पडघम २०१४-भाग १७: पूर्ण देशातील अंदाज

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
11 May 2014 - 9:42 pm

पडघम २०१४-भाग १७: पूर्ण देशातील अंदाज

यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण
भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)
भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात
भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली
भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश
भाग १२: बॅटलग्राऊंड स्टेट-पंजाब
भाग १३: बॅटलग्राऊंड स्टेट-उत्तराखंड
भाग १४: बॅटलग्राऊंड स्टेटस-उत्तर भारतातील इतर राज्ये
भाग १५: बॅटलग्राऊंड स्टेटस-पूर्व भारतातील राज्ये
भाग १६: बॅटलग्राऊंड स्टेटस-दक्षिण भारतातील राज्ये

आता या भागात आपण आतापर्यंत मांडलेल्या अंदाजांचा आढावा घेऊ.त्यापूर्वी पश्चिम भारतातील गोवा, दिव-दमण आणि दादरा नगर हवेली या चार लोकसभा मतदारसंघांचे अंदाज राहिले आहेत त्याविषयी लिहितो.

गोव्यातील दोनपैकी उत्तर गोव्याची जागा भाजपला तर दक्षिण गोव्याची जागा कॉंग्रेसला धरतो.
दिव-दमण आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांवर गुजरातमधील वातावरणाचा मोठा परिणाम होतो.त्यामुळे या दोन्ही जागा भाजपला मिळतील असे धरतो.

तसेच पूर्व भारतात अंदमान-निकोबारच्या जागेचा अंदाज व्यक्त केलेला नव्हता. १९९९ प्रमाणे यावेळीही भाजपचे विष्णूपद रे जिंकतील असे मला वाटते. तसेच दक्षिण भारतात लक्षद्वीपच्या जागेचाही अंदाज व्यक्त केलेला नव्हता.ही जागा कॉंग्रेस जिंकेल असे धरतो.

तेव्हा विभागनिहाय निकालांचे अंदाज पुढीलप्रमाणे

१. दक्षिण भारत

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

 
दक्षिण भारत 
एकूण जागा१३१
  
एन.डी.ए३२
भाजप१६
तेलुगु देसम१२
पी.एम.के२
मद्रमुक२
  
यु.पी.ए२९
कॉंग्रेस२७
केरळ कॉंग्रेस मणी१
मुस्लिम लीग१
  
डावी आघाडी१२
  
इतर५८
अण्णा द्रमुक२१
वाय.एस.आर कॉंग्रेस१४
द्रमुक१३
तेलंगण राष्ट्रसमिती७
जनता दल (धर्मनिरपेक्ष)२
एम.आय.एम१

२. पूर्व भारत

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

 
पूर्व भारत 
एकूण जागा१५४
  
एन.डी.ए५४
भाजप४८
लोक जनशक्ती४
उत्तर-पूर्वेतील इतर एन.डी.ए पक्ष२
  
यु.पी.ए३७
कॉंग्रेस२६
राजद१०
झारखंड मुक्ती मोर्चा१
  
डावी आघाडी१५
  
इतर४८
तृणमूल कॉंग्रेस२५
बीजू जनता दल१४
जनता दल (संयुक्त)५
झारखंड विकास मोर्चा१
सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट१
उत्तर-पूर्वेतील इतर पक्ष२

३. उत्तर भारत

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

 
उत्तर भारत 
एकूण जागा१५१
  
एन.डी.ए९१
भाजप८७
अकाली दल३
हरियाणा जनहित कॉंग्रेस१
  
यु.पी.ए२६
कॉंग्रेस२४
नॅशनल कॉन्फरन्स२
  
इतर३४
समाजवादी पक्ष१६
बहुजन समाज पक्ष१३
आय.एन.एल.डी३
पी.डी.पी१
आम आदमी पक्ष१

४. पश्चिम भारत

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

 
पश्चिम भारत 
एकूण जागा१०७
  
एन.डी.ए८३
भाजप६७
शिवसेना१५
शेतकरी संघटना १
  
यु.पी.ए२३
कॉंग्रेस१६
राष्ट्रवादी कॉंग्रेस७
  
इतर१
महाराष्ट्र नवनिर्माण सेना१

तर पूर्ण देशातील निकालांचे अंदाज पुढील तक्त्यात दिले आहेत.

