तू गेलीस आणि मीच मला शोधीत राहिलो..
सुकलेली तुटकी स्वप्ने कुरवाळीत राहिलो
अधरांवर उरली एक अधिरशी हूरहूर ओली
कावितेत तुझ्या मी आठवणी गुंफीत राहिलो..
तू गेलिस तेव्हा सांज जराशी ओली होती
नुकतीच पसरली प्रेमफुलांवर लाली होती
तू अश्रूसम पापणीतुनी ओघळून जाता
तो अश्रू ओला चोहिकडे शोधीत राहिलो..
गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी
अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी
बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा
राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो..
तू सर प्रेमाची चातक मी एकला अधिरसा
रोखून श्वास या इथे उभा मी सखे कधीचा
हा श्वास संपता खोल तुझ्या डोहात बुडावे
इतुकेच मागणे नित्य सखे मागीत राहिलो..
© अदिती शरद जोशी
प्रतिक्रिया
29 May 2014 - 5:33 pm | चाणक्य
छान रचना. आवडली
29 May 2014 - 5:38 pm | नानासाहेब नेफळे
तो माझी लोचने मीटो यावी, च्या धर्तीवर.
29 May 2014 - 6:27 pm | अत्रुप्त आत्मा
वाह्ह!!!
29 May 2014 - 8:24 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हि कविता तुमच्या आधीच्या कवितांच्या लेव्हलला नाही वाटत.
कदाचित मलाच समजली नसेल नीट, पण उगाच अस वाटलं.
29 May 2014 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गे स्मरती सखये सांजेच्या त्या वेड्या भेटी
अंतरात अजुनी सलती त्या स्मरणांच्या गाठी
बघ धून आळवीत नित्याची मी होवूनी कान्हा
राधा म्हणुनी तुजला गे हाकारीत राहिलो..
एकदम ख़ास !!!
-दिलीप बिरुटे
30 May 2014 - 2:17 pm | आत्मशून्य
लिखाण आवडले.
- धन्यवाद.
30 May 2014 - 4:03 pm | शेखर बी.
वाह्ह!!!मस्त..