पुस्तकाची ओळख - "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing "

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
23 Apr 2014 - 1:17 am

पूर्वी ऐसीवरती एका धाग्यात एका पुस्तकाची ओळख करुन दिली होती. बालमानसशास्त्रावरील हे पुस्तक अतिशय अ‍ॅबनॉर्मल केसेस हाताळणारे व हृदयद्रावकच वाटले. इथे तो प्रतिसादात्मक लेख टाकते आहे. हळव्या लोकांनी वाचू नये. -

काल "बार्न्स अँड नोबल्स" मध्ये , "The Boy Who Was Raised As a Dog, and Other Stories from a Child Psychiatrist’s Notebook: What Traumatized Children Can Teach Us About Loss, Love, and Healing " पुस्तक चाळता चाळता एक पूर्ण कथा वाचली. एका बालमानसोपचारतज्ञाच्या, पेशंटच्या हृदयद्रावक केसेस यात आहेत. पैकी मी "Cold Heart" नावाची केस वाचली. सुरुवात केल्यावर खालती ठेवताच येईना. या १८ वर्षाच्या मुलाने २ लहान मुलींचा (वय वर्षे १२ व १३)खून करुन, नंतर त्यांच्या शवांवर बलात्कार तर केलाच तरीही त्याच्या राग शांत होईना तेव्हा बूटांनी त्यांना चिरडले.
पण हे सर्व प्रक्षोभक आणी हिंसक व भडक लिहीण्यासाठी हा प्रतिसादप्रपंच नाही तर त्या मुलाशी व त्याच्या पालकांशी बोलून या मानसोपचारतज्ञाला जी "इनसाईट" मिळाली ती मला सांगायची आहे.
या मुलाची आई जी डोक्याने थोडी अधू होती, तिला मुलाचे रडणे सहन न झाल्याने, या मुलाला तान्हे असताना अंधार्‍या खोलीत रडत ठेऊन बाहेर निघून जात असे. असे महीनोंमहीने केल्याने त्या बाळाचे रडणे तर थांबले पण मानवी संपर्कातून जी ऊब व माया मिळते ती न मिळाल्याने, हा मुलगा माणसांवर विश्वास टाकणे, त्यांच्या सकारात्मक प्रोत्साहनास प्रतिसाद देणे , त्यांच्या भावनांशी एकरुप होणे अशा काही मुलभूत "ट्रिगर्स्"पासून वंचित राहीला. त्यातून त्याच्या संतापाचा, "सहानुभूती व सहवेदनेच्या अभावाचा" जन्म झाला.
लेखकाने खूप सोप्या पण वैद्यकीय भाषेत हे उलगडून दाखविले आहे. पुस्तक खाली ठेववतच नाही. या पुस्तकातील अन्य लहान मुलांच्या कथाही अशाच विद्रावक, भयानक पण दु:खाचा कढ आणणार्‍या होत्या. एक वेगळ्याच विषयावरचे पुस्तक.
गुडी -गुडी (गोग्गोड) पुस्तकांपेक्षा फार वेगळ्या अन व्यावहारीक विषयावरचे पुस्तक असे म्हणेन.

परवा हे पुस्तक लायब्ररीत मिळाले. सर्वच कथा विचित्र व हृदयद्रावक वाटल्या.बालमानसोपचारतज्ञाचे काम इतके अवघड असेल याची कल्पना नव्हती.

एक कथा आहे जी मला सर्वात स्पर्शून गेली. - 'फॉर युअर ओन गुड'.३ वर्शाच्या मुलीने तिच्या आईवर रेप होताना व आईचा नंतर खून होताना पाहीला. नंतर त्या खून्याने या इवल्याशा मुलीचा गळा चिरला.तो गळा चिरताना त्याने हे शब्द वापरले की "फॉर युअर ओन गुड डूड".११ तास ही मुलगी एकटी त्या प्रेताजवळ राहीली, तिने स्वतःचे स्वतः फ्रीझमधील दूध पीण्याचा प्रयत्न केला पण गळ्यातून ते दूध बाहेर येई. ती ११ तासांनी सापडल्यावर काही महीन्यांनी तिने फोटोच्या ढीगातून त्या खून्याला ओळखले. पुढे विटनेस म्हणून तिला वापरणार होते पण त्याची पूर्वतयारी म्हणून ती ४ वर्षाची असताना बाळाला मानसोपचारतज्ञाकडे पाठविले गेले.अन मग थेरपी सुरु झाली.

की मुलगी काय करत असेल बरं थेरपीत? तर डॉ. पेरींवर विश्वास बसल्यानंतर ती हळूहळू ओपन अप झाली व "तो' सीन स्वतःची स्वतः एनॅक्ट करु लागली. ती पेरींना हात बांधल्यासारख्या कल्पित अवस्थेत झोपवत असे.थोपटत असे, मधेच जाऊन दूध आणे व देई,खेळणे आणे व देई. पेरी अर्थातच 'त्या आईची" भूमिका करत असल्याने हालचाल करत नसत.मग ती त्यांच्या अंगावर झोपून "रॉक अन हम" करत असे.कधी रडत असे/हुंदके देत असे.हे असे दर सेशनमध्ये होई.या थेरपीचा की पॉईंट हा होता की त्या मुलीला सिचुएशनचा पूर्ण "कंट्रोल" पेरींनी दिला. जो कंट्रोल तिला "तेव्हा" मिळाला नाही तो या सेशनमध्ये तिला दिला गेला. अन हीलींग सुरु झाले.

पुढे ही मुलगी खूप 'प्रॉडक्टीव्ह" आयुष्य जगली,जगते आहे. तिला उत्तम ग्रेडस मिळाल्या. तिचे स्वतःचे कुटुंब आहे. ती एक द्याळू व संतुलीत व्यक्ती आहे. शी इज जस्ट डुईंग फाईन.
___________________________________
अर्थात फक्त थेरपीच नव्हे तर औषधोपचाराचीही जोड द्यावी लागली.क्लोनॉडीन नावाच्या औषधामुळे तिचे निद्रेविषयक बरेच प्रश्न सुटले, बेल वाजल्यावर दचकणे आदि भीती दूर झाली वगैरे. याच कथेत औषधोपचारावरती एक फार मार्मीक मिमांसा केलेली आहे. मेंदू आपले काम न्यूरॉन्स नावाच्या ट्रान्स्मिटर्स द्वारा करतो.कोणतीही संवेदना अनुभवण्यासाठी हे न्यूरॉन्स विशिष्ठ रेसेप्टर्स्कडे जाणे आवश्यक असते. न्यूरॉन्स = किल्ली अन रिसेप्टर्स = कुलुप असे धरल्यास, या एकमेव अशा किल्ल्या असतात असे मानता येईल. म्हणजे त्या त्या किल्लीने फक्त अणि फक्त ते ते कुलुपच उघडणार. मग सायकोअ‍ॅक्टीव्ह औषधे काय करतात तर या किल्ल्या कॉपी करतात अन हवी ती दारे (कुलपे) उघडतात अथवा बंद करतात.
पुढेही सोप्या वैद्यकीय भाषेतील खूप विश्लेषण या कथेत वाचावयास मिळते.

ही कथा व हे एकंदर पुस्तकच मानवी मेंदूची गुंतागुंत सोडविणारे वेधक वाटले.
______________________
या कथेसंबंधीत लेख - http://www.aaets.org/article196.htm

एक शेवटची "केस" सांगते. अँबर नावाची मुलगी स्वतःच्या मनगटावर रेझर/सुरीने "कट्स" देत असे. बरेचदा असे "सेल्फ्-म्युटिलीएशन" करणार्‍या मुलामुलींचा भूतकाळ अंधारमय/यातनामय असतो आणि अँबरही याला अपवाद नव्हती.
७ वर्षाची असल्यापासून तिच्या सावत्र वडीलांनी केलेल्या लैंगिक शोषणाची ती शिकार होती. वडील दारु प्यायचे तेव्हा "तसे" वागायचे. भीतीमुळे तिने हे लपविले होतेच पण पुढेपुढे एकदाचे "ते" होऊन जाउ दे या हेतूने ती त्यांना दारु देणे/प्रव्होकेटीव्ह वागणे आदि करुन ती तो यातनामय प्रसंग हातावेगळा करत असे. पुढे २ वर्षांनी आईला ने वडीलांना तिच्याबरोबर पाहीले व हाकलून दिले. पण आईने काही मानसोपचारतज्ञाची मदत घेतली नाही.
लहानपणीच्या या स्मृती अँबरकरता इतक्या ओव्हरव्हेल्मींगली यातनामय होत्या की हळूहळू त्या स्मृतींपासून स्वतःला "डिसोसीएट" करायला ती मनगटावर "कट्स" देऊ लागली व "ट्रान्स" मध्ये जाऊ लागली. अशा प्रकारची मुले जे ड्रग्ज घेऊन साधतात ते ती स्वत:ला जखमा करुन साधू लागली.
तिला लहानपणाची लाज (शेम) व गुन्हेगार (गिल्ट) वाटे पण स्वतःला सुरक्षित करण्याची पॉवर तर हवी होती. यातून सुरु झाले एक समांतर आयुष्य!
प्रसंगी ती स्वतःला कावळा समजे. अतिशय चतुर/स्मार्ट पक्षी जो पॉवरफुल आहे, वाईटाचा पारीपत्य करणारा आहे. अन तो काळा हीडीस आहे, कोणालाही नको असलेलाही आहे. हवे तेव्हा ती त्या जगात निसटून जाई , जिथे ती कावळा असे. ती फक्त काळे कपडे घाले, शरीरावर काळे टटू रेखाटून घेत असे.
डॉ पेरींनी तिला कशी थेरपी दिली, तिला श्वासावर लक्ष केंद्रित करण्यास शिकविले, १ श्वास - १ पायरी- २ रा श्वास-दुसरी पायरी .... अशा १० पायर्‍या उतरुन तिला मनातल्या मनात जीन्याखालच्या अंधार्‍या पण सुरक्षित खोलीत जायला "स्मृती पासून डिसोसीएट करायला" शिकवले ज्यायोगे ती "कट्स" देईनाशी झाली.
पुढे याच थेरपीतून त्यांनी तिला हे पटवून दिले की जग "हीडीस समजून" तिला नाकारत नसून ती जगावर तिच्या शेम व गिल्टचे आरोपण करत एक सेल्फ-फुलफिलिंग प्रॉफेसी जगत आहे हे तिच्या लक्षात आणून दिले.
_____________
अर्थात औषधोपचारही लागलेच लागले. या औषधांचे मेंदूवर होणारे परीणाम व विश्लेषण केवळ वाचनीय आहे. या पुस्तकातून एक नक्की अर्थबोध झाला तो म्हणजे - बाळाची पहीली वर्षे फार फार नाजूक असतात अन आई -वडीलांचा रोल फार महत्त्वाचा (क्रुशिअल) ठरतो. दुसरे एक कळले ते हे की मुलांना रुटीन/एक स्ट्रक्चर (साचा) लागते. एका प्रेडिक्टेबल, रीपीटीटीव्ह आयुष्याची अतोनात आवश्यकता असते व त्यातून त्यांची वाढ होत असते. असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.
________________
प्रत्येक समुपदेशकाने वाचावेच असे पुस्तक आहे.

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

23 Apr 2014 - 1:51 am | आत्मशून्य

खरे तर ह्या प्रकारांची ओळख डेक्स्टर, हनिबाल सेरिज, टेकिंग लाइव्हज सरखे असंख्य चित्रपट्/टीवी सिरीअल्स अथवा गेलाबाजार कॉडी मॅकफायदीन च्या स्मोकी बेरेट सिरीज सारख्या पुस्तकातुन जास्त झाली... सुरुवातीला हे सगळे सायको अतिरंजीत व प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अतिरीक्त हाउस भागवायसाठी लिहलेले वाटायचे. सगळेच कल्पनेचे मनोरे. पण आता मात्र मत बदलल आहे, आणी असला हिंसक-सायकोपणा मनोरंजन म्हणून सहन करायची इछ्चासुधा.

पण जेंव्हा हे प्रकार सत्यघटना म्हणुन सामोरे येतात तेंव्हा असले दुर्दैव बघुन खरोखर मन विषण्ण होते. पुस्तक नोंद करुन ठेवले आहे पण सध्या वाचणार नाही.

असे आयुष्य देता येत नसेल त्यांनी मुलांना जन्माला घालण्याचा सव्यापसव्य करुच नये.

खरेच आहे. परवाच फ्रिकोनॉमिक्स वाचत होतो. त्यात साधारण ९०च्या दशकापासुन अमेरिकेतील गुन्हेगारी अचानक कमी कशी झाली याचे मस्त उदाहरण दिले आहे. सगळेच म्हणतात इकॉनॉमीक बुम आला, पोलीसांची कामगीरी सुधारली पण कोणी या कारणास्तव स्वतःची पाठ कितीही थोपटुन घ्यावी खरे कारण हेच आहे की त्याआधी प्रथमच अमेरिकेत गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाली होती. ज्यामुळे असंख्य अवांछीत संतती अक्षरशः जन्माला येता येता राहील्या(इट्स अमेरीका), जे भविष्यातील गुन्हेगारही बनु शकले असते, आणी जे जन्माला आले त्यातील बहुतांश सकस वातावरणात पोसले गेले, गुन्ह्याच्या संखेची घसरलेली टक्केवारी हे फक्त आणी फक्त त्याचीच परिणीती आहे. - फ्रिकोनॉमिक्स.

ज्यामुळे असंख्य अवांछीत संतती अक्षरशः जन्माला येता येता राहील्या(इट्स अमेरीका), जे भविष्यातील गुन्हेगारही बनु शकले असते, आणी जे जन्माला आले त्यातील बहुतांश सकस वातावरणात पोसले गेले, गुन्ह्याच्या संखेची घसरलेली टक्केवारी हे फक्त आणी फक्त त्याचीच परिणीती आहे. - फ्रिकोनॉमिक्स.

बाप रे!! भयंकर आहे हे. आणि विशेषतः आमच्याइथे अनेक म्हणजे खरच बरीच होर्डींग्स दिसतात - "मी जन्माला यायच्या आधीच देवाला माझा आत्मा माहीत होता"/ "तुम्हाला माहीत आहे का की माझ्या बोटाचा ठसा मी गर्भात असतानाच पहील्या अमक्या अमक्या दिवसात तयार होतो"/ "मला गर्भात असतानाच अमक्या दिवशी माझ्या बाबांचे डोळे मिळाले" ...... एकूण काय गर्भपात करु नका.

माझा तरी या "विरोधाला" विरोध आहे. केवळ कायद्याचा बडगा दाखवून लोकांवर गर्भपाताची बंदी आणायची अन मग मुलांचे हाल कुत्रा खात नाही :( ..... इट्स रिडीक्युलस.

पुस्तक नोंद करुन ठेवले आहे

जरुर वाचा. अतिशय रौद्र अन विचित्र कथा आहेत पण औषधोपचार अन बालसंगोपनाविषयी अमूल्य टीप्स आहेत. वाचून वेगळच काही वाचल्याचे समाधान मिळते. शिवाय कथांचा अंत सकारात्मक आहे.

असले दुर्दैव बघुन खरोखर मन विषण्ण होते.

खरे आहे. मला खात्री आहे की डॉक्टर पेरींनाही जेवण जात नसेल, झोप येत नसेल पण या अशा संशोधकांचे मर्म हेच की या विषण्णतेला भेदून झेप घेऊन ते अतिशय वैज्ञानिक अन वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून या केसेस बघू शकतात व काही एक थिअरी/उपचारपद्धती विकसित करु शकतात. पेरींनी इतक्या निर्लेप अन प्रांजळपणे केसेस मांडल्या आहेत अन तरीही त्यांचा "कंपॅशनेट" दृष्टीकोन केवळ अनपॅरलल आहे. हे पुस्तक वेड्यासारकं आवडलं होतं. आज परत ग्रंथालयातून घेऊन वाचेन म्हणते.

पैसा's picture

23 Apr 2014 - 6:41 am | पैसा

लहान मुलांबद्दल असं काहे वाचणं अशक्य आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी बहुधा अक्षरच्या दिवाळी अंकात एका मंदबुद्धी मुलाबरोबर त्याचा मामा लैंगिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याला प्रेमाचं नाव देतो अशी काही तरी कथा वाचली होती आणि त्याचा नंतर कित्येक वर्षे त्रास झाला होता. तसंच एका पिंजर्‍यात कित्येक वर्षे कोंडून ठेवलेल्या मुलाची सत्यकथाही वाचली होती. सत्य असलं तरी वाचवत नाही. त्यापेक्षा असल्या गोष्टींबद्दल माहीत नसल्याचा आव आणणं जास्त सोपं आहे.

या पुस्तकाची अनेक संस्थळांवर परीक्षणं वाचली होती. मात्र परीक्षणंच इतकी अंगावर येत होती की पुस्तक वाचायचं धाडस झालं नाही.

असंच एक पुस्तक पडून आहे सिंथिया ओवनचं लिव्हींग विथ दी एव्हिल.
अकरा वर्षांच्या मुलीवर जन्मदाता बाप अत्याचार करतो. त्या अत्याचारातून जन्माला आलेल्या बाळाचा या जन्मदात्या मुलीची आई चाळीस वेळा भोसकून खून करते आणि दुसर्‍या एका शहरात नेऊन पुरते. ही मुलगी या सार्‍या प्रकाराला धीराने तोंड देत मोठी होते...

गार्डीयनवर या पुस्तकाची धावती ओळख आहे.

पेरींचा संशोधक अन तज्ञ म्हणून दृष्टीकोन मला आवडला. अत्यंत वस्तुनिष्ठ. उदाहरणार्थ टीना नावाची लहान मुलगी आहे (मला वाटतं ९ वर्षाची) लैंगिक शोषणामुळे तिला काही समस्या आहेत. या समस्या उकलत असताना खेळांद्वारे पेरी नवीन नवीन संकल्पना तिला शिकवत जातात - (१) खेळात पुढची खेळी खेळण्याआधी थोडे थांबणे व विचार करणे (२) पेरी तिला हे शिकवतात की भविष्य ही गोष्ट प्लॅन करता येते, आपण वर्तमानातील वागणूकीने भविष्य ठरवू शकतो.

पेरींना खरच हॅट्स ऑफ!!! अफाट मानसिक ताकदीचा देवदूत वाटला मला. The way he has handled each case, simply amazing!!!