आणखी एक मध्यवर्ती डोंबिवली कट्टा.....

भाते's picture
भाते in जनातलं, मनातलं
2 Apr 2014 - 12:08 pm

नमस्कार लोक्स,

कट्टा नियोजन अधिकारी मा. श्री. मुक्तविहारि यांच्या मार्गदर्शनानुसार ऊत्त्सवमुर्ती 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' यांच्यासोबत मध्यवर्ती डोंबिवलीमध्ये कट्टा करायचे ठरले आहे.

काय करणार, सर्वात जास्त मिपाकर मध्यवर्ती डोंबिवलीतले असल्याने, इथे वारंवार कट्टे होणे सहाजिकच आहे!

बाकीच्या नेहमीच्या इतर गोष्टी खालीलप्रमाणे…

तारीख / वार : ४ एप्रिल २०१४ / शुक्रवार
ठिकाण : हॉटेल नंदी पॅलेस, डोंबिवली
वेळ : संध्याकाळी ७:३० वाजता

मुक्तकबातमी

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

2 Apr 2014 - 1:44 pm | सुबोध खरे

मी येणार.
आजच श्री निनाद यांच्या बरोबर कॉफी पण झाले. ते राहायला मुलुंडला आहेत असे कळले म्हनून लगेच भेट हि घेतली. आणी शुक्रवारी भेटण्य़ाचेही नक्की झाले.

तारीख, वार, ठिकाण, वेळ बघता शुभेच्छा !!

प्यारे१'s picture

2 Apr 2014 - 2:42 pm | प्यारे१

मी देखील असेच म्हणतो. ;)

मुक्त विहारि's picture

2 Apr 2014 - 2:43 pm | मुक्त विहारि

मस्त फोटो वगैरे काढा.

(शुक्रवारी सुट्टी असुन पण, दूर असल्याने येवू शकत नाही.क्षमस्व.)

कट्ट्याला शुभेच्छा... वृत्तांत आणि फोटोच्या प्रतिक्षेत.

आत्मशून्य's picture

2 Apr 2014 - 4:29 pm | आत्मशून्य

डोंबोलीला "मध्यवर्ती ठिकाण" (सेंटर प्लेस) संबोधु नका हो. फार अश्लिल वाटते.

मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस नाही फक्त सेँट्रल प्लेस .अश्लिलच अर्थ काढायचा असेल तर अटकेपार झेंडा लावायला नको आणि क्रिकेट ,फुटबॉल मधले बरेच शब्द बदलायला लागतील .

पुण्यात असल्याने येता येणार नाही.. बाकी निनाद शेठ पुण्यनगरीत येणार असतील तर इथेही कट्टा करायची संधी आहे..

आत्मशून्य's picture

2 Apr 2014 - 8:40 pm | आत्मशून्य

मध्यवर्ती म्हणजे सेंटर प्लेस नाही फक्त सेँट्रल प्लेस .अश्लिलच अर्थ काढायचा असेल तर अटकेपार झेंडा लावायला नको आणि क्रिकेट ,फुटबॉल मधले बरेच शब्द बदलायला लागतील .

नको नको... एव्हडा बदल अपेक्षित नाही फक्त "मध्यवर्ती" एव्हडा उल्लेख टाळला तरी अश्लिलता बाजुला होउन जाइल हे नक्कि.