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

     
 दक्षिण भारतपूर्व भारतउत्तर भारतपश्चिम भारतएकूण
 १३११५४१५११०७५४३
      
एन.डी.ए३२५४९१८३२६०
भाजप१६४८८७६७२१८
तेलुगु देसम१२   १२
पी.एम.के२   २
मद्रमुक२   २
लोकजन शक्ती ४  ४
उत्तर-पूर्वेतील इतर एन.डी.ए पक्ष २  २
अकाली दल  ३ ३
हरियाणा जनहित कॉंग्रेस  १ १
शिवसेना   १५१५
शेतकरी संघटना   ११
      
यु.पी.ए२९३७२६२३११५
कॉंग्रेस२७२६२४१६९३
केरळ कॉंग्रेस मणी१   १
मुस्लिम लीग१   १
राष्ट्रीय जनता दल १०  १०
झारखंड मुक्ती मोर्चा १  १
नॅशनल कॉन्फरन्स  २ २
राष्ट्रवादी कॉंग्रेस   ७७
      
डावी आघाडी१२१५००२७
      
इतर५८४८३४११४१
अण्णा द्रमुक२१   २१
वाय.एस.आर कॉंग्रेस१४   १४
द्रमुक१३   १३
तेलंगण राष्ट्रसमिती७   ७
जनता दल (धर्मनिरपेक्ष)२   २
एम.आय.एम१   १
तृणमूल कॉंग्रेस २५  २५
बीजू जनता दल १४  १४
जनता दल (संयुक्त) ५  ५
झारखंड विकास मोर्चा १  १
सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट १  १
उत्तर-पूर्वेतील इतर पक्ष २  २
समाजवादी पक्ष  १६ १६
बहुजन समाज पक्ष  १३ १३
आय.एन.एल.डी  ३ ३
पी.डी.पी  १ १
आम आदमी पक्ष  १ १
महाराष्ट्र नवनिर्माण सेना   ११

यावरून कळते की एन.डी.ए ला २६० (भाजप: २१७) आणि यु.पी.ए ला ११५ (कॉंग्रेसला ९३) जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे ७ खासदार आणि वाय.एस.आर कॉंग्रेसचे १४ खासदार नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला फार अडचण करतील असे नाही.तसेच सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंट आणि उत्तर पूर्व भारतातील इतर काही पक्ष यांचाही पाठिंबा नरेंद्र मोदींना मिळायला अडचण येऊ नये.तेव्हा नरेंद्र मोदीच भारताचे पुढचे पंतप्रधान होतील असे मला वाटते.

काही राज्यांमध्ये जनमत चाचण्यांपेक्षा मी एन.डी.ए ला कमी जागा दिल्या आहेत.उत्तर प्रदेशात भाजप तब्बल ३८% मते मिळवेल असे काही चाचण्या म्हणत आहेत.चतुरंगी लढतीत भाजपने ३८% मते मिळविल्यास माझ्या अंदाजाप्रमाणे भाजप ६० जागा सुध्दा जिंकू शकेल.अर्थात ३८% मते पक्षाला मिळणे या गृहितकावर हे अवलंबून आहे.तसे झाल्यास एन.डी.ए ला निर्विवाद बहुमत मिळेल. नक्की काय होते हे १६ मे रोजीच कळेल.

मतमोजणी झाल्यानंतर मी एकूण निकाल आणि माझे अंदाज यांच्यात तुलना करणारा एक लेख नक्कीच लिहेन.

सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल आणि सहकार्याबद्दल आभार. मिपाकरांचे प्रोत्साहन नेहमीच हुरूप वाढविणारे असते. तसेच पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे ज्ञानोबाचे पैजार, पैसाताई, राहुलजीव्ही, सुहासदवन आणि श्रीरंग जोशी यांनी ही आकडेवारी एकत्र करायला महत्वाची मदत केली. त्यांचे परत एकदा आभार मानून पडघम-२०१४ या लेखमालेची सांगता या लेखाबरोबर करत आहे.

धन्यवाद

प्रतिक्रिया

समीरसूर's picture

17 May 2014 - 12:38 am | समीरसूर

अंदाज सगळ्यांचेच चुकले. ३३६ जागा एनडीएला मिळतील असे भाजपच्या नेत्यांनाही वाटले नसेल. फक्त चाणक्यच्या एग्जिट पोल सर्वे ने एनडीएला ३४० जागा दाखवल्या होत्या आणि सगळ्यांना हे अंदाज अगदीच अवास्तव वाटत होते. पण अखेरीस तेच अंदाज खरे ठरले. :-) भले भले गारद झाले. छगन भुजबळ पडले हे उत्तम झाले. राष्ट्रवादीची धूळदाण महराष्ट्रासाठी उपकारक ठरेल. अत्यंत घाणेरडे राजकारण करणारा हा गुंडांचा पक्ष जितक्या लवकर संपेल तितके राज्याचे लवकर भले होईल. शरद पवारांना आता तरी आपल्या राजकारणातल्या चुका लक्षात आल्या असतील. भयंकर उन्माद, सत्तेचा माज, अराजक, पराकोटीचा भ्रष्टाचार, अरेरावी, गुंडगिरी, स्वार्थ, जातीजातींमध्ये तेढ, ब्राम्हण-मराठा द्वेषाची पेरणी, नुकत्याच घडलेल्या ऑनर किलिंगच्या लाजिरवाण्या घटना, सत्तेसाठी हपापलेपण (शरद पवार आता एनडीएची स्तुती करत तिथे काही जागा मिळतेय का याची चाचपणी करत होते) याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राला काय दिले हा प्रश्न शरद पवारांनी स्वतःला विचारावा आणि शांतपणे निवृत्त होऊन बारामतीमध्ये तिथल्या क्रिकेट असोसिएशनला जमेल तसे (फार जास्त नाही) मार्गदर्शन करावे हेच त्यांच्यासाठी उत्तम आहे. अजित पवारांसारखा बेजबाबदार नेता पुन्हा उभा राहणे महाराष्ट्रातल्या जनतेला परवडणारे नाही. शरद पवारांची गणिते चुकली. धूर्त, मुत्सद्दी, दिग्गज नेता असल्या स्वतःच्याच खोट्या प्रतिमेत अडकलेला परंतु भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतात सगळ्यात जास्त बदनाम झालेला नेता याखेरीज त्यांची अजून काही प्रतिमा होणे शक्य नाही. चुकीच्या विचारांना कवटाळल्याने काय परिणाम होतो हे त्यांना आज कळले असेल. आता राष्ट्रवादी काँग्रेस नामशेष झालेलीच उत्तम! विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपवणे हे महाराष्ट्रातल्या जनतेचे आद्य कर्तव्य आहे. 'आप'ला दीड वर्षात लोकसभेत ४ जागा मिळतात आणि पवारांसारख्या तथाकथित धूर्त, मुत्सद्दी, अनुभवी वगैरे राजकारण्याने १५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जेमतेम ५ जागा मिळतात हीच पवारांसाठी नामुष्कीची आणि लज्जास्पद गोष्ट आहे. असल्या भयंकर दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसने बरखास्त करावी हेच उत्तम!! महाराष्ट्राने उगीच या नेत्याला मुत्सद्दी, धोरणी, धूर्त वगैरे म्हणून डोक्यावर घेतले. वास्तविक स्वतःच्याच चुकीच्या धोरणांनी स्वतःचे इतके नुकसान करून घेणारा क्वचितच कुणी दुसरा नेता असेल. मराठा समाजाच्या बळावर आपल्याला वाट्टेल तसे घाणेरडे राजकारण करता येईल अशी दिवास्वप्ने बघणारा हा नेता आता राष्ट्रीय राजकारणातून हद्दपार झालेला आहे. एनडीएला आता कुठल्याच पक्षाच्या आधाराची गरज नाही. फुटकळ खासदारांच्या जोरावर हा माणूस पंतप्रधानपदाची स्वप्ने कशी काय बघत होता हे कळत नाही. हा मुत्सद्दी, धूर्त वगैरे नेता इतका कसा काय भोळा असू शकतो? केवळ बापजाद्यांच्या जमिनी, माज, सत्तेत भागीदारी, गुर्मी, गुंडगिरी, गुंठामंत्रीगिरी असले दुर्गुण निर्भेळ यश कधीच देऊ शकत नाहीत हे पवारांसारख्या चलाख वगैरे नेत्याला कळले नाही हे आश्चर्यच आहे. शेवटी त्यांची महत्वाकांक्षा अपूर्णच राहिली आणि अपूर्णच राहणार यात शंकाच नाही! राजकीय अपयश यापेक्षा वेगळे ते काय असू शकेल? बाकी अमाप पैसा तर हजारो-लाखो लोकं (प्रामाणिकपणे) देखील कमवतात. सुप्रिया सुळेंची लढत राष्ट्रवादीला बारामतीमध्येच किती अवघड गेली हे आठवून आठवून पवारांना आपण काय गमावले हे आयुष्यभर डाचत राहिल. आणि तेच योग्य आहे.

अक्शु's picture

17 May 2014 - 1:19 am | अक्शु

वाक्या वाक्याशी सहमत.
*clapping*

हुप्प्या's picture

17 May 2014 - 2:13 am | हुप्प्या

हीच लाट विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकेल आणि त्यात राष्ट्रवादीसारखा समाजकंटकी पक्ष नेस्तनाबूत होईल अशी आशा.
पुढारी लोक आपण जनतेचे सेवक आहोत, त्यांचे प्रतिनिधी आहोत वगैरे नाटकी संवाद तरी म्हणत असत. पण राष्ट्रवादीने हे नाटकही करणे बंद केले होते. गुर्मी, माज, मग्रूरी ह्या गोष्टींनी उच्छाद मांडला होता.
भुजबळ बुडाला, तटकरे थोडक्यात का होईना पण बुडला, तीच गोष्ट बारावी पास डॉक्टर नाईकांची हे उत्तम झाले. शंकाच नाही. सुळेबाईंनाही झटका मिळाला असता तर बरे झाले असते. पण आज नाही तर उद्या ते होईल अशी आशा.
पवारांसारख्या चालू माणसाचे समर्थन भाजपाला घ्यायची वेळ येणार नाही हे ईश्वराचे भाजपावरच नव्हे तर भारतावर उपकार आहेत. त्यांचा मुत्सद्दी, मुरब्बी वगैरे विशेषणांचा धुराचा पडदा लवकरच विरो आणि त्या माणसाचे क्रूर, स्वार्थी, ढोंगी, खोटारडे रुप समाजासमोर येवो.
समीरसूर, तुमच्या सगळ्या लेखाशी सहमत.

बाळकराम's picture

17 May 2014 - 2:35 am | बाळकराम

वाक्यावाक्याशी सहमत! प्रचंड टाळ्या!! पवाराइतका भेकड, निकम्मा आणि हरामखोर माणूस भारतीय राजकारणात झाला नाही. उगाच पब्लिकनी डोक्यावर चढवलेला एक अतिमहत्त्वाकांक्षी, पाताळयंत्री पण निकम्मा माणूस अशीच मी त्याची गणती करतो. मी भाजपाचा वा मोदींचा समर्थक नाही, पण पवारला पुरतं ओळखून चुकलेला जर कोणी माणूस असेल तर तो म्हणजे नरेंद्र मोदी असं मला नेहेमी वाटत आलय. असल्या माफियाला स्वतःच्या बळावर दोन आकडी जागा मिळवता आल्या नाहीत. जिथे जयललिता, ममता वा नवीन पटनाईक ने मोदी लाटेत सुद्धा २०-३५ जागा घेतल्या, तिथे ह्या स्वयंघोषित जाणत्या राजाला ४-५ खासदारांवर भीक मागायची वेळ मतदारांनी आणली, हे असल्या माफिया, गुंडगिरीच्या राजकारणाचे मोठे अपयश आहे.
पुन्हा एकदा खणखणीत शब्दात मांडल्याबद्दल अभिनंदन!

वेताळ's picture

17 May 2014 - 10:05 am | वेताळ

मनातील शरद पवाराविषयी असणार्‍या भावनाना योग्य शब्दात मांडल्याबद्दल धन्यवाद.अत्यंत हलकट राजकारण करणारा हा नेता मराठा असुच शकत नाही.ह्याला यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील ह्याच्या रांगेत उभे करणार्‍याची किव केली पाहिजे.

यशोधरा's picture

17 May 2014 - 6:42 am | यशोधरा

पवार आणि त्यांचे सगळे सगळे बगलबच्चे राजकारणातून कायमचेच नामशेष होवोत ही इच्छा!

हे पहा निकाल....

NDA UPA AAP OTHERS TOTAL NEWS TV
335 60 4 144 543 ABP NEWS
336 59 4 144 543 INDIA TV
334 61 4 144 543 NEWS 24
337 58 4 144 543 NEX EXPRESS
336 60 4 143 543 NEWS NATION
337 61 4 141 543 SAMAY
334 59 4 146 543 Z BUSINESS
336 59 4 144 543 TIMES NOW

मन१'s picture

17 May 2014 - 12:26 pm | मन१

अपेक्षेहून अधिक खरं निघालं की.

नमस्कार मंडळी,

माझे अंदाज चुकले याचा मला आनंदच आहे.

पुढील राज्यात अंदाज बर्‍यापैकी बरोबर आले असे म्हणायला हरकत नाही:
१.राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, छत्तिसगडः यापैकी केवळ उत्तराखंडमध्ये मी भाजपचा स्वीप होईल असे म्ह्टले होते.प्रत्यक्षात या राज्यांपैकी मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या राज्यांमध्ये एकूण जागा कमी आल्या आणि बाकी सगळ्या जागा भाजपने जिंकल्या. या राज्यांमध्ये मी भाजपला ९५ जागा दिल्या होत्या.प्रत्यक्षात जागा आल्या १०३. हे अंदाजांचे तितक्या प्रमाणावर अपयश जरूर आहे पण या राज्यांमध्ये अंदाज बर्‍यापैकी बरोबर आले असे म्ह्णायला हरकत नसावी. तसेच झारखंडमध्ये १४ पैकी १२ जागा मी दिल्या होत्या.त्या तितक्याच आल्या.

२. बाकी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये निकालांचे अंदाज आकड्यांमध्ये नक्कीच चुकले पण एकूण निकालांचा कल (कोणता पक्ष जास्त जागा जिंकेल) हे बरोबर ओळखले होते. उत्तर प्रदेशात ८० पैकी ७३ जागा मला वाटते चाणक्य सोडून इतर कोणीच दिल्या नव्हत्या.

३. कर्नाटक आणि केरळमधील अंदाजांचा आकडा आणि कल दोन्ही चुकले.

असो. या अंदाजांचे यश आणि अपयश दोन्ही माझेच. :)

केलेले विदापुर्वक लेखन महत्वाच्या विषयावर वाचायला मिळते. अंदाज चुकले कारण त्यामगील अभ्यास वा दिशा चुकीची न्हवतीच तर या निवडणुकीत विचारात घ्यायचे फॅक्टर्सच फार बदलले आणी यापुढील निवडणुका हे फॅक्टर्स टाळु शकणार नाहीत. विशेषतः (कर्तुत्ववान) तरुणांचे मानसीक खच्चीकरण करणारी राजनीती यापुढे बाद होत जाणार.

चौकटराजा's picture

17 May 2014 - 2:01 pm | चौकटराजा

असो. या अंदाजांचे यश आणि अपयश दोन्ही माझेच.
त्याबद्ल तुम्ही अमेरिकेच्या अदध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे राव ...
आता खरे सांगतो कॉगीचे पानीपत २००९ मध्येच व्हायचे पण त्यांचे अलायन्स त्यावेळी नीट जमले म्हणून.
बाकी शरद पवार, राज ठाकरे या घरभेद्यांचे तीन तेरा वाजले हे चांगले झाले.आता राजने स्वता: ला उद्धवच्या पक्षात विलीन करावे व शरद पवारानी स्वत: चा जातीयपणा विसरत कॉग्रेसमधे सामील व्हावे. गांधी घराण्याचा नाद करायचा नाय हे जर
कोंगीना कळले नाही तर २०१९ मधे फक्त चार सीट मिळतील. जोतिरादित्य सिंदिया हा नेता बनायला चांगला आहे असे वाटते.

पैसा's picture

17 May 2014 - 5:03 pm | पैसा

देशाचा एकूण कल तुझ्या बरोबर लक्षात आला होता, पण सगळीकडे दिसणारे 'वारे' आणि लोकांची मनस्थिती पाहता तुझे अंदाज काहीसे सावध आहेत आणि भाजपा आघाडीला संपूर्ण बहुमत मिळू शकेल असं वाटलं होतं. आणि तसंच झालं. हे असंच घडताना गोव्याच्या विधानसभा निवडणुकांत पाहिलं होतं.

लोकांच्या भावना न समजण्याची चूक काँग्रेसला चांगलीच महाग पडली आहे. यावरून ते काही शिकतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही.

नव्याने आलेले मतदार सगळे एकगट्ठा भाजपकडे वळलेले दिसतात. आणि इतर पक्षही लोकांचा राग समजू शकले नाहीत. या निवडणुकांत लोकांनी काँग्रेसला पायउतार करू शकणार्‍या एकाच पक्षाला मते दिली आहेत. अपवाद जया अम्मा आणि ममता आणि बिजू जनता दल यांचा. कठीण प्रसंगात भारतीय जनता एकदिलाने आणि एका सामुदायिक शहाणपणाच्या प्रेरणेने वागते हे परत अधोरेखित झालं.

इतक्या सुंदर अभ्यासू लेखमालिकेसाठी पुन्हा एकदा धन्यवाद!

दुश्यन्त's picture

18 May 2014 - 1:28 pm | दुश्यन्त

महागाई, घोटाळे, निर्णय न घेणे, बेताल वक्तव्ये, जनतेला गृहीत धरणे, सत्तेची मस्ती आणि बर्याच ठिकाणी गुंडागर्दी या सगळ्या गोष्टी कॉंग्रेस आघाडीला भोवल्या. भाजपचा शिस्तबद्ध प्रचार, मोदींचा करिष्मा, मोदी आणि गुजरात मॉडेलचे लोकांना आकर्षण यामुळे देशात भाजपा आणि एनडीएला अभूतपूर्व यश मिळाले आहे. विधानसभेतही आता महायुतीच येईल. फक्त यशाने हुरळून न जाता जोमाने प्रचार करत राहायची गरज आहे.

समीरसूर's picture

18 May 2014 - 3:52 pm | समीरसूर

काही अंदाज चुकले असले तरी कल बरोबर होता तुमचा. निकाल सगळ्यांनाच अनपेक्षित होते. जनतेच्या मनाचा ठाव लागणे तसे कठीणच. तरीही तुमचा अभ्यास, पृथ्थकरण, माहितीसंकलन, इत्यादी कौतुकास्पद होतेच. त्यामुळे तुमचे अभिनंदन करावेच लागेल. :-)

समीर

जयंत कुलकर्णी's picture

18 May 2014 - 4:04 pm | जयंत कुलकर्णी

आप्ले अंदाज हे स्टॅटिस्टिकल मॉडेलवर आधारित होते. (थोड्याफार प्रमाणावर निश्चित). स्टॅटिस्टिक्सची ही एक मोठी कमतरता आहे की तेथे जमिनीवर काय चालले आहे ते कळत नाही. तुम्हाला जर सगळ्या ठिकाणी दौरा करता आला असता तर तुमचे अंदाज जास्त बरोबर आले असते.......

प्रसाद गोडबोले's picture

15 Sep 2014 - 11:28 pm | प्रसाद गोडबोले

महारष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे अंदाज व्यक्त करणार्‍या धाग्याची आतुरतेने वाट पहात आहे ...

शिद's picture

16 Sep 2014 - 6:56 pm | शिद

+१

बाकी, विविध राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालात भाजपची बर्‍यापैकी पिछेहाट झालेली दिसतेय.

आता महाराष्ट्र व हरीयाणा मध्ये काय होतं हे पाहणं रोचक ठरेल.

श्रीगुरुजी's picture

16 Sep 2014 - 8:54 pm | श्रीगुरुजी

युती व आघाडी यांच्यात जागावाटप नक्की झाल्यानंतरच अंदाज व्यक्त करता येतील. सद्यपरिस्थितीत युती व आघाडीने एकत्रित निवडणुक लढविली (एकमेकांनी कसेही जागावाटप केले) तर युतीचा दणदणीत विजय नक्की आहे. पण भाजप वि. शिवसेना वि. आघाडी किंवा भाजप वि. शिवसेना वि. राकाँ. वि. काँग्रेस असे सर्वजण वेगळे लढले तर भाजप सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरेल परंतु कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही.

प्रसाद गोडबोले's picture

17 Sep 2014 - 11:31 am | प्रसाद गोडबोले

क्लिंटन ,

आपण हा सांख्यिकीय डेटा कोठुन मिळवत होता ? मी इलेक्शन कमीशनच्या साईटवर सर्चुन पाहिले पण सत्व डेटा पीडी एफ रीपोर्ट्स मधे आहे , त्याचे क्लीनींग करुन अ‍ॅनालिसिस करणे हे बरेच जिकरीचे काम आहे :(

जर इतरत्र कोठे हा डेटा उपलब्द असेल तर जरुर कळवा :)

पैसा's picture

17 Sep 2014 - 12:16 pm | पैसा

http://www.indiavotes.com/ या साईटवरून आम्ही आधी टेबल्स कॉपी पेस्ट करत होतो. पण नंतर क्लिंटनला आणखी एक साईट सापडली होती, तिथे सगळा डेटा एक्सेलमधे उपलब्ध होता. ती कोणती ते मात्र मला आता आठवत नाहीये.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2014 - 12:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

पैसाताई,
बहुतेक https://github.com/datameet/india-election-data
हि साईट होती ती
पैजारबुवा,