघांचीही साथसंगत आवडली आणि आम्ही आमच्या सहलीची पूर्ण मजा घेऊ शकलो.
जाऊ आपण कुठेतरी जवळच. तसे, क्रॅकॉव (पोलंड) 'सॉल्ट माईन्स' पाहायची आहे. ऑस्ट्रिया सुद्धा यादीत आहे. बघूया कधी जमते ते.
8 Jun 2014 - 6:42 am | दिपोटी
कामानिमित्त गेल्या वीस वर्षांत बर्याच वेळा स्टुटगार्टला जाऊन आलो आहे, त्या अनुभवावर आधारित काही ठळक प्रेक्षणीय स्थळांची यादी (पसंतीक्रमानुसार) खाली देत आहे ...
१) Neuschwanstein Castle : एखाद्या परीकथेत शोभून दिसेल असा एक अत्यंत अप्रतिम व देखणा राजवाडा
२) Titisee-Neustadt : स्टुटगार्टच्या दक्षिणेस ब्लॅक फॉरेस्ट प्रदेशातील (Black Forest region) एक नयनरम्य ठिकाण/गांव ... जगप्रसिध्द 'कक्कू क्लॉक'चे माहेरघर ब्लॅक फॉरेस्ट प्रदेश असल्याकारणाने येथे लहान-मोठ्या 'कक्कू क्लॉक्स'ची बरीच दुकाने मार्केटमध्ये शेजारीशेजारी दिसतील. जुलै महिन्यात सर्वसाधारणपणे हवामान उत्तम असते, तेव्हा एखाद्या चांगल्या हवामानाच्या दिवशी सकाळीच पोहोचल्यास दिवसभर फेरफटका मारायला व हिंडा-फिरायला सुध्दा हे गांव एकदम मस्त छान आहे.
३) Heidelberg Castle (Heidelberger Schloss) : स्टुटगार्टच्या उत्तरेस असलेला एक प्रेक्षणीय राजवाडा
४) Lake Constance (Bodensee) : (जवळजवळ क्षितिजापर्यंत पोहोचणारा असा) एक अतिभव्य तलाव.
जाण्याआधी विकिपीडीयावर या स्थळांची आधी माहिती पाहिल्यास बरे होईल.
ट्रेनच्या सोयीची कल्पना नाही - सोयीस्कर असल्यास हा पर्याय देखील चांगला आहे. एखाद्या ओळखीच्या स्थानिक व्यक्ती/सहकारीची साथ व गाडी मिळाल्यास बरेच सोपे जाईल. प्रथमच जात असल्यास (व ट्रॅफिकची दिशा भारतातील ट्रॅफिकच्या दिशेच्या विरुध्द असल्याने) भाड्याची गाडी न घेतलेलीच बरी. (पहिल्यावेळेस गाडी चालवताना पोटात भलामोठा गोळा आला होता म्हणून माझ्या एका अनुभवी सहकार्याला गाडी चालवण्याची विनंती केली. पुढील वेळेपासून - दुसरा पर्याय नसल्याने - गाडी चालवायला लागलो व लवकरच रुळलो देखील.)
- दिपोटी
8 Jun 2014 - 6:46 am | दिपोटी
वर मधुराने सांगितलेल्या स्ट्रासबुर्ग शहराबद्दल एक मुद्दा ... येथील एक प्रसिध्द प्राचीन चर्च जरुर पहाणे ... अत्युत्तम आर्किटेक्चर ... बघायलाच हवे असे.
- दिपोटी
8 Jun 2014 - 8:20 pm | मधुरा देशपांडे
ट्रेन संबंधी अधिक माहिती
http://www.bahn.de/i/view/DEU/en/index.shtml
या वेबसाईट वर माहिती मिळू शकेल. यात फास्ट ट्रेन्स, लोकल आणि छोट्या अंतरावरील ट्रेन्स अशी सगळी माहिती मिळेल. शिवाय विकांताला किंवा आंतरराज्य, इत्यादी सवलतीतील तिकिटे याबद्दल देखील माहिती मिळेल.
उपयुक्त मोबाइल अॅप -
https://play.google.com/store/apps/details?id=de.hafas.android.db&hl=en
8 Jun 2014 - 8:53 pm | भाते
निनाद आणि पेठकर काका.
बघितलं धाग्यावरच साद दिल्याचा परिणाम! लग्गेच प्रतिसाद आला! :)
8 Jun 2014 - 10:21 pm | vrushali n
तिथे फारसे कोणी ओळखीचे नसल्याने वरील सर्व माहीती अतीशय उपयोगी आहे.
तिचे म्युनशनला येणॅ झाले तर नीनाद व दिव्यश्री ह्यांना जरूर कळवेल.तुमच्या आ॑पुलकी मुळे भारावुन गेले आहे.
मधुरा देशपांडे ताई ट्रेन संबंधी माहीतीबद्दल बहुत आभार,ती ऑफीसला ट्रेननेच येने जाने करणार आहे
10 Jun 2014 - 9:17 pm | केदार-मिसळपाव
तर मग रहाण्याची व्यवस्था कंपनीने केलेली असेल.
खाण्याची व्यवस्था-
भारतीय जेवण:
Indisches Restaurant Ganapati
Schloßstraße 33
70174 Stuttgart
फोनः0711 91274561
Indian Palace
Steinstraße 11
70173 Stuttgart
फोनः 0711 6724460
Ganesha Restaurant
Lembergstraße 19
70186 Stuttgart
फोनः0711 4687981
भारतीय किराणा सामान मिळण्याचे ठिकाण
Indian Store
Augustenstr. 63/1,
D-70178, Stuttgart, Germany
Phone: 0049-711-617114
सध्या जाम मस्त वातावरण आहे जर्मनीत (युरोपात) तेव्हा मस्त फिरा आणी भरपुर मजा करा.
शुभेच्छा.
12 Jun 2014 - 11:21 am | vrushali n
इंडीयन जेवणाची सोय झाली की कुठेही रहाण सुसह्य होत.
मला एक विचरयच आहे,तिथले फॉरेन Brand चे shampoo conditioner आणी इतर वस्तु परत येताना कितीही आणता येतात का लगेज मधे मागे टाकुन?
12 Jun 2014 - 12:04 pm | सुनील
तुमचा बॅगेज अलावन्स पूर्ण भरेपर्यंत (बहुधा २३ किलो प्रति बॅग) आणता येतील की!! ;)
12 Jun 2014 - 1:03 pm | vrushali n
तसे नाही,liquids आणन्यास मनाइ असते ना बर्याचदा म्हणुन विचारले हो
12 Jun 2014 - 1:09 pm | केदार-मिसळपाव
आणी त्यची पावती ठेवा सोबत.
12 Jun 2014 - 1:09 pm | केदार-मिसळपाव
आणी त्याची पावती ठेवा सोबत.
12 Jun 2014 - 1:15 pm | vrushali n
सांगते बहीणीला तस
12 Jun 2014 - 1:14 pm | सुनील
अहो, मनाई असते ती हात-बॅगेतून आणण्यास. चेक-इन बॅगांतून आणा की हवे तेवढे लिक्विड!! ;)
(नेहेमी दोन बाटल्या लि॑क्विड आणणारा) सुनील
12 Jun 2014 - 1:17 pm | vrushali n
*lol*
12 Jun 2014 - 1:43 pm | प्यारे१
ते दोन बाटल्या लिक्विड चेक इन बॅगेमध्ये अलाउड असतंय काय?
आम्ही 'डुटी फ्री' मधून घेऊन केबिन लगेज ला टाकतो ब्वा!
12 Jun 2014 - 11:55 am | ऋषिकेश
नुकताच त्या ट्रीपवरून परतलो आहे. स्टुटगार्टला चार दिवस होतो.
त्याचे प्रवासवर्णन इथे लिहितो आहे त्यातून बरीच माहिती मिळेल
12 Jun 2014 - 1:09 pm | vrushali n
भरपुर प्लानींग करुन केलेली दिसतेय सहल.आवड्तेय वाचायला
12 Jun 2014 - 5:00 pm | ऋषिकेश
होय मला ट्रीप इतकंच त्या ट्रीपचं प्लानिंग आवडतं
माझा छंदच आहे म्हणा ना, तहान भूक विसरून जातो अगदी ट्रीपचे प्लॅनिंग करताना
12 Jun 2014 - 2:18 pm | यसवायजी
http://www.misalpav.com/node/26384
20 Mar 2017 - 12:57 am | संग्राम
Namaskar .....
Mobile varun type karat asalyamule marathit lihu shakalo nahi tyabaddal kshamasva .....
Project nimitta Hannover yethe family sobat April 2017 madhye yenar aahe ... Jar koni mipakar Hannover kinva aaspass asatil tar saanga ....thodi madat havi aahe ...