http://www.misalpav.com/node/27348 हि पहिल्या भागाची लिंक आहे.
डखाऊ कॅम्प वरून थोडेसे हिरमुसून आम्ही बशी ईष्टोप्वर आलो. तिथून ट्रेणीत बसलो . ज्या गफ्फा रंगल्या काही विचारू नका . लैम चा ष्टोप कंदी येउन गेला समजलेच नाय . एक अगदी वयस्कर आजी आमच्या गफ्फांकडे लक्ष देत होत्या त्यानाही कळल नाही कि स्टोप कधी येउन गेला . :( मग त्याही आमच्या बरोबरच पुढच्या थांब्याला उतरल्या आणि तिथून मग आमची वरात लैमला आली . :D
लैम ष्टेषण ला उतरून चाली चाली करत घरी आलो . बशीला वेळ होता म्हणून चाली चाली . घरी आल्यावर आधी पाणी मग चहा . एकीकडे गफ्फा दुसरी कडे कांदा पोहेंची तयारी . मज्जाच मज्जा होती . एका क्षणी मी अतिशय भावूक झाले आणि रडलेच . परदेशातल्या माझ्या या छोट्याशा घरी , संसारात आज पहिल्यांदाच जेष्ठ आणि श्रेष्ठ तसेच मायेच्या व्यक्ती आल्या होत्या ते म्हणजे पेठकर काका आणि काकू . हे आमच घर ना माझ्या आई-बाबांनी पाहिलं :( ना सासू-सासर्यांनी . पहिले दांपत्य पेठकर काका काकू आहेत जे इथे घरी आले हे आम्ही दोघेही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. :)
पोहे खाताना ...श्री निनाद यांचे प्रवचन तल्लीणतेणे ऐकताणा श्रोतागण . ;) :D
थोडस सावरल्यावर पुन्हा पोह्यांकडे वळले . मनात इतकी धाकधूक होती मी काकूंना पोहे कसे होतील काय माहिती हा आणि अशा आशयाचे किती प्रश्न किती वेळा विचारले देवच जाणे . काकू सतत मला सांगत होत्या अग काळजी करू नको छानच होतील ई. पण कोणफीडन्सच नाही आधीपासून मग काय *beee* . त्यात काकांसारख्या व्यक्ती समोर काहीतरी करायचं म्हणजे बालवाडीतल्या मुलीने पीएचडी / अजून जी मोठी डिग्री असेल ती झालेल्या व्यक्तीसमोर काय करावे . करून करून काय करणार . पोहे झाले . त्यात कांदा , बटाटा आणि मटार घातले . कसे झाले होते परमेश्वर जाणे . पण काका काकू आणि श्री निनाद , प्यांटवालं( यांना आता सवयच आहे म्हणा ;) ) यांनी ते खाल्ले . मग कॉफी केली . कॉफीपान झाल्यानंतर आमची वरात जगप्रसिध्द अशा माधुशालेकडे निघाली .
अगदी हळदी कुंकू लावून मधुशालेत जाणार्या आम्ही दोघी पहिल्याच महिला असू . *LOL* तिथे मस्त आम्ही कोक घेतलं आम्ही सभ्यपुरुषांनी त्याचं पेय घेतलं . :D एकीकडे गोंगाट दुसरीकडे संगीत आणि आमच्या गफ्फा तिसरीकडेच . :P अस चालू होत . एकंदरीत मस्त चालू होत . ते आटोपल्यावर पुन्हा ठेषण तिथून चाली चाली मग घरी .
मधुशालेत पेयाचा आस्वाद घेताणा ...श्री निनाद आणि प्यांटवालं / मिष्टर दिव्यश्री . :D
अशाप्रकारे पहिला दिवस संपला . :)
दुसर्या दिवशी सकाळी फोण केला काकांना . त्यांना आमंत्रण दिल त्यांनी ते स्वीकारलं त्या बद्दल त्यांची आभारी आहे . त्याप्रमाणे दुपारी चारच्या दरम्यान मला त्यांचा फोण आला कि आम्ही डखाऊ हून निघलो आहोत थोड्या वेळात भेटूया . त्याप्रमाणे पाच वाजता ते आले . निनाद यांचाही फोण आला होताच . नेमके त्याच वेळेस काकाश्री मला फोण करत होते . मग काका काकूंना घेऊन मी घरी आले . चहा घेण सुरु असतानाच ठणाठाण बेल वाजली . खरतर मी विसरूनच गेले होते . मी म्हणाले कि या वेळेस कोण आल आणि जर्मन लोक अशी कशी बेल वाजवतात , आजपर्यंत अस कधीच नाही झालं . *DASH* मग काकू म्हणाल्या अग निनाद असतील मग ट्यूब पेटली . निनाद यांना पेशल चाय करून आम्ही खरेदीला निघालो .
घरातून निघेपर्यंत सव्वासहा होऊन गेले होते . मी अक्षरशः सगळ्यांना पळवल कारण आठ वाजता सगळी दुकाने / मौल्स बंद होतात . काकांना टिपणे काढायला वही मिळाली . मला फार बर वाटल . याच साठी केला अट्टाहास . मग तिथून दुसरी कडे तिथे काकांनी आमच्यासाठी( मी आणि निनाद ) खाऊ घेतला जो त्यांनी घरी आल्यावर आम्हाला दिला . तिथे थोडी खरेदी करून परत घरी .
घरी येउन सयपाक केला . लैच उशेर झाला व्हता . भज्याची आमटी, पोळ्या , पुरण , साध वरण , भात , तुपाची धार , काकडी असा साधसुधा मेन्यु होता जेवायला . काकांना आमटी तिखट जाळ लागली . असो पुढच्या वेळेस जरा जास्तच साधासुधा मेन्यु ठेवूया , काय काका चालेल णा?
जेवताणा ...पुन्हा एकदा प्रवचनकार आणि श्रोतागण . :P :D
निघताना काका काकुंना नमस्कार केला त्यात स्वार्थ जास्तच होता . तो म्हणजे आशीर्वाद . त्यांनी अगदी मस्त आशीर्वाद दिला . भरून पावले मी . काका आणि काकू तुम्हा दोघांचे मनापासून आभार वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या कडे आलात खूप बर वाटल . आयुष्यभर पुरेल असा आठवणींचा खजिना आमच्याकडे आहे . निनाद यांचेही आभार .
ऐतिहासिक(पक्के) कट्टेकरी . :)
खूप मज्जा केली दोन दिवस परदेशात आहे मी अस मला वाटलच नाही . ठेषणवर सोडायला गेलो . ट्रेन आली हे लोक बसले . ट्रेन सुरु झाली जशी जशी ती पुढे सरकू लागली ....वायीट वाटत होत .आता परत कधी भेट होयील असा प्रश्न पडत होता . खरतर या दोन दिवसांमध्ये सगळ्या विषयांवर जोरदार वादविवाद झाले , त्या नादात इष्टोप विसरलो , सगळ झाल . पण हे दोन दिवस माझ्या युरोप मधल्या वास्तव्यातले अतिशय आनंदी , समाधानी असे आहेत . जर पुढे कधी पुस्तक लिहील तर हे दोन दिवस मी त्या पुस्तकामध्ये अतिशय अभिमानाने नमूद करेन .
प्रतिक्रिया
2 Apr 2014 - 2:08 pm | इष्टुर फाकडा
छाण ! मुक्तपिठाची उगाच आठवण झाली ;)
2 Apr 2014 - 8:22 pm | यसवायजी
कायतरिच्काय? मूक्तपिटातल्या लिकाणात येवड्या स्पेलिन्ग मिश्टेकी असत्यात?? ;)
वायीट वाटंलं.
बाकी, कट्टा चान चान नाही, छान छान..
@ दिव्यश्री >> ज.घ्या. ;)
2 Apr 2014 - 2:12 pm | प्यारे१
'बेशुद्धलेखन' कमी करावं ही 'णम्र विणंती'.
कट्ट्या बद्दल बोलाल तर छान वृत्तांत.
2 Apr 2014 - 4:17 pm | बॅटमॅन
+आतीशयं शमत!!!!
(दोनी वाक्यांन्ना शमत- नेमके नको तिथे नवेपणाचे अर्ग्युमेंट सुचते हे रोचक आहे.)
2 Apr 2014 - 2:15 pm | पैसा
अगदी मनापासून लिहिलंय हे कळतंय! फोटो पण छान!
2 Apr 2014 - 2:24 pm | शिद
मस्तच... अगदी भावनात्मक कट्टा वृत्तांत. आवडेश.
2 Apr 2014 - 2:29 pm | सूड
आवडलं!!
2 Apr 2014 - 2:36 pm | आरोही
छान वृत्तांत ...खूप आवडला ....+)
2 Apr 2014 - 3:00 pm | प्रमोद देर्देकर
छान वृत्तांत आवडला . तुम्ही अंमळ रंजनासारख्या दिसता आहात. (फॉटॉमध्ये हो)
2 Apr 2014 - 3:32 pm | दिव्यश्री
प्यांटवाल आणि ओळखीतल्या काही व्यक्ती देवकीताई पंडित यांच्यासारखी दिसते अस म्हणायचे . *beee* आता ह्येअर इष्टाइल बदलली मी . :D
2 Apr 2014 - 8:15 pm | पिंगू
क्षणभर मलाही हे वाटून गेलं..
2 Apr 2014 - 9:26 pm | किसन शिंदे
देवकी पंडीत सारख्याच दिसताय तुम्ही..
धम्माल कट्टा वृत्तांत आवडला.
3 Apr 2014 - 8:38 am | आंबट चिंच
तुमच्या http://www.misalpav.com/comment/562502#comment-562502 या प्रतिसादातील हा ही ओळ
>>>बायको हि विरंगुळा असू शकते का, तिची त्रेधातिरपीट हा चेष्टेचा विषय होऊ शकतो का
मग नवर्याला सर्वकाळ प्यांटवाल म्हणुन का बरं संबोधिता आहात? तेही इतरांच्या समोर.
3 Apr 2014 - 10:07 am | दिव्यश्री
अजून गाड तिथच अडलंय का? अहो महाराज जरा नीट प्रतिक्रिया वाचाल का? साप , मधमाश्या , बायको हि सायको असते , भुतावळ हे असले शब्द तर नाही ना मी लिहिले .
काय वाईट आहे हो प्यांटवालं मध्ये ? इतके लोकांनी आजपर्यंत हा शब्द वाचला , ऐकला त्यांना नाही खटकला ...आपल्यालाच का खटकला ? असो .
जर तुमच्याच धाग्यावर चर्चा केली तर चालेल का? व्य. नि. मध्ये आपणच लिहिले आहे कि हा माझा शेवटचा प्रतिसाद . याला उत्तर देवू नका म्हणून मी थांबले . जर पुन्हा तेच करायचं असेल तर आता नो व्यनि. एकतर धाग्यावर किंवा खरडवहीवर . आत एक बाहेर एक , पोटात एक ओठात एक असलं मला चालणार नाही , जमणार तर त्याहून नाही .
कृपया काश्मीर करू नये कुणीही .
2 Apr 2014 - 3:10 pm | पियुशा
मस्त मस्त मस्त !
2 Apr 2014 - 5:35 pm | भिकापाटील
बालवाडी निबन्द समाप्ती.
धन्यव्वाद
2 Apr 2014 - 5:42 pm | जेपी
दिव्यश्री -
सदस्यकाळ -1 वर्ष 4 महिने ....
फिर भी नयी हु मंय ?
अरे क्या नयी हो तुम ..
सब क्या बोल रहे हे तुम क्या बोल रही हो ...
डालु क्या मोबाईल डोके में ....
(सद्याच्या प्रथेपरमाणे-ह घे नये )
2 Apr 2014 - 5:43 pm | चौकटराजा
कून्नी कायप्न म्हनो माला तुपली शायली आवाल्डी ! आसंच लेखण क्रित जा. म्या बी पुरच्या वर्सी येचा म्हन्तो प्न मुन्चाला
येन की नाय मात नाय ! पन युर्पात येनार !
2 Apr 2014 - 7:15 pm | रेवती
चला, बेशुद्धलेखनामागील व्यक्तीमत्वाचे दर्शन झाले. ;)
वृत्तांत चांगला झालाय.
2 Apr 2014 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वृत्तांत आवडेश.
-दिलीप बिरुटे
2 Apr 2014 - 8:15 pm | भाते
नेहमी वरण/आमटी भात खाणाऱ्या माणसाला कधीतरी बिर्याणी मिळाली तर छान वाटते.
नेहमी शुध्दलेखन वाचायची सवय झाल्यामुळे कधीतरी अशुध्दलेखन (?) सुध्दा छान वाटते.
शेवटी शब्दांमागच्या भावना महत्त्वाच्या! नाही का?
दिव्यश्री,
आता 'नयी हुं मय...' सही चालणार नाही! :)
2 Apr 2014 - 8:25 pm | मदनबाण
मागचा आणि हा भाग दोन्ही छान. :)
2 Apr 2014 - 8:29 pm | अत्रुप्त आत्मा
हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म........
2 Apr 2014 - 9:20 pm | श्रीरंग_जोशी
वृत्तांत आवडला. जर्मनीतल्या मिपाकरांचा हेवा वाटतो.
पहिल्या फटुची रुंदी कृत्रिमपणे कमी केली आहे का?
2 Apr 2014 - 10:12 pm | पैसा
म्हणजे माणसं आहेत त्यापेक्षा अरुंद दिसावीत म्हणून मुद्दाम का?
3 Apr 2014 - 2:35 am | श्रीरंग_जोशी
आता फटुच्या लांबी रुंदीचे गुणोत्तर सुधारलेले दिसत आहे.
3 Apr 2014 - 8:41 am | पैसा
तुम्ही म्हटलंत मग दुरुस्त करून टाकलं!!
2 Apr 2014 - 9:36 pm | बिपिन कार्यकर्ते
अय्या! चानच!
2 Apr 2014 - 9:36 pm | आत्मशून्य
व्रुत्तांत.
2 Apr 2014 - 9:41 pm | मुक्त विहारि
छान लिहीला आहे व्रुत्तांत....
पेठकर दांपत्याला भेटल्या नंतरच्या भावना पोहोचल्या.
2 Apr 2014 - 10:43 pm | खटपट्या
दिव्यश्री ताय चे दिव्य दर्शन झालेले हाय !!
3 Apr 2014 - 10:21 am | सुबोध खरे
मनापासून लिहिलेले लेखन आवडले.
3 Apr 2014 - 10:21 am | llपुण्याचे पेशवेll
चामारी तुम्ही पुस्तक पण लिहीणार! ;)
वृत्तांत कथन आवडले. बरेच दिवस झाले काकांना भेटून.
3 Apr 2014 - 11:14 am | झकासराव
छान :)
3 Apr 2014 - 12:01 pm | ब़जरबट्टू
आवडले.. मुळात मराठीत टाइप करणे, कंटाळ्वाणे व खरच वेळखाऊ आहे, त्यात मिपावर तर माश्याअल्ला.. :) म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती आहे, किती वेळ लागतो, एक चुक दुरुस्त करायला... म्हणून ते सुध्ध्धलेखनाचे जाउ द्या..
संपादक पेटणार हाये.. =))
3 Apr 2014 - 1:16 pm | दिव्यश्री
सगळ्या मायबाप वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे आभार .
प्रशांत आवले , बॅटमॅन , पैतै ,शिद , सूड ,अद्वेय ,प्रमोद देर्देकर काका ,किसन दादा , पिंगू , पियुशा ,रेवती मावशी , प्रा. डॉ. बिरुटे सर , भाते काका , मदनबाण , आत्मशून्य , मुक्त विहारी काका आणी झकासराव वृतांत आवडला आणि ते इथे आवर्जून लिहिले त्याबद्दल धन्यवाद . :)
इष्टुरजी...चला कशातरी का होईणा आठवण तर झाली . :P
यसवायजी...मूक्तपिटातल्या लिकाणात येवड्या स्पेलिन्ग मिश्टेकी असत्यात?? विणक>>> तिथ व्याकरणातल्या मिश्टेकी असत्यात. *beee* माझ्या माहिती प्रमाणे स्पेलिन्ग मिश्टेकी साठी इंग्रजी मध्ये मुक्तपिट चालू करावे लागेल . :D
@ दिव्यश्री >> ज.घ्या. विणक>>> योग्य घेतलं आहे.
प्रशांत दादा आणि बॅटमॅन 'णम्र विणंती'.>>> ओके . कमी करण्याचा प्रयत्न करते . :)
जेपी ...लोकांच्या सोईप्रमाणे ते आपल्याला बनवतात त्यापेक्षा आपणच आपल ठरवलेलं चांगल नाही का ? (सद्याच्या प्रथेपरमाणे-ह घे नये )>>> हे काही कळळल नाही .
चौराकाका ...म्या बी पुरच्या वर्सी येचा म्हन्तो प्न मुन्चाला
येन की नाय मात नाय ! पन युर्पात येनार ! >>> नक्की या ...म्युनिकलापण या . आमंत्रण समजा हेच .
रेवती मावशी ...चला, बेशुद्धलेखनामागील व्यक्तीमत्वाचे दर्शन झाले. विणक>>> प्रत्यक्ष दर्षण देऊ का बोला ? ;)
भाते काका ...शेवटी शब्दांमागच्या भावना महत्त्वाच्या! नाही का? >>> ++++ १०० हे जेंव्हा सगळ्यांना समजेल तो दिवस , क्षण मिपावर सुवर्णाक्षरात लिहिला जावा . :)
आता 'नयी हुं मय...' सही चालणार नाही! स्मिले>>> ओके .न्विन सही मिळे पर्यंत थांबा .
अत्रुप्त आत्मा ... फक्त ह्म्म्म ?
श्रीरंग दादा ... या तुम्हीपण जर्मनीत राहायला . मग कट्टे करायला अजुण मजा येईल.
खटपट्या दादा ... दिव्यश्री ताय चे दिव्य दर्शन झालेले हाय !!>>> परतेक्ष कुड झाल अजुण . :P
बिका काका... :)
डॉ. खरे ...धन्यवाद .
पुपे काका ... चामारी तुम्ही पुस्तक पण लिहीणार! विणक>>> अहो आत्ताशी विचार चालू केलाय तर हे . प्रत्यक्ष जर हातात पुत्तक पडल तर काय होईल . *LOL*
ब़जरबट्टू...एक चुक दुरुस्त करायला... म्हणून ते >>> ते तर आहेत . मला तर आता वाटतंय कि स्वसंपादनाची सोय नाही तेच चांगल आहे .का ते विचारू नका .
3 Apr 2014 - 6:59 pm | अत्रुप्त आत्मा
@अत्रुप्त आत्मा...फक्त ह्म्म्म ?>>> =)) ब्वॉर... हुम्म्म्म्म...हुम्म्म्म्म...हुम्म्म्म्म्म! :D
3 Apr 2014 - 7:47 pm | श्रीरंग_जोशी
आमंत्रणाबद्दल धन्यवाद.
कामानिमित्त दिर्घकाळ राहण्याची संधी मिळेल का हे ठाऊक नाही पण पर्यटनासाठी जर्मनीला भेट देण्याची इच्छा जरुर आहे.
तुम्हीही जमेल तेव्हा अमेरिकेत येण्याचे करावे.
3 Apr 2014 - 1:37 pm | गणपा
हा वृत्तांत वाचतानाच इतकी दमछाक झाली.
हे भगवान उठाले रे बाबा. ;)
सिरीयसली प्यारे आणि बॅट्याच्या विनंतीचा विचार व्हावा.
गोड शिर्यात चवी पुरताच मीठ योग्य वाटतं. सुज्ञ आहात अधिक बोलणे न लगे. :)
3 Apr 2014 - 1:41 pm | प्यारे१
>>> गोड शिर्यात चवी पुरताच मीठ योग्य वाटतं.
हे शेफचे बोल काय? ;)
गणपा कार्यस्थळी सुद्धा एखाद्याला- प्रोजेक्ट डीले होतंय म्हणून- अरे, पन्नास पाहुणे आलेत नि अजून भाजीच चिरत राहशील तर स्वैपाक कधी व्हायचा असा प्रश्न करतोय असं चित्र डोळ्यापुढं आलं. =))
3 Apr 2014 - 2:57 pm | बॅटमॅन
=))
3 Apr 2014 - 5:30 pm | प्रभाकर पेठकर
दिव्यश्रीने मला अगदि आवर्जून 'मखरात' बसविले आहे, त्यामुळे माझ्या वात्रटपणाला आपोआप आळा बसला आहे. मान गये उस्ताद.
म्युनिकची भेट आम्हा उभयतांसाठीही अनेक कारणांनी अविस्मरणिय झाली. निनाद आणि दिव्यश्रीने जो वेळातवेळ काढून आम्हाला म्युनिक आणि डकाऊ दर्शन घडविले, युरोपात 'मराठी' सोबत केली, मराठी जेवण खाऊ घातले त्याने मन भरून आले.
दिव्यश्री, 'आमटी 'छान' तिखटजाळ झाली आहे' ह्या माझ्या प्रशस्तीपत्रकातील 'छान' हा शब्द गाळल्याने वाक्याचा अर्थ अगदी उलटा झाला. आमटी मला अशीच आवडते. पुढच्या वेळी येईन (आलो तर) तेंव्हा आमटी ह्याहून तिखट असेल तरी मला आवडेल. एकूणातच जेवण अतिशय रुचकर होते.
शुद्धलेखनावर (निदान आत्ता तरी) मी कांही बोलणार नाही. पण बाकीच्यांच्या प्रतिसादांशी सहमत आहे.
रंजना आणी देवकी पंडीतला विसरून जा, दिव्यश्री म्हणूनच तू छान आहेस. अशीच रहा.
माझी लेखमाला दोन दिवसांत सुरु होईल.
3 Apr 2014 - 6:15 pm | जुइ
लेख आवडला!!
3 Apr 2014 - 11:40 pm | निनाद मुक्काम प...
लेखातील शब्दा शब्दाशी व त्यामागील भावनेशी सहमत
उद्या डोंबिवली कट्टा करणार आहे.
हा वृत्तात वाचून अनिवासी प्रवचनकार उद्या भेटीशी येणार हे पाहून कट्टेकरी मंडळींच्या मनात संमिश्र भाव दाटून येतील.
भारतात मी मज्जा करतोय
@ येतांना तेथून काय आणू
तुझ्यासाठी व तुझ्या प्यांटवाल्यासाठी
4 Apr 2014 - 12:53 am | विनोद१८
दिव्यश्रीताई आवडला हाही भाग छान लिहीलाय.
4 Apr 2014 - 9:13 am | चौकटराजा
मला वाटतं दिव्यश्री ना शुद्धलेखनाची शुद्ध नाही असे कुणास वाटत असेल ते ते चूक ठरू शकते. यावरून फार वर्षापूर्वी विनोदी लेखक वि आ बुवा यानी संपूर्ण एक कथा अशुद्धलेखनाचा बाज घेऊन लिहिली होती, हे आठवले त्याचा नायक हा ढोदुणंदन बोडके असा होता.कोणा एका मालन व पुष्पा वर त्याचे प्रेम बसते अशी काही कथा होती. पण तो बाज त्यानी इतका मस्त सांभाळला होता की यंव !
4 Apr 2014 - 9:52 am | कंजूस
मटार पोहे आणि {छान}तिखट आमटी म्युनिकमध्ये तुमच्या घरी पेठकरकाकांच्या चुरचुरीत टपल्या घेत आणि हभप निनादचे प्रवचन ऐकत खायला न मिळाल्यामुळे हळहळलेले बरेच जण प्रतिसादांत शुध्दलेखनावर घसरले आहेत .ती चूक संपा कडून विनंती करून सुधारून टाका .एवढी मोठी बर्लिन वॉल काढली तर इतके नक्कीच करता येईल .
मागच्या महिन्यात काकांची भेट (मुंबईत घारापुरीला हो) झाली आणि आज मध्यवर्ती डोंबिवलीत निनादशी भेटण्याचा योग येत आहे .
काकांचा फोडणीचा वृत्तांत आवडला .
4 Apr 2014 - 3:18 pm | अधिराज
युरोप मध्ये केलेला कट्टा व त्यातील धमाल,यजमानांनी केलेला पाहूणचार इ. चे कौतूक आहेच.
पण लिखाणातल्या ओढून ताणून आणलेल्या ढिसाळ व गलथानपणामुळे लेख वाचताना खूपच "इरिटेटिंग" वाटतो.
7 Apr 2014 - 3:18 pm | दिव्यश्री
मिपाशेफ गणपा दादा ,पेठकर काका ,जुइ , निनाद , विनोद१८ , कंजूस आणि अधिराज धन्यवाद .
गणपा दादा ...हे भगवान उठाले रे बाबा. विणक>>> मेरेको उठाले .
सिरीयसली प्यारे आणि बॅट्याच्या विनंतीचा विचार व्हावा.>>> होय .
सुज्ञ आहात अधिक बोलणे न लगे>>> सुज्ञ आणि मी ? काय जोक करता ? जर असते तर इथे डोकेफोड थोडीच करत बसले असते .
पेठकर काका ...दिव्यश्री, 'आमटी 'छान' तिखटजाळ झाली आहे' ह्या माझ्या प्रशस्तीपत्रकातील 'छान' हा शब्द गाळल्याने वाक्याचा अर्थ अगदी उलटा झाला. आमटी मला अशीच आवडते. पुढच्या वेळी येईन (आलो तर) तेंव्हा आमटी ह्याहून तिखट असेल तरी मला आवडेल.>>> छान हा शब्द गाळला नाही ओ मला खरच अस वाटल कि तुम्हाला आमटी तिखट लागली . ह्याहून तिखट आमटी आहे आमची पेशल शिपी आमटी तीच करू . भन्नाट लागते . :)
रंजना आणी देवकी पंडीतला विसरून जा, दिव्यश्री म्हणूनच तू छान आहेस. अशीच रहा.>>> म्हणून तर केसांची स्टाईल बदलली . लग्नाच्या वेळेस सगळेच म्हणाले देवकीतै तेंव्हाच बदलली . बाकी आशीर्वाद असू द्या . मी अशीच राहणार आहे . फक्त शुद्धलेखन सुधारते .
माझी लेखमाला दोन दिवसांत सुरु होईल.>>> वाट पाहत आहे .
अधिराज... लिखाणातल्या ओढून ताणून आणलेल्या ढिसाळ व गलथानपणामुळे लेख वाचताना खूपच "इरिटेटिंग" वाटतो.>>> विश्वास ठेवा मी सहज सहज लिहित गेले . "इरिटेटिंग" वाटू शकतो .
8 Apr 2014 - 3:06 pm | केदार-मिसळपाव
"परदेशातल्या माझ्या या छोट्याशा घरी , संसारात आज पहिल्यांदाच जेष्ठ आणि श्रेष्ठ तसेच मायेच्या व्यक्ती आल्या होत्या ते म्हणजे पेठकर काका आणि काकू . हे आमच घर ना माझ्या आई-बाबांनी पाहिलं Sad ना सासू-सासर्यांनी."
भावना पोहोचल्या.
बाकी कट्टा छान जमुन आलाय.
8 Apr 2014 - 11:21 pm | शुचि
छान!