" तुम्हाला हिंदी येते? "
" येते तुटकी फुटकी "
" कोकणी येते? "
" नाही "
" अहिरणी "
" अं? "
" गोंडी? "
" नाही "
" तेलगु? "
" नाही "
" तुळु "
" ही कुठली भाषा? "
" तमिळ "
" नाही "
" ओरिया "
" नाही "
" बांग्ला "
" नाही हो नाही "
" भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे अन तुम्हाला तुमची मातृभाषा सोडून
कुठलीही दुसरी भाषा धड येत नाही, खंत नाही वाटत? "
" वाटते ना! "
" कसची? "
" इंग्लिश नाही येत ना त्याची! "
प्रतिक्रिया
29 Apr 2014 - 9:26 pm | आतिवास
:-)
29 Apr 2014 - 10:23 pm | आत्मशून्य
:)
29 Apr 2014 - 10:24 pm | शुचि
इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे त्यामुळे असे होत असावे. अजून काय!!
30 Apr 2014 - 8:45 pm | जयनीत
ज्ञान भाषेचा मुद्दा आहेच पण त्यामुळेही फारसा फरक पडतो असे वाटत नाही.
सामन्य लोकांच नोकरी अन शिक्षणात त्यामुळे फारसं अडतांना दिसत नाही.
अनेक उच्च शिक्षित लोकानांही ती भाषा पूर्णपणे येतेच असं नाही. विषया पुरतं भाषेचं ज्ञान अन शब्द संग्रह ह्याच्या बळावर कित्येक लोक त्यांच्या विषयात मूलभूत संशोधन करण्या पर्यंत यशस्वी झालेले आहेत.
अन नोकरी किंवा व्यवसायातही खूप वर पर्यंत पोहचलेल्या लोकांचंही त्या शिवाय फारसं अडत नाही.
पण तरही खंत वाटण्याचे कारण त्या भाषेत बोलल्यावर मिळणारी खरी खोटी प्रतिष्ठा.
30 Apr 2014 - 2:16 am | खटपट्या
"विविधतेतील एकता" म्हणायचय का तुम्हाला ?
1 May 2014 - 9:14 pm | जयनीत
एकटा हेच म्हणायचं होतं.
भाषेच्या मर्यादेमुळे आलेला एकटेपणा इथे अधोरेखित करायचा आहे.
30 Apr 2014 - 8:52 pm | सुहास..
क्वालिटी वाढली बॉस !!
थोडक्यात लिहीलय पण मस्त !!!
अवांतर : बरं , तुला संस्कृत येत नाही याची खंत वाटत नाही ..
अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी
वाश्या
1 May 2014 - 9:20 pm | जयनीत
''''''''''''''अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या'''''''''''
हे मात्र अगदी जबरदस्त….
30 Apr 2014 - 9:12 pm | पैसा
छान लिहिलंय.
1 May 2014 - 11:28 am | कवितानागेश
:)
2 May 2014 - 12:01 am | तुमचा अभिषेक
मला इंग्लिश जमत नाही (भाषा हं) याची खंत माझ्यापेक्षा माझ्या बायकोलाच जास्त वाटते. कारण तिच्या मित्र-मैत्रीणी वा काही हायफंडू कॅटेगरीतले स्टुडंटस दैनंदिनीतील गप्पाही फाडफाड ईंग्लिशमध्ये मारतात, तर मला त्यांच्याशी बोलायची वेळ आल्यास मी गंडेल असे तिला वाटते.
बायकोचे तरी ठिक पण माझ्या मराठी माध्यमातील परमपूज्य पिताश्रींना पण हि खंत वाटते की त्यांच्या मित्रांची पोरे जी माझ्यापेक्षाही कमी हुशार आहेत ती देखील फाडफाड फाडतात.
मला स्वताला मात्र मी इंग्लिशमध्येच पेपर लिहून आणि ईंग्लिशमध्येच वायवा (तोंडी परीक्षा) देऊन ईंजिनीअरींग केली याचेच फार कौतुक.. खंत अशी कधीच नाही :)
पण ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की शिकावी. या भाषेला आता आपण एवढे महत्व देऊन ठेवलेय ते बदलणे कोणी एखाद दुसर्याने स्वतापुरती क्रांती करून होणार नाही. तर त्यापेक्षा न्यूनगंड आणि अहंकार दोन्ही बाजूला सारून नक्कीच शिकावी. ज्यांना जमत नाही त्यांनीही आमचे यावाचून काही अडले नाही असा तोरा मिरवायची गरज नाही. मी सिविल ईंजिनीअर आहे. आज ऑफिस जॉब करतोय तर बोलावी लागतेच. तेच साईट जॉब करत असतो तर तितकीशी गरज लागली नसती. पण म्हणून मी लगेच तेव्हा ईंग्लिशवाचून माझे काही अडत नाही असे बोलण्याला काही अर्थ नाही.
3 May 2014 - 4:17 pm | जयनीत
जेव्हा काहीही लिहिण्याचा विचार मनात नव्हता तेव्हा असंच काहीतरी सुचलं अन ते टायपलं. मनातला विचार कितपत लिखाणातून उतरेल ह्याचीच शंका वाटत होती. तरीही लिखाण ब-यापैकी वाचकां पर्यंत पोहोचलं आहे हे बघून बरं वाटतय.
प्रतिसादा साठी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.