दहनाभुमिवर फुले वहाया
येशील ना तू माझ्या नंतर
मधले सारे विरून जाऊ दे
मिटून जाऊ दे आपुले अंतर
अवचित अश्रु येतील डोळा
थेम्ब मातीचा होइल ओला
तृप्त तृप्त मी होउन जाइन
मातीतून मी कविता गाइन
अश्रु तुझे ते प्रेम बोलतील
पुन्हा स्मृतींचे मेघ दाटतील
वेळ निघुनी असेल गेला
पाचोळ्यावर पाउस ओला
उगीच आपुल्या हट्टापायी
हरवून बसलो जे काही क्षण
पुन्हा परतुनी नाही यायचे
किती बोलावा करा निमंत्रण
हिशोब कसला झाले गेले
आठवणींचे काहूर उरले
रंग उडुनी गेला आता
दोनच अश्रु जाता जाता
असेच ना हे नेहमी होते
वेळ जातो अन ओढ लागते
तुटण्या आधी रेशीम धागे
एकच पाउल येऊ मागे
प्रतिक्रिया
29 Jul 2008 - 6:37 pm | प्राजु
अतिशय भावपूर्ण कविता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Jul 2008 - 8:53 pm | मिसळपाव
....
उगीच आपुल्या हट्टापायी
हरवून बसलो जे काही क्षण
पुन्हा परतुनी नाही यायचे
किती बोलावा करा निमंत्रण
....
हे भान सहजगत्या आधी आलं तर किती बरं होइल नाहि?
30 Jul 2008 - 12:10 am | मनीषा
खुप छान कविता
अवचित अश्रु येतील डोळा
थेम्ब मातीचा होइल ओला
तृप्त तृप्त मी होउन जाइन
मातीतून मी कविता गाइन ....सुंदर
30 Jul 2008 - 12:48 am | llपुण्याचे पेशवेll
अवचित अश्रु येतील डोळा
थेम्ब मातीचा होइल ओला
तृप्त तृप्त मी होउन जाइन
मातीतून मी कविता गाइन
सहीच रे पुष्कराज लगे रहो..
पुण्याचे पेशवे
30 Jul 2008 - 12:50 am | मुक्तसुनीत
"असेच ना हे नेहमी होते
वेळ जातो अन ओढ लागते
तुटण्या आधी रेशीम धागे
एकच पाउल येऊ माग""
कविता अतिशय आवडली. चटका लावणारी भावकविता !
31 Jul 2008 - 3:27 pm | राजाराम
सुंदर कवित