मुंगळा थिअरी

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
22 May 2014 - 2:32 pm

एक मित्र आहे माझा,मैत्रीला वयाचे बंधन नसते म्हणतात तसे,बाबांच्या वयाचा आहे माझ्या,पण मी त्याला अरे तुरेच करतो.कधीतरीच बोलतो,पण भरभरून गप्पा होतात.एकटाच राहतो लग्न झालेले नाही.आई वडील केंव्हाच वारलेले.नातेवाईक सुद्धा जास्त नाहीत. पण पट्ट्या नेहमी आनंदात असतो.भयानक क्रियेटीव आहे.ad agency मध्ये क्रियेटीव डायरेक्टर आहे.डोक्यात सतत नवीन नवीन कल्पना येत असतात.घरी लहान मुलांचे चित्रकलेचे क्लास घेतो.मध्येच विपश्यना काय करून येतो.तो काहीही कधीही करतो.काल बर्याच दिवसांनी बोलणे झाले.त्याला म्हटले तुला एकट्याला कंटाळा नाही का येत? तो म्हणाला रात्री कधी कधी घर खायला उठतं, मग डोक्यात त्याच वेळी भन्नाट कल्पना सुचायला लागतात.
म्हटल काय ?
तर म्हणे आपण आपले घर नेहमी आय लेवल वरून बघत असतो, गेली कित्येक वर्षे... आता डोळे मिटून कल्पना करायची कि आपण एका मुंगळ्या एवढ्या उंचीचे आहोत. आता दरवाज्यापासून घर बघायला सुरवात कर. लिविंग रूम बघ, सोफ्याखालुन कोण बाहेर तर येत नाहीये ना? गाडीच्या आकाराचा टिवी रिमोट. पोत्याच्या आकाराचे पडलेले पॉप कोर्न ..अक्ख घर हळू हळू फिर. किचन मध्ये जा, देव्हार्यात जा, लेणी बघतोस तशा मूर्ती दिसतील. अति प्रचंड.बेड वर फिर,हवे तिथे जा. आजूबाजूने हळू वर निट लक्ष देऊन निरीक्षण करत रहा.घाई नको .. एक एक objet नीट लक्ष देऊन तपासत रहा. कसा वेळ जाईल तुला समजणार नाही. वेगळा perspective मिळेल तुला, 3d visualiser आहेस, तुला अजून सोप्प जाईल.

आयला म्हटलं भारीये हे..

अजून एक फंडा ऐक, म्हटल ऐकवा

आता आपण डायनासोर च्या आकाराचे आहोत असे समज, आणि अक्खा एरिया त्या आय लेवेल वरून फिरून बघ,अजून धमाल येईल.
मेंदूला नेहमी पेक्षा काहीतरी वेगळे विश्लेषण करायला मिळते. मुलं खूप एन्जोय करतात अरे.

अजून एक वेगळा मेंदूचा व्यायाम सांगतो.

Eye - hand co ordination.

ह्यासाठी चित्रकार असलच पाहिजे असं काही नाही हा. एखादी तू बघितलेली वस्तू, व्यक्ती, किंवा काहीही रेखाटायचा प्रयत्न करायचा.इथे चित्र किती सुंदर आलंय ह्याला महत्व नाही तर तुझे डोळे, मेंदू आणि हात एकत्र आले कि कसे काम करतात हे तपासणे महत्वाचे आहे, समजा तू माझे चित्र काढायचा प्रयत्न केलास तर तिसर्या व्यक्तीला न सांगता समजायला हवे कि हा मीच आहे.

म्हटले मान गये उस्ताद..
तेवढ्यात त्याला काहीतरी अजून आठवले, म्हणाला मी वर्चुअल ट्रेक पण करतो. म्हटले आ ? कसा काय
म्हणतो समजा मी आत्ता ऑफिस मध्ये आहे.. खूप काम आहे, तर मी दहा मिनिट वेळ काढतो , रेस्ट रूम मध्ये जातो आणि डोळे बंद करतो.झोपा नाही काढत ऐक पुढे .. तर एका क्षणात मी भर पावसातल्या हरिश्चंद्र गडावर असतो. समोर भयंकर कोकण कडा पसरलेला आहे. तो मी हपापल्यासारखा बघतो.तो भयंकर पाउस माझ्यावर कोसळत असतो, मी पूर्ण भिजलेलो असतो.हातपाय गार पडलेले असतात,हो मी ते सर्व निट जाणवून घेत असतो.मी खरच थंडीने थडथडायला लागतो कडाडणाऱ्या विजा मला दिसतात.अंधारून आलेले आकाश मला दिसते.. पाण्यात बुडलेला तो हरिश्चंद्रेश्वर दिसतो.तेवढ्यात दहा मिनिटे संपतात आणि मी वास्तवात येतो. पण आधी पेक्षा मी दुप्पट तिप्पट ताजातवाना झालेला असतो, ट्रेक करून आलेलो असतो न नुकताच :)

मी एकटा असलो कि असे काहीकाही नवीन शोधून काढतो.. आणि आयुष्य मजेत जगतो

त्याच्याशी बोललं कि असा वेगळा काहीतरी धागा सापडतो , आयुष्य भरभरून जगायचा. बाय द वे त्याची ती मुंगळा थिअरी मी करून बघीतली, u cant imagine , आईशप्पथ खूप मजा आली :)

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 May 2014 - 2:34 pm | प्रचेतस

आता मी पयला.
स्पा ला हापिसकामातून वेळ मोकळा मिळालेला दिसतोय.

उर्वरित प्रतिसाद धागा वाचल्यानंतर. =))

स्पंदना's picture

23 May 2014 - 5:20 am | स्पंदना

काय केलत पहिला येउन?
काही भिजलात पावसात? दिसले पॉपकॉर्न पोत्याएव्हढे?
उगा "मी पयला" "मी पयला"
उठा जागा खाली करा! जेपी यायचेत! ;)

पयला येऊन अज्ञातवासातून बाहेर आलेल्या स्पाच्या धाग्याला प्रतिसाद दिला. =))
बाकी व्यक्तिशः अशा थियरी मला पटत नाहीत. ते जेपी कुठे गायबलेत कुणास ठाऊक.

llपुण्याचे पेशवेll's picture

23 May 2014 - 9:22 am | llपुण्याचे पेशवेll

ही थियरी म्हणजे कोणती? मुंगळा की आय हॅन्ड को-ओर्डीनेशन? मला आवडल्या दोन्ही. पहीली करायला शक्य वाटली दुसरी अशक्य. असो. तुझा चॉईस. आता तुझ्यासारखे शिल्पपरीक्षण करायला लै आवडेल पण झेपेल थोडेच करायला. :-)
का मी पयला ची थियरी?

मुंगळा आणि आय हॅण्ड दोन्ही. :)
कारण मी मूळात तसा विचारच करू शकत नाही.

बाकी शिल्पपरी़क्षण खूप सोप्पय. निरखून बघितलं तर आपोआप कळतंच. :)

काल पास्न लै उचक्या लागल्या. आदी वर बगितल , वर शिंकाळ्यावर सासु बी लोणी खात बसली नव्हती. मंग हिकड आलो तर मी पयला वरुन माजीच आठवण काडली व्हती. बाकी स्पांडुची थेरपी लय भारी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2014 - 2:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रचंड कल्पनाशक्ती आहे तुमच्या मित्राकडे. ad agency मध्ये क्रियेटीव डायरेक्टर आहे यात आश्चर्य नाही... किंबहुना तो अत्यंत यशस्वी क्रियेटीव डायरेक्टर असावा असा माझा अंदाज आहे.

प्रसाद गोडबोले's picture

22 May 2014 - 2:43 pm | प्रसाद गोडबोले

ह्यात थेयरीत काही खास वाटलं नाही :(

ह्यात थेयरीत काही खास वाटलं नाही

हरकत नाही ,खास वाटायलाच हवे असे काही नाहीचे, उलट जे काही आहे ते खूप साधे सरळ आणि बालिश आहे. :)

मुक्त विहारि's picture

22 May 2014 - 2:45 pm | मुक्त विहारि

मस्त...

झक्कास...

(मित्रा, मला माझ्या कंटाळ्यातून बाहेर काढल्या बद्दल,,,,धन्यवाद)

मस्त आहे मुंगळा थिअरी. मला कंटाळा आला, अनकम्फर्टेबल वाटायला लागलं की स्वयंपाकघर गाठतो. काहीतरी बनवायला घेतो, कधीकधी एखादी अशी गोष्ट बनवायला घेतो जी बर्‍यापैकी किचकट आहे. वेळ पण जातो मन पण गुंततं.

चित्रांची आठवण काढलीस बरं झालं. बरेच दिवस ब्रश, पोस्टर कलर धूळ खात पडलेत. वीकांती बाहेर काढावे म्हणतो. :)

तुमचा अभिषेक's picture

22 May 2014 - 2:46 pm | तुमचा अभिषेक

मस्तय, अशीच एक " बर्ड थिअरी " मलाही अनुभवायला आवडते. कुठेही उंचावरच्या जागी गेले की, खाली बघताना गरगरायला होते ना. माहीत असते पडणार नाही तरी भिती वाटते. मग अश्यावेळी ती भिती काढायला स्वताला पक्षी समजून मी आजूबाजुचे जग बघायला लागतो. भिती जातेच, पण थोड्यावेळाने उडत उडत छानपैकी फेरफटका मारून यावासा वाटतो, आणि तो मारूनही येतो. बरेचदा समोरच्या आकाशात विहार करणार्‍या एखाद्या पक्षालाच सोबतीला घेतो. मनातली भिती एकदा गेली ना, मग ती भिती कसलीही असो, मरणाची, पराभवाची वा अपयशाची, पण ती एकदा गेली ना की मग मन जे कल्पक होते त्याला तोड नाही.

पैसा's picture

22 May 2014 - 2:48 pm | पैसा

अशी कल्पनाशक्ती लहान मुलांतच जास्त असते. ती आपल्याला सापडली तर मस्तच!

बेसिकली पैसा ताई , तो लहान मुळातच जास्त रमतो, म्हणूण त्यांच्यासाठी तो असं काही बाही शोधून काढतो, पण हे आमच्या फिल्ड मध्ये आम्हालाही खूप उपयोगी पडत

पैसा's picture

22 May 2014 - 3:00 pm | पैसा

तुमच्या फील्डमधे कामासाठी उपयोगी पडेलच, पण इतरांना निव्वळ विरंगुळा म्हणून मस्त प्रकार आहेत एकेक!

अनुप ढेरे's picture

22 May 2014 - 2:58 pm | अनुप ढेरे

छान आहे थिअरी! लेख आवडला.

कवितानागेश's picture

22 May 2014 - 3:01 pm | कवितानागेश

मस्तयत थिअरीज. मनातल्या मनात पावसात भिजणं तर मस्तच. :)
बाकी,"तो लहान मुलातच जास्त रमतो" हे पटलं. ;)

मुंगळा चष्मा घालुन पाहिला पण नाहि काय दिसलं :-( तुम्हि मुंगळा थेअरी बोलतात ती मुळात आर्ट डिरेक्टर ची नजर आहे, सगळ्यांना नाहि जमनार. .. मी प्रोडक्ट डिझायनर असल्या मुळे असेल कदाचित, मला माझ्या नजरेनेच शेप्स वगेरे पहायला आवडतात, अगदि शेणाच्या पो मध्येही मला शेप्स दिसतात. :-)
बाकि लेखाभिव्यक्ती आवडली हे.सा.न.ल. :-)

ब़जरबट्टू's picture

22 May 2014 - 4:42 pm | ब़जरबट्टू

एखाद्या दिवशी दोन पेग जास्त झाले तर आमचा मुंगळा, डायनासोर, पक्षी, सुपरमण, व डुक्कर सुध्दा होतो.. आकाशात तरंगत डायरेक्ट इन्ददरबारात पण जाऊन येतो :))
हाय काय .,.,,, नाय काय... मायला आज काय बनावे ?? :D

उताना (बजरु )

राजेश घासकडवी's picture

22 May 2014 - 4:56 pm | राजेश घासकडवी

ही कल्पना छान आहे. लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जागरुक रहायला कसं शिकवायचं याचा विचार करताना मी एक 'लेझर पॉइंटर' प्रयोग केला होता. एक लेझर पॉइंटर घ्यायचा, एका जागी बसून वेगवेगळ्या वस्तूंवर, पृष्ठभागांवर टाकायचा. त्या बिंदूला आपण स्पर्श करतो आहोत याची कल्पना करायची. मग भिंतीचा खरबरीतपणा, पडद्यांचा झुळझुळीतपणा अनुभवायचा. मस्त वाटतं. त्यासाठी लेझर पॉइंटरचीही गरज नाही. नुसतं एका जागी बघून चालतं. थोडा वेळ असं केल्यावर आपल्या नजरेलाच एक पोताची, वस्तूंच्या हलकेजडपणाची, भरीवपणाची जाणीव व्हायला होते.

आतिवास's picture

22 May 2014 - 5:01 pm | आतिवास

प्रयोग मजेदार आहेत; करून बघायला पाहिजेत :-)

प्रयोग जबरी. मला बोर झालं तर मी सरळ घराबाहेर पडतो अन थकेस्तोवर निरुद्देश इकडेतिकडे भटकतो. कधी चालत, कधी सायकलवर तर कधी बाईकने. अन मग रात्री थकून झोपल्यावर भटकतानाची छान वैविध्यपूर्ण स्वप्ने पडतात.

राही's picture

22 May 2014 - 6:36 pm | राही

मला चालायला आवडतं. चालणं हा एक फार मोठा स्ट्रेस-बस्टर आहे. पूर्वी (म्हणजे मुंबईचे रस्ते सदाचे खोदलेले नसत तेव्हा) कुठल्याही डबलडेकर बसमधे वरती बसून शेवटच्या स्टॉपपर्यंत जायचं आणि पुन्हा त्याच रूट्ने परत यायचं, असंही अनेकदा केलेलं आहे. मुंबईचे बसरूट्स् भन्नाट आहेत. एका फेरीमध्ये मुंबईच्या सगळ्या जीवनाचा क्रॉस-सेक्शन बघायला मिळतो. आणखी एक विरंगुळा म्हणजे एखादी घडलेली गोष्ट आणखी किती तर्‍हांनी घडू शकली असती, त्यात प्रत्येकाची भूमिका काय राहिली असती याचं चित्र डोळ्यांसमोर आणणं. वेळ छान जातो आणि ताजंतवानं वाटतं.
लेख आवडला.

नंदन's picture

23 May 2014 - 12:25 am | नंदन

आणखी एक विरंगुळा म्हणजे एखादी घडलेली गोष्ट आणखी किती तर्‍हांनी घडू शकली असती, त्यात प्रत्येकाची भूमिका काय राहिली असती याचं चित्र डोळ्यांसमोर आणणं. वेळ छान जातो आणि ताजंतवानं वाटतं.

+१
राशोमोन थिअरी :)

कवितानागेश's picture

23 May 2014 - 1:31 pm | कवितानागेश

थकेस्तोवर निरुद्देश इकडेतिकडे भटकतो.>>
ही तर "मांजर" थिअरी झाली! ;)

बॅटमॅन's picture

23 May 2014 - 1:56 pm | बॅटमॅन

वटवाघळाला मांजर आवडणारच!
-क्रिष्टफर नोलाण.

धन्या's picture

22 May 2014 - 6:22 pm | धन्या

झकास आहे थियरी. एक प्रकारचा परकाया प्रवेशच. :)

मुंगळा थिअरी मस्त आहेच आणि सर्जनशीलतेचा एक प्रकार आहे.

मी कधीकधी मूड आला की पेपर घेऊन घड्या घालायला बसतो.

आत्मशून्य's picture

22 May 2014 - 7:22 pm | आत्मशून्य

ती एक विशिष्ट सिध्दी देणारी साधना म्हणुन प्रचलित आहे ...

किसन शिंदे's picture

23 May 2014 - 12:08 am | किसन शिंदे

हि मुंगळा थियरी माहीती नव्हती, पण अशाच प्रकारची कल्पनाशक्ती कुठल्याही ठिकाणी मी मोकळा बसलेला असेल तर वापरतो. स्पावड्या लेख आवडला.

नंदन's picture

23 May 2014 - 12:28 am | नंदन

लेख आवडला.

लहानपणी एकदा आमच्याच बिल्डिंगमध्ये परंतु दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या शेजारांच्या बाल्कनीतून नेहमीचंच परिचित दृश्य वेगळ्या अँगलने पाहताना गंमत वाटली होती, ते आठवलं. वाढत्या वयाच्या निबरपणाबरोबर ही 'गंमट' वाटणं कमी होत होत नाहीसं होतं. तुझ्या मित्रासारखे मोजके काही अपवाद.

स्पा's picture

23 May 2014 - 1:08 pm | स्पा

असच समोरच्या बिल्डींग मधून आमच्या घराची बाल्कनी आणि आतले बघताना पण सोलिड वाटलेले, बाहेरून आपले घर कधी बघितले नव्हते :)

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2014 - 1:26 pm | प्रभाकर पेठकर

असेच एकदा स्वतःकडे 'बाहेरुन' पाहण्याची गंमत अनुभवावी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 May 2014 - 1:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आवडला.

अतिशय रटाळ किंवा गैरसोयीच्या ठिकाणी बसलेली असताना मी घरात झोपलेली आहे असा विचार करते. निदान त्रास तरी कमी होतो. नंदन म्हणतो तसं शेजाऱ्यांच्या बाल्कनीतून नेहेमीचं दृश्य वेगळं दिसतं त्याची गंमत वाटायची. अजूनही, नेहेमीच्या ठिकाणी वेगळ्या रस्त्याने आलं की वेगळं दिसण्यातली गंमत जाणवते.

ही अशी काही गंमत लक्षात आणू दिल्याबद्दल आभार.

श्रीरंग_जोशी's picture

23 May 2014 - 1:48 am | श्रीरंग_जोशी

कल्पनाशक्तीचा फारच चांगला उपयोग.

अवघड परिस्थितीमध्ये स्वतःला सावरायला visualization (कृपया मराठी शब्द सुचवा) हे तंत्र फारच उपयोगी आहे.
उदा. आपण तापाने फणफणलो आहोत अन काही काळाने बरे होणार आहोत याची खात्री वाटत असुनही नैराश्य / अप्रसन्नता जाणवत असेल तर आपण बरे आहोत असे समजून आपली आवडती कामे करत आहोत असे कल्पावे. नैराश्य कुठला कुठे पळून जाईल.

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2014 - 2:19 am | प्रभाकर पेठकर

मला स्वत:ला प्राण्यांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचायला आवडतं. त्याच्या डोक्यात आत्ता ह्या घडीला काय चाललं असेल ह्याची, त्याच्या चेहर्‍यावरील भाव वाचत, कल्पना करायला आवडतं.
अगदी लहान (कडेवरील) बाळांच्या डोक्यात काय विचार चालले असतील ह्याची कल्पना करण्यातही सृजनशील विरंगुळा जाणवतो.

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2014 - 2:57 am | प्रभाकर पेठकर

काय चाललं असेल ह्यांच्या मनांत?

Cat

मनिमाऊ आजूबाजूच्या रहदारीचं परिक्षण करण्यात आपला विरंगुळा शोधते आहे. दुपारी चोरुन चापलेलं दूध जरा जास्तच झालंय. पण चेहर्‍यावरचा, 'मी नाही त्यातली' हा सोज्वळ भाव एखाद्या अभिनेत्रीलाही लाजविणारा आहे.

Kutra

तर, ह्या बंड्याने नक्कीच, मालकाला न आवडणारी कांहीतरी गोष्ट केली आहे. कुठे चुकीच्या ठिकाणी शी-शू तर केली नाही नं? आता शिक्षेच्या भितीने 'सॉरी, चुक झाली, पुन्हा नाही करणार' असा भाव चेहर्‍यावर आणला आहे.

पैसा's picture

23 May 2014 - 11:30 am | पैसा

दोघेही मस्त आहेत!

स्पंदना's picture

23 May 2014 - 5:25 am | स्पंदना

स्पाऊ धमाल थेअरी आहे ब्वा!
पण जरा जपुन, एकदा मला स्वप्नात सगळ हळुहळु मोठं होत जाण्याचा त्रास झाला होता. खुप दिवस त्यनंतर डोळे मिटायला लागले की आजुबाजुच सार अस्ताव्यस्त पसरत मला गुदमरवुन टाकणार आहे अस वाटायचं.

पैसा's picture

23 May 2014 - 11:35 am | पैसा

मला जेव्हा कधी ताप चढतो तेव्हा असे भास होतात की आजूबाजूचं सगळं मोठं होत चाललंय.

तसे आकाशातले ढगांचे आकार शोधायला पण मजा येते आणि लहान असताना भिंतीवरचा चुना पडलेल्या जागचे किंवा माळ्याच्या लाकडी फळ्यांवरचे आकार बघायायला पण जाम मजा यायची. आता तसा पडणारा चुन्याचा गिलावा कुठे दिसत नाही त्यामुळे ते आकार पण हरवलेत.

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2014 - 8:27 am | अत्रुप्त आत्मा

पां डुब्बाचा धागा... =)) राखुन ठेवा भरपुर जागा! =))

मुंगळा/बलुन ..तत्सम थिअरी.. वेगवेगळ्या प्रकारे..निरनिराळ्या क्षेत्रात उपयोगी पडतात.मी तर या थिअरी एका स्वसंमोहनाच्या सेशन मधे..अनुभवल्या पाहिल्या आहेत.

अ वांतरः-हल्ली, आमचा पां डुब्बा ना,सात्विक..नम्र..सज्जन - झालाय. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif कित्ती शुंदल..आनी गो ग्गोड धागा ताकलन बगा ना..! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

रोफ्ल, बुव्या लय माजलायेस तु, बघतोच तुला "अ"ता

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2014 - 4:40 pm | अत्रुप्त आत्मा

@बुव्या लय माजलायेस तु, >>> =)) http://www.sherv.net/cm/emoticons/playful/angry-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif
.....................http://www.sherv.net/cm/emo/laughing/free-laughing-smiley-emoticon.gif
@बघतोच तुला "अ"ताhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif >>> http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gifबघ नक्की! http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/policeman-smiley-emoticon-1.gif

विजुभाऊ's picture

23 May 2014 - 8:35 am | विजुभाऊ

अशा प्रकरचे प्रयोग " सिल्वा मेथड ऑफ ंमाइन्ड कन्ट्रोल " या पुस्तकात लिहीलेले आहेत.
पुस्तकातील इतर गोष्टी जाउदेत ज्याला त्याच्या आनंद घेता येतो त्याच्यासाठी मात्र मुंगळा थिअरी हा एक मस्त प्रकार आहे.
मोठ्या प्रमाणात लोक चित्रपट पहाताना हीच थेअरी वापरतात. विचार करतात अभिनेत्याच्या /अभिनेत्रीच्या जागी स्वतःला बघतात.

मी लहानपणी एक मजेदार खेळ खेळत असे. आरसा घ्यायचा अन त्यात पायाखालचा रस्ता पाहून चालण्याचा प्रयत्न करायचा (अर्थात घरातच)! कैच्या कै धमाल येते ! आपण पाय ठेवतो तिथे जमीनच नसते ! मग कसरत..लै मज्जा येते.

ही थेअरी लहानपणीच चित्रपटात पाहुन झाली आहे. :) नंतर बर्‍याच वेळा हा पाहिला चित्रपट !
कोणता ?
Honey, I Shrunk the Kids

H

बाकी आम्हाला मुंगडा थेअरी सुद्धा फार आवडते बरं का... ;)
इथल्या रसिक मंडळींसाठी बेंद्रीण बाईंचा मुंगडा देतो... एन्ज्यॉय माडी ! ;)

या थेअरीमुळे डोळ्याचा,हॄदयाचा आणि मनाचा "ताण" कमी होण्यास मदत होते, असा आमचा अणुभव हाय ! ;)

(पीएचडी इन लव्ह थिअरी} ;)

पाटीलभाऊ's picture

23 May 2014 - 2:27 pm | पाटीलभाऊ

भन्नाट कल्पना...आवडली बुवा..!

त्यासाठी डीजे बोल्वावा लागतो ;)

प्यारे१'s picture

24 May 2014 - 8:18 pm | प्यारे१

मस्त रे स्पाउली!
आवडलं.

आर्किटेक्ट हाफिज काँट्रॅक्टर च्या एका मुलाखतीमध्ये वाचलेलं.... म्हणे फार हुच्च वाटू लागलं की मी एखाद्या मोठ्ठ्या हॉलमध्ये जाऊन बसतो. (एखादं उंच छप्पर (फ्लोअर टॉप टु रुफ बॉटम हाईट ५०-१०० फूट वगैरे असलेलं चर्च आठवा) आणि फार 'लो' वाटू लागलं की ऑफिसमधल्या पोटमाळ्यात (उंची जेमतेम ६ फूट) जाऊन बसतो.

माझं पर्स्पेक्टीव्ह खूप छान होतं. परत बघायला हवं. :(

सुहास..'s picture

25 May 2014 - 9:13 am | सुहास..

कधी चेक नव्हत केले ..पण कल्पना चान चान आहे :)

आरवी's picture

31 Mar 2019 - 10:40 am | आरवी

साॅल्लिड थिअरीज
भन्नाट आयडियाज आहेत, बोअर झाल्यावर एकेक प्रयोग करून पाह्यले पायजेत.

पाटीलबाबा's picture

31 Mar 2019 - 4:15 pm | पाटीलबाबा

वेगळी कल्पना