अरविंद बरोबर दीड तास!

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
20 Mar 2014 - 1:24 pm

India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही.

स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं.

प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं.

या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्‍या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

अरविंद केजरीवाल इतका प्रामाणिक आणि तळमळीचा नेता भारताला लाभलाय हे भारताच मोठ भाग्य. त्याचा विरोधासाठी विरोध करण हे भारतीय लोकशाही च सर्वात मोठ दुर्देव!
विशेषतः इतर सर्व नेत्यांचा इतका भयावह अनुभव घेतल्यानंतरही कीमान केजरीवाल सारख्या चांगल्या हेतु असलेल्याला तरी एकदा संधी दिलीच पाहीजे. त्यांनी केलेल्या चुका तरी ते प्रांजलपणे मान्य करतात. सुधारण्याची कायम तयारी दाखवितात.
उलट बाजुने विचारायच तर याहुन चांगला नेता आणि पक्ष सर्व चुका कंसीडर करुनही दुसरा कोण आहे ? मग या पक्षाला तरी का संधी देउ नये?
का याचा ही जीझस बनवायचाय ?
संजय क्षीरसागर यांच्याशी १०० % सहमत.

= दिली होती ना संधी दिल्ली मधे. काय केलं त्या संधीचं त्यांनी ? नुसतं लोकपाल लोकपाल ओरडत बसले आणि त्या संधीची माती केली. तो मुद्दा एकदा सत्तेत यायला ठीक होता. त्यानंतर एफेक्टीव अ‍ॅडमीनीस्ट्रेशन द्यायला नको का ? सत्तेत आले म्हणजे काहीही करु शकतात असा आणि विचार त्यामागं. हातात सत्ता असताना कोण धरणे धरतं का रस्त्यावर ? का लोक विश्वास ठेवतील परत ? आणि आव असा आणायचा की मसीहा (कि मसायाह ? ) आहे आणि इकडं तर अगदी नाटकीपणानं म्हणायचं, "मै तो बोहोत छोटा आदमी हुं, मेरी तो कोइ औकात ही नही है".

= दिली होती ना संधी दिल्ली मधे. काय केलं त्या संधीचं त्यांनी ? नुसतं लोकपाल लोकपाल ओरडत बसले आणि त्या संधीची माती केली. तो मुद्दा एकदा सत्तेत यायला ठीक होता. त्यानंतर एफेक्टीव अ‍ॅडमीनीस्ट्रेशन द्यायला नको का ? सत्तेत आले म्हणजे काहीही करु शकतात असा आणि विचार त्यामागं. हातात सत्ता असताना कोण धरणे धरतं का रस्त्यावर ? का लोक विश्वास ठेवतील परत ? आणि आव असा आणायचा की मसीहा (कि मसायाह ? ) आहे आणि इकडं तर अगदी नाटकीपणानं म्हणायचं, "मै तो बोहोत छोटा आदमी हुं, मेरी तो कोइ औकात ही नही है".

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 2:27 pm | मंदार दिलीप जोशी

नका इतका तळतळाट करु. केजरीवाल बनेल आणि ड्यंबिस आहे तो तसाच राहणार. असले पन्नास व्हीडीओ बनवेल आणखी लोकांना फसवायला. लोक येडे नव्हेत आता. एकदा बनले दिल्लीत आता नाही फसणार.

मुक्त विहारि's picture

20 Mar 2014 - 2:07 pm | मुक्त विहारि

लिंक बद्दल धन्यवाद......

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 2:25 pm | मंदार दिलीप जोशी

छान छान. अरविंद एक नंबर अभिनेता आहे याची खात्री पटली.

नानासाहेब नेफळे's picture

20 Mar 2014 - 2:28 pm | नानासाहेब नेफळे

मग या अभिनेत्याला मोदी घाबरले का हो? थेट बडोदा गाठले..

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 2:29 pm | मंदार दिलीप जोशी

कोण घाबरतंय. प्रत्येक पक्ष व नेत्याची स्वतःची स्ट्रॅटेजी असते त्याप्रमाणे वागतात. अनेक नेते अनेक ठिकाणाहून उभे राहतात.

