कधी कधी बान्ध भावनान्चे
अचानक फुटतात
पण अश्रू मात्र
पापण्यान्तच गोठतात...
अचानक येणारा पाऊस
आणि नकळत येणार्या आठवणी
सरता सरत नाहीत
दोघेही चिम्ब भिजवून जातात
शरीराला अन मनालासुद्धा...
प्रेम व्यक्त करायला
का असतात, शब्दान्ची बन्धने ??
पुरेशी नसतातच का कधी
तुझ्या-माझ्या ह्रदयाची स्पन्दने ??
प्रतिक्रिया
6 Nov 2007 - 1:09 pm | शब्दवेडा
मी केलेल्या काही निवडक चारोळ्या
7 Nov 2007 - 1:29 am | विसोबा खेचर
अचानक येणारा पाऊस
आणि नकळत येणार्या आठवणी
सरता सरत नाहीत
दोघेही चिम्ब भिजवून जातात
शरीराला अन मनालासुद्धा...
वा! क्या बात है...
तात्या.
7 Nov 2007 - 11:20 pm | स्वाती राजेश
छान आहेत चारोळ्या.
7 Nov 2007 - 5:07 pm | शब्दवेडा
मीही आता शिकलोय
मनातले मनातच ठेवायला
आणि उगाचच ओठावर
खोटे हसू खेळवायला..
सान्गायचे तर खूप असते..
पण शब्दच सापडत नाहीत..
कोन्डलेल्या श्वासान्ना मोकळी
वाटच सापडत नाही...
पावसाने थोडे तिच्या
येण्यासाठी थाम्बावे...
पण ती आल्यावर मात्र
मनसोक्त बरसावे...
7 Nov 2007 - 6:38 pm | धनंजय
या अधिक आवडल्या
7 Nov 2007 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणतो !
14 Nov 2007 - 1:16 pm | शब्दवेडा
आयुष्यावर हसता हसता..
हळूच आयुष्य माझ्यावर हसून गेले..
आठवणीन्च्या पावसातील दोन थेम्ब..
नकळत डोळ्यान्तून सान्डून गेले..
कवितांवर कधीच..
भुलायचं नसतं..
कारण कवितान्च्या जगात..
सगळंच कही खरं नसतं....
14 Nov 2007 - 1:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त रे शब्दवेड्या !!!
छान कविता आहेत, येऊ दे आणखी काही अशाच कविता..................!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
14 Nov 2007 - 6:01 pm | विसोबा खेचर
कवितांवर कधीच..
भुलायचं नसतं..
कारण कवितान्च्या जगात..
सगळंच कही खरं नसतं....
सुंदर...!
शब्दवेडेसाहेब, येऊ द्या अजूनही...
तात्या.
14 Nov 2007 - 8:06 pm | सुवर्णमयी
या गटातील दुसरी चारोळी जास्त आवडली.
14 Nov 2007 - 3:40 pm | स्वाती राजेश
आयुष्यावर हसता हसता..
हळूच आयुष्य माझ्यावर हसून गेले..
आठवणीन्च्या पावसातील दोन थेम्ब..
नकळत डोळ्यान्तून सान्डून गेले..
हे खुपच छान. अशाच ओळी येउ देत.
वाट बघत आहे सुंदर ओळींची.
14 Nov 2007 - 7:18 pm | शब्दवेडा
व्याकरणाचे नियम मी
सहसा पाळत नाही...
कारण प्रत्येक गोष्ट साच्यात बसविणं
मला कधीच जमत नाही....
थोडं समजायचं असतं..
थोडं उमजायचं असतं...
कारण सगळंच काही..
शब्दान्त सान्गायचं नसतं...
14 Nov 2007 - 7:29 pm | ध्रुव
या ओळी आवडल्या
--
ध्रुव
14 Nov 2007 - 7:50 pm | विसोबा खेचर
व्याकरणाचे नियम मी
सहसा पाळत नाही...
कारण प्रत्येक गोष्ट साच्यात बसविणं
मला कधीच जमत नाही....
क्या बात है, जियो!
शब्दवेडेसाहेब, तुम्ही अगदी आमच्या 'दिल की बात' बोललात!
तात्या.
14 Nov 2007 - 7:30 pm | मनिष
आयुष्यावर हसता हसता..
हळूच आयुष्य माझ्यावर हसून गेले..
आठवणीन्च्या पावसातील दोन थेम्ब..
नकळत डोळ्यान्तून सान्डून गेले..
फारच आवडले हे!
14 Nov 2007 - 7:48 pm | प्राजु
शब्दवेडेराव,
पावसाने थोडे तिच्या
येण्यासाठी थाम्बावे...
पण ती आल्यावर मात्र
मनसोक्त बरसावे...
अगदी छान आहे ही...
प्राजु.
14 Nov 2007 - 8:21 pm | उदय ४२
आरशात चेहरा पहावा
चेहर्यात मन
मनात मला
माझ्यात तुला
......अन मग
आरसाच पाहु नये..!
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
15 Nov 2007 - 5:46 pm | ashwini
फारच छान !!
19 Nov 2007 - 11:27 am | शब्दवेडा
शब्दांत मांडतो मी
हसरी सुरेल गाणी..
ह्रदयात दडवितो मात्र
व्यथा अनामिक केविलवाणी..
गणितात तसा मी
थोडा कच्चाच आहे..
म्हणूनच व्यवहाराच्या परीक्षेत माझ्यावर
'नापास' असा शिक्का आहे....
19 Nov 2007 - 12:55 pm | विसोबा खेचर
वरील चारोळ्या तेवढ्या खास वाटल्या नाहीत बॉस!
असो..
पुढील चारोळ्यांकरता शुभेच्छा!
तात्या.