प्रथम तुज पाह्ता , जीव वेडावला अर्थात टू स्टेट्स

पेट थेरपी's picture
पेट थेरपी in जनातलं, मनातलं
20 Apr 2014 - 6:59 pm

एक पे एक फ्री ही मार्केटिंग मधली हमखास यशस्वी होणारी युक्ती आहे. चित्रपटाच्या रंगीत दुनियेतही ती वापरली जाते पण नेहमी यशस्वी होईलच असे नाही. असं बघा पहिले फरहा आली दोन चार चित्रपट करून विंदू कुमार बरोबर लग्न करून स्थिरावली. पण तिच्या पावलावर पाउल टाकून तब्बू आली. आणि पहिला प्रेम सोडा,( पहिला डाव भुताच असतो ना... ) पण प्रत्येक चित्रपटाद्वारे उत्तम काम करून तिने आपला असा क्लास निर्माण केला. सनी देवलच्याच घरातून बॉबी आला. तो बेताब आम्ही थेटरात जाउन बघितला होता हे कबूल करणे ही आता तरुणपणी केलेली एंबरासिन्ग कामे ह्या फोल्डर मध्ये टाकून डिलीट करायची बाब झाली. पुढे बॉबी इज सो सो क्यूट म्हणणार्‍या युवतींचा स्क्रू ढिला आहे कि काय असे उगीचच वाटायचे. पण त्यांच्या मागून आलेला अभय देवल मात्र अगदी खास आव्डीचा झाला. दिसणे तर टोन्ड डाउन आहेच पण कामे ही छान करतो आणि भूमिकांचे सिलेक्षनही वेगळे. सोचा न था, देव डी, ओय लक्की, अन जिंदगी मिले ना दोबारा! ब्लू आइड बेबी बेबी बेबी करिश्मा नंतर आली करीना जिने ओंकारा, जब वी मेट आणि इतर चित्रपटांतून आपले असे खास स्थान निर्माण केले आहे. खरी स्टार क्वालिटी तिच्यात दिसते जी करिश्मा कधी व्यक्त करू शकली नाही झुबेदा वगळता.तिच्या नशिबात गोविंदा अन सलमान तद्दन कमर्शिअल सिनेमे! भयानक कपडे आणि भिकार मेकप. गल्यान साखली सोन्याची मध्ये नाच करत पुढे आलेली पूजा भटट आठवते का? दिल है कि मानता नहीं मध्ये कलिंगड खाणारी, सर सर म्हणून गाणे गाणारी, डॅडी काँप्लेक्स असलेली लिस्प आणि चकणे डोळे असूनही धकवून नेणारी.पुढे प्रोड्यूसर बनली. जिस्म वगैरे सिनेमे काढले, राहुल रॉय विवेक मुशरन ची नायिका! आणि आलिया भट्टची मोठी बहीण!

ऐंशी आणि नव्वद च्या दशकात महेश भट्टचे नाव कायमच कोणत्या तरी बाबतीत चर्चेत असायचे. आंतरजाल नसतानाही तो कायम हेडलाइन्स ग्रॅब करायचा. स्टारडस्ट, सोसायटी, मूव्ही, स्टार अँड स्टाइल
अन तत्सम मासिकात मुलाखती देणे. अती वैयक्तिक बाबी( परवीनच नव्हे तर इतरही) उगीचच बोलून सनसनाटी प्रसिद्धी मिळविणे. एकावेळी तीन तीन चित्रपट दिग्दर्शित करणे अश्या गमती हा करत असे.
पण अर्थ ह्या आद्य स्त्रीवादी सिनेमाचा दिग्दर्शक असल्याने व कसेही असले तरी प्रांजलपणे मनात येइल ते बोलत असल्याने , स्वतः च्या मानसिक जखमा उकलून दाखविणारा त्याकाळात हा एक ऑड बॉल
कॅरेक्टर आमच्या सहानुभूतीला पात्र होता.

तेव्हा एकूणच करमणुकीची साधने कमी होती. ट्विटर, फेसबुकद्वारे तारेतारका सतत संपर्कात नसत २४/७ चॅनेल्स वरून आज ह्याने काय केले, त्याने काय खाल्ल्ले अशी बातमी पत्रे मिनिटो-मिनटी मिळत नसत. इन्स्टाग्राम पण नव्हते फोटो बघायला. त्यामुळे त्यांच्या जीवना बद्दल एक प्रकारचे कुतुहल मध्यमवर्गी मनात असे. लायब्ररीतून आणलेल्या स्टारडस्टमध्ये महेशने सोनी राझदान ( सारांश मधली - प्रिया राजवंश ची अपग्रेड! ) बरोबर चक्क दुसरे लग्न केले अशी एक खबर चवीने वाचली होती. ते लग्न, त्यासाठी धर्मबदल ते प्रेम इत्यादी ह्याने अगदी सविस्तर मुलाखत दिली होती. आज हे सर्व आठवण्याचे कारण आलिया!

टू स्टेटस मध्ये आलिया जेव्हाही पडद्यावर येते , तिच्या प्रेझेन्सने स्क्रीन झळाळून जातो. अतिशय फ्रेश, सुरेख आणि गोड दिसली आहे. कामही छान केले आहे. अ‍ॅज द रोल डिमांडस. स्टुडंट ऑफ द इअर मध्ये ती फारच नवखी होती पण आता तिला कॅमेर्‍यापुढे सहज वावरायचे जमून गेले आहे. क्वीनची मोहिनी अजून टिकून आहे ; परंतू करीना, कट्रिना, प्रियांका अनुष्क,, दीपिका ब्रिगेडला तिने झपाट्याने मागे टाकले आहे. ती तमिळ दिसत नाही असे अनेक प्रतिसाद येतील. पण दीपिकाच्या मीनाम्मा पेक्षा तरी मला आवडली ती. चित्रपटात कोणी तिचा कपडेपट सांभाळला आहे त्याला हॅटस ऑफ. अति शय योग्य लुक दिला आहे आणि शॉर्ट्स, स्कर्ट्स, चुडीदार, साडी, लहेंगा सर्व प्रकारचे कपडे उत्तम डिझाइन करून दिले आहेत.

एक बॉलीवुड प्रेक्षक म्हणून माझ्या मागण्या फार नसतात. थोडे इंटेलिजंट मनोरंजन व्हावे , कथा संगीत चांगले असावे. इतकेच. पण सध्या येणारे बरेच चित्रपट एक तर दबंगची सवंग कॉपी, अक्षय-सोनाक्षी धरपकड पट, बेबी डॉल एम एम एस/ डर अ‍ॅट मॉल असले काहीतरी असतात मग काय बघावे समजत नाही. त्या मुळे टू स्टेट्स हे एक प्लेजंट सरप्राइज मिळाले. कर्मभूमी चेन्नाई आणि दिलवालोंकी दिल्ली ह्यांचा
अनईझी संगम!

चेतन भगतच्या लेखनाची भाषिक क्वालिटी मला फारशी आव्डत नाही पण हा चित्रपट पुस्तकापेक्षा चांगला जमला आहे. दिग्दर्शकाने ओवर द टॉप न जाता काम केले आहे व सर्व कास्ट नीट रोलला न्याय देते.
समथिंग पीपल लाइक अस कॅन रिलेट टू असे वाट्ते. तमिळीअन आईबाबा - शिव आणि रेवती( रामुच्या रात मधली हिरवीण आता मम्मी झाली आहे चक्क.) आणि अमृता - पंजाबी आई - ह्यांचे रोल्स तर खूपच रिअल लाइफ वाटतात.

सैफची पहिली बायको, बेताब, मर्दची हिरॉइन असलेली अमृता ! ओरिजिनल सिखनी. जीवनातील आघातांनी आतून पिचून गेलेली, भरपूर नव्हे इतरांना, मुलाला देखील असह्य होईल असे इमोशनल बॅगेज घेउन वावरणारी. गरम गरम पराठे घेउन येणारी पण फिल्मी मा वाटत नाही. निरूपा रॉयने अमर केलेया व्यक्तिरेखे पासून बॉलिवूडच नव्हे तर समाज देखिल किती पुढे आला आहे असे जाणवते. व्हिकी डोनरमधील सासूबरोबर हुसकीचा पॅग लगावणारी पार्लरवाली आई आठवते का? मां बदल रही है.

रोनित रॉयचा रोल ही अवघड नाही त्याच्यासाठी. कसोटी जिंदगी की मधला ऐटबाज मि. बजाज, ते उडान मधला बाप आणि हा विझलेला आर्मी ऑफिसर. शेवटी बाप आणि मुलगा एका इश्यू वर रिलेट होतात ते अगदी खरे वाट्ते.

चित्रपटाचा पहिला भाग अगदी रीतसर रोमान्स आहे. तो ही आय आय एम मधला. तो बघताना अनेकांना आपल्या कॉलेजातील मैत्रीणीची नक्की आठवण येईल. ग्रॅज्युएशन, आणि मग प्लेसमेंट त्यातले सर्प्राइज
प्रसंग बघताना आपण ह्या माइल स्टोनची एक पालक म्हणून किती आसुसून वाट बघत आहोत ते फार प्रकर्षाने जाणवले. पण मुले मोठी होत असताना कधीतरी एका क्षणापासून ती आपली गोष्ट न राहता त्यांची बनली आहे आणि आपण फक्त एक मेन कथेतले सपोर्टिंग पात्र बनलो आहोत ही जाणीव देखील होते.
काहीतरी सुटल्यासारखे पण वाट्ते आणि एक सल राहून जातो. ह्या कथेतली मुले चांगली वाढवली आहेत.
आपल्या लग्नात आईबाबा जास्त आनंदी असा वेत अशी इच्छा कर्णारी गोड मुलगी आहे आणि आई वर प्रेम करणारा पण सुवर्ण मध्य न गाठू शकल्याने थकून गेलेला एम बी ए मुलगा आहे.

अर्जून कपूर पण मला पहिल्या पासून आवडतो. सत्ते शौरी ह्या त्याच्या आजी चित्रपट फायनान्स करत असत. मोना कपूर ची पूर्ण कहाणी पण सॅव्ही मासिकात वाचली होती. लग्न मोडल्यावर त्यांनी परिस्थितीशी झु़ंज दिली. लाइम लाइट पासून दूर जगल्या व काही काळापूर्वी त्यांचे कॅन्सरने निधन झाले.
मुलाचे यश बघता आले नाही. ह्या सिनेमात त्याने अतिशय बारीकीने व्यक्तिरेखेच्या सर्व छटा रंगवल्या आहेत. त्याच्या वयाची बॅक पॅक लाउन कामाला येणारी मुले आता माझ्या बरोबर काम करतात. त्याने क्रिश चे पात्र अगदी बिलीव्हेबल, रिलेटेबल केले आहे. सासुरवाडीत फिट होताना त्याची होणारी धावपळ,
माझ्याशी लग्न करा असे म्हणणे हा सीन खूपच मजेशीर आहे. एकीकडे खोल गेलेल्या जखमेसारखे चिरत
गेलेले लग्न जपणारी आई, अब्युझिव वडिलांबद्दलची घृणा आणि दुसरीकडे अनन्याबद्दलचे हळुवार प्रेम, ब्रेकप नंतरचे दु:ख ह्यात दबले जाणारे स्वत्व त्याने व्यक्त केले आहे. रणबीर कपूरसारखा हा फ्लॅम बॉयंट नाही . रनवीर सिंग सारखा चिल्लर चिंधी?/ टू फिजिकल नाही वरूण धवन सारखा ऑल अ‍ॅब्ज नो ब्रेन्स नाही. सिध्दार्थ सारखा टू पंजाबी नाही. ह्याच्याकडून चांगल्या कामाच्या खूप अपेक्षा आहेत.

सिनेमा बघताना जाणवणार नाही कदाचित पण गाणी चांगली आहेत. भारतातली जीवन पद्धती किती बदलली आहे त्याची जाणीव क्वीन आणि हा सिनेमा बघताना पदोपदी होते. कलाकारांची नवी पीढी आली आहे आणि प्रेक्षकांची देखील. पण संपताना पुढील रांगेतल्या युवतीने कोणाला तरी एस एम एस केलेला वाचता आला जस्ट अ‍ॅज शी वॉज टायपिंग इट, फँटॅस्टिक मुव्ही.. आय क्राइड अँड आय लाफ्ड. ......... सो ट्रू डीअर ... सो ट्रू!

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

नक्की कशापध्दल बोलायचे आहे तुम्हाला? धाग्याचा विषय नक्की काय आहे?
धाग्याच्या शिर्षकात 'टू स्टेट्स' वैगरे वाचले म्हणुन 'टू स्टेट्स' चित्रपटाचे परीक्षण असेल या ऊत्सुकतेने धागा ऊघडला. पण पहिले काही परिच्छेद भट्ट परिवार (?) आणि इतर काही कलाकारांपध्दल (अनावश्यक) माहिती मिळाली.
धाग्याच्या शिर्षकात 'टू स्टेट्स' वैगरे लिहुन त्याचे परीक्षण कुठे आहे?

एक प्रामाणिक प्रश्न! तुम्ही चेतन भगतचे 'टू स्टेट्स' हे पुस्तक (कादंबरी) वाचली आहे का? चेतन भगतचे 'टू स्टेट्स' वाचल्यावर हा चित्रपट पाहिला तर पदरी अगदी निराशा येते.
चेतन भगतचे कुठलेही पुस्तक वाचताना त्याच्या लेखनशैलीमुळे वाचत असताना प्रसंग आपल्या डोळ्यासमोर ऊभा राहातो. पण चित्रपटात पडद्यावर जे काही दिसते ते नक्कीच वेगळे (भयानक) असते.

कोणत्याही कादंबरीचे चित्रपटात रुपांतर (?) करताना मुळ कथानकाची इतकी चिरफाड कशाला करतात हे? सॉरी, पण हे माझे वैयक्तिक मत आहे.

अनुप ढेरे's picture

20 Apr 2014 - 9:19 pm | अनुप ढेरे

महेश भटनी आपल्या वैतक्तिक आयुष्यातून बरच काही बॉरो केलं आहे चित्रपटांसाठी. अर्थ, जख्म, वो लम्हे त्याच्याच आयुष्यातल्या घटना/व्यक्तींना केद्रस्थानी ठेऊन बनवलेले आहेत. मला तो दिग्दर्शक म्हणून आवडतो. तुमचा लेखही छान आहे. हायवे मध्ये पण आलिया भटनी काम छान केलं आहे असं ऐकलय.

पैसा's picture

20 Apr 2014 - 9:26 pm | पैसा

चित्रपट बघणीय असावा. चेतन भगतचे पुस्तक एकदा वाचायला म्हणून आवडले होते. आणि सिनेमा पुस्तकाबरहुकूम नसला तरी काही बिघडत नाही. एका माध्यमातून दुसर्‍यात जाताना थोडेफार बदल आणि काटछाट अपरिहार्यच.

अर्जुन कपूर हा बोनी कपूरचा मुलगा आहे. अभिनय कशाशी खातात हे त्याला नक्कीच माहित असणार! आणि आलिया भटबद्दल माझ्या कॉलेजात जाणार्‍या मुलीचे मत चांगले दिसले. रेवतीने चांगलं काम करणं यात काही विशेष नाही, आणि अमृता सिंगही चांगला डायरेक्टर असेल तर चांगलं काम करू शकते. तेव्हा एकूण सिनेमा एकदातरी बघेन नक्की.

बेताब मीही थिएटरमधे जाऊन पाहिला आहे, त्यामुळे इतर गोष्टींशी सहज रिलेट करू शकले! सिनेमाची गोष्ट एकतर सगळ्यांना माहित असावीच, पण या प्रकाराने लिहिलेले परीक्षण, आणि सिनेमाच्या निमित्त मनात आलेले विचार हे कॉम्बिनेशन आवडले. मिपावर स्वागत! असेच लिहीत जा!

यशोधरा's picture

20 Apr 2014 - 9:35 pm | यशोधरा

चांगलं लिहिलंय की. :)
मलाही बघायचा आहे हा सिनेमा. मी पुस्तक वाचले नाहीये.

प्यारे१'s picture

20 Apr 2014 - 9:49 pm | प्यारे१

पुस्तक वाचलंय. एखाद्या मसालापटाची पटकथा लिहावी तशीच स्टुरी आहे.

प्रथितयश कॉलेजला जाणारे तरुण तरुणी, अत्यावश्यक नॉर्थ साऊथ पोल्स, नॉर्थ वाल्या हिर्व्याच्या घरातली भांडणं, वाद, पंजाबी विरुद्ध तमिळ वाद, भांडणं, थोडा सेक्सचा तडका, मधेच हिरोनं हिरॉईनच्या घरी जाणं, भावाला शिकवणं, आई बाबाला वश करण्यासाठी प्रयत्न करणं वगैरे वगैरे...

अर्जुन कपूर आयायाएम वाला वाटतो का आमच्या एका मिपाकरासारखा? तो इशकजादे मधला रौडी आमदारनातू चांगला वाटतो खरंतर! आलिया भटला 'बघावं' लागेल. ;)

निलरंजन's picture

20 Apr 2014 - 10:15 pm | निलरंजन

चांगले लिहिलेय आवडले
अगदी मनापासून

प्रीत-मोहर's picture

20 Apr 2014 - 11:19 pm | प्रीत-मोहर

पे थे. मिपावर स्वागत.

आणि परीक्षण आवडलेच. उद्या परवात बघेनही

रेवती's picture

21 Apr 2014 - 2:34 am | रेवती

लेखन आवडले.
क्वीन सिनेमाच्या आधी थेट्रात याचा ट्रेलर दाखवला तेंव्हाच पहावासा वाटत होता.
धन्यवाद.

चिप्लुन्कर's picture

21 Apr 2014 - 9:43 am | चिप्लुन्कर

बघितला , चांगला आहे . आलीया चं दिस्लेइय आणि काम पण चांगल केलं आहे . अर्जुन नी पण काम चांगला केलय . फक्त टिपिकल चेतन भगत च्या कथेमुळे गरमा गरमी अमळ जास्तच आहे

इरसाल's picture

21 Apr 2014 - 11:11 am | इरसाल

तो अर्जुन त्या "जुबान पे लगाम" च्या थियेटर मधल्या "क्या यहा पिक्चर देखने आये हो" असे म्हणणार्‍या त्या पोरासारखा दिसतोय अ‍ॅडव्हर्टाइज मधे.

किसन शिंदे's picture

21 Apr 2014 - 12:02 pm | किसन शिंदे

काल पाह्यला अर्थातच चकटफू! अर्जून अन् आलियाच्या प्रेझेन्समुळे सिनेमाला एक रिफ्रेशिंग लूक येतो.

चित्रगुप्त's picture

21 Apr 2014 - 12:55 pm | चित्रगुप्त

लोकसत्तातील या सिनेमाचे परिक्षण:
http://www.loksatta.com/manoranja-news/alia-bhatt-arjun-kapoor-on-2-stat...

एखादं पुस्तक आपण वाचतो नी ते आपल्याला फारसं काही आवडत नाही पण वाचतानाच इतकं जाणवतं की त्यात पुरेपूर हिंदी फिल्मी मसाला आहे. काही वर्षांतच त्यावर हिंदी बॉलिवुड पट बनतो सुद्धा!

तोच हा २ स्टेट्स. एक अत्यंत ठोकळेबाज व काहिशी रटाळ कथा, त्यात काही तद्दन फिल्मी मसालेदार प्रसंग घालुन फुलवलेली. एक पुस्तक म्हणून फारसे (खरंतर बर्‍यापैकी) आवडले नसले तरी कदाचित टिपिकल हिंदी चित्रपट म्हणून तरी निव्वळ करमणूक होईल म्हणून बघायला गेलो. मुळात कथा आणि पटकथा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत यावर हिंदी चित्रपट सृष्टीत कोणाचा समज असेलसे वाटत नाही. हा चित्रपट बनवण्यापेक्षा त्याचा अभिवाचनाचा कार्यक्रम करायला हवा होता, बर्‍याच स्वस्तात झाला असता.

कादंबरीहून रटाळ चित्रपट, कंटाळवाण्या पारोश्या चेहर्‍याने सबंध चित्रपटभर वावरणारा नायक, तितकेच टुकार संगीत - ध्वनी - प्रकाश व मोठ्या स्क्रीनवर हाऊसफुल गर्दित बघितल्याने कमी पडणारा एसी यामुळे पुरता वैतागुन गेलो. त्यातल्या त्यात हिरवाईनीने आपले सुंदर दिसण्याचे काम चोख बजावल्याने मधेमधे डोळे सुखावत होते. शिवाय दोघांच्याही पालकांच्या भुमिकेत असणार्‍या चौघांनीही आक्रस्तळेपणा सोडून अपेक्षेहून बरीच उजवी भुमिका केली आहे. शिवाय पार्श्वभूमीला दिसणारे वास्तवदर्र्शी घरे, बिल्डिंगा, दारू पिणार्‍या पंजाबी बायका (हा हल्ली नवा स्टिरीयोटाईप होतोयसं दिस्तय - वास्तवदर्शी चित्रण म्हणजे दारू पिणार्‍या पंजाबी बायका आल्याच पाहिजेत ), कचरा, तुंबलेली गटारे, वायर्समुळे झालेली विद्रुप शहरे जसेच्या तसे येत असल्याने किमान चित्रपटाला एक वास्तवदर्शी अवकाश मिळते.

बाकी, अधिक काय लिहिणे ४/१०, फुकट मिळाला नी दुसरे काहीच करायला नसेल तर झोप येईपर्यंत पहा!

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2014 - 4:29 pm | पिलीयन रायडर

+१

हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं होतं की ही कथा नसुन चित्रपटची स्क्रिप्ट आहे.. तय्यार.. अश्शीच्या अश्शी उचलुन पिक्चर बनवता येईल..

मैत्र's picture

22 Apr 2014 - 1:59 pm | मैत्र

इतर पुस्तकांपेक्षा हे चेतन भगतचं पुस्तक बरंच बरं आहे (उदा. ते कॉल सेंटरवालं जाम डोक्यात जातं )

पंचेस चांगले आहेत. स्टिरिओ टाईप्स अतिशयोक्ती जरी असली तरी काही बाबतीत मस्त लिहिले आहेत.

मूळ स्टोरी - बी स्कूल, पंजाबी मुलगा, तमीळ मुलगी वगैरे सगळं तर त्याचं स्वतःचं आयुष्य आहे.
आता त्यात मिलिटरी बाप, ती भांडणं, थेट एस पी समोर तमीळ सासुने इक पल का जीना वगैरे गाणं इ.
टिपिकल चेतन भगत बळंच प्रकार आहेत. तरी देव प्रत्यक्ष येणं वगैरे पेक्षा आश्रम अनुभव ठि़क आहे.

अर्थात सिनेमात सगळं लार्जर दॅन लाईफ केलं असणार.

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2014 - 2:06 pm | पिलीयन रायडर

कॉल सेंटर वालं पुस्तक (म्हणजे त्यातले लोकांचे किती वाजता, काय कपडे घालुन कोण कोण, कुठल्या स्टॉपवरुन कॅब मध्ये बसलं हे डिटेल्स.. ह्या व्यतिरिक्त नक्की पुस्तकात काय लिहीलं होतं हे मला शप्पथ आठव्त नाहीये..) जर प्रमाण मानायचं असेल..तर हे फारच उत्तम पुस्तक आहे..

थेट एस पी समोर तमीळ सासुने इक पल का जीना वगैरे गाणं इ.
टिपिकल चेतन भगत बळंच प्रकार आहेत

म्हणुन तर ही पिक्चरची स्क्रिप्ट आहे..

मैत्र's picture

22 Apr 2014 - 3:05 pm | मैत्र

जे त्याचे नेहमीचे ओढून ताणून बनवलेले अति नाटकी प्रसंग आहेत ते सोडता
जो प्रत्यक्ष २ स्टेटस चा भाग आहे तो चांगला आहे..

अजया's picture

22 Apr 2014 - 3:46 pm | अजया

मूळ कथेतील पंचेसही हरवलेली पटकथा, गचाळ संगीत्,कोणतीही भाव भावना न दिसणारा चेहेरा घेउन फिरणारा नायक !!अगदीच डोक्यात गेला चित्रपट!

चेतन भगतच्या लेखनाबाबत माझा मुख्य आक्षेप आहे, की तो आपल्या कथांमध्ये घटना "घडवतो". अगदी ओढून ताणून घडवतो.

तसा प्रत्येक लेखकच कोर्‍या कागदावर विश्व उभं करत असतो, आणि घटना घडवत असतो. पण सराईत लेखकाचा हात अदृश्य असतो. घटना नैसर्गिकपणे घडल्यासारख्या वाटतात.

भगत कथानकातला पेचप्रसंग सोडवण्यासाठी अक्षरशः कुंथतो तेव्हा दया येते.

कॉलसेंटर (देवाचा फोन) आणि टू स्टेट्स (सासूबाईंचं गाणं आणि सासर्‍यांचं पीपीटी) इथे तर भगत कपडे काढून अंगावर रेड इंडियनसारखे फराटे ओढून "बघा बघा कसं जमवलं, आहे का नाही मी हुश्शार!" असं ओरडत नाचल्याचा भास झाला!

ऋषिकेश's picture

22 Apr 2014 - 4:49 pm | ऋषिकेश

हा हा हा! =))

आदुबाळा या प्रतिसादासाठी तुझ्या पुढिल ४ प्रतिसादांचे खंडन करणार नाही ;)

प्यारे१'s picture

22 Apr 2014 - 4:54 pm | प्यारे१

+१११११.

'बुलेट' वाचल्यापासून आबाचा फॅन! ;)

बॅटमॅन's picture

22 Apr 2014 - 5:12 pm | बॅटमॅन

नेमके आक्षेप हो आदूबाळ. दीडदमडीचा चेत्या भगत, मायला कधी भेटला तर चार शिव्या घालीन म्हंटो.

(पाव दमडीचा नसूनही मते ठाम असलेला) बॅटमॅन.

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2014 - 5:18 pm | पिलीयन रायडर

बास बास बास.. हेच्च म्हणायचे होते (हे तुमचा प्रतिसाद वाचल्यावर लक्षात आले!!!)

चित्रगुप्त's picture

22 Apr 2014 - 5:10 pm | चित्रगुप्त

मुळात हा चेतन भगत प्राणी कोण, त्याने पुस्तके कोणती लिहिली आहेत, आणि या पिच्चर मधील एक रेवथी वगळता इतरांची नावेही ठाऊक नाहीत, अशी आमची परिस्थिती. त्यातून लोकसत्तातील परिक्षण वाचले, त्यामुळे हा पिच्चर बघितलाही नाही, आणि बघणारही नाही.

समीरसूर's picture

22 Apr 2014 - 5:37 pm | समीरसूर

'२ स्टेट्स' चांगला आहे. टॉकीजवर पाहिलात तरी चालेल. १५० मिनिटे म्हणजे थोडा लांबीला जास्त वाटतो खरा पण सगळ्यांची कामे छान आहेत. लेखात म्हटल्याप्रमाणे आलिया भटने सुरेख काम केले आहे. रोनित रॉय तर जबराच! बाकी रेवती देखील छान आहे. बघायला हरकत नाही. संवाददेखील मोकळे आणि फ्रेश आहेत.

फेबुवर मी एक छोटेसे परीक्षण टाकले होते. आश्चर्य म्हणजे 'तिच्या प्रेझेन्सने स्क्रीन झळाळून जातो' असे वरील लेखात लिहिल्याप्रमाणे मी देखील असेच काहीसे माझ्या परीक्षणात लिहिले होते. योगायोग! :-)

लेख छान! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बाकी '२ स्टेट्स' ची गाणी फारशी आवडली नाहीत. एक गाणे (आंखे करे जीहुजुरी की असेच काहीसे) ऐकून 'तेरे मस्त मस्त दो नैन...' हे 'दबंग्'चे गाणे आठवले. चाली सारख्याच वाटल्या. छान चाल आणि मेलडी गायब आहेत आज काल्.. नाहीतर बद्धकोष्ठ झालेला शब्बीर कुमार "जब हम जवा होंगे..' करायचा ते देखील कानाला गोड वाटायचे...असो.

दिव्यश्री's picture

22 Apr 2014 - 6:09 pm | दिव्यश्री

मी पाहिला . थोडाफार आवडला . पण येक समजलच नाही समुपदेशनासाठी जातो शेवटी काय होत ते कळलच नाही . कोणी सांगू शकेल का ? अर्धवट सोडल्यासारख वाटल मला ते .

पेट थेरपी मिपावर स्वागत आहे . लिहित रहा. :)

वेल्लाभट's picture

24 Apr 2014 - 9:48 am | वेल्लाभट

मला अज्ज्जिबात नाही आवडला. थर्ड रेट.

टुंड्रा's picture

24 Apr 2014 - 3:08 pm | टुंड्रा

नक्की काय म्हणायच आहे ?

आता शिनेमा बघावा की बघू नये हा प्रश्न पडलाय. असो, जालावर येईल तेंव्हा बघते.

आत्मशून्य's picture

25 Apr 2014 - 3:17 am | आत्मशून्य

आता टीवीवर सुधा बघण्यात वेळ वाया घालवणार नाही.

चौथा कोनाडा's picture

26 Apr 2014 - 9:41 pm | चौथा कोनाडा

झकास परिक्षण ! बेताबची अमृतासिंह ते आलिया भटचा आढावा व्ह्याया फरहा, तब्बू, सनी देवल, बॉबी, अभय देवल, , राहुल रॉय, विवेक मुशरन पूजा भट्ट वै. झकासच ! मजा आली लेख वाचून!

आमच्या व्हॉटसॅप्प्च्या खात्यात येवून पडलेला " शून्याचे जनक: आलिया भट " असा भन्नाट वृत्ततुकडा येवून पडला होता. तो आठवला आत्ता ! कोणीतरी पेस्ट करा हो इथे तो !

तुमचा अभिषेक's picture

27 Apr 2014 - 12:00 am | तुमचा अभिषेक

आमच्या व्हॉटसॅप्प्च्या खात्यात येवून पडलेला " शून्याचे जनक: आलिया भट " असा भन्नाट वृत्ततुकडा येवून पडला होता. तो आठवला आत्ता ! कोणीतरी पेस्ट करा हो इथे तो !

कोणीच नाही केला तर मी करतो उद्या.

परीक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास मायबोलीवर याला प्रतिसाद दिला आहे तोच इथेही लागू. अगदी मनापासून आलेय परीक्षण.

टू स्टेट्स बद्दल बोलायचे झाल्यास चार महिन्यापूर्वीच माझ्या बायकोने याला जायचे म्हणून माझ्या परवानगीची बूकींग केली होती. (आईशप्पथ, ती घेते माझी परवानगी ;) ) पण आता रीलीज झाला तर लेकीमुळे सारेच प्लान फुस्स..

स्वताबद्दल बोलायचे झाल्यास पर्सनली मला असले हलकेफुलके लव्हस्टोरी चित्रपट आवडतात, पण त्यात शाहरुख असेल तरच ;)

यसवायजी's picture

27 Apr 2014 - 12:10 am | यसवायजी

तुम गुज्जु लोग मिठेमे क्या खाते हो? दाल? ;)

वगैरे एक-दोन मोजके विनोद सोडले तर बकवास पिच्चर हाय. उगाच ७०० एम्.बी. डाउनलोड वाया घालवायचे नाही म्हणून पाहिला. ;)
तो जो कोण हिरो आहे, त्याच्याकडे लक्षच गेलं नाही. पण आपली आलिया बरीच बरी दिसलीय.