नानासाहेब नेफळे's picture

20 Mar 2014 - 3:26 pm | नानासाहेब नेफळे

इमानदारी के शेर की दहाड सुनकर बेईमानी की लोंबडीया भाग खडी होती है'अशी आपची वैचारीक स्ट्रटेजी असावी..

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:27 pm | मंदार दिलीप जोशी

आपच्या इमानदारीचे धिंडवडे काढलेत पहा ग्रेटथिन्कर ;)

लिहीण्याचे स्वातन्त्र्य आहे म्हणुन असली बिनडोक विधाने करु नयेत, मोदी गेली ४० वर्षे समाज व राजकारणात आहेत, गेली १२ वर्षे मुख्यमन्त्री आहेत, त्याना तुमच्यापेक्षा जास्त राजकारण समजते व करता येते, सबब आपल्यापेक्षा अक्कल त्याना असल्याने ते त्यान्च्या द्रुष्टीने जे योग्य तेच करतील. बरे तुमचा हा गजकर्णी अरविन्द कसला आलाय 'शेर' ??? ५० दिवस धड दिल्ली साम्भाळु शकला नाही आणि चाललाय 'दिल्ली'वर झेन्डा लावायला, देश चालविणे म्हणजे मिडीयासमोर बकवास करण्याइतके सोपे आहे का ?? तेव्हडा मगदुर आणि कुवत अजुन तरी दिसली नाही.......

विनोद१८

क्लिंटन's picture

20 Mar 2014 - 10:30 pm | क्लिंटन

१००% मान्य

विकास's picture

20 Mar 2014 - 11:03 pm | विकास

त्याना तुमच्यापेक्षा जास्त राजकारण समजते व करता येते,

पण मोदींना धरणे धरता येतात का? थयथयाट करता येतो का? मग?

असो, जोक अपार्ट...

गेल्या १-२ दिवसांत कधीतरी चेतन भगतचे एक चांगले निरीक्षण वाचले. दिल्लीतून पळ काढल्यानंतर माध्यमांना सामोरे जाणार्‍या एकेंनी माध्यमांच्या विरोधात आक्रस्ताळेपणा चालू केला. मोदींनी म्हणे माध्यमांना विकत घेतले. सत्तेवर आल्यावर त्यांना तुरूंगात टाकण्याची भाषा केली...

या उलट १२ वर्षे माध्यमांनी मोदींना छळले, राक्षस असल्याची प्रतिमा तयार केली. पण त्यांनी कधी आक्रस्ताळेपणा केल्याचे देखील ऐकलेले नाही.

कारण तुम्हाला सगळ्यात पहिली संधी दिली होती दिल्लीत सरकार बनवण्याची तेव्हा तुम्ही तर १३च दिवसात पळून गेलात! ;) आणि तुमचंच (गंडलेलं) लॉजिक तुम्हालाच लावायचं म्हटलं तर काँग्रेसवाले गेली १३० वर्षे राजकारणात आहेत आणि ६५+ वर्षे सत्तेत आहेत- त्यामुळे त्यांना तुमच्या पेक्षा जास्त राजकारण समजते व करता येते- सबब आपल्यापेक्षा अक्कल जास्त असल्यामुळे त्यांना जे पाहिजे ते करतील, तुम्ही कोण त्यांना शिकविणार? देश चालवणे म्हणजे "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" करण्याइतके सोपे आहे का? >>>

विटेकर's picture

21 Mar 2014 - 9:53 am | विटेकर

देश चालवणे म्हणजे "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" करण्याइतके सोपे आहे का? >>>
सहमत . ते लै मंजे लै च सोप हाय...

मंदार दिलीप जोशी's picture

21 Mar 2014 - 10:01 am | मंदार दिलीप जोशी

देश चालवणे म्हणजे "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" करण्याइतके सोपे आहे का? >>>

केजरीवाल ने तेव्ढे सुद्धा करुन दाखवले नाही :D

कारण तुम्हाला सगळ्यात पहिली संधी दिली होती दिल्लीत सरकार बनवण्याची तेव्हा तुम्ही तर १३च दिवसात पळून गेलात!

