मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
25 Mar 2014 - 1:48 pm

सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार
केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष
लक्षात येण्याजोगा आहे...

मोदींहूनही मोदी भक्त किंवा
मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे

असो तर प्रश्न असा आहे

खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान
अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...
प्रश्न अनेक आहेत.

हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

क्लिंटन's picture

25 Mar 2014 - 1:51 pm | क्लिंटन

सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील :)

बंडा मामा's picture

26 Mar 2014 - 11:57 pm | बंडा मामा

मला वाटलं ९० च्या दशकातील आणि अजून कुठली कुठली आकडेवारी गोळा करुन हे आधीच सांगता येतं :)

काही तरी काय बंडा मामा,
आकडेवारीला काय अर्थ असतो का? मुद्दे, आकडे यातून काहीही निष्पन्न होत नाही.
शेवटी तुम्हाला काय वाटतं तेवढं आणि फक्त तेच खरं - बरोबर आहे ना?

बंडा मामा's picture

27 Mar 2014 - 4:10 pm | बंडा मामा

असं काही नाही, आपण ज्या बाबाची भक्ती करतो त्याची आकडेवारी इकडून तिकडून गोळा करुन आपले पुस्तकी ज्ञान थोडे पाजळले की भाबडा भक्तगण डोलायला लागतो आणि आपण सेल्फ प्रोक्लेम्ड गुरू बनायला मोकळे.

मंदार दिलीप जोशी's picture

28 Mar 2014 - 9:54 am | मंदार दिलीप जोशी

जसे तुम्ही बनले आहात

गब्रिएल's picture

1 Apr 2014 - 1:21 pm | गब्रिएल

न्हाय न्हाय ! त्ये काय अजुन गुरु बिरु नाय बन्लेत. बंडामामा, संक्शी आनि नेभळे लय परयत्न करू र्‍हायले काय्बाय येडाचाळा करून गुरु बनाय्चा. पन मिपावर लय बेर्की लोकं हाय्त. लई मार पड्ला बेचार्‍याना. आसतं येकायेकाच नशीब :)

नानासाहेब नेफळे's picture

25 Mar 2014 - 2:08 pm | नानासाहेब नेफळे

सध्या भाजपात एनडीएत आलेल्या व्यक्ती..

जगदंबिका पाल(४० वर्षे काँग्रेसी)
रामविलास पासवान( लोजपा)
रामदास आठवले (युपीएतला एक जुना सहकारी पक्ष,आरपीआय)
सतपाल महाराज (चाळीस वर्षें काँग्रेसी)
येदुयुरप्पा (जमीन घोटाळ्यातला भाजपनेच हकालपट्टी केलेला मुख्यमंत्री.)

मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे.

आयुर्हित's picture

25 Mar 2014 - 2:12 pm | आयुर्हित

मोदी येवोत अथवा कोणीही!
आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध व जास्तीत जास्त नागरिक सुविधा हव्यात.
भ्रष्टाचार, महागाई, वीज व इंधन बिल कमीत कमी हवे
सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP),राष्ट्रीय उत्पादन क्षमता (National Productivity)जास्त कसे होईल
सर्व स्तरांवरचे प्रदूषण कमी करण्याचे सक्षम पर्याय
शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आत्महत्या रोखता आल्या पाहिजेत.
नदीजोड प्रकल्प, गावागावात पोचणारे रस्ते, अन्न धान्याची नासाडी रोखणे
व या सर्वात नागरिकांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय!

बॅटमॅन's picture

25 Mar 2014 - 2:20 pm | बॅटमॅन

अन घटकाभर धरा, झाला तुमचा मोदी पंतप्रधान..त्यानं काय होणारे? सर्कारी हपिसांतला भ्रष्टाचार थांबणारे? गल्लोगल्लीचे दीडदमडीचे नगरसेवक अन त्यांचे पित्ते नंगानाच करायचे थांबणारेत? डॉल्बीच्या भिंती उभ्या करून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....

या प्रतिसादात मोदींऐवजी रागा/केजु किंवा कोणीही क्षयज्ञ टाकला तरी चालू शकेल :)

बॅटमॅन's picture

25 Mar 2014 - 2:29 pm | बॅटमॅन

नो डौट :) धागा मोदीबद्दल आहे म्हणून ते नाव टाकले इतकेच.

मराठी कथालेखक's picture

25 Mar 2014 - 3:58 pm | मराठी कथालेखक

भ्रष्टाचार नाही कमी झाला तरी पायाभूत सुविधांचा विकास जास्त होईल, उद्योगधंदे वाढतील, बेकारी कमी होईल.
हे ही नसे थोडके.

नानासाहेब नेफळे's picture

25 Mar 2014 - 2:27 pm | नानासाहेब नेफळे

ब्याटम्यान, आपण वास्तव सांगितलत.

प्रसाद गोडबोले's picture

25 Mar 2014 - 2:31 pm | प्रसाद गोडबोले

मोदी येणे अवघड आहे

संपत's picture

25 Mar 2014 - 2:44 pm | संपत

बाकी पासवान हा भारतीय राजकारणाचा खरा चेहरा आहे. गुजरात दंगलीमुळे नाराज होऊन रालोआ सोडणारे पण पासवान आणि आता मोदींच्या गळ्यात गळा घालणारे पण पासवान,
मोदी आता पक्षात नवीन आलेल्या लोकांना अडवाणी समर्थकांच्या जागी उभे करत आहेत ही चाल ते लोक निवडून आले तर चांगली आहे पण त्यामुळे अंतर्गत बंडाळी पण वाढली आहे. त्यामुळे फासे कसे पडतात ते बघायचे.

विटेकर's picture

25 Mar 2014 - 2:57 pm | विटेकर

यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही
कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे.

पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल !
मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही.

भारतीय म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक भारतीयाला वाटत असतेच !हल्ली परदेशी प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणूनमोदी पंतप्रधान झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल.
गांधीजींच्यामागे जाणारे भारतीय / महाराजांच्यामागे जाणारे मावळे हे तत्कालीन अत्यंत निराशाजनक परिस्थितीतही आपली निष्ठा टिकवून ठाम उभे राहीले आणि विजयी झाले. ताकद शस्त्रात नसते तर ती चालवणाराच्या हातात आणि मानसिकतेत असते.

मोदीच असे नव्हे तर कोणी ही एक ताठ कण्याचा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे..

( मी गांधीजी / महाराज यांची तुलना मोदी यांच्याशी करतोय असा कोणी गैरसमज करुन घेऊ नये , मी फक्त सक्षम नेता काय करु शकतो याचे उदाहरण दिले आहे, तो अंतर्गत तसेच बाह्य शत्रुंना पुरुन उरतो. असेच उदाहरण प्रभु रामचंद्राचे देखील आहे वानरांना घेऊन त्याने बलाढ्य रावणाचा पराभव केला ..)

बॅटमॅन's picture

25 Mar 2014 - 3:01 pm | बॅटमॅन

भगवान करो अन तुमची बात सच निकलो! पण सध्या तरी इतके आशावादी रहावे असे वाटत नै. असो, घोडामैदान जवळच आहे.

आशु जोग's picture

26 Aug 2015 - 1:22 pm | आशु जोग

पटतंय

हाडक्या's picture

26 Aug 2015 - 2:54 pm | हाडक्या

पाकेस्तान ने कुरापत काढली , महागाई वाढली , अराजकता वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,डॉलरचे भाव गगनाला भीडले तरी आमचे पंप्र ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल !

यात कै बदल मित्र हो ? मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.

मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "कणा" असलेला नेता लागतो मगच राष्ट्रात विजिगिषु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही.

म्हणजे नक्की काय व्हायला हवं होतं आणि ते होत आहे का ? अथवा जैसे थे आहे अजून तरी?

कारण मोदी पंतप्रधान झाल्यावर रोजच्या आयुष्यात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व क्षेत्रात जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे.

हे मान्य पण सद्य स्थिती काय सांगतेय याबद्दल, ते जाणून घ्यायला आवडेल.
("वाट पहा आणि पहा" चे सल्ले कोणी द्यायला येऊ नयेत. आम्ही अजाईल पद्धतीवर विश्वास ठेवतो त्यमुळे तसे प्रतिसाद फाट्यावर मारले जातील.)

गॅरी ट्रुमन's picture

26 Aug 2015 - 3:57 pm | गॅरी ट्रुमन

मला तरी पंप्र अजून ढीम्मच दिसतेत महागाई, डॉलर भाव आणि पाकिस्तानी कुरापतीवर.

महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती. ज्या गोष्टींवर डल्ब्यू.पी.आय ठरतो (आणि ज्यावर रिझर्व्ह बँकेचे व्याजदर अवलंबून असतात) त्यात डाळी आणि भाज्यांपेक्षा इतर अनेक गोष्टींचा समावेश होतो आणि त्या सगळ्यांचा ओव्हरऑल परिणाम ऋण आहे.

डॉलर भाव अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या २-३ दिवसात रूपया जास्त कोसळला. आणि काही महिन्यात जर अमेरिकन फेडने व्याजाचे दर वाढवले तर रूपया आणखी कोसळू शकेल.

हाडक्या, तुम्ही तसे करणार नाही याची खात्री आहे पण इतर कोणीही "मग मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही असेच बाह्य घटक जबाबदार होते" असे म्हणत अंगावर येऊ नये ही विनंती. मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhe... . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही.

तिसरे म्हणजे पाकिस्तानविषयीचे धोरण म्हणाल तर इंग्लंडमधील डेली मेल या पेपरातील ही लिंक बघा--
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2785698/Islamabad... आणि हो ही बातमी ऑर्गनायझर, विवेक, कमल संदेश किंवा तरूण भारत मध्ये आलेली नाही. तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे. हा ग्रुप भारताने काश्मीर प्रश्न यु.एन कडे नेल्यानंतर स्थापन केला गेला होता.या ग्रुपच्या दिल्लीतील ऑफिसला जागा खाली करायचेही आदेश मोदी सरकारनेच दिले होते.

अनुप ढेरे's picture

27 Aug 2015 - 12:15 pm | अनुप ढेरे

महागाईचे डब्ल्यू.पी.आय सारखे आकडे तरी ऋण आहेत. आणि त्यात तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा नक्कीच मोठा वाटा आहे हे पण तितकेच खरे. बाकी कोणी त्या डाळीबिळींचे भाव इथे पोस्ट करू नका ही विनंती.

अगदी! सीपीआय पण ३-४% आहे. जो बराच अ‍ॅक्सेप्टेबल आहे.
हा लेख वाचनीय आहे.
http://indianexpress.com/article/opinion/columns/no-proof-required-why-i...

गॅरी ट्रुमन's picture

27 Aug 2015 - 12:24 pm | गॅरी ट्रुमन

'म' विसरलात का? :)

अनुप ढेरे's picture

27 Aug 2015 - 1:20 pm | अनुप ढेरे

:)
अरर्.. कॉपीपेस्टच्या डुलक्या!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2015 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

महागाईतल्या म ला गायब कराल तर... =))

अनुप ढेरे's picture

27 Aug 2015 - 1:21 pm | अनुप ढेरे

संपादक काका, हता काय? दुरुस्तं करा की राव!

अस्वस्थामा's picture

27 Aug 2015 - 2:11 pm | अस्वस्थामा

असु दे हो ढेरे साहेब.. तसं ही ते "म" शिवाय जास्त यथार्थ वाटतंय. ;)

हाडक्या's picture

27 Aug 2015 - 3:19 pm | हाडक्या

मनमोहन पंतप्रधान असताना सरकारच्या अंतर्गत धोरणांवर (पूर्वलक्षी प्रभावाने कराची अंमलबजावणी वगैरे) मी टिका केली होती-- बाह्य घटक आपल्या नियंत्रणात नसतात पण जे घटक आपल्या नियंत्रणात आहेत ते तरी फूलप्रूफ पाहिजेत असे काहीसे एका प्रतिसादात म्हटलेही होते. आज भारताची परिस्थिती २०१३ पेक्षा अधिक चांगली आहे हे मी नाही तर रघुराम राजन साहेब म्हणत आहेतः http://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/market-mayhe... . तेव्हा त्याचे श्रेय जेवढे मोदी सरकारला द्यायला हवे ते दिलेच पाहिजे आणि मॅट किंवा पूर्वलक्षी कराच्या अंमलबजावणीवर ठोस भूमिका न घेतल्याचा दोषही.

हे पूर्णतः मान्य.. !
याबद्दल दुमत होण्याचे कसलेच कारण नाही. परंतु जसे तुम्हाला दोष दिसले आणि ते तुम्ही ते मांडलेत तो प्रांजळपणा अनेक समर्थकांना अपमान असल्यासारखा वाटतो आणि मुख्य कारण हे "सरकार बदलल्यावर सगळे बदलणार, विजिगिषु चैतन्य निर्माण होणार, खरोखरच्या सुधारणा येऊन देश महासत्ता होणार" असा जो ओव्हर-नाईट बदलांच्या अपे़क्षांचा लोकांनीच केलेला डोंगर हे आहे.

कोणतेही सरकार आले तरी असे बदल लगेचच (ओव्हर नाईट) शक्य नाहीत आणि यात गेल्या सरकारची भलामण नाही की नव्या सरकारवर टिका नाही. हे आपले समाज वास्तव आहे आणि त्यास स्वीकारण्यास बरेच अंध समर्थक ( ते आप असो अथवा भाजपा अथवा इतर कोणताही पक्ष) अजिबातच तयार नसतात.

देशास आवश्यक धोरणे ठरवणे, त्याकडे योग्य दिशेत वाटचाल होणे आणि धोरणांचा पाठपुरावा, मुलभूत बदलांची आस आणि लोकांचा सत्ता सहभागाबरोबरच पुढच्या पिढीसाठी सुदृढ, पोषक समाज निर्मिती या महत्त्वाच्या पण कमी ग्लॅमरस गोष्टींकडे जोवर लोकांचे दुर्लक्ष होत आहे तोवर अशा "सेविअर" मानसिकतेस काहीही करु शकत नाही.

तसेच पाकिस्तानचा डॉनही म्हणत आहे की पाकिस्तानने भारताच्या unprovoked गोळीबाराची तक्रार United Nations Military Observer Group in India and Pakistan कडे केली आहे.

डेली मेल रद्दड पेपर आहे त्यास बाजूस ठेवू. भारतातील कोणत्याही पेपरपेक्षा "डॉन" पत्रकारितेत उजवा आहे असं वाटतं. तुम्ही सांगितलेल्या बातमीत (मला आठवतंय त्या प्रमाणे) त्यांनी पाकिस्तानवर गोळीबार "झालाच" आहे आणि भारताचा असा "तथाकथित दावा" आहे, म्हणून दोघांनीही तक्रार केल्याचं म्हटलं आहे. भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी.
असो.

गॅरी ट्रुमन's picture

27 Aug 2015 - 3:45 pm | गॅरी ट्रुमन

भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो हा डॉन चा गेल्या ५ वर्षांपासूनचा दावा आहे आणि त्यात नवे काही नाही ह्याची नोंद घ्यावी.

पाकिस्तानच्या पहिल्यापासूनच असे दावे करत आहे की. मुद्दा तो नाही. मुद्दा आहे की भारताने केलेल्या गोळीबाराविरूध्द पाकिस्तानने यु.एन च्या एजन्सीकडे धाव घेतली हा आहे. आणि ही बातमी मिंटसारख्या भारतीय पेपरातही आलीच होती. http://www.livemint.com/Politics/HshGr5iGhoXo4p2V1EabXK/Pak-targets-40-B...

आम्हाला भारताने मारले म्हणून पाकिस्तानने यु.एन किंवा अन्य कोणत्या एजन्सीकडे तक्रार करायचे प्रसंग फार आलेले नाहीत हे पण नक्कीच. माझ्या आठवणीत ऑगस्ट १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानचे विमान पाडले म्हणून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती. भारताच्या म्हणण्यानुसार हे विमान भारतात घुसखोरी करत होते म्हणून ते कच्छमध्ये पाडले तर पाकिस्तानचे म्हणणे होते की त्या विमानावर भारताने ते विमान पाकिस्तानी हद्दीत असताना हल्ला केला होता. पाकिस्तान हा खटला हरले होते. २००० साली मटामध्ये विठ्ठलराव गाडगीळांनी लेख लिहिला होता त्यात इतर १-२ प्रसंगी पाकिस्तानने भारताविरूध्द आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली होती असे लिहिले होते हे आठवते.हे खटले नक्की कोणते होते हे आता लक्षात नाही.पण माझ्या आठवणीप्रमाणे हे खटले लष्करी कारणावरून नव्हते.कारगीलच्या वेळीही नवाझ शरीफ अमेरिकेला रवाना झाले होते आणि मध्यस्थीची गळ घातली होती. लष्करी कारणावरून पाकिस्तान असे रडत दुसरीकडे कधी जाईल? जेव्हा जोरदार चोप मिळेल तेव्हाच. आपण आपल्या दिवट्या शेजार्‍याला तितके तरी ओळखतोच. १९७१ मध्ये असा जोरदार चोप मिळून इतरांकडे धाव घ्यायच्या आतच युध्द संपले. काश्मीर प्रश्नावरून यु.एन. मानवाधिकार आयोगापुढे वगैरे तक्रार नेणे ही काही लष्करी मार मिळाल्यानंतरची धाव नाही.

याव्यतिरिक्त पाकिस्तानने "भारताने आम्हाला मारले" म्हणून यु.एन कडे किंवा यु.एस कडे धाव घेतल्याची इतर उदाहरणे चटकन डोळ्यासमोर येत नाहीत. तेव्हा पाकिस्तानने अशी धाव घेणे यातच बरेच काही आले की नाही?

हाडक्या's picture

27 Aug 2015 - 3:48 pm | हाडक्या

हे मान्यच पण तो माझ्या प्रतिसादात कमी प्रायोरिटीचा पुरवणी मुद्दा होता हो, तुम्ही पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेत म्हणायचे (ह.घ्या).. :D

आशु जोग's picture

25 Mar 2014 - 3:59 pm | आशु जोग

.

चौकटराजा's picture

25 Mar 2014 - 5:16 pm | चौकटराजा

सगळे बरोबर आहे पण भाजपाला नवे मित्र मिळतील ????? अशक्य ! खरे तर भाजपा व काँग्रेस यानीच किमान कार्यक्रम
घेऊन सरकार स्थापावयास हवे. पण एकमेकाना पांण्यात पहाणार्‍या पण जनलोकपाल बद्द्ल एकमेकाना उंदीर मांजर साक्ष असणार्‍या या गुरू शिष्याना कोण समजावणार ...?

नानासाहेब नेफळे's picture

25 Mar 2014 - 5:33 pm | नानासाहेब नेफळे

भाजप काय किंवा काँग्रेस काय, दोघेही किमान समान कार्यक्रमावरच एकत्र सत्ता चालवत असतात. लोकांना हे लक्षात आलेले नाही, त्यांना काय ,राजकीय सभेत आरोप प्रत्यारोपाची मैफल ऐकवली कि लगेच त्यांचा विश्वास बसतो कि भाजप व काँग्रेस भिन्न आहेत .एकमेकांना शिव्या घालायच्या परंतु अंबानीच्या व अदाणीच्या बाबतीत' समान' कार्यक्रम हे दोघेही राबवत आले आहेत. बहुतांश घोटाळे मिडीयाने बाहेर काढलेत, कॅगनेच 2G व कोळसा घोटाळा बाहेर काढला, पण याचे श्रेय लाटायला मात्र भाजप पूढे...
यांनी त्यांच्या प्रातःस्मरणीय प्रखर राष्ट्रवादाचे, पवित्र आचरणाचे,अखंड भारतभुचे, रामराज्याचे तंबोरे इतकी वर्षं खाजवुनही यांच्या मैफीलींमधून काही देशउन्नतीच्या तारा आजपर्यंत छेडल्या गेल्या नाहीत,' दक्ष', राहुन कुठे 'दुर्लक्ष' करायचे याचे चांगले प्रक्षिशण घेऊनच हे संघिष्ट लोक राजकारणात येत असतात.

मंदार दिलीप जोशी's picture

25 Mar 2014 - 6:05 pm | मंदार दिलीप जोशी

गेट वेल सून.

बंडा मामा's picture

26 Mar 2014 - 11:21 pm | बंडा मामा

म्हणूनच वाराणसीतुन मोदी आणि अमेठीतुन राहुल गांधी हरले तर एक कडक चपराक ह्या पारंपारीक पक्षांना मिळेल. दिल्लीत मिळाली तशी. तो पर्यंत येड्डीयुरप्पा, अशोक चव्हाण, रामलुलु, ए.राजा हेच लोक निवडणुका खरेदी करणार.

आशु जोग's picture

26 Aug 2015 - 12:52 pm | आशु जोग

खरं नाही ठरलं याचा आनंद आहे

मराठी कथालेखक's picture

25 Mar 2014 - 4:00 pm | मराठी कथालेखक

हा Chyren म्हणजे मोदीच असतील का ?

http://www.worldwarthird.com/htm/per_nostradamus.htm

संचित's picture

14 Apr 2014 - 6:39 pm | संचित

Aniruddha Bapu
साक्षात अनिरुद्ध बापुनी लिहिल आहे ते पुस्तक. खोट कस असणार ?

बाबा पाटील's picture

25 Mar 2014 - 4:14 pm | बाबा पाटील

माणस वास्तवात का जगत नाहित्,एन.डी.ए च्या एकुन जागांची कुणी बेरिज करुन सांगेल का रे ?

विजुभाऊ's picture

27 Mar 2014 - 11:33 am | विजुभाऊ

एन डी ए = एकूण जागाची बेरीज ५०२
एन डी ए = न दिसलेली आघाडी .

विकास's picture

25 Mar 2014 - 4:25 pm | विकास

खरेच मोदी येतील का ?

नाही.

राहूल गांधीच आम आदमीचा चॉईस रहाणार आहे! ढोल-ताशे तयार ठेवा! :)

चिरोटा's picture

25 Mar 2014 - 5:22 pm | चिरोटा

ह्या लिस्टमधील कोणीही पंतप्रधान झाला तरी हरकत नाही.
http://www.linkedin.com/pub/dir/Arvind/Modi किंवा
http://in.linkedin.com/pub/narendra-kejriwal/1b/673/a41

विकास's picture

25 Mar 2014 - 7:33 pm | विकास

राहूल मोदी, मोदी इंटरनॅशनलचे मालक यांच्या अनुल्लेखाबद्दल निषेध!

अम्रुता आफले's picture

25 Mar 2014 - 5:30 pm | अम्रुता आफले

सगल्यानि मतदान करा मग नक्कि येतिल मोदि .

मालोजीराव's picture

25 Mar 2014 - 5:31 pm | मालोजीराव

मोदी पंतप्रधान व्हावेत हि इच्छा …पण त्यांनी पंतप्रधान होऊन देशाचा गुजरात करण्यापेक्षा देशाचा महाराष्ट्र करावा

राही's picture

25 Mar 2014 - 6:29 pm | राही

अगदी अगदी.

अर्धवटराव's picture

25 Mar 2014 - 7:18 pm | अर्धवटराव

कुठल्या दशकातला राजे ? बारामतीकर काकांच्या वेळचा वा त्या अगोदरचा म्हणाल तर बरच आहे...अन्यथा आजच्या महाराष्ट्राची स्थिती काळजी करावी अशीच आहे.

मालोजीराव's picture

26 Mar 2014 - 1:03 pm | मालोजीराव

मालक कौतुक राज्यकर्त्यांच नाहीच… अशोक चव्हाण,धाकटे साहेब यांच्यासारखे माती करणारे राजकारणी असूनसुद्धा उद्योजक,शेतकरी बांधवांनी महाराष्ट्राला सतत अग्रेसर ठेवलं.

देशाचा महाराष्ट्र करायचा तर अगोदर देशातल्या विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला पाहिजे.

हे म्हणजे तुमी फेडरल फ्रंट सारखे बोलून र्‍हायले ;)

बॅटमॅन's picture

26 Mar 2014 - 2:09 pm | बॅटमॅन

हा हा हा ;)

मोदी पंतप्रधान होतीला का ?>>>>>
काय माहित नाय बॉ .

बॅटमॅन's picture

25 Mar 2014 - 7:07 pm | बॅटमॅन

मी पयला...

मोदी पंतप्रधान बनणे खुप अवघड आहे. राहुल गांधीकडे पंतप्रधान पद पर्याय नाही म्हणून जाईल अशी शक्यता आहे. मात्र वर्शाच्या आत परत निवडणुका होतील.

पण आआपमुळे जो मोदींचा प्रचार चाललाय, त्यामुळे बरेचसे कुंपणावरचे मतदार एव्हाना एका कुठल्यातरी बाजुला झुकले असतील. त्याचा फायदा आआप आणि भाजप, दोघांनाहि होईल. आआपला जास्त कारण त्यांना या निवडणुकीत गमवण्यासारखं काहि नाहि. काँग्रेसचं भवितव्य एव्हाना फ्रीझ झालं असेल. त्यांच्या संभाव्य मतदारांची संख्या निवडणुकींपर्यंत तरी फारशी वाढणार वा घटणार नाहि.
पण प्रॉबॅबिलिटीच काढायची झाली तर मोदिंचे चान्सेस सर्वात जास्त आहेत असं वाटतं

प्रकाश घाटपांडे's picture

25 Mar 2014 - 7:15 pm | प्रकाश घाटपांडे

चला या निमित्ताने कुणी कुणी राजकीय भविष्य वर्तवले आहे ते सांगा.

भाते's picture

25 Mar 2014 - 8:15 pm | भाते

संपादकांना सतत त्रास देणारा धागा काढल्यापद्धल धागाकर्त्याचा निषेध!

अनावश्यक प्रतिसाद लवकरात लवकर उडवण्यापद्धल संपादकांचे विशेष कौतुक आणि अभिनंदन!

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2014 - 8:18 pm | श्रीगुरुजी

>>> मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

एप्रिल-मे २०१४ च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनण्याची शक्यता खूपच कमी आहे.

माझ्या अंदाजानुसार भाजपला १९०-२०० व रालोआला २२५ च्या आसपास जागा मिळतील व काँग्रेसला १२०-१३० व संपुआला १४०-१५० जागा मिळतील. रालोआला बहुमतासाठी अंदाजे ५० जागा कमी पडतील. अशा परिस्थितीत २-३ शक्यता आहेत.

(१) मोदींऐवजी अडवाणी/स्वराज्/जेटली अशांपैकी कोणाचे नाव पुढे करून तथाकथित निधर्मी पक्षांचा (तॄणमूल काँग्रेस, बिजद इ.) पाठिंबा मिळवून सरकार स्थापन करायचे.

हा पर्याय मोदींना फारसा आवडणार नाही कारण पक्षातच पर्यायी नेतृत्व उभे राहते जे भविष्यात त्रासदायक ठरेल. भाजपला देखील हा पर्याय फारसा आवडणार नाही कारण हे सरकार काही काळ चालून परत निवडणुका झाल्यास परत काँग्रेसच्या जागा वाढून भविष्यात त्रासच होणार. परंतु अडवाणी, स्वराज इ. ची महत्वाकांक्षा थोपवून धरणे अवघड आहे.

(२) सरकार स्थापन न करता विरोधी पक्षात बसणे.

हा पर्याय मोदींसाठी व पर्यायाने भाजपसाठी चांगला ठरेल. कारण १९९६ प्रमाणे तिसर्‍या आघाडीचा कोणतरी पंतप्रधान होऊन एक अस्थिर व कडबोळे सरकार स्थापन होईल जे फार थोडा काळ टिकेल आणि ते पडून मध्यावधी निवडणुका झाल्यावर भाजपसाठी अजून चांगली परिस्थिती असेल. १९९८ मध्ये भाजप व २००५ मध्ये बिहारमध्ये संजद-भाजप युतीला असाच फायदा झाला होता.

(३) तिसर्‍या आघाडीचे काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे (१९९६ प्रमाणे) किंवा मीराकुमार/सुशीलकुमार शिंदे इ. दलित नेत्याचे नाव पुढे आणून काँग्रेसने तिसर्‍या आघाडीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे. हे सरकार अत्यंत अस्थिर व अल्पकालीन असेल.

भाजपसाठी पर्याय (१) आत्मघात ठरेल. पर्याय (२)/(३) हेच योग्य ठरतील.

नानासाहेब नेफळे's picture

25 Mar 2014 - 8:29 pm | नानासाहेब नेफळे

काय जबरदस्त आत्मविश्वास आहे राव!

आम आदमी पार्टीचा तरूण चेहरा, जनतेचे तारणहार, आणि सार्‍या भारतवर्षाची एकमेव आशा* असलेले धडाडीचे नेते श्री. अरविंद केजरीवाल यांनी खास लोकाग्रहास्तव वाराणसीतून निवडणूक लढणार असे जाहीर केले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन! त्यांनी स्पष्टपणे म्हणले आहे की खासदार होणे महत्वाचे नाही तर मोदींना हरवणे महत्वाचे आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!

गंगेत घोड न्हालं! ;)

* आशाच... लता नाही कारण तीचे मोदींनी पंप्र व्हावे असे स्वप्न आहे. :angry:

संपत's picture

25 Mar 2014 - 9:52 pm | संपत

गंगेत घोड न्हालं!

टोमणा आवडला :)

देव मासा's picture

25 Mar 2014 - 9:58 pm | देव मासा

माझ्या सारख्या सामान्य त्रस्त मुंबईकराना मोदीनां
पंतप्रधान पेक्षा रेल्वे मंत्री पदावर पाहायला जास्त आवडेल ,
विकास झालाय कि नाही झालाय
ते फक्त रेल्वेच्या कामावरूनच स्‍पस्ट कळते.
इतर विकासांचे नुसते कागदी आलेख असतात .
ते उलटे -सुलटे करून पहिले तरी काही केल्या समजत नाही . *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz:

एक शंका मोदी जर भारताचे पंतप्रधान झाले तर अंतराष्ट्रय स्तरावरील राजकारणाला त्यचा ताप होईल का?
म्हणजेच युद्धाच्या संभावना वाढतील का? अंतराष्ट्रय स्तरावरील राजकारणातील लोकांना सुद्धा ते भारताचे
पंतप्रधान पदावर नसावे असे वाटत असेल का ? *nea* *NO* *NO*

मूकवाचक's picture

26 Mar 2014 - 1:08 am | मूकवाचक

.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Mar 2014 - 2:08 pm | प्रकाश घाटपांडे

आपच्या उदयामुळे मोदी पंतप्रधान बनण्याचा धोका वाटत नाही. सध्या कुठल्याही पक्षाला निर्णायक बहुमत मिळण्याचे दिवस गेले आहेत.

विकास's picture

26 Mar 2014 - 7:28 pm | विकास

मोदी पंतप्रधान बनण्याचा धोका वाटत नाही.
म्हणजे आप पुढे मोदी पंतप्रधान होणे हा धोका नसून वरदान ठरेल असे म्हणायचे आहे का? :)

आशु जोग's picture

26 Mar 2014 - 7:49 pm | आशु जोग

मनमोहन गेले मोदी आले ,अशीच परीस्थीती असणार आहे. जुनीच दारु आहे, बाटलीही जूनीच फक्त टोपण बदलेले आहे.

तुम्ही मोदी यांना टोपण म्हणालात ! निष्षेध !

उत्तर : हो !

याबद्दल अजुनही शन्का ????

बंडा मामा's picture

26 Mar 2014 - 11:17 pm | बंडा मामा

माझ्या मते मोदी पंतप्रधान होणार नाहीत.

१. मोदींच्या पोलरायजेशनमुळे मायनॉरिटी कधीच मते देणार नाही.
२. त्यांनी विवाहीत असुन आपल्या पत्नीला नाकारल्याने महिलांमधे त्यांची ढासळत चाललेली लोकप्रियता. (त्यात भर म्हणून भाजपची एकूणच बुरसट सनतानी विचारांची एक प्रतिमा. प्रमोद मुतालिक प्रकरण इ.)
३. मोदींच्या मिनिअन्सनी जिथे तिथे घातलेला धुमाकुळ. अर्वाच्य शिवीगाळ, फेकूगिरी करणारी फोटोशॉप केलेली पोस्टर्स, फुगवलेले आकडे इ.इ. ज्यामुळे दुरावत असलेला मॉडरेट इंटरनेट सॅव्ही ग्रुप. (ज्यांची मते आआप नक्की मिळवणार आणि चुरशीच्या लढतींमधे भाजपा उमेदवार पडणार)
४. त्यात भर म्हणून स्वत: मोदी करत असलेली बेताल विधाने, जसे की केजरीवाल हे पाकिस्तानी एजंट आहेत वगैरे
५. मोदींचा नुसताच सभा घेण्यावर भर, कठीण प्रश्नांना सामोरे न जाण्याचा निर्णय.
६. भाजपातील अंतर्गत बंडाळी. गडकरी, अडवाणी, सुषमा स्वराज, जसवंत सिंघ, मुरली मनोहर इ.इ. अनेक भाजपा नेत्यांशी बिघडलेले त्यांचे संबंध

वरील कारणांमुळे पंतप्रधान होणे तर सोडाच, वाराणसीतुन लाजिरवाणा पराभवास सामोरे जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

एके ४९ म्हणजेच अरविंद केजरीवाल. त्यांनी नुकताच एक नव्या पक्ष स्थापन केला असून पक्षाच्या वेबसाईटवर त्यांनी भारताचा भाग असलेले काश्मीर सरळ पाकिस्तानला देऊन टाकले आहे. ज्यांनी देशाला दुभागण्याचे काम केले, ते देश कसा सांभाळणार असा प्रश्न विचारत केजरीवाल हे पाकिस्तानचे एजंट आणि भारताचे शत्रू असल्याचा अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला
साभार:केजरीवाल पाकिस्तानचे एजंट- नरेंद्र मोदी

यात चुकीचे काय आहे बंडा मामा!

मोदींनी "ISI चे हस्तक आणि पाकिस्तानचे एजंट" म्हणलेले नाही. त्यांचे वाक्य असे आहे: "There are three AKs in Pakistan who are being admired. AK 47, AK Antony and AK49. This third one, AK 49, has just launched a political party," अर्थात केजरीवालांच्या एकाच वेळेस खुळचटपणामुळे आणि लबाडीमुळे ते असे काही वागत आहेत जे पाकीस्तानच्या पथ्यावर पडत आहे आणि म्हणून पाकीस्तान त्यांचे कौतुक करत आहे... असे काय ते करत आहेत? खालची चित्र पहा...

हे आप च्या संस्थळावरचे आहे. नकाशातले काश्मीर भारतात नाहीच! तेच अरूणाचल प्रदेशाचे पण... अर्थातच बोंबाबोंब झाल्यावर ते काढून टाकण्यात आले आहे. पण माहीतीतंत्रज्ञानाच्या जगात काही कायमस्वरूपी खोडणे अवघडच असते. तेच येथे पण झाले आहे: (इंडीया टूडे मधून घेतलेला आहे).

AAP Map
The embarrassing botch-up on the AAP website's donations page, a map of India which showed parts of Kashmir as a part of Pakistan, has now been removed from the website, yet it has already been circulated on Twitter.

गंमत म्हणजे पब्लीकने ते लक्षात आणून दिल्यावर तो भारतीय दंडविधानानुसार बेकायदेशीर नकाशा तात्काळ काढून टाकण्यात आला. पण भारताचा अधिकृत नकाशा मात्र ठेवण्यात आला नाही. असे का करावे? का पाकीस्तानच्या भावना दुखावतात म्हणून?

हे दुसरे रेडीओ पाकीस्तानचे ९ जाने. २०१४ चे अधिकृत ट्वीट आहे. ते अजूनही ट्वीटरवर मिळू शकते.

PakRadio

त्या व्यतिरीक्त आपचे नेते प्रशांत भूषण काय म्हणाले ते माहीत असेलच. नक्षलवादासंदर्भात आत्ता चर्चा नको. तो मुद्दा पण येईलच लवकर...

थोडक्यात मोदींच्या भाषणात एके हे एजंट आहेत असे म्हणलेले नसताना देखील, कस्सा माझा गरीबबिचार केजरू... ट्वीट करतो, "Did Modi ji call me an agent of Pakistan and AK 49? " ... ह्याला खोटारडेपणा म्हणायचे नाहीतर काय म्हणायचे?

ऋषिकेश's picture

27 Mar 2014 - 11:46 am | ऋषिकेश

यावेळी मोदी त्यांना एजंट म्हणाले आहेत असे दिसते.ही बातमी बघा

मोदी म्हणतातः "These agents of Pakistan and enemies of India are speaking the language of Pakistan"

मग, आता त्यांना खोटारडे म्हणायचे नाही असे तुम्ही ठरवलेय का? ;)

बंडा मामा's picture

27 Mar 2014 - 4:07 pm | बंडा मामा

मस्त! असे प्रतिसाद दिसले की फोरम्सवर आल्याचे सार्थक होते.

विकास's picture

27 Mar 2014 - 7:29 pm | विकास

यावेळी मोदी त्यांना एजंट म्हणाले आहेत असे दिसते.ही बातमी बघा
दुव्याबद्दल धन्यवाद.

केजरीवाल हे कसे खोटे नाहीत हे दाखवताना त्यांचे काश्मीर संदर्भातील नकाशा चुकीचा आहे, किमान चुकून आला असेल इतके पण म्हणावेसे वाटत नाही?

मग, आता त्यांना खोटारडे म्हणायचे नाही असे तुम्ही ठरवलेय का?

अहो त्या धर्मराजांचा रथ हा तीन हात आकाशातून जात होता एकेकाळी. पण आता तो नुसता जमिनीवरच नाही तर जमिनीखाली ६ हात (पक्षी: खड्ड्यात) गेला आहे. इतरत्र दिलेल्या प्रतिसादातील काही भाग चोप्य पस्ते करतो:

केजरीवालांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या होत्या...

  1. राजकारणात येणार नाही.
  2. (मुलांच्या डोक्यावर हात ठेवून) काँग्रेस भाजपाला पाठींबा देणार नाही आणि घेणारही नाही.
  3. ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांच्या खात्यावरील त्या काळातली (दिल्लीतली) वीज बील थकबाकी माफ करेन.
  4. दिल्लीत आमदार झालेल्यांना (त्यात स्वतः एके पण आले) खासदारकीची तिकीटे दिली जाणार नाहीत.
  5. वगैरे वगैरे

पण ते असो. काय गंमत आहे ह्या प्रकरणात काश्मीर संदर्भात जे मुद्दे बोलले गेले त्याबाबत ना केजरीवाल केजरीवाल बोलत आहेत ना त्यांचे समर्थक. त्यामुळे मोदींचे विधान नुसतेच राजकीय सभेतले विधान नसून खरेच आहे असे वाटू लागले आहे. आणि हो नकाशात केवळ काश्मीरच नाही तर अरूणाचल प्रदेश देखील वादग्रस्त म्हणून दाखवला आहे.

काश्मीरचा युएन ठराव नॉन बाइंडींग आहे हे वास्तव असताना देखील परत परत जो देश दहशतवादी भारतात आणि जगात निर्यात करतोय त्यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर का दाखवला जातो?

जो नकाशा घटनेनुसार आणि कायद्यानुसार भारताचा आहे तो वापरला का जात नाही? अगदी तो इंटरनॅशनल नकाशा असला तरी गुगल देखील भारताच्या (.in) संस्थळावर संपूर्ण भारत दाखवते, कारण कायद्याने बंधनकारक आहे म्हणून. अर्थात अ‍ॅनार्किस्ट केजरीवालना हे कायदेच मान्य नसावेत.

आजानुकर्ण's picture

27 Mar 2014 - 7:42 pm | आजानुकर्ण

रथ चालण्याच्या संदर्भात दुरुस्ती म्हणजे धर्मराजांचा रथ तीन अंगुळे वर चालत असे तीन हात नाही.

(मोदी म्हटल्यावर संदर्भ चुकलेच पाहिजेत असे अनेकदा होते बॉ)

विकास's picture

27 Mar 2014 - 7:59 pm | विकास

मुद्दा लक्षात आला ना? रथ तीन अंगु़ळे का तीन हात ह्याने कुणावर नकळत देखील चिखलफेक झाली नसती म्हणून कन्फर्म करत बसलो नाही. आणि तसे देखील आम्ही पोथीनिष्ठ नसल्याने रामायण-महाभारतातले मतितार्थ समजण्यावर भर देतो. :) पण मोदीद्वेष्टे हे मात्र तसे करताना कायम दिसतात.

बाकी तुमचे देखील एकदा काश्मीरवरचे मत सांगून टाकाना कारण तो मुद्दा होता. का त्यावरील सोयिस्कर दुर्लक्ष हे पाकीस्तानच्या घशात काश्मीर आणि चीनच्या नरड्यात अरूणाचल घालण्यासाठीची सहमती समजायची?

आजानुकर्ण's picture

28 Mar 2014 - 2:27 am | आजानुकर्ण

मोदी पंतप्रधान व्हावेत किंवा नाहीत या चर्चेसंदर्भात फार तर मोदींचे काश्मीरबाबतचे मत जाणून घेणे आवश्यक ठरावे. माझे काश्मीरबाबतचे मत समजल्याने मोदींच्या पात्रतेसंदर्भातील विश्लेषणास काही मदत होईल किंवा कसे हे जाणून घेण्यास अस्मादिक असमर्थ आहेत.

सदर चर्चेत काश्मीरसंदर्भात मत देणे आवश्यक आहे किंवा प्रत्यक्ष मतदान करतानाही मिसळपाववरील मोदीसंदर्भातील चर्चेत काश्मीरसंदर्भात मत देणे आवश्यक आहे असा फतवा इलेक्शन आयोगाने काढला आहे काय?

असो. काश्मीरसंदर्भात माझे काहीही विशेष मत नाही. फारच उत्सुकता असल्यास - काश्मीर भारतात असल्यामुळे किंवा नसल्यामुळे मराठी संकेतस्थळांवर चघळण्याचा एक विषय याउप्पर माझ्या दैनंदिन आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही. माझ्यापेक्षा काश्मीरमधील नागरिकांचे यासंदर्भातील मत आवश्यक आहे असे मला वाटते. एकंदर विस्तृत पटलामध्ये सदर प्रश्नाबाबतचे सर्व हक्क मी मतदान करुन लोकप्रतिनिधींकडे डेलिगेट केले आहेत. लोकसभा वा अन्य योग्य ठिकाणी यावर विस्ताराने चर्चा होऊन माझे लोकप्रतिनिधी त्यावर मतप्रदर्शन करतील.

प्यारे१'s picture

28 Mar 2014 - 3:00 am | प्यारे१

>>> एकंदर विस्तृत पटलामध्ये सदर प्रश्नाबाबतचे सर्व हक्क मी मतदान करुन लोकप्रतिनिधींकडे डेलिगेट केले आहेत. लोकसभा वा अन्य योग्य ठिकाणी यावर विस्ताराने चर्चा होऊन माझे लोकप्रतिनिधी त्यावर मतप्रदर्शन करतील.

इथे बोलण्यासारखं काहीच्च राहत नाही का मग? चला तर मग, मतदान करुन येऊ या!
कायको बोलबच्चन.
त्या विकास अण्णाला नाही काम! तुम्ही करा. कशाला ह्या भानगडीत पडावं. नै का? :)

विकास's picture

28 Mar 2014 - 5:06 am | विकास

मोदी पंतप्रधान व्हावेत किंवा नाहीत या चर्चेसंदर्भात...

तसे म्हणायचे असेल तर धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हता आणि इतर असे अनेकदा असताना आपण आपल्या पिंका टाकताच की! मग आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?

ऋषिकेश's picture

28 Mar 2014 - 9:49 am | ऋषिकेश

आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?

जर नकाशामध्ये सद्यस्थितीचा विपर्यास असेल (तुम्ही म्हणताय तसे श्रीनगर भारतात दाखवले नाहीये अशा प्रकारच्या चुका असतील) तर ते चुकच आहे. मात्र, निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही. फार तर ते अधिकृत भुमिकेचा विपर्यास म्हणून बेकायदेशीर असु शकते - ती ही खात्री नाही पण असु शकते, पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही. जर असे नकाशे प्रकाशित करणे बेकायदेशीर असेल तर त्यावर सरकारने योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती कायदेशीर शिक्षा करावी.

मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते.

या विषयावर अतिशय तपशीलवार व सांगोपांग चर्चा खूप पूर्वी ऐसीवर झाली होती. ती अत्यंत वाचनीय ठरावी.
त्यातील श्रावण मोडक यांच्या पुढिल मताशी सहमती आहे:

चुकीचे प्रायश्चित्त त्यांना द्यावे भारताच्या सरकारने.
पण असे नकाशे प्रकाशित करण्याचे पराक्रम भारतात इतरांनीही केले आहेत. अगदी पुणे विद्यापीठानेही हा पराक्रम केल्याचे आठवते. हे असे नकाशे अंगभूत असणाऱ्या सॉफ्टवेअरवर भारताचे सरकार बंदी घालेल का, किमान आजवर अशी सॉफ्टवेअर विकल्याबद्दल फौजदारी गुन्हे नोंदवेल का? बड्या कंपन्यांना अंगावर घेण्याची हिंमत लागेल त्यासाठी. राष्ट्रवादासाठीची ती हिंमत मला आजवर तरी दिसलेली नाही.

विकास's picture

28 Mar 2014 - 5:20 pm | विकास

काश्मीर बाबत अपेक्षित उत्तर मिळाले त्याबद्दल आश्चर्य वाटले नाही. :)

निव्वळ वादग्रस्त भागाला वादग्रस्त दाखवण्यात किंवा वेगळे आरेखन करण्यात माझ्या मते काहि चुक नाही.

आय होप महाराष्ट्र सरकार बेळगाव नकाशात वादग्रस्त म्हणून दाखवत नसावे. तेच हैद्राबाद आणि तेलंगणा राज्यनिर्मितीच्या आधी... वादग्रस्त भाग जर प्रत्येक नागरीक ठरवू लागला आणि त्याचे समर्थन करायचे असले तर देश कशाला म्हणायचे. अर्थात अनेकांना देश ही संकल्पनाच मान्य नसते तशी तुम्हाला देखील देश ही संकल्पना मान्य नसली तर गोष्ट वेगळी आहे.

पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट चुकीची मानलीच पाहिजे असे नाही - जसे मी समलैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर असले तरी चुकीचे मानत नाही.

Apple-Orange... राष्ट्राच्या सीमा या केवळ कायद्याचा भाग नसतात.

मात्र अश्या चुकांचा संबंध थेट अख्ख्या आआपच्या राष्ट्रवादाशी वगैरे जोडणे हास्यास्पद व टोकाचे वाटते.

ट्रेंड काय आहे हे बघून राष्ट्रवादाशी संबंध जोडला जातो. नकाशा नंतर काढला पण बदलला नाही. हा मुद्दा आहे. त्या व्यतिरी़क्त प्रशांत भूषण यांचे स्टेटमेंट आणि घटनेवर हात ठेवून शपथ घेत नंतर स्वत:स सतत अ‍ॅनार्कीस्ट म्हणत गोंधळ घालणारी व्यक्ती लोकांशी लॉयल नाही हे सिद्धच झाले आहे पण देशाशी लॉयल खरेच असू शकेल का हा प्रश्न आहे...

आजानुकर्ण's picture

28 Mar 2014 - 9:22 pm | आजानुकर्ण

धर्मराजाचा रथ किती उंचीवरून चालला होता हा देखील या चर्चेचा मुद्दा नव्हता

हो पण भारताच्या सांस्कृतिक संदर्भात आम्हाला रस असल्याने व अशा चुका करणे ही 'आप'ची मक्तेदारी नसून, इतरांकडूनही अशा संदर्भाच्या चुका होऊ शकतात हे दाखवून द्यावेसे वाटल्याने तो मुद्दा पुढे आणला.

आप ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे बरोबर का चूक हे सांगायला एखाद्या लिगल डिसक्लेमर सारखे आढेवेढे का घेताहात?

'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे.
'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे.
'आप'ने भारताचा अवैध नकाशा दाखवणे चूक आहे.

एकंदर या प्रकरणात पुढे काय झाले ह्यात पुरेसा रस नसल्याने व/वा केजरीवाल आणि मोदी या दोन्ही व्यक्तींमध्ये अधिक भंपक कोण यासंदर्भातच अद्याप विचार करत असल्याने पुढे काय झाले हे नक्की माहिती नाही. मात्र दोन शक्यता संभवतात. हा नकाशा चुकीचा असल्याने 'आप'ने तो काढून टाकला असावा किंवा हा 'चुकीचा नकाशाच बरोबर आहे' असा आपचा दावा असावा. हा नकाशा चुकीचा असल्याचे उघडकीस आल्यावर 'आप'ने चूक मान्य करुन बरोबर नकाशा दाखवला असल्यास (किंवा चुकीचा नकाशा काढून टाकला असल्यास) प्रकरण फारसे उगाळण्यात अर्थ नाही असे वाटते. मात्र निवडणुकीसंदर्भात हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. (चर्चा तर होणारच!) मात्र भारताचा चुकीचा नकाशा हाच बरोबर नकाशा आहे असा 'आप'चा दावा असल्यास 'आप'वर काही कारवाई करण्यासंदर्भात कोणी एसेमेस स्वरुपात माझे मत मागवले तर मी अशी कारवाई करण्यासंदर्भात होकार देईन.

इरसाल's picture

1 Apr 2014 - 1:11 pm | इरसाल

आधी पंतप्रधान,मग पक्षाध्यक्ष मग पंतप्रधान्पदाचे दावेदार किंवा पक्षाध्यक्षांचे चिरंजीव असा क्रम हवा ना ?

श्रीगुरुजी's picture

1 Apr 2014 - 1:55 pm | श्रीगुरुजी

>>> आधी पंतप्रधान,मग पक्षाध्यक्ष मग पंतप्रधान्पदाचे दावेदार किंवा पक्षाध्यक्षांचे चिरंजीव असा क्रम हवा ना ?

तसाच क्रम आहे. अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत.

आशु जोग's picture

1 Apr 2014 - 3:09 pm | आशु जोग

हे भारीच ___/\___

इरसाल's picture

15 Apr 2014 - 4:33 pm | इरसाल

अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत
ये तो मैने वाच्याच नै था !

आजानुकर्ण's picture

15 Apr 2014 - 6:16 pm | आजानुकर्ण

अल्पसंख्याकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी उजवीकडून डावीकडे चित्रे छापलेली आहेत

मुस्लिमफोबियापासून श्रीगुरुजी लवकर बरे व्हावेत यासाठी साक्षात राजनाथसिंग यांनी काही मुस्लिम धर्मगुरुंची भेट घेतल्याचे कळते.

तुमच्या मनात लगेच मुस्लीम कसे आले. नाही म्हणजे ज्यु लोकं पण अल्पसंखांक आहेत आणि ते पण उजवीकडून डावीकडे लिहितात...

आजानुकर्ण's picture

15 Apr 2014 - 9:06 pm | आजानुकर्ण

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहा. http://minorities.in/profiles.php

यातील उजवीकडून डावीकडे लिहिणारे कोण आहेत बरे? बहुदा पारशी आणि मुसलमान. आता यातील पारशी आणि मुसलमान यांच्यापैकी कोणाच्या लांगूलचालनाबाबत 'श्रीगुरुजी' या नावाने लिहिणाऱ्या आयडीला आक्षेप असेल असे तुम्हाला वाटते?

श्रीगुरुजी या मूळ व्यक्तीबाबत अधिक माहिती येथे पाहा: http://en.wikipedia.org/wiki/Madhav_Sadashiv_Golwalkar

आशु जोग's picture

16 May 2014 - 2:59 pm | आशु जोग

आता बोला