पडघम २०१४-भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
9 May 2014 - 10:55 pm

पडघम २०१४-भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली

यापूर्वीचे लेखन
भाग १: राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधील मतदानामधील फरक
भाग २: क्रिटिकल मास
भाग ३: बॅटलग्राऊंड स्टेट- मध्य प्रदेश
भाग ४: बॅटलग्राऊंड स्टेट-कर्नाटक
भाग ५: बॅटलग्राऊंड स्टेट- राजस्थान
भाग ६: बॅटलग्राऊंड स्टेट- केरळ
भाग ७: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र: मुंबई परिसर आणि कोकण
भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)
भाग ९: बॅटलग्राऊंड स्टेट-गुजरात

सुरवातीला दिल्लीमध्ये २००८ च्या विधानसभा आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय झाले हे बघू.

तक्ता क्रमांक १

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

       
दिल्ली२००८२००९ २००८२००९२००८२००९
 मते %मते %मतांमधील फरकविधानसभा जागाविधानसभा जागा आघाडीलोकसभा जागा आघाडीलोकसभा जागा
कॉंग्रेस४०.३%५७.१%१६.८%४३६८७७
भाजप+अकाली दल३६.८%३५.२%-१.६%२३२००
बसपा१४.०%५.३%-८.७%२०००
इतर९.४%२.४%-७.०%२०००

तक्ता क्रमांक १ वरून खालील गोष्टी कळतात
१. पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांकडे मते अधिक प्रमाणात वळतात तर लहान पक्षांची मते कमी होतात. दिल्लीत २००८-०९ मध्ये हे प्रकर्षाने दिसून आले.लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत तब्बल १६.८% मते जास्त मिळाली. भाजपची मते १.१% ने कमी झाली.
२. याचा परिणाम म्हणून दिल्लीमध्ये कॉंग्रेसने मोठा विजय मिळाला.लोकसभेच्या सातपैकी सात जागा पक्षाला मिळाल्याच पण कॉंग्रेसने दिल्लीतील ७० पैकी तब्बल ६८ जागांमध्ये आघाडी मिळवली.

तक्ता क्रमांक २ मध्ये २०१३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल दिले आहेत. सोयीसाठी २००८ च्या विधानसभा निवडणुकांचे निकालही परत एकदा त्याच तक्त्यात दिले आहेत.

तक्ता क्रमांक २

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

      
दिल्ली२०१३  २००८  
 मते %विधानसभा जागालोकसभा जागा आघाडीमते %विधानसभा जागालोकसभा जागा आघाडी
कॉंग्रेस२४.५%८०४०.३%४३७
भाजप+अकाली दल३४.०%३२५३६.८%२३०
बसपा५.३%०२१४.०%२०
आम आदमी पक्ष२९.५%२८०   
इतर६.७%२०९.४%२०

१. आम आदमी पक्षाने २९.५% मते आणि २८ जागा जिंकून पहिल्याच निवडणुकीत चांगलेच यश मिळवले.यापैकी १५.८% (पक्षाला मिळालेल्या अर्ध्यापेक्षा जास्त) मते कॉंग्रेसकडून, ८.७% मते बसपाकडून, २.८% मते भाजप+अकाली दलाकडून तर २.७% मते इतरांकडून आली होती. २००८ मध्ये बसपाला १४% मते होती त्यापैकी ८.७% मते आआपकडे गेली म्हणजे बसपाचे ६०% पेक्षा जास्त मतदार आआपकडे गेले. कॉंग्रेस आणि भाजपच्या बाबतीत हेच प्रमाण अनुक्रमे ३९% आणि ८% होते.

यावरून मी म्हणतो की नवा पक्ष जेव्हा रिंगणात उतरतो तेव्हा मुळात फ्लोटिंग मतांचा बेस उपलब्ध असेल (दिल्ली-२०१३ मध्ये बसपा तर गुजरात-१९९८ मध्ये अपक्ष आणि इतर--ज्यांची मते वाघेलांच्या राष्ट्रीय जनता पक्षाने खाल्ली) तर तो पहिल्यांदा फ्लोटिंग मते खातो आणि मग प्रस्थापित पक्षांना धक्का लावतो.

२. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांपासून दिल्लीतले राजकारण कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात दुरंगी राजकारण होते. आआपने मारलेल्या मुसंडीमुळे हे राजकारण तिरंगी झाले.

तक्ता क्रमांक ३ मध्ये २०१३ च्या विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय मतांची टक्केवारी दिली आहे.

तक्ता क्रमांक ३

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

        
लोकसभा मतदारसंघभाजप+अकाली दलकॉंग्रेसआआपइतर (बसपा, जदयु, अपक्ष, नोटा)एकूणआघाडी पक्षदुसऱ्या क्रमांकाचा पक्षआघाडी %
चांदनी चौक३१.१%२५.८%३१.९%११.२%१००.०%आआपभाजप०.८%
पूर्व दिल्ली३२.३%२९.३%२८.१%१०.३%१००.०%भाजपकॉंग्रेस३.०%
नवी दिल्ली३३.२%२३.८%३७.९%५.१%१००.०%आआपभाजप४.७%
उत्तर पूर्व दिल्ली३२.१%२६.३%२६.६%१५.०%१००.०%भाजपआआप५.५%
उत्तर पश्चिम दिल्ली३७.२%२२.८%२५.६%१४.४%१००.०%भाजपआआप११.६%
दक्षिण दिल्ली३४.४%२१.३%२८.५%१५.७%१००.०%भाजपआआप५.९%
पश्चिम दिल्ली३६.४%२२.७%३०.८%१०.१%१००.०%भाजपआआप५.६%
एकूण३४.०%२४.५%२९.५%१२.०%१००.०%  

तक्ता क्रमांक ३ वरून आपल्याला कळते की भाजपला ५ तर आआपला २ लोकसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. कॉंग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी मिळाली नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे अंदाज
माझे अंदाज पुढील गृहितकांवर आधारीत आहेत:
१. विधानसभा निवडणुकांच्या वेळी अरविंद केजरीवालांनी कॉंग्रेस पक्षालाच लक्ष्य केले होते तर भाजप आणि मोदींवर अजिबात टिका केली नव्हती. त्यामुळे अगदी भाजपच्या पारंपारिक मतदारांनीही राज्य पातळीवर नव्या पक्षाला संधी देऊन बघू म्हणून आआपला मते दिली असतील ही शक्यता आहेच. एका अर्थी कॉंग्रेसविरोधी मतांमध्ये आआपने फूट पाडली इतकेच नाही तर भाजपची काही मतेही आपल्याकडे वळवली. पण आता केजरीवाल कॉंग्रेसपेक्षा मोदी आणि भाजपवरच टिका करत आहेत.त्यामुळे भाजपचे पारंपारिक मतदार तर आआपला मते द्यायची शक्यता फारच थोडी.तसेच अनेक मतदार असे असतात की जे भाजपचे कट्टर विरोधक असतात पण इतर कोणता पर्याय नाही म्हणून ते कॉंग्रेसला मते देतात. अशा वर्गातील मते काही अंशी आआपकडे वळतील.
तेव्हा लोकसभा निवडणुकांमध्ये आआप भाजपपेक्षा कॉंग्रेसचे नुकसान करेल ही शक्यता जास्त.
२. डिसेंबर २०१३ च्या निवडणुकांनंतर केजरीवाल मुख्यमंत्री झाले.त्यांच्या सरकारने ४९ दिवसात जे काही प्रकार केले (सोमनाथ भारती प्रकरण, मुख्यमंत्री धरण्यावर बसणे, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला अडचण निर्माण करण्यातही काही गैर न वाटणे आणि शेवटी राजीनामा देणे) यामुळे आआपला नक्कीच फटका बसेल.आआपला डिसेंबर २०१३ मध्ये पाठिंबा देणारे मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय होतेच तर त्याचबरोबर गरीब वर्गातही आआपला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता.त्यापैकी सुशिक्षित मध्यमवर्गीय वर्गात आआपचे आकर्षण नक्कीच कमी झाले आहे. विशेषत: केजरीवालांनी बहुमत गमावले नसतानाही राजीनामा दिला यावरून ते जबाबदारीपासून पलायन करत आहेत असे चित्र उभे राहिले (जे पुढे स्वत: केजरीवालांनीही मान्य केले). त्या तुलनेत नरेन्द्र मोदींचे नेतृत्व सुशिक्षित मध्यमवर्गाला जास्त आकर्षित करेल.

विविध मतदारसंघांविषयीचे अंदाज
१. चांदनी चौक: या मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ नेते आणि डिसेंबर २०१३ मध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ.हर्षवर्धन, कॉंग्रेसकडून कपिल सिब्बल आणि आआपकडून आशुतोष निवडणुक लढवत आहेत. या मतदारसंघात डिसेंबर २०१३ मध्ये आआपला ०.८% ची निसटती आघाडी होती. या मतदारसंघातील चांदनी चौक, मातीया महाल, बलीमारन या अल्पसंख्यांकांची संख्या जास्त असलेल्या भागात कॉंग्रेस आणि आआपमध्ये नक्कीच लढत होईल.मतदारसंघातील आदर्श नगर, शालीमार बाग, शकूर बस्ती, ट्राई नगर, मॉडेल टाऊन यासारख्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे बळ चांगले आहे.स्वत: हर्षवर्धन मुळातले या भागातले नाहीत.तरीही त्यांचे नाव दिल्लीमध्ये नक्कीच माहित आहे आणि त्यांची प्रतिमाही चांगली आहे याचा फायदा भाजपला होईल. या मतदारसंघात अगदी जोरदार चुरस असेल तरीही हर्षवर्धन यांचे पारडे जड असेल असे मला वाटते.

२. पूर्व दिल्ली: या मतदारसंघात भाजपकडून महेश गिरी, कॉंग्रेसकडून शीला दिक्षित यांचे चिरंजीव संदिप दिक्षित आणि आआपकडून राजमोहन गांधी उमेदवार आहेत. राजमोहन गांधी हे महात्मा गांधींचे नातू आहेत पण लोकांवर फार प्रभाव पडावा असे त्यांचे नाव आणि कामही नाही. या मतदारसंघात डिसेंबर २०१३ मध्ये भाजपला आघाडी मिळाली त्यामागे एक कारण आहे. पूर्व दिल्लीतील कृष्णनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ.हर्षवर्धन यांनी ४३ हजार मतांची आघाडी मिळवली होती (भाजपला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात ४७ हजार मतांची आघाडी होती). तेव्हा या मतदारसंघात कॉंग्रेस विरूध्द भाजप अशी अगदी चुरशीची लढत होईल.पण नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आणि पूर्व दिल्लीत यमुनेच्या पलीकडच्या वस्त्यांमध्ये आआप कॉंग्रेसची मते खायची शक्यता या दोन कारणांमुळे पूर्व दिल्लीमध्ये भाजपचाच विजय होईल असे मला वाटते.

३. नवी दिल्ली: या मतदारसंघात भाजपकडून मीनाक्षी लेखी, कॉंग्रेसकडून अजय माकन आणि आआपकडून पत्रकार आशिष खेतान उमेदवार आहेत. या मतदारसंघातील १० पैकी ७ विधानसभा मतदारसंघांमध्ये आआपला आघाडी होती तर ३ मतदारसंघात (मोती नगर,आर.के.पुरम आणि राजींदर नगर) भाजपला आघाडी होती. या मतदारसंघात आआप विरूध्द भाजप अशी चुरशीची लढत होईल असे वाटते.आआपचे पारडे जड असेल असे वाटते.

४. उत्तर पूर्व दिल्ली: या मतदारसंघात भाजपकडून भोजपुरी गायक मनोज तिवारी,कॉंग्रेसकडून जयप्रकाश अगरवाल तर आआपकडून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक आनंद कुमार उमेदवार आहेत.त्यामानाने जयप्रकाश अगरवाल हाच एक ओळखीचा चेहरा आहे.मतदारसंघातील बिहारी-भोजपुरी मतदारांची संख्या लक्षात घेता मनोज तिवारी यांना भाजपने उमेदवारी दिली असे वाटते.त्याचा फायदा त्यांना होईलच.तसेच नरेन्द्र मोदी फॅक्टर लक्षात घेता उत्तर पूर्व दिल्लीत भाजप येईल असे वाटते.

५. उत्तर पश्चिम दिल्ली: या मतदारसंघात भाजपकडून उदित राज, कॉंग्रेसकडून केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ आणि आआपकडून राखी बिडलान उमेदवार आहेत. या मतदारसंघात डिसेंबर २०१३ मध्ये भाजपला सुरक्षित आघाडी होती. या मतदारसंघात मुंडका विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रामबीर शोकिन निवडून आले होते. त्यांना मिळालेली ५२ हजार मते लोकसभा निवडणुकांमध्ये ’फ्लोटिंग’ मते आहेतच त्यापैकी बरीच मते भाजपला जायला हरकत नसावी.कृष्णा तीरथ यांना युपीएविरोधी वातावरणाचा फटका नक्कीच बसेल.राखी बिडलान डिसेंबर २०१३ मध्ये निवडून आल्या तरी दरवेळी असे चमत्कार घडत नसतात. मला वाटते की या मतदारसंघात भाजप निवडून येईल.

६. दक्षिण दिल्ली: या मतदारसंघात भाजपकडून रमेश बिधुरी, कॉंग्रेसकडून रमेश कुमार तर आआपकडून देवेन्द्र सेहरावत उमेदवार आहेत.रमेश बिधुरी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.रमेश कुमार २००९ मध्ये कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते.युपीए विरोधी वातावरणाचा त्यांना नक्कीच फटका बसेल. मला वाटते की दक्षिण दिल्लीमधून भाजप जिंकणार.

७. पश्चिम दिल्ली: या मतदारसंघात भाजपकडून माजी मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा, कॉंग्रेसकडून खासदार महाबल मिश्रा तर पी.चिदंबरम यांच्यावर जोडा फेकून प्रसिध्दी मिळालेले पत्रकार जर्नेल सिंग आआपकडून उमेदवार आहेत. मतदारसंघातील १० पैकी ५ मतदारसंघात भाजपने, एका मतदारसंघात (राजौरी गार्डन) अकाली दलाने तर उरलेल्या ४ मतदारसंघात आआपने आघाडी मिळवली होती. वर उल्लेख केलेल्या कारणांमुळे मला वाटते या मतदारसंघातही भाजपला निवडून यायला अडचण येऊ नये.

तेव्हा मला वाटते की दिल्लीमध्ये पुढीलप्रमाणे निकाल लागतील:

table.tableizer-table {
border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif
font-size: 12px;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #ccc;
}
.tableizer-table th {
background-color: #104E8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

 
एकूण जागा७
भाजप६
आआप१

प्रतिक्रिया

'नवी दिल्ली' मतदारसंघात अजय माकन चांगली लढत देतील असा अंदाज आहे - अंदाजच, माहितीवर आधारित नाही :-)

दुश्यन्त's picture

9 May 2014 - 11:50 pm | दुश्यन्त

अंदाज योग्य वाटतो (भाजप-६, आप-१). मात्र जागांची अदलाबदल होवू शकते. वर लिहिलंय तसं कॉंग्रेसच्या उमेदवारांपैकी फक्त अजय माकन यांच्याबद्दल लोक चांगले बोलत आहेत .नवी दिल्लीत ते दुसर्या जागेवर राहतील आणि भाजपच्या मीनाक्षी निवडून येवू शकतात.

पैसा's picture

10 May 2014 - 12:05 am | पैसा

अंदाज एकूण बरोबर वाटतात. जे काही लोक पडले पाहिजेत अशी माझी जबरदस्त इच्छा आहे त्यात कपिल सिब्बलचा नंबर बराच वरचा आहे! ;)

सुहास झेले's picture

10 May 2014 - 9:38 am | सुहास झेले

+१ :)

लेखकाला दिल्लीची प्रचंड माहिती आहे. आय अ‍ॅम इम्प्रेस्ड.