वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
13 Apr 2014 - 5:21 am

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?

तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये

बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये

                                         - गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==

अभय-गझलमराठी गझलवाङ्मयशेतीगझल

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2014 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुलेशु.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

13 Apr 2014 - 10:45 am | माहितगार

कविवर्य काहीतरी सांगू पहात आहेत एवढ लक्षात आलं, पण नेमक काय ते नीटस उमगल नाही.

==या प्रतिसादासाठी सही==
(-स्वतःस काय माहित नाही ते माहित असलेला माहितगार)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2014 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवी अवकाळी पावसावर नाराज आहे, वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये असे कवीला म्हणायचे असावे. गरीबी इथे जोपासली जाते म्हणन्यापेक्षा इथे लोक गरीब राहावेत अशीच व्यवस्था सरकार राबवते,आणि ती एक महान परंपरा म्हणजे व्यवस्थेचे प्रमुखांची ती तक्रार असावी.

एकूण तक्रारीची ही रचना आहे. पण मला आवडल्या होत्या त्या खाली लिहिलेल्या ओळी पण यातली दुसरी ओळ अपेक्षापूर्ण करु शकली नाही असे वाटले. काही तरी अजून खास लिहिता आलं असतं असं वाटलं. अर्थात कवीच्या आणि सरकारच्या मनात केव्हा काय असेल सांगता येत नाही. :)

तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

13 Apr 2014 - 2:02 pm | प्रसाद गोडबोले

वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये

इथे फालतु हा शब्द नकक्की कोणाला उद्देशुन वापरलाय हे नीटसे उमगले नाही . वरुणाला उद्देशुन वापरला असेल तर एक वेळ ठीक आहे ....पण जातीला फालतु हा शब्द वापरला असेल तर अ‍ॅट्रॉसिटी खाली हा गुन्हा ठरेल ना ?

बाकी कविता सो सो .

असो .

नगरीनिरंजन's picture

13 Apr 2014 - 2:43 pm | नगरीनिरंजन

जात हा शब्द इथे वृत्ती या अर्थाने घ्यावा असे वाटते.

प्रसाद गोडबोले's picture

13 Apr 2014 - 5:49 pm | प्रसाद गोडबोले

वॉव ! जात हा शब्द काही ठिकाणी वृत्ती ह्या अर्थाने घ्यावा ! व्हॉट अ‍ॅन आयडीया सरजी !

नगरीनिरंजन's picture

14 Apr 2014 - 5:11 pm | नगरीनिरंजन

आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल. आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही. देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात हे सगळ्यांना माहित असेल अशी आशा.
(वरुणदेव म्हणजे वरुण नाव आणि देव आडनाव असलेला माणूस नव्हे हेही इथे स्पष्ट करुन ठेवलेले बरे).

तुम्ही त्यांच्या कवी म्हणून असलेल्या "पोएटीक लिबर्टी"च्या हक्कावरच घाला घालत आहात. :)

प्रसाद गोडबोले's picture

14 Apr 2014 - 10:33 pm | प्रसाद गोडबोले

तुम्ही त्यांच्या कवी म्हणून असलेल्या "पोएटीक लिबर्टी"च्या हक्कावरच घाला घालत आहात.

"पोएटीक लिबर्टी" लय भारी शब्द .... ह्यावरुन काही महिन्यांन पुर्वी बाबासाहेबांचे घटना निर्मितीच्या काळातील व्यंग चित्र आणि "आर्टिस्टिक लिबर्टी" ह्यावुन निर्माण झालेला वाद आठवला ! ती लिबर्टी खपवुन घेतली गेली नव्हती ...लय राडा झाला होता !

(बायदवे , धन्या ,केवळ आपल्यात गैरसमज नको म्हणुन ....... माझा मुद्दा इतकाच होता की इथे आपण जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत तेव्हा कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही , आता उद्या कोणी जर बळीराजाने त्याची जात दाखवु नये असे कडवे टाकले तरीही मी त्याचा निषेध्दच करेन !!
)

गंगाधर मुटे's picture

15 Apr 2014 - 12:56 am | गंगाधर मुटे

@प्रसाद गोडबोले,

जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत

तुम्हाला बहुधा मनुष्यजातीतील अंतर्गत जातीव्यवस्थेविषयी बोलायचे असावे. तसे असेल तर ठीक अन्यथा

- मनुष्यजात आणि जनावरांची जात यातील जातीचे निर्मूलन करायचे म्हटले तर माणूस आणि जनावर यांना एकाच वर्गवारीत आणावे लागेल.
- देव आणि दानव यांनाही एकाच पारड्यात मोजावे लागेल.
- जर्शी ही त्या गाईची जात असूनही सारेच तिला "जर्सी गाय" असेच म्हणतात. जास्त दूध देते म्हणून जात काढण्याची मुभा असते की काय?

कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही

या विधानाने मला अजिर्ण झाल्यासारखे वाटत आहे. पचणे फारच कठीण चाललेय.
अहो गोडबोले साहेब, सोईचे असेल तर जातीचे समर्थन आणि जेथे गैरसोय होते तेथे निर्मुलनाची भाषा हा विचित्र पण नवा प्रघातच पडला आहे आता आपल्या देशात. जात (Caste) या विषयावर काही अपवाद वगळता प्रत्येक मनुष्य दुतोंडी झाला आहे. हे विधान मी खात्रीने आणि पुराव्यानिशी करू शकतो.

---------------------
जाता जाता पुन्हा एक जात काढून जातो.

महेंद्रकपूर -
माझ्या पासून दूर नको जाऊ गंगूबाई
तुझ्याविना मला करमत नाय

उषा मंगेशकर -
नेऊ नका आडोशाला येणार मी नाय
पुरुषांच्या जातीचा भर्‍होसा काय?
----------------------
प्रसादराव, मला असे वाटते की पुरुषांची जात काढली म्हणून महिलांवर 'अ‍ॅट्रासिटी' लावण्यापेक्षा पुरुषांच्या जातीवर भरवसा ठेवण्याइतपत त्यांच्यात विश्वासाहार्य बदल घडवून आणायला हवेत.

नाहीतर महिला पुरुषांची 'जात' काढतच राहतील. कारण ..... :)

प्रसाद गोडबोले's picture

14 Apr 2014 - 10:24 pm | प्रसाद गोडबोले

तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल.

हो ना . आंबेडकर जयंतीला आपण अजुनही एखाद्याची जात काढण्याचे समर्थन करत आहात हे पाहुन आनंद वाटला !!

आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही.

नेहमीचा गोंधळ ... मायथॉलॉजी एक तर संपुर्ण स्विकारा किंव्वा पुर्ण नाकारा .... म्हणजे जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना , आणि मानत नसाल तर मग कोणत्याही का जातीचा असेना , त्याची जात काढु नका .... जातिनिर्मुलनाच्या साठी प्रयत्न करा !

देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात

हे तुमचे वैयक्तिक मत आहे . त्यामुळे त्या बद्दल पास . खुष राव्हा !!

गंगाधर मुटे's picture

15 Apr 2014 - 1:49 am | गंगाधर मुटे

जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना

माझ्यासारख्याला वरुणदेवाचे देव म्हणून किंवा व्यक्ती म्हणून अस्तित्व मानायचे किंवा नाकारायचे, या दोनपैकी कोणताच प्रश्न कधीच न पडल्याने त्याविशयी कधी सखोल विचार केलाच नाही.

पुरातन ग्रंथात त्याची caste काय लिहिली आहे, हे माहीत करून घ्यायची तर आजही गरज वाटत नाही. पण मला असे वाटते की वरुणदेवाच्या नामकरणाच्या पुरातन ग्रंथांच्या तत्कालीन जमान्यात जातीव्यवस्था अस्तित्वात नसेल. तेव्हा वर्णव्यवस्था अस्तित्वात असावी. कुणी याविषयी लिहिले तर वाचायला आवडेल आणि माझ्या ज्ञानात भरसुद्धा पडेल.

शिवाय प्रुथ्वीची निर्मीती झाली तेव्हापासून वरुणदेवाचे (देव म्हणून नव्हे तर पाऊस पाडणारी शक्ती/यंत्रणा) अस्तित्व आहे. पुरातन ग्रंथ कितीही पुरातन असले तरी पृथ्वीच्या निर्मितीच्या काळाचा हिशेब करता सर्व पुरातन ग्रंथ हे काही वर्षातलेच ठरतात. त्यामुळे त्याला जात होतीच हेही मानने माझ्यासारख्या आवश्यक अथवा अनावश्यक वाटत नाही कारण आता प्रयोजन उरलेले नाही.
---------------------------------
मी काव्यात वापरलेल्या जात या शब्दाचे caste या अर्थाशी काहीही देणे घेणे नाही. केवळ "वृती" असाच अर्थ घ्यावा. वाक्यरचना आणि आशय लक्षात घेतला तर तोच अर्थ निघतो. casteवाचक अर्थ कोणत्याही अंगाने निघत नाही.

आशय व्यक्त करतांना अत्यंत परफेक्ट अर्थ वाचकांपर्यत पोचवायला नेमके शब्द वापरावेच लागतात.

उदा. मला ज्योतीबा फुले, डॉ. आंबेडकर आणि शरद जोशी हे एकाच जातीचे वाटतात. संघर्षाच्या बाबतीत तर या तिघांचीही जातकुळी निसंशय एकच आहे.

विवेकपटाईत's picture

18 Apr 2014 - 9:31 pm | विवेकपटाईत

वैदिक काळात जाती व्यवस्था नव्हती. देवांची कुठलीही जाती नव्हती.
जेंव्हा मनुष्य स्थिरावला अर्थात शेती, व्यापार इत्यादी करू लागला आणि त्या साठी स्वत:ची वेगळी ओळख असणे गरजेचे भासू लागले अशाप्रकारे हळू हळू जात व्यवस्था समाजात पसरली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2014 - 12:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जात वृत्ती या अर्थानेच.

-दिलीप बिरुटे

आत्मशून्य's picture

13 Apr 2014 - 4:22 pm | आत्मशून्य

साक्षात देवाच्या जातीला फालतु म्हणने अ‍ॅट्रॉसिटी खाली गुन्हा नसावा असा संशय आहे...

गंगाधर मुटे's picture

13 Apr 2014 - 7:23 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद बिरुटे सर.

जे लिहिले त्याचा तंतोतंत अर्थ काव्यातून पोचत असेल तर त्याचा आनंद आणि समाधान काही औरच असते.
__________________

तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही

ही ओळ तुम्हाला आवडली त्याबद्दल धन्यवाद. मात्र दुसरी ओळ अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तेवढ्याने बरे झाले. नाही तर गझलेचा त्या एकाच शेराने नूर पालटला असता आणि अन्य शेरातून जे पोचवायचे आहे (ज्यासाठी ही गझल लिहिली गेली आहे) ते बाजूला पडून मूख्य आशयाकडेच वाचकाचे दुर्लक्ष झाले असते. मग लेखकाने/कवीने तेवढी काळजी घ्यायला नको का?

आपल्याला जे लिहायचे असते, ते लिहून झाल्यानंतर ते किती हलके वा जड आहे, हे लक्षात येऊनच जाते. वाचकांची पसंती/नापसंती हा वेगळा भाग आहे.

त्यामूळे नाईलाजाने पहिल्या ओळीचा समारोप करतांना दुसर्‍या ओळीत मीठ वापरायचे टाळले व फोडणी बिघडू दिली. क्षमस्व.
------
कधी तरी त्या ओळीला साजेशी दुसरी ओळ लिहून मी नक्कीच स्वतंत्र गझल लिहेन.
ये वादा रहा! दोस्ती के खातीर इतना तो करही सकता हू| :)

गंगाधर मुटे's picture

13 Apr 2014 - 7:28 pm | गंगाधर मुटे

@ नगरीनिरंजनजी धन्यवाद|

@ प्रसाद गोडबोले, वरूणदेवाला पण 'जात' असते?
मला वाटते की बहुतेक नसावीच.
आणि
असलीच तर माझी आणि माझ्या देवाची 'जात' वेगवेगळी कशी असणार?

प्रसाद१९७१'s picture

14 Apr 2014 - 11:26 am | प्रसाद१९७१

जातीयवादी कविता.

लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.

:-)

गंगाधर मुटे's picture

14 Apr 2014 - 3:02 pm | गंगाधर मुटे

<<< लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.>>>

हे खरे आहे हो.

कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते.

या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे.

निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

गंगाधर मुटे's picture

14 Apr 2014 - 3:08 pm | गंगाधर मुटे

वरिल प्रतिसाद खालीलप्रमाणे वाचावा. मला संपादनाची सोय नसल्याने संपादन करता आले नाही.

लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.

हे खरे आहे हो.

कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते.

या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे.

निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.

प्रसाद गोडबोले's picture

14 Apr 2014 - 3:19 pm | प्रसाद गोडबोले

=))

मुटेजी वरील दोन्ही प्रतिसाद आवडले ! आपल्या खिलाडु जातीला (येथे वृत्ती ह्या अर्थाने :D) सलाम !!

मस्त प्रतिसाद गिर्जाकाका !! ;)

अनुप ढेरे's picture

14 Apr 2014 - 5:52 pm | अनुप ढेरे

=))
मस्तं प्रतिसाद!

"बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये"

आवडेश....

'फालतू' शब्द 'विनाकारण' अशा अर्थाने वापरला असावा, असे वाटते.

गंगाधर मुटे's picture

16 Apr 2014 - 12:04 pm | गंगाधर मुटे

शेराचा विचार करता 'विनाकारण' या शब्दापेक्षा 'फालतू' हा शब्दच जास्त संयुक्तिक आणि अर्थप्रवाही ठरायला हवा.

कारण नसताना केलेले कृत्य - विनाकारण
गरज संपल्यानंतर/भागल्यानंतर सुद्धा वरकड/गरजेपेक्षा जास्तीचे "वरकड" कृत्य करत राहणे म्हणजे 'फालतू' असा अर्थ वाचकांनी घ्यावा, असे अभिप्रेत आहे.

जेव्हा गरजेपेक्षा जास्त पाऊस होतो तेव्हा "ओला दुष्काळ" आणि जेव्हा पावसाची अजिबात गरज नसते तेव्हा पाऊस आला तर आपण त्याला अवकाळी पाऊस म्हणतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मदनबाण's picture

15 Apr 2014 - 2:41 pm | मदनबाण

कविता/गझल आवडली !

मृगनयनी's picture

18 Apr 2014 - 6:16 pm | मृगनयनी

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

शेती करणारे असाल... तर कर्माने नक्कीच तुम्ही "शूद्र" नसाल!!.. आणि जन्माने असाल.. तर मग.. "संत- चोखामेळा" यांचा आदर्श का नाही डोळ्यासमोर ठेवत? तत्कालीन उच्चवर्णीयांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांनी कातडी देव्हार्‍यामध्ये विठ्ठल-रुक्मिणीची स्थापना केली होती. आपल्याकडे खरा- म्हणजे चोखामेळ्यासारखा भक्तिभाव असेल.. तर वरूणदेवच काय.. सगळेच देव पावतील तुम्हाला!!!!! फक्त त्यासाठी देवाची करूणा भाकली पाहिजे.. देवापुढे नम्र झाले पाहिजे.
कविता ही कवीच्या मनाचे प्रतिबिम्ब असते.. असे म्हणतात..... तुमच्या कवितेतून वरूणदेव आणि ओव्हरऑल सगळ्याच देवांबद्दलचा द्वेष जाणवतोये. "देव" ही संकल्पना खरोखर अस्तित्वात आहे.. असे जर मानत असाल.. तर देवाला शिव्या देणं थांबवा.. आणि केवळ कवितेपुरतं "देवा"ला मध्ये आणायचं असेल.. तर बाकीच्या देव मानणार्‍यांच्या धार्मिक भावनांचा अपमान होऊ नये.. याची काळजी घ्या......... :)
पाऊस पडावा, असे वाटत असेल तर "पर्जन्यसूक्ता"चे पठण करून यज्ञ करावा.. पूर्वीच्या काळी पर्जन्यदेवतेला आवाहन करण्यासाठी महान ऋषी-मुनी हीच पद्धत अवलंबत असत.... :) :)

गंगाधर मुटे's picture

18 Apr 2014 - 8:16 pm | गंगाधर मुटे

मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच.

मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.

याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा
आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या.
वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? :)

मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? :)

मृगनयनी's picture

18 Apr 2014 - 11:05 pm | मृगनयनी

मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच.

गंगाधर मुटे, ऑलरेडी तुम्ही त्याचे सार्वजनिक प्रकटीकरण केलेले आहे.- तुमच्या या ओळींमधून
वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये


जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?


कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

या सगळ्या ओळींमध्ये आपण देवाचे नाव तीनदा घेऊन त्याचे सार्वजनिकीकरण केलेलेच आहे की!!!!

मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.

इथे तुम्ही म्हणताय, की तुमच्या देवाशी कसे वागावे.. हा डेफिनेटली हा तुमचा प्रश्न आहे. पण सार्वजनिक साईटवरती आपण देवाची नसलेली जात काढून त्याला "जातीच्या चौकटीत" बसवण्याचा प्रयत्न करत आहात!!! आणि देव सगळ्यांचा आहे. आणि कुणाचीही खाजगी मालमत्ता नाहीच्चे!!.. अहो.. जी मालमत्ता सगळ्यांना प्राप्त होत असते.. ती देवाच्याच कृपेने की!!! आणि देवाला खडे बोल सुनावणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि इथले किमान ५० % मिपाकर आणि बाकीचे मिपावाचन करणारे पाहुणे यांपैकी अनेक जणांच्या मनात देवाची प्रतिमा अत्यंत उच्चस्थानी आहे. देव हे आमचे श्रद्धास्थान आहे.
तुमच्या लेखी नक्की देवाचे काय स्थान आहे.. हे मला माहित नाही. पण एकंदर तुमच्या भाषेवरून आणि त्राग्यावरून देव म्हणजे तुमचा नोकर आहे आणि त्याने काम नीट केले नाही म्हणून तुम्ही त्याला शिव्या देत त्याची जात काढत आहात.. असे वाटते. अर्थात हे सगळं.. आमच्या दृष्टीने खूप निरर्थक आणि आक्षेपार्ह आहे. पण तरीही तुमची भडास काढायला तुम्हाला ज्या काही शिव्या द्यायच्या असतील.. त्या तुमच्या प्रायव्हेट ब्लॉगवर देऊ शकता.. जो की तुमच्या मालकीचा असेल.. तिथे तुमच्याच विचारसरणीची माणसे येत असतील.. अर्थात जिथे आमच्यासारख्या लोकांना यायची इच्छाही नसेल...

याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा
आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या.

इथे तुमच्या या वक्तव्यावर हसावे, की रडावे.. ह्च कळत नाही. देवाचे वकीलपत्र!!!.. ओह माय गॉड॥!!.. तुमची केस खरंच हाताबाहेरची आहे.. असं वाटतंय!!!.. विश्वाचा अफाट पसारा चालवणारी जी एक दिव्य आणि दैवी शक्ती आहे.. तिला परमात्मा, परमेश किंवा सोप्या भाशेत- "देव" असे म्हणतात.... संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करणार्‍या देवाचे वकीलपत्र घेणे.. ही कल्पनासुद्धा खूप हास्यास्पद आहे.
संत एकनाथांच्या घरी देवाने "श्रीखंड्या"च्या रूपाने पाणी भरले. संत सखूबाईंना पंढरपुरास पाठवुन स्वतः तिच्या सासूचा छळ सहन केला, सन्त ज्ञानेश्वरांसाठी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, सन्त तुकारामांच्या गाथा १३ दिवसांनंतर जश्याच्या तश्या पाण्यातून वर आणल्या... या सगळ्या कथा ऐकून कदाचित तुम्हाला वाटले असेल.. की देव सहज उपलद्ब्ध असतो...हो खरं आहे.. देव सहज उपलद्ब्ध असतो..सगुण रुपातही आणि निर्गुण रुपातही!!!.... पण तो त्याच्या भोळ्या भक्तांसाठी..!!!.. त्याच्या ठिकाणी नम्र होऊन त्याची करूणा भाकणार्‍यांसाठी!!!!... उठसूट देवाला आपल्या मनाला येइल त्या चौकटीत किन्वा जातीत स्वार्थीपणाने बसवून त्याला उद्धटपणे जाब विचारणार्‍यांसाठी नाही!!!

वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अहो भक्तांना कश्यासाठी तो अशी दु;खे देइल?..उलट आणि अगदी एखाद्या भक्ताच्या पूर्वकर्मानुसार भक्तांना पीडाच भोगायचे नशिबात असेल.. तर देव कोहळ्याएवढा भोग आवळ्याएवढा करू शकेल!!!...
ज्यांना देव म्हणजे काय आहे, कोण आहे.. त्याची शक्ती किती व्यापक आहे.. हेच्च कळले नाही.. जे लोक मनमानी वागून करंट्या सरकारच्या चुका, शेतकर्‍याच्या व्यथा यांचे खापर देवाच्या माथी फोडतात.. त्यांना देव का मदत करेल???

कुणी देव मानो अथवा न मानो.. किन्वा त्याची खिल्ली उडवो.. निसर्गाच्या नियमांनुसार घटना घडत असतात... फक्त देव त्याच्या खर्‍या भक्तांच्या पाठी मात्र मजबूतपणे उभा असतो आणि असतोच्च!!!! गारपीट खर्‍या भक्ताच्याही शेतात पडते.... पण तुलनेने त्याचे नुक्सान कमी होते. किन्वा अनाहुतपणे त्याला कुणाची तरी मदत मिळते.. किन्वा सरकारी मदत तरी मिळते. काही मिपाकरांचेही असे काही चांगले अनुभव आहेतच की!!!

मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile

मी वरूणदेवाचे समर्थन बिल्कूल करत नाही. गारपीटीने शेतकर्‍यांचे, शेतीचे किती भयानक नुक्सान झाले.. हे मी पाहिलेय. खरोखर त्या बद्दल अत्यंत दु:खही होत आहे. परन्तु वरुणदेवाला जातीच्या चौकटीत का बसवायचे? आणि शिव्या घालायच्या?.. तुम्हाला जात काढायचीच असेल.. तर ज्यांच्या मुळे ही परिस्थिती ओढवलीये.. त्यांची काढा ना!.. सरकारची जात काढा.. कृषीमंत्र्यांची काढा... वेळीअवेळी पावसाला- गारपीटीला कारणीभूत ठरलेल्या लाकूड-तोडीला- वृक्षतोडीला संमती देणार्‍यांची काढा ना..... वरूण-देवता ही निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याला शिव्या दिल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही.. पण देवावर श्रद्धा आणि विश्वास असणार्‍या असंख्य लोकांच्या मात्र भावना दुखावू शकतात.

आणि तसेही मिसळपाव'च्या नियमानुसार इथे "जातीयवादी" कोणतेच लिखाण अलाऊड नाहीये. हे तुम्हाला माहित असेलच.. मग उगीच कोणत्या देवाची नसलेली जात काढून त्याला जातीच्या चौकटीत बसवून जातीय तेढ निर्माण करण्यात काय अर्थ आहे?

माहितगार's picture

19 Apr 2014 - 11:57 am | माहितगार

"जात" या शब्दाला सर्वसामान्य माणूस एवढा विटलेला आहे, की जीवशास्त्रीय वर्गीकरणांना केवळ जीवशास्त्रीय वर्गीकरण म्हणावे. जाती, प्रजाती हे शब्द जीवशास्त्रातही वापरू नयेत एवढा 'जात' हा शब्द आताशा डोळ्या (किमान मलातरी) खूपु लागला आहे. ( 'अमुक तमुकची जात काढणे आणि अमुकतमुकच्या जातीवर येणे' हेही वृत्ती या शब्दाचे नकारात्मक भाव दाखवतात किंवा कसे? आणि म्हणून 'जात' हा वृत्ती या अर्थानेही नकोसा होतो. -खासकरून प्रा. बिरूटे सरांनी आमची ही भावना लक्षात घ्यावी असे वाटते). कदाचित मानवी इतिहासाची ज्ञानकोशीय दखल घेताना ज्ञानकोशात 'जात' हा शब्द इतिहास होऊन राहणे एवढे ठिक. या पुढील साहित्यात 'जात' हा शब्द 'जातीयतेचा निषेध करण्यापुरताच येईल हे संवेदनशील साहित्यिक आणि कवींनी पाहील्यास आमचा त्यांच्या साहित्याप्रती आदर निश्चीत दुणावेल

अर्थात मी (भक्त अथवा भक्तेतर) माझ्या (आपल्या अभिप्रेत) प्रीय/अप्रीय देवावरही कोपू शकतो हे स्वातंत्र्य सर्वसाधारण भारतीय साहित्यातच नव्हे तर विवीध धार्मिक आणि संत साहित्यात सुद्धा आहे. देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही.

उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ?

देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही.

माहितगार... मुळात आपल्या "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही." या वाक्याचा काहीही संदर्भ लागत नाही... :)
"देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपणे".. म्हणजे नक्की काय ?.. आणि ती संकल्पना भारताबाहेरून कशी आली..याचे विश्लेषण कृपया देऊ शकता का? ..
माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे. "वरूणदेवाने फालतू त्याची जात दाखवू नये" या वाक्याला आहे. बाकी त्यांचे त्यांच्या देवावर रागावणे वगैरे.. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त वापरलेली भाषा आणि शब्द चुकीचे आहेत. ते स्वतः कवी आहेत.. म्हणून त्यांना आवडतील.. ते चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी वापरणे.. हे चुकीचे आहे. माझ्या वरच्या प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे.. त्यांना पाहिजे ते देवावरचे रागावणे, कोपणे.. वगैरे गोष्टी ते आपल्या स्वतःच्या ब्लॉगवर करू शकता. इथे मिसळपाववर "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या कविता कृपया टंकू नये.

उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ?

बहुतेक तुम्हाला स्वतःलाच नक्की कश्याबद्दल आक्षेप आहे... याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक आहात!!!.... जाऊ देत.. वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!! :) :)
=)) .. =))

माहितगार's picture

19 Apr 2014 - 6:47 pm | माहितगार

वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!!

मी जेवढ्यांदा वाचण्याचे आपण स्वप्न पहात आहात त्याला गुणीले ५६ वेळा, "तुमच्या आक्षेपालाच आक्षेप आहे" हे नीट कळून सवरून लिहिले आहे हे पुन्हा पुन्हा कळे पर्यंत वाचत रहावे (ह.घ्या).

जात हा शब्द वृत्ती या अर्थाने आजही मराठीत येतो (आणि वर एका प्राध्यापकांनी त्यास सर्टीफाय पण केले आहे) त्यावर कोनतीही बंदी नाही आणि वृत्ती/प्रवृत्ती "वरूणदेवाने फालतू त्याची प्रवृत्ती दाखवू नये" यात एक वरूणदेवाला नव्हे तर वरूणदेवाच्या दुर्दैवी विघ्नकर्त्या प्रवृत्तीला फालतू हा अनावश्यक या अर्थाने शब्द आला आहे. आणि तो पंचमहाभूता पैकी एका महाभूत असलेल्या वरूणराजाने आणलेल्या अवकाळी संकटे आणण्याच्या प्रवृत्तीस उद्देशून वापरलेला दिसतो आहे. पंचमहाभूते कितीही ग्रेट असली तरी भूते ती भूतेच उद्या तुम्ही पंचमहाभूत या शब्दात महाभूत हा शब्द वापरला आमच्या भावना दुखावल्या म्हणाल !

या कवितेत "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे काहिही नाही. उलट संकटाने ग्रस्त शेतकर्‍याची वेदना मांडणार्‍या कवितेचे सुयोग्य संवेदनशील रसग्रहण करण्याचा अभावग्रस्तता आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या दृष्टीकोणात दिसते. आपल्या आक्षेपात इतर लोक भावना दुखावल्या म्हणतात तसे आम्हीही म्हणून पाहतो या वृत्ती पलिकडे तथ्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे. कवी महोदयांनी या पुर्वीच्या धाग्यातून भक्तीरसपूर्ण काव्य रचले आहे आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसाद (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद.

@ गंगाधर मुटेंजी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती ते आपण शेवटी सांगीतलेच आहे. आपल्या कवितेतील मतितार्थ हळू हळू उलगडतात. आपल्या आवडीचे लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसादात सदस्य मृगनयनी यांना (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद.

मृगनयनी's picture

19 Apr 2014 - 7:11 pm | मृगनयनी

माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही.. किंवा ज्यांना "स्कोअर सेटल" करावयाचा होता....त्यांनी आपापल्या मतीनुसार तेथे प्रतिक्रिया देऊन माझे आणि संबंधित व्यक्तींचेही मनो'रंजन केले आहे. त्यामुळे आपल्याला जो काही निषेध दर्शवायचा असेल.. तो त्या पर्टीक्युलर धाग्यावर नोन्दवला गेला तर बरे होईल. इथे या धाग्याशी आणि प्रतिक्रियांशी संबंधित डेटा जर आपल्याकडचा संपला असेल.. तर कृपया मिपावरच्या इतर चर्चांचा आनन्द घेऊ शकता... :)

असो.....

इथे या धाग्यावर आपला जो काही देवाच्या आणि जातीच्या सन्दर्भातला संभ्रम आहे.. तो दूर झाला का? अर्थात दूर झाला असेल किंवा नसेल.. तरी मला "प्रांजळ" आनन्दच आहे... :)

माहितगार's picture

19 Apr 2014 - 7:39 pm | माहितगार

माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही..

मृ. तै तुमच्या त्या प्रतिसादावर इतरांनी स्कोअर सेटलींग केलं नाही केलं त्याची कल्पना नाही, पण आपला हा प्रतिसादच आपण स्वतः आपला 'तो' प्रतिसाद स्कोअर सेटलींग करता होता याची अप्रत्यक्ष कबूली देतो आहे. म्हणजे तुम्ही तुमची व्यक्तीगत स्कोअर सेटलींग करताना सार्वजनिक व्यासपीठ वापरून फक्त ज्याच्याशी स्कोअर सेटल करतोय त्या पलिकडे जाऊन आसपासच्या समाजाच्या भावना दुखावणार लेखन आपल्या हातून घडल होत याचं भान अद्यापही आपणास दिसत नाही.

ज्यांनी आपणास भानावर आणण्यासाठी प्रतिसाद देण्याचे प्रयत्न केले त्यांच्या वरच स्कोअर सेटलिंगचे आरोप लावणे हास्यास्पद वाटते. किमानपक्षी माझा तर आपल्याशी कोणता पूर्व परिचय नसताना मी आपल्याशी स्कोअर सेटल करण्याचा प्रश्न येत नाही. तेव्हा एक त्रयस्थ म्हणून पुन्हा एकदा नमूद करतो की आपला तो प्रतिसाद (विचार प्रणाली) सार्वजनिक व्यासपिठावर कळत नकळत आपली स्वतःचीच नकारात्मक प्रतिमा उभी करत आहे. 'संवेदना' नावाच्या गोष्टीचा आपला परिचय संपला नसेल तर आपल्या 'त्या विचारप्रणाली' आपण पुन्हा एकदा अभ्यासाव्यात अथवा सार्वजनिक व्यासपिठावर तसे लिहिण्याचे टाळावे असे वाटते.

आपल्या त्या प्रतिसादाचा संबंध या धाग्यात तर आता अधिक लागतो आहे हे ही आपण लक्षात घेतले असे दिसत नाही. सार्वजनिक व्यासपिठावर माझ्यामुळे (आपल्यामुळे असे वाचावे) आसपासचे दुसरे दुखावले गेले तर चालतात, आणि मी (इथे आपण असे वाचावे) मात्र ज्यात नाही त्याचे अर्थ काढून दुसर्‍यांना सार्वजनिक व्यासपिठ वापरण्याबद्दल हकनाक आक्षेप घेतो, हे माझे (आपले असे वाचावे) वागणे दुटप्पी आणि विरोधाभासाचे नाही किंवा कसे याचा मीच माझा (येथे आपणच आपला असे वाचावे) विचार केला पाहीजे.

(आपल्या विचारधारांमुळे हे स्पष्ट करू इच्छितो की गंगाधर मुटेंची बाजू घेण्यास ते माझे कोणी लागत नाहीत) गंगाधर मुटे यांच्या शब्द योजने बद्दल मलाही सुरवातीस साशंकता वाटली म्हणून या कवितेच्या एकदम सुरवातीच्या प्रतिसादात माझा प्रतिसाद आहे. पण कविता पुन्हा पुन्हा अभ्यासली ती एक शेतकर्‍यांच्या दुख्खाबद्दलची निखळ संवेदनशील कविता आहे. कविते वर अनभिज्ञतेतून अथवा गंमतीतून आलेले आक्षेपांनी शेतकर्‍यांच्या वेदना जी कवी मांडू पाहतो आहे ती दुर्लक्षीत होते आहे म्हणून मी कवीने या कवीतेत मांडलेल्या वेदनांची मी अभ्यासपूर्ण आणि संवेदनशीलपणे बाजू घेतो आहे.

गंगाधर मुटे's picture

20 Apr 2014 - 8:16 pm | गंगाधर मुटे

माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे.

मी वरूणदेवाला जातीच्या चौकटीत कसा काय बसवू शकेल ब्वॉ? एखाद्या जातीच्या चौकटीत एखाद्याला बसवायचे असेल तर समान गुणधर्मिय जातीचे अनेक असायला हवेत ना?

माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पाडण्याचा गुणधर्म फक्त आणि एकमेव वरुणदेवातच आहे. आणखी कोणाकोणाला व्यक्तिगत अथवा सामुहिक/सामुदायीकरित्या पाऊस पाडता येतो, हेच मला माहित नसल्याने मी वरुणदेवाला जातीच्या चौकटीत बसवायला असमर्थ आहे.

मात्र या पृथ्वितलावर "पाऊस पाडण्याची शक्ती" असलेली जात कुणी माझ्या निदर्शनास आणून दिली तर, त्या जातीच्या चौकटीत वरुणदेवाला बसवायचा विचार करता येईल.

प्रसाद गोडबोले's picture

20 Apr 2014 - 10:51 pm | प्रसाद गोडबोले

मागे काही वर्षांपुर्वी बारामतीकरांनी प्रायोगिक तत्त्वावर सिल्वर आयोडिन का काय ते त्याचा फवारा करुन कृत्रिम पाऊस पाडला होता म्हणे ... त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल :D

गंगाधर मुटे's picture

21 Apr 2014 - 8:12 am | गंगाधर मुटे

त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल

वरुणदेव आकाशातून पाऊस पाडतो........
बारामतीचा बारामतीकर थेट शेतकर्‍यांच्या डोळ्यातूनच पाऊस पाडतो.......
धरणामध्ये पाऊस पाडण्यासाठी बारामतीकरांकडे खास बनावटीचे औजार आहे म्हणे.......

एकाच श्रेणीत नाही आणता येणार यांना. ;)

माहितगार's picture

19 Apr 2014 - 12:01 pm | माहितगार

भारतीय संस्कृतीत देवावर कोपलेला भक्त अगदी आपल्या प्रीय देवतेला पाण्यात वगैरे सुद्धा बुडवून ठेवत असे. (हे पुर्वीच्या आज्जी आजोबा पुर्व पिढीत बरेच होते नवीन पिढ्यांना ठाऊक नाही एवढेच)

धन्या's picture

19 Apr 2014 - 12:05 pm | धन्या

"देव पाण्यात बुडवून बसण्याचा" संदर्भ असा आहे तर. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Apr 2014 - 12:54 am | विश्वनाथ मेहेंदळे

अरे ते निव्वळ ब्लॅकमेक्लिंग असे. माझी मागणी मान्य कर, तोवर पाण्यातून काढणार नाही असे…
नवस म्हणजे देवाला दिलेली लाच, तशी ही देवाकडे केलेली दादागिरी !!!

माहितगार's picture

19 Apr 2014 - 1:00 pm | माहितगार

कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.

मृगनयनी's picture

19 Apr 2014 - 5:36 pm | मृगनयनी

कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.

तु'मची ही क'मेंट दे'खील म'ला तित'कीच मनो'रंजक वाट'ली....

असो...अर्थ कळेपर्यंत प्रतिसाद वाचत रहा..... =)) .. =)) ... अजून काय!!!??!!!

प्रसाद गोडबोले's picture

19 Apr 2014 - 6:39 pm | प्रसाद गोडबोले

वरील लिन्क्स दिल्याबद्दल माहीतगार ह्यांचे आभार !

आता , मुटेजींनी वरील कवितेत वापरलेला 'जात' हा शब्द बीग्रेडी मनोजातीतुन (जात येथेही वृत्ती ह्याच अर्थाने) आला नसल्याची खात्री झाली आहे !

पुनश्च एकवार आभार !!

गंगाधर मुटे's picture

20 Apr 2014 - 8:01 am | गंगाधर मुटे

माहितगार - धन्यवाद. तुमच्यासाठी आणखी काही लिंक्स.
- जा रे कान्हा नटखट
- चोरटा मुरारी
- चेंडू मारियेला
- वेणी सोडुनिया

आणि मृगनयनी यांच्यासाठी काही खास लिंक :
- पंढरीचा राया : अभंग-१
- शुभहस्ते पुजा : अभंग-२
- आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

माहितगार's picture

20 Apr 2014 - 8:56 am | माहितगार

सर्वच कविता वाचल्या आणि आवडल्या, धन्यवाद आणि पु.ले.शु. .

प्रसाद गोडबोले's picture

20 Apr 2014 - 12:44 pm | प्रसाद गोडबोले

शेवटची सोडुन सर्व कविता आवडल्या :)

पोटे's picture

18 Apr 2014 - 9:06 am | पोटे

गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये"

वाक्य खूप आवडले.

मुटेसाहेब, गोडबोलेंच्या मागे तुम्ही जे प्रतिसाद देत धावता आहात, तेही आवडले.

पार्डी ताड: संसारामध्ये जिवन जगत असताना जिवाला सुख पाहीजे असेल तर देव आपलासा करुन घ्यावा असे प्रतिपादन हभप किशोरीताई सांगुले यांनी हरिकिर्तनात यांनी म्हटले.

येथे हनुमान जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम व o्रीमद भागवत साप्ताहातील हरिकिर्तनामध्ये संबोधन करताना किशोरीताई म्हणाल्या की, भागवत कथा ही o्रवण करावी त्यामुळे माणव जिवणाचा उद्धार होतो भागवत कथा ही सुखकारी व दुखहारी आहे प्रत्येक जिवाला मरणाचे भेव आहे आज मात्र मानव सुख मिळण्यासाठी रात्रदिवस कामकरतो मात्र त्याच्या जिवणात पदरी सुख मिळत नाही पैसा म्हणजे सर्व काही सुख नाही o्रीमंत लोक सर्वात दुखी असतात पैसा काहीही सुख देत नाही.

पैशाने अन्न विकत घेता येते पण भुक मात्र विकत मिळत नाही .संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता देवाला आपलस करावे लागते ‘माया’ ही संसारातील सुख लपविते संसारात काही सेाबत येत नाही.परमार्थ केल्याने सर्वकाही सोबत येते.असे प्रतिपादन किशोरीताई यांनी केले
या कार्यक्रमाला साथसंगत मुदंगाचार्य हभप रामेश्‍वर महाराज गायणाचार्य हभप भारत महाराज बोरकर साप्रदाईक भजनी मंडळ माळशेलू यांची होती.
देव आपलासा करून घ्यावा- किशोरीताई सांगुले

श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह

       आमच्या ग्रामविकास भागवत कमेटीच्या वतिने श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताहाच्या आयोजनाचं हे १२ वे वर्ष.

दिनांक : १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०१४

Bhagwat
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
भागवत
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई
* * * *
Bhagwat
ग्रामस्वच्छता सप्ताहानिमित्त गावातील रस्त्यांची साफ़सफ़ाई. या निमित्ताने बालगोपालही आपापल्यापरिने सहभाग नोंदवतात.
* * * *

मृगनयनी's picture

19 Apr 2014 - 8:24 pm | मृगनयनी

मुटे.... व्हेरी गुड पॉलिसी हं!!!!!..... कीप इट अप!!!!! :)

अर्थात या फोटोंचा या धाग्याशी काहीही संबंध नाही... हे आपल्यालाही माहित आहे. आणि हे फोटो इथे कश्यासाठी टाकलेत.. हे सूज्ञांना सांगायला नको!!!!!!! :) :) हरे राम हरे कृष्ण !!!!!

गंगाधर मुटे's picture

20 Apr 2014 - 8:56 pm | गंगाधर मुटे

मृगनयनी,

गेली १२ वर्षे मी "श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचे" आयोजन करत आहे, हा माझा ढोंगीपणा आहे, असे तुम्हाला म्हणायचे असेल तर http://www.misalpav.com/node/24663 या लिंकवरील गझलेतील माझाच एक शेर माझ्याच विरोधात माझा कबुलीजबाब म्हणून वापरू शकता. :)

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

विवेकपटाईत's picture

18 Apr 2014 - 9:42 pm | विवेकपटाईत

अवकाळी पावसासाठी वरुण देवाला दोष देण्यात अर्थ नाही.

यात माणसाची शुद्र आणि स्वार्थ बुद्धीचा दोष अधिक आहे. आपण (माणसे) स्वत: देव बनून परमेश्वराने निर्मित केलेल्या सृष्टीत वाजवी पेक्षा जास्त ढळवा-ढवळ करत आहोत आणि त्याचे परिणाम ही आपण भोगतो आहे. वर विना कारण देवाला दोष देत आहोत.

मुटे साहेब निराशा सोडून या मागचे वास्तविक कारणे काय आहेत याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे आणि त्या वर उपाय शोधणे ही.

आशु जोग's picture

18 Apr 2014 - 11:19 pm | आशु जोग

यात वरूण गांधी कुटाय

मुटे साहेब आपल्या कविता विशेषकरुन नागपुरी तडके फार आवडतात.

या कवितेबद्दल, उगाच वितंडवादात उर्जेचा अपव्यय करण्यापेक्षा, एक मस्त तडका लिहून टाका. जे झालं ते झालं त्यावर चर्वितचर्वण अन आरोप-खंडण-प्रत्यारोप-खंडण मध्ये कशाला उर्जेचा व्यय करता?

बघा मला तरी असे वाटते. बाकी आपण सूज्ञ आहातच.

शुचि's picture

19 Apr 2014 - 12:02 am | शुचि

*खंडन
असे वाचावे :(

मृगनयनी's picture

19 Apr 2014 - 11:28 am | मृगनयनी

Live in the Fear of God

अरे व्वा!!!.. हे वाक्य काय मुटें'साठी आहे का?... व्वा व्वा!!!.... आवडली स्टाईल... कीप इट अप!!!!!! :)

नाही नाही माझी सही आहे बस!

मृगनयनी's picture

19 Apr 2014 - 7:16 pm | मृगनयनी

नाही नाही माझी सही आहे बस!

Live in the Fear of God

अच्छा!!!... पण या धाग्याच्या पार्श्वभूमीवर ती सही फारच "रोचक" आणि धागालेखकासाठी संवेदनशील आणि उचित संदेशकारक वाटते. :)

धाग्यावर नेहमीचा प्रतिसाद खेचक विषय घुसल्यामुळे आता, "आयेगा मजा अब बरसात का" :)

पैसा's picture

19 Apr 2014 - 7:38 pm | पैसा

कविता आणि बिरुटे सरांनी केलेले रसग्रहण आवडले.

आपल्याकडे संतांनीही देवाला भरपूर शिव्याशाप दिले आहेत. जनाबाईचा अभंग पटकन आठवला. त्याचा अर्थ भले वेगळा आहे पण वरकरणी शिव्याच आहेत.

"अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या
तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली
तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे
उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी"

त्यामुळे इथे वरूणदेवाला शिव्या देण्यात काही आक्षेपार्ह वाटले नाही. आई आपल्याला लेकराला कधी रागाने "मर मेल्या" म्हणते, तेव्हा तिला तो मरावा असे खरेच वाटते का? कधीच नाही! तसाच हा कवीचा त्रागा आहे!

मृगनयनी's picture

19 Apr 2014 - 8:21 pm | मृगनयनी

पैसाताई... कृपया इथे जनाबाईंची तुलना गंगाधर मुटेंशी करण्याचा मोह टाळला, तर बरे होईल.... कारण दोघांच्या मतांमध्ये आणि देवाविषयी वाटणार्‍या भावांमध्ये प्रचंड तफावत आहे. शब्दार्थांमध्ये जरी वर वर साधर्म्य दिसत असले, तरी दोघांचा देवाविषयीचा भाव खूप वेगळा आहे. जनांबाईंच्या ओव्यांमधून भक्तीरस ओथंबून वाहतो आहे.. तिच्या विठुरायावर तिचा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे...आणि तिच्या शिव्यांमध्येही तिने विठुरायाची गुणगानच गाईले आहे.- तिचा विठ्ठल हा मूळ-महामायेचाच एक अंश आहे...आपण दिलेल्या जनाबाईंच्या ओव्यांमधल्या दोन ओळींमधल्या विरोधाभासातलाही अर्थ खूप गहन आणि विठ्ठलभक्तीने ओथंबलेला आहे.. जनाबाईच्या विठुरायामुळे रांडही जन्मसावित्रीचा पवित्र चुडा घालू शकते. आणि काळानेही विठुरायापुढे हात टेकले आहेत..... ही ओवी खरंच खूपच भावपूर्ण आहे... आणि जनाबाई काय कुणीही संतानी काय देवाला शिव्या घातल्या म्हणून आपणही घालायच्या.. वरकरणी शिव्या भासवून जातीयवादा'ची आपली भडास पुरी करून घ्यायची... खरंच खूप हास्यास्पद आहे हे!!!..

मुटेंसाठी "देव" हा कुणीतरी वेगळा माणूस आहे. आणि त्याच्यावर श्रद्धा नसलेल्यांच्या शेतात तो गारपीट करतो.. असे काहीसे त्यांचे म्हणणे आहे......

वर मला दिलेल्या एका प्रतिसादात गंगाधर मुटेंनी हे सुस्प्ष्टपणे लिहिले आहे.. की देवाला गारपीट करायची असेल तर "त्याच्या भक्तांच्या शेतात करावी.. आम्हला कश्याला त्रास देतोय" ...

गंगाधर मुटे - Fri, 18/04/2014 - 18:46

मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच.

मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.

याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा
आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या.
वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile

मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile

माझी वाङ्मयशेती - Facebook Page
बळीराजा डॉट कॉम

उत्तर द्या

इथे एखादी आई जरी आपल्या मुलाला शिव्या देत असली.. तरी तिच्या मनात.. त्याच्याबद्दल मनातून प्रेम असते.. जे, की जनाबाईंच्या ओव्यांमधून विठ्ठलाबद्दल जाणवते. पण मुट्यांच्या प्रतिसादातून मात्र देवाविषयी प्रेम कमी आणि तिरस्कार जास्त जाणवतोय. स्पेशली त्यांचा भर हा "जाती"वर आहे. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचे"च असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. या त्यांच्या वाक्यातून "देवा" बद्दल त्यांना "अ‍ॅक्चुली" काय वाटतेय.. हे एखाद्या शेंबड्या पोरालाही कळेल.. असो!!!!...

मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!

पैसा's picture

19 Apr 2014 - 10:01 pm | पैसा

मुटेंना पाठीशीच घालायचे ठरवले असेल... तर कोण काय बोलणार ? प्रत्येक जण शेवटी आपापल्या "जाती"वरच जातो... नाही का!!!!!!!!

हे फारच झालं हो! मी कोण कोणाला पाठीशी वगैरे घालणारी! गंगाधर मुटे या व्यक्तीबद्दल मी बोलत नाही. कवितेत दिसणार्‍या कवी/निवेदकाबद्दल बोलते आहे. कवितेत आहे ते मुटेसाहेब म्हणताहेत असं म्हटलं तर खुनाच्या कथा लिहिणारा माणूस स्वतः खुनी असायला हवा नाही का!

कोणतीही कलाकृती ही कलाकारापासून स्वतंत्र असते. तिचा कलाकाराने सांगितलेला अर्थ आणि एखाद्या वाचकाने लावलेला अर्थ संपूर्ण वेगळा आणि त्या व्यक्तीपुरता खरा असू शकतो ना!

आणि इथे मी मुटेसाहेबांची जनाबाईशी तुलना केली नाही तर या भावनांची तुलना केली आहे. आपणही काही मनासारखं झालं नाही की देवाला शिव्या घालतो. त्यात काही विशेष नाही. जनाबाईचा अभंग पटकन आठवला म्हणून त्याचा दाखला दिला. एवढंच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Apr 2014 - 1:06 am | विश्वनाथ मेहेंदळे

पैसाताई, देव हा तुमचा विषय आहे का ? नाही. तुम्ही केवळ बँकेबद्दल आणि गोव्याबद्दल बोला. अध्यात्माबद्दल, देवाबद्दल, संतांबद्दल तुम्हाला काय कळते ? तो त्यांचा एरिया आहे. आल्या, जनाबाईचे संदर्भ देत.

हभप, इतर देव भप, बेढबमैत्रीणमदतकर्त्या, निस्पृह समाजसुधारक, मुर्गनैनीबै प्रवचन देत असताना तुम्हाला मध्ये पडायचे कारणच काय, तुम्ही फार फार तर कापूस घेऊन या, वाती वळू.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Apr 2014 - 7:41 am | अत्रुप्त आत्मा

@कापूस घेऊन या, वाती वळू.>>> =))

पैसा's picture

20 Apr 2014 - 8:30 am | पैसा

आलेच कापूस घेऊन! मला वाटलं विषय कवितेचा आहे, म्हणून तोंड उघडलं. परत मिश्टिक होणार नै!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2014 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरुणदेवा आरं पाहतोय ना ! मुटेंना गारपीटांचा मारा आणि प्रतिसादांचाही मारा.
तब्येत खराब होईल ना त्यांची :)

-दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे's picture

20 Apr 2014 - 12:55 pm | गंगाधर मुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, काळजी नसावी.

नियतीच्या घावांनी मला एवढे 'टणक" (कणखर) बनविले आणि त्यासोबतच वास्तवशास्त्राची जोड यामुळे मी पाकिस्थान, अमेरिका, मानव, दानव आणि देवाच्या बापालाही पुरून उरेल. :)

बिघडल्याच तर इतरांच्याच तब्बेती बिघडतील. :)
जाळल्या कोंबड्याला कुठे अग्नीची भिती असते? :D

(हा अहं नाहीये आणि रावणी दर्पोक्ती पण नाहीये.)

बालगंधर्व's picture

20 Apr 2014 - 2:21 pm | बालगंधर्व

मुटे सहेब, अता उन एत्का वदहला अहे के, सुरय्य देवने पन तेची जात दावु नये असे महनावे लगेल.[ थनदेइ कुनामुले पदते ते महित नहे. नायतर तयचए पन कदलि असते थन्दिमधये. अहो जात कदलि मह्नुन अन्गनाआवर भुनकाअयाल तो कय बओस अहे क? शिवया घलतना बओसच चेरा समोर अनयचाअ. :)
कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे.

(संपादित)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2014 - 2:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय लिहिलंय..................मेलो ना मी =))

>>>>>>>> कुनचह्य भव्नाआ दुक्ल्यया असतेल तर्सओरे.
नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका.

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

20 Apr 2014 - 3:18 pm | दादा कोंडके

:)) :)) :))

या बाल्याला कुणितरी आवरा रे! :)

बालगंधर्व's picture

20 Apr 2014 - 5:58 pm | बालगंधर्व

नै नै तुम्ही लिहित राहा. कोणाच्याही भावनांचा विचार करू नका.

-दिलीप बिरुटे

बिरुते सर, मि अप्ला अबहरि अहे. नय्तर इक्दे बहव्नचा कुहुप इसुह्यु होतो.

दिनेश सायगल's picture

20 Apr 2014 - 6:04 pm | दिनेश सायगल

असे लिहायला "कुहुप" त्रास होतो ना?

किसन शिंदे's picture

20 Apr 2014 - 10:58 pm | किसन शिंदे

तब्बल पंधरा मिनिटे लागली प्रतिसाद वाचून समजायला. :) रच्याकने खूप कष्ट पडले असतील नै, जाणून बुजून अशुध्द टंकलेखन करायला. ;)

पैसा's picture

20 Apr 2014 - 11:28 pm | पैसा

चुकून होतं ते अशुद्धलेखन. लोकांना बेशुद्ध करण्यासाठी केलेलं ते बेशुद्धलेखन!

किसन शिंदे's picture

20 Apr 2014 - 11:38 pm | किसन शिंदे

ओह! धन्यवाद पै नविन व्याख्या समजावून सांगितल्याबद्दल. पण बालगंधर्व अचानक कसे काय अवतरले ब्वॉ? अन् ते ही मुंटेंच्या धाग्यावरच??

हल्ली भावना भलतीच संवेदनशील झाली आहे राव. जरा कुठे खुट्ट वाजलं की ती दुखावते. :)

प्यारे१'s picture

20 Apr 2014 - 8:04 pm | प्यारे१

काय ठरलं मग?
जात पडताळणी / वैधता कागदपत्रांची पूर्तता झाली का?
शेवटची मुदत कधीपर्यंत?
मेन ऑफिस पुण्यालाच आहे ना अजून?
मुळात हे 'देव'लोक जातीचं प्रमाणपत्र घ्यायला लायक आहेत का?
आर टी आय खाली माहिती मिळेल काय?

बोबो's picture

21 Apr 2014 - 1:53 am | बोबो

छान .आवडली.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Apr 2014 - 2:35 am | निनाद मुक्काम प...

कविता आवडली.
मुटे सरांचे प्रतिसाद आवडले .

शैलेन्द्र's picture

21 Apr 2014 - 3:19 pm | शैलेन्द्र

कविता आवडली.. गाभ्रीचा पाउस हा चित्रपट आठवला..

बाकी सगळा वाद म्हणजे निव्वळ **पणा..