बहुधा तुमचे इतिहासाचे ज्ञान कच्चे दिसतेय.. जरा शिकवणी लावा चांगली.

बॅटमॅन's picture

20 Mar 2014 - 2:30 pm | बॅटमॅन

+१

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 2:31 pm | मंदार दिलीप जोशी

गोविंदा हा अभिनेता सुद्धा निवडून येतो ते आठवले :D

सव्यसाची's picture

20 Mar 2014 - 5:41 pm | सव्यसाची

Shooting facts that suits theory instead of shooting theories that suits facts.

हाडक्या's picture

20 Mar 2014 - 10:48 pm | हाडक्या

वा वा..!!

Sherlock Holmes: [to Watson] Never theorize before you have data. Invariably, you end up twisting facts to suit theories, instead of theories to suit facts.

सव्यसाची's picture

21 Mar 2014 - 8:01 am | सव्यसाची

मी पहिल्यांदाच याचे ओरिजिनल व्हर्जन ऐकतो आहे. पण सारांश तोच आहे असे वाटते.

हाडक्या's picture

21 Mar 2014 - 7:55 pm | हाडक्या

शेरलॉक पहाच मग तुम्ही.. सहा वर्षात नऊ भाग केलेत फक्त. पण जवळपास सगळेच उत्तम आहेत..!

नानासाहेब नेफळे's picture

20 Mar 2014 - 2:26 pm | नानासाहेब नेफळे

थांकू

प्रकाश घाटपांडे's picture

20 Mar 2014 - 2:32 pm | प्रकाश घाटपांडे

हा केजरीवालांचा अरविंदा ना! अस्सच करतो लहानपणापासून!

प्रसाद गोडबोले's picture

20 Mar 2014 - 2:40 pm | प्रसाद गोडबोले

ह्या निमित्ताअने आठवले युट्युब वर "नायक २" चा व्हिडीयो नक्की पहा =))))

अरे तुम आयायती से हो , कोई युथ ओरीयंटेटेड घिसिपिटी बूक क्यों नही लिखते =))

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 2:41 pm | मंदार दिलीप जोशी

Feuds and barbs spoil AAP party

EW DELHI: The party with a difference has been besieged with problems faced by traditional ones. With the Aam Aadmi Party's eighth list on Wednesday taking the number of candidates named so far to 287, allegations of bribery, favoritism and in-fighting refuse to die down.

The latest being Kerala-based social activist Aswathy Nair who withdrew her candidature accusing the party of feudalism and corruption. The allegations, though denied by the state unit, have found echoes in Uttar Pradesh, Delhi, Punjab and Bihar.

Just a day earlier, candidate from north-west Delhi Mahender Singh had alleged that former Delhi minister and party colleague Rakhi Birla had demanded Rs 7 lakh to campaign for him. In the last few weeks, allegations have swirled around Khaled Parvez , the party's Moradabad candidate. Parvez was found to be a bank defaulter just as Singh was found to have served a jail term on a fake currency case only after his candidature was announced.

While dismissing Singh's allegations, AAP leader Manish Sisodia said, "Singh raised these issues only after his candidature was cancelled. He should have spoken earlier if Birla had made such demands. But looking at the past few cases I do feel that we have lacked in public scrutiny. Our internal scrutiny based on the candidate's papers and testimonies is fair but due to lack of time, we have not been able to make names public before finalizing them like we did in the Delhi elections.'' Sisodia said the party would cancel ticket of any candidate if a case of corruption or lack of probity was found even on the last day.

There have been unsubstantiated allegations that a senior political affairs committee member has sold the Lok Sabha seats of Sitapur, Jaunpur, Machhalishahar, Mohanlalganj and Mishrikh, which have been rubbished by the party for lack of evidence.

But this is not all. There are others like Savita Bhatti who bowed out of the race in Chandigarh citing lack of cooperation from party volunteers. Earlier, national executive member Ashok Agrawal resigned from the party alleging that it was run by elites while prominent singer Jaspinder Narula too turned her back on the party.

चिगो's picture

20 Mar 2014 - 3:26 pm | चिगो

हे असं बोलू- लिहू नये, मंदारराव.. आप आरोप करते, ते पुराव्याविनाही खरे, कळकळीचे आणि जनतेच्या हिताचेच असतात. आपवर आणि निर्मोही, निर-अहंकारी केजरवाल ह्यांच्याविरोधात बोललेला प्रत्येक शब्द अथवा आरोप हा खोटा, बीनबुडाचा आणि पाॅलिटीकली मोटीव्हेटेडच असतो..
तुमचा निषेध !!

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:27 pm | मंदार दिलीप जोशी

:D

प्रसाद गोडबोले's picture

20 Mar 2014 - 3:30 pm | प्रसाद गोडबोले

वरील कमेंट सरक्यॅस्टीक आहे का ?

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:30 pm | मंदार दिलीप जोशी

अर्थातच गोडबोले :)

त्या दिल्ली त राज्य करण्याची संधी दिली जीथे राज्य सरकार ला अगदीच कमी अधिकार काहीही कायदा करायचा म्हटल तर केंद्राची परवानगी लागते. अशा अर्धवट अधिकार देउन काय अपेक्षा करता? पुर्ण सत्ता मिळायला हवी होती. तरीही इतक्या मर्यादीत अधिकारातही आणि इतक्या बंधनातही
विज कंपन्याचे ऑडीट चा निर्णय घेतला ( आजपर्यंत कोणाची हींमत झाली नव्हती हे एकच उदाहरण पुरेसे आहे)
आणि मुकेश अंबानी विरोधात तर भले भले शेपुट आत घालतात त्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत तर दाखविली.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:02 pm | मंदार दिलीप जोशी

ज्यांच्या विरोधात बोलायचे नंतर त्यांचीच मदत घ्यायची असा आपचा जुना शिरस्ता आहे. कोंग्रेसविरुद्ध आंदोलन करुन आणि त्यांची मदत घेणार नाही असे सांगून यु टर्न (या संज्ञेवर आपने प्रताधिकार घ्यावा) घेऊन त्यांचाच पाठींबा घेतला.
समजा अरविंद पंतप्रधान झालाच, तर "तो क्या है, फाईन मारा उनको और अब वो स्वच्छ हैं, अंबानी हुए तो क्या हुआ, उनको भी एक मौका और मिलना चाहीये ना" असं म्हणून पलटी मारेल याची खात्री आहे.

नानासाहेब नेफळे's picture

20 Mar 2014 - 3:07 pm | नानासाहेब नेफळे

अरविंदकडे नैतिकता आहे जोशीबुवा ,तो अदाणीच्या आणि अंबानिच्या इमानातुन फिरत नाही.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:11 pm | मंदार दिलीप जोशी

नेफळेचाचा, अरविंदच्या नसलेल्या नैतिकतेचे सगळीकडे वाभाडे निघत आहेत. हे पहा. याप्रश्नांची उत्तरे आहेत का त्याच्याकडे?

आपच्या आमदारावर विनयभंगाचा गुन्हा

नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्र सिंह कोली यांच्या विरोधात पराभूत कॉंग्रेस उमेदवाराच्या पत्नीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

---------

आम आदमी पार्टीच्या केजरीवालांना काही प्रश्न

(१) भ्रष्टाचाराविरोधात तथाकथित लढाई लढणार्‍या अरविंद केजरीवाल व त्यांच्या पत्नीची दिल्लीतून एकदाही बदली झाली नाही. पण अशोक खेमका व दुर्गा शक्ती यांच्या सारखी त्यांच्यावर एकदाही कारवाई झालेली नाही असे का?

(२) प्रशांत भूषण यांच्या टिप्पण्यांच्या संदर्भात आपची काश्मीर, भारतीय सेना, व तथाकथित हिंदू दहशतवाद यांच्या विषयी काय मते आहेत?

(३) आम आदमी पक्षाची रामजन्मभूमी या प्रश्नावर काय भूमिका आहे?

(४) बाटला हाऊस एनकाउंटरमधे हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांच्या हौतात्म्याविषयी आपचे काय मत आहे?

(५) आप केंद्रात सत्तेवर आल्यावर शीखविरोधी दंगलींतल्या आरोपींचे काय करणार?

(६) बिनायक सेन हा कोर्टाने शिक्षा सुनावलेला माओवादी नेता आप मधे कसा?

(७) भारतात इस्लामी सत्ता यावी म्हणून जाहीरपणे बोंबलणारा आणि ज्याच्या विरोधात डझनावारी वॉरंट्स आहेत अशा इमाम बुखारी या इसमासोबत केजरीवाल अनेक वेळा दिसलेले आहेत. यावर त्यांचे काय म्हणणे आहे? त्या दोघांतल्या संबंधांबाबत केजरीवाल यांच्याकडे काय स्पष्टीकरण आहे?

(८) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले पवन बन्सल आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात केजरीवाल काहीच कसे बोलत नाहीत?

(९) उपोषणादि कार्यक्रमात आधी भारतमातेचे चित्र लावणार्‍या आपने नंतरच्या आपल्या कार्यक्रमांतून ते चित्र अचानक का गायब केले?

(१०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीच्या एका उपोषणाच्या कार्यक्रमात अन्न वाढण्याच्या प्रकाराबद्दल केजरीवाल यांना विचारले असता मीडियाला बाईट देताना म्हणाले "आम्हाला जातीयवादी (communal) लोकांकडून समर्थन नको". मग याच आम आदमी पार्टीचे लोक उत्तराखंड कधे बाबा रामदेवांच्या लोकांनी चालवलेल्या रिलीफ कँपमधे (जे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होते) ते जेवण हादडताना दिसले होते, त्याचे काय? फुकटचे गिळताना रामदेव बाबा सेक्युलर झाले का?

(११) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या विरोधातल्या अनेक गंभीर आरोपांबद्दल केजरीवाल शांत का?

(१२) बाटला हाऊस एनकाउंटर हा फेक होता आणि इशरत जहां अगदी गोड गोजिरी लाज लाजिरी अशी भोळीभाबडी मुलगी होती आणि तो एनकाउंटरही फेक होता असे एका पत्रात केजरीवाल यांनी मुसलमान संघटनांना लिहीण्याचे काय कारण?

(१३) दहशतवाद विरोधी एनकाउंटरांची यादी देताना केजरीवाल यांना नेहमी गुजरात कसे आठवते? आणि तेही हे सत्य असताना की काँग्रेसशासित महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश तसेच पूर्वोत्तर राज्ये आणि उत्तर प्रदेश यांत हा आकडा/यादी कितीतरी मोठी आहे.

(१४) उत्तर प्रदेशातल्या दंगलींबाबत बोलताना केजरीवाल यांनी मोदी आणि अमित शहा यांचा ठळक उल्लेख करुन समाजवादी पक्षाचा अगदी जाता जाता पुसटसा उल्लेख का केला? या दोघांचा आणि उत्तर प्रदेशातल्या दंगलींचा काय संबंध? आणि तेही हे सत्य असताना की २ काँग्रेसचे माजी खासदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि काही बसपा आणि सपा खासदारांवर दंगली भडकावल्यचा आरोप आहे. काँग्रेसविषयी इतका सॉफ्ट कॉर्नर का?

(१५) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मयंक गांधी आणि दमानिया या आम आदमी पार्टीच्या सदस्यांची चौ़कशी करायला केजरीवाल यांनी अंतर्गत लोकपाल नियुक्त करणे आणि सीबीआयने काँग्रेसची चौ़कशी करणे यात विनोदाचा भाग वगळला तर फरक काय?

(१६) सरकारी सेवेत असताना जास्त पगार लाटल्याचा केजरीवाल यांच्यावर आरोप होता. आपण कोणताही भ्रष्टाचार केला नाही असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यांनी अतिरिक्त पगार परत केला. त्यांनी बेकायदेशीररित्या जास्त पगार ढापला नव्हता तर त्यांनी तो जास्तीचा पगार परत का केला?

(१७) माहिती अधिकाराचा डंका पिटणार्‍या आम आदमी पार्टीच्या Core Reforms team मधल्या सदस्यांवरच भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन अनेक माहिती अधिकारात अनेक अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जांना आप उत्तर द्यायला टाळाटाळ का करत आहे?

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2014 - 8:46 pm | श्रीगुरुजी

>>> