"अभिनंदन.."
धन्यवाद
"पार्टी पाहीजे"
कसली?
"कसली म्हणजे काय. ५८ चे ८५ ची पार्टी मिळालीच पाहीजे"
अरे ़ज्याला मिळाले तो म्हणतो "सो व्हॉट" तर मी उगाच कशाला नाचु गावभर.
"़कमाल आहे. बोर्डावर अधोरेखीत नोंद आहे शाळेत. मॅड्मनी ़़खास उल्लेख केला. तुला बोलला नाही"
नाय बॉ.
"़कमाल आहे.पुढे काय? सायन्स?"
बघु. अजुन काय ठरले नाही.
"तू काय ठरवलयस"?
ठरवणारा मी कोण?
"९० हुकल्याचे फ्रस्ट्रेशन वाट्तेय मला"
अरे हट बे. ९५ आले असते तरी धिरुभाई बोलवणार होता का असे मी नाही तो म्हणतोय.
"ंमग प्रश्नच खुंटला. माझ्याने घराण्याचे नाव ़काढले. ९२.३५. दोन मार्काने शाळेतला पहीला नंबर चुकला. सायन्स चा पेपर री असेस्मेंट ला टाकणार आहे"
तो ़काय म्हणतो?
" पालक म्ह्णुन माझी काय जबाब्दारी आहे की नाही?"
अगदी अगदी. वाढले ़की सांग हां -माझ्याकडुन पार्टी.
"नक्की."
फक्त तुझे घर. घराणे नाही?
"चालेल. पेढे घेउन येइलच. जरा मार्गदर्शन कर"
९३ ला मी काय मार्ग दर्शन करणार बापडा?
"ते ही खरेच"
..... ........ ........................
साधारण ३ आठवड्यानंतर
"चो हे काय ऐकतोय मी? रुईया गेला बाजार एस.आय.एस. सोडुन शाळेचे ज्यु.कॉलेज?"
बर मग?
"तू अशी चू़क कशी करतोयस. अरे जरा बाहेरचे जग बघु दे."
बोंबला. माझा ़काय संबंध? वेळ आली की बघेन म्हणतो.
़"कमाल आहे. क्लास ़कुठला?"
माहीत नाही. त्याची चौकशी सुरु आहे.
"माझ्याचे सुरु झाले. नामां़कित आहे. चांगला आहे. १.५लाख फी आहे."
ओके. लिनियर इक्वेशन.
"म्हणजे"?
नामांकित - चांगला- १.५ लाख - आय. आय. टी रँक
"बरोब्बर. आता रोड मॅप ठरला आहे तर पैशाकडे काय बघायचे?
अगदी अगदी? रोड मॅप म्हणजे?
" ३०० प्लस, पवई इलेक्ट्रॉनिक्स, आय. आय. एम. अहमदाबाद"
हे सगळे एवढ्यात ठरले सुद्धा. वा. वा.
"आता मागे हटायचे नाही ध्येयापासुन"
कुणाच्या?
"माझ्या आणि त्याच्या. तुझा काय म्हणतोय?"
काहीच नाही. ते सगळे मार्कांवर बघु २ वर्षांनंतर असे म्हणतोय.
"हम्म. काळजी करु नकोस चो. प्रायवेट ला डोनेशन दिली की हवी ती स्ट्रिम मिळते"
च्या मारी मी " बर मग" वाला. काळजी कसली? एक लिमिट नंतर शेख तेरी तू देख.
...............
हे २००३-४आहे. आजही आकडे सोडता हीच परिस्थिती आहे.
भाग १- १०व्वी च्या पालकांना समर्पित.
प्रतिक्रिया
29 May 2014 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजुन येऊ द्या. पोरांना मार्काच्या स्पर्धेत जितकं पळवायचं तितकं पालक म्हणुन आम्ही पळवत राहु.
-दिलीप बिरुटे
29 May 2014 - 9:57 am | ऋषिकेश
हे त्या उंदरांचे पालक की मालक!? असो.
29 May 2014 - 11:31 am | सस्नेह
मग काय ? लागा कामाला, अभ्यासाच्या !
29 May 2014 - 11:35 am | पैसा
आय आय टी च्या अॅडमिशनसाठी मुलांना आठवीपासून क्लास लावतात म्हणे. काही ठिकाणी मुलं ११ वी १२ वी ला शाळेत जातच नाहीत. फक्त क्लासेसना जातात असंही ऐकलंय. अवघड आहे. या पोरांना अॅडमिशन नाही मिळाली तर काय?
29 May 2014 - 1:31 pm | विनायक प्रभू
I.A.C.P. I.I.T. Classes
IACP- Immediately After Confirmed Pregnancy
29 May 2014 - 1:44 pm | पैसा
जल्लां! हे म्हणजे हिरवे लोक आधी कार्यालय वगैरे बुक करून ठेवतात आणि मग लग्नासाठी मुली/मुलगे बघायला सुरुवात करतात तशातला प्रकार!
29 May 2014 - 3:27 pm | टवाळ कार्टा
=))
13 Jun 2014 - 12:11 pm | सामान्यनागरिक
अहो हल्ली हेच होत आहे. अगदी आय आय टी नसले तरी प्लेस्कुल्च्या मधे गरोदराहुहिल्यानंतर लगेच् दाखला घेतात.
पुढची पायरे म्हणजे :
आपल्या पोराला जनुकीय तंत्रज्ञान वापरुन बुद्धीमत्ता बदलुन घेणे. म्हणजे पोटात असतांनाच खात्री होईल की हा प्रत्येक परीक्षेत पहिला येणार !
29 May 2014 - 3:14 pm | मुक्त विहारि
आवडला...
29 May 2014 - 3:17 pm | आत्मशून्य
अतिशय आवडला.
-धन्यवाद.
29 May 2014 - 3:44 pm | विनायक प्रभू
काही प्रश्न असल्यास लेखावर विचारावेत. व्य.नी नको. लेखाचा उद्देश पूर्ण होइल.
29 May 2014 - 4:52 pm | आदूबाळ
जबरदस्त!
पुभाप्र!
29 May 2014 - 9:47 pm | धन्या
डॉ. खरे अणि गुरुजींच्या लेखाने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे हे खुपच चांगलं झालं.
या निमित्ताने मी ही बरेच दिवस पडून असलेलं डॉ. व्ही रघुनाथन यांचं शर्यत शिक्षणाची (इंग्रजी: डोन्ट स्प्रिंट दी मॅरेथॉन) हे पुस्तक वाचून काढले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पुस्तकाचा भरही आय आय टी ला प्रवेश मिळणे न मिळणे यावरच आहे.
आजचं शिक्षण हे पुढे चांगली नोकरी मिळावी या हेतूनेच घेतले, दिले जाते. घोकून घोकून परीक्षांमध्ये ओकायचे आणि पुढे सरकत राहायचे हेच आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्राक्तन आहे. शिक्षणामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे हे कुणाच्या गावीच नाही.
काल परवाची गोष्ट. शेजारी राहणार्या माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान मित्राचा फोन आला, "दादा बीईला कॉम्प्युटर इंजिनीयरींगला फर्स्ट क्लास मिळाला आहे, पुढे कुठला कोर्स करु?" मी त्याला कॅम्पसमधून वगैरे जॉब नाही मिळाला का विचारले. नकारार्थी उत्तर येताच मला माहिती असलेले पर्याय सांगितले.
संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळवणार्या तरुणाला "मी पुढे काय करु" हा प्रश्न पडत असेल तर ते शिक्षण व्यवस्थेचे अपयश नव्हे काय?
आज "इंटरनॅशनल" स्कुल्समध्ये मुलांना पूर्वप्राथमिक वर्गात प्रवेश घेण्यासाठी वार्षिक पन्नास हजारापेक्षा अधिक फी मोजावी लागते. जेमतेम तीन वर्ष वयाच्या आपल्या मुलाला/मुलीला या शाळा असे काय शिकवणार आहेत ज्यासाठी एव्हढी मोठी रक्कम आपण मोजतोय हा विचार पालक करत नाहीत. कारणे अनेक असतात. अशा शाळांमध्ये मुले शिकण्यासाठी जात नसतात, पालकांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जात असतात. ती फी शिक्षणाची नसून प्रतिष्ठेची असते. यासाठी मग "जे आम्हाला मिळालं नाही ते त्यांना मिळावं" अशी लटकी सबब पुढे केली जाते.
या पन्नास हजारी इंटरनॅशनल स्कुल्स आणि मनपाच्या शाळा या दोन टोकांमध्ये सर्वसामान्यांना परवडणार्या शुल्कामध्ये अतिशय चांगलं शिक्षण देणार्या शाळा आपल्या आजूबाजूला असतात. पण त्यांचा विचार कुणीच करत नाही.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हल्ली बरेच वेळा व्यक्तीने घेतलेले शिक्षण आणि करत असलेले काम यात दुरान्वयानेही काही संबंध नसतो. दहावी बारावी खुप दूरची गोष्ट झाली, अगदी अभियांत्रिकीच्या पदवीचाही हल्ली काम करताना उपयोग होतोच असे नाही. यंत्र, खाणकाम, स्थापत्य, विद्युत अशा अभियांत्रीकीच्या विदयाशाखांमध्ये शिक्षण घेतलेले अनेकजण आज आयटीमध्ये कीबोर्ड बडवत आहेत.
जवळ पैसा नसेल तर माणसाची अवस्था दयनीय होते हे जरी खरी असले तरी आपल्या मुलाला/मुलीला अर्थार्जनासाठी सक्षम बनवत असताना त्यांचा व्यक्ती म्हणून सर्वांगिण विकास होतोय ना याचाही विचार आई वडीलांनी, पालकांनी करायला हवा. अन्यथा पैसा खोर्याने येईल मात्र आपलं मुल एक व्यक्ती म्हणून आयुष्याबाबत समाधानी नसेल तर त्या पैशाचं काय करणार?