" त्या अनोळख्याने माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
29 Jul 2008 - 8:15 am

"मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो.
मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."असे उद्गार काढण्याची माझ्या एका मित्रावर पाळी आली.ती त्याची कथा सांगताना,
मला म्हणाला,
" मनुष्याच्या आत्म्यावर माझा विश्वास आहे आणि इतरांबरोबर दुवा ठेवण्याच्या आत्म्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. सभोवतालच्या वातावरणा बद्दल जागृततेची क्षमता असण्यावर माझा विश्वास आहे.अपेक्षा नसतानाही माझ्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या घटना मधे आलेल्या एका घटनेवर माझा विश्वास आहे."
आणि मला पुढे सांगू लागला,
"त्यादिवशी मी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घरी आलो.सर्दी खोकला जब्बर झाल्याने कधी एकदां अंथरूणावर पडतो असं झालं होतं.शेजारच्या घरात पार्टी चालली होती त्यांच्या आवाजानें माझी झोप जागृतच होती.
माझ्या तुटपुंज्या स्वप्नाचा बाहेरून येणारा आवाज भंग करू शकला.कांचा फूटल्याचा आवाज मला पुर्ण जागं करू शकला.माझ्या खिडकीतून दिसणारं रात्रीचं आकाश आगीच्या डोंबाने शेंदूरी रंगाचं दिसू लागलं.अरुंद जिन्याला आगिच्या ज्वाळानी घेरलं होतं.बाहेर जाण्याचा तिथूनच दरवाजा होता.माझे शेजारी माझ्या किचनच्या खाली उभे राहून तिकडच्या खिडकीतून उडी मारण्याची मला आवर्जून सांगत होते.

दोन तिन आठवड्यानंतर मी सर्व प्रकरणांची जंत्री घेत घेत ज्यावेळी विमानात बसून सीट बेल्ट लावून झाल्यावर त्या घटनेचा विचार करू लागलो तेव्हा मला राग आणि संतापाने घेरलं,
"मलाच हे असं कसं झालं"
असा विचार मनात आला.
"मी जवळ जवळ मृत्युच्या जबड्यातून बाहेर पडलो होतो आणि माझं सर्वस्व मी गमावून बसलो होतो.मी असं काय केलं होतं की मलाच हे प्रायश्चित मिळालं?"
माझ्या शेजारच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला बघून मी माझ्या ह्या विचारातून बाहेर पडून त्याच्याशी बोलायला लागलो.तो दिल्लीला चालला होता आणि तो डॉक्टर होता.मद्रासला झालेल्या सायंटीफिक कॉनफरन्सला हजर राहून दिल्लीला आणखी काही कंपनीच्या कामाला चालला होता.त्याचं आणि माझं साध्या साध्या गोष्टीवर बोलणं चाललं होतं. परदेशातही तो बरेच फिरून आला होता.गेल्या वर्षी मेडिकल कनव्हेनशनसाठी तो पॅरिसला गेला होता.नंतर मी त्याला आणखी प्रश्न विचारले. त्याच्या फॅमिली बद्दल आणि तो कुठल्या प्रांतात राहतो त्याबद्दल.त्याचे डोळे थोडे पाणवळल्या सारखे दिसले.
तो महाराष्टात मुंबईत राहत होता.असाच एकदा तो युरोपला गेला असताना,मुंबईत झालेल्या दंगलीत त्याची अख्खीच्या अख्खी फॅमिली मारली गेली होती.असं सांगता सांगता त्याने माझा हात हातात घेवून घट्ट धरला.माझे पण ते बघून डोळे पाणावळले.मी माझे डोळे पुसले.
मी ज्यावेळी त्याची बोटं माझ्या हातात कुरवाळली,तेव्हा माझ्या मनात क्षणभर आगीत झालेल्या माझ्या नुकसानीचं स्मरण माझ्या दैवाच्या अगणीत उपकाराच्या भावनेत रुपांतरीत झालं.मी त्या आगीतून जीवंत होतो.जळलो पण नव्हतो.माझे नातेवाईक मला सभोवताली घेरून होते,माझे प्रिय मित्र मला आधार देत होते.मला हवं असलेलं सर्व काही माझ्या जवळ होतं.

माझ्या ह्या प्रवास-मित्राचं नंतर काय झालं ते मला माहित नाही.आम्ही एकमेकाचे पत्ते किंवा फोन नंबर्स घेतले नाहीत.आम्ही एकमेकाला गुडबाय म्हटल्यानंतर मला लक्षात आलं की मला त्याचं फक्त पहिलं नांवच माहित होतं.पण त्याची ती कथा मी माझ्याबरोबर घेतली होती.त्याची ज्या ज्यावेळी मला आठवण यायची त्यावेळेला मी त्याचे मनात आभार मानत होतो कि तोच मला जीवनात मोठा फरक काय असतो ते स्मरण करून देत होता.

मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.
मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो.
मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jul 2008 - 12:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी एकदा एरिक नावाच्या माझ्या फ्रेंच मित्राला विचारलं, "काय रे तू कायम एवढा उत्साही, आनंदी कसा काय असतोस? तुला कधी रागावलेलं पाहिलं नाही मी! तु कधी कोणाला वाईट म्हणत नाहीस! हे कसं काय?" त्याने मला ही गोष्ट सांगितली.

तो एकदा बसमधून कुठेतरी चालला होता. त्याला डाव्या बाजूची खिडकी मिळाली होती (फ्रान्समधे उजव्या बाजूने गाड्या चालवतात.) त्याच्या शेजारी जी अनोळखी तरुण मुलगी होती तिलाही खिडकी हवी होती. याने तिला खिडकीची जागा दिली आणि स्वतः आतल्या बाजूला बसून झोपी गेला. त्याला जाग आली तर बसला मोठ्ठा धक्का बसून बस थांबली होती, शेजारची मुलगी खाली पडली होती, डाव्या बाजूला एका प्रचंड मोठ्या ट्रकने धडक देऊन बसचा डावा पत्रा संपूर्णपणे कापला होता. डाव्या खिडकीतले प्रवासी जबर जखमी झाले होते आणि ती मुलगी .... तिच्या डोक्याचा संपूर्ण चेंदामेंदा होऊन ती जागीच गेली होती.

"माझं आयुष्य माझं नाही," एरिक बोलत होता, "ती छान होती, तिने थोडा हट्ट केला, आणि मला काय वाटलं कोण जाणे! एवढ्या सुंदर, तरुण मुलीला आपण जागा द्यायची नाहितर काय बुद्रुक चेहेय्राच्या खडूस माणसाला, असा मतलबी विचार करून मी तिला जागा दिली होती. ४ तासाच्या प्रवासात, एखाद तास झोप काढू आणि नंतर तिच्याशी गप्पा मारण्यात, फ्लर्ट करण्यात वेळ चांगला जाईल असं माझं गणित होतं. आणि हे काय झालं बघ? आज मी तिचं उरलेलं आयुष्य जगत आहे, माझं तर त्या दिवशी अपघातातच संपलं. तिला दुखवलं नाही म्हणून मी आज जिवंत आहे. आता जेवढं मिळालंय तेवढं मी अशा पद्धतीने जगायचा प्रयत्न करतो की त्यातून दुसय्राला झाला तर आनंदच होईल. दुसय्राला दुखवून मला काय मिळणार?"

मला माहित असलेल्या वात्रट, गमत्या एरिकच्या जागी एक वेगळाच एरिक मला दिसायला लागला होता!

वेदश्री's picture

29 Jul 2008 - 1:11 pm | वेदश्री

एषगोय,
तुम्ही सांगितलेल्या बसचा अपघात मी स्वतः अनुभवला आहे पण मी थोडक्यात बचावले होते आणि मग जवळ बसलेल्या बाबांशी माझ्या तत्व आणि अध्यात्मावरच्या गप्पा अगदी झकास रंगल्या होत्या. खूपच क्वचित ते असे मनापासून भरभरून बोलतात, चर्चा करतात.. त्यादिवशी का कोण जाणे पण ते अगदी गप्प गप्प बसून होते. अचानक कलाटणी मिळून हव्या तशा गप्पा सुरू झाल्याने अगदी छान वाटले होते. अर्थात रात्री डायरी लिहिताना वेगळाच विचार मनात पिंगा घालत होता.. पत्रा चिरून पायाला नुसती जखम होण्यापेक्षा जर माझा अख्खा पायच चिरला गेला असता तर?

एरीकचा सकारात्मक दृष्टीकोन खूप आवडला. तसे विचार प्रत्यक्षात अंगिकारणे खूप अवघड असते.

II राजे II's picture

29 Jul 2008 - 3:57 pm | II राजे II (not verified)

>>>...एरीकचा सकारात्मक दृष्टीकोन खूप आवडला. तसे विचार प्रत्यक्षात अंगिकारणे खूप अवघड असते.

हेच म्हणतो...... !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Jul 2008 - 10:16 pm | श्रीकृष्ण सामंत

अदिती,
तुझी ही गोष्ट वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.
आयुष्य किती क्षणभंगूर असतं.निसर्गाने मानवला ओंजळी भरभरून निर्मितीची क्षमता देली,पण नक्की भविष्य कसं समजावं ही कला दिली नाही.अर्थात तसं न देण्यातही त्याचा काही उद्देश असावा. नाहितर तो मानव जेव्हडा सुखी तेव्हडाच किंबहूना थोडा जास्तच दुःखी झाला असता.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

भाग्यश्री's picture

30 Jul 2008 - 4:04 am | भाग्यश्री

हे असं कसं होतं कुणास ठाऊक.. आमच्या बिल्डींग मधे राहणारे एक काका, आणि त्यांचा १८-१९ चा मुलगा बसने शिर्डीला निघाले.. आणि इतक्या वेळ खिडकी पाशी बसलेला अमोलदादा उठून शेजारी बसला, आणि काका खिडकीपाशी.. सेम स्टोरी.. शेजारून ट्रकने धडक दिली.. डोक्याचा पार चेंदामेंदा.. अमोलदादाच्या पोटात काचा गेल्या.. पण काका तिथल्या तिथेच गेले.. :( मी ८-९ वर्षांची होते, आणि आईबाबांनी कितीही दटावलं असलं तरी मी काकांची बॉडी पाहायचा मुर्खपणा केला होता.. अजुनही ते डोळ्यासमोरून जात नाही.. आणि आयुष्य किती क्षणभंगूर आहे ते जाणवते..! :(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2008 - 12:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... आणि आयुष्य किती क्षणभंगूर आहे ते जाणवते..!
स्वतःच्याच घरात पहिलाच मृत्यू पाहिला आणि मलाही तेवढंच जाणवलं. लोकं माझ्यावरच्या "जबाबदारी"बद्दल बोलत होते, पण मला समजत होतं एवढंच की आत्ता अहे ते खरं! जेवढं जमेल तेवढं एन्जॉय करायचं. आपल्या दु:खी चेहेय्रानी इतर दु:खी होतात आणि आपल्या हसण्यानी आनंदी! एरीकनी मला पुन्हा त्याची आठवण करून दिली.
म्हणून मिपाचा आनंद लुटा ... हसा आणि हसवा! :-)

(आनंदी) अदिती

वेदश्री's picture

29 Jul 2008 - 1:15 pm | वेदश्री

मस्त लिहिलं आहे, कांताकाका ! लहान रेघेशेजारी मोठी रेघ काढणार्‍या बिरबलाची आठवण आली. असे लिहित रहा. पुढील लेखनास शुभेच्छा.

>मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.
मलाही असेच वाटते. :)

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Jul 2008 - 10:22 pm | श्रीकृष्ण सामंत

वेदश्री,
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
"मला ही असेच वाटते"
मालवणीत
"माका ही असांच वाटतां"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

31 Jul 2008 - 8:41 am | विसोबा खेचर

अंतर्मुख करणारे अनुभव आणि प्रतिक्रिया!

हेच म्हणतो..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2008 - 9:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंतर्मुख करणारे अनुभव आणि प्रतिक्रिया!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतोष's picture

11 Jan 2009 - 9:16 pm | सतोष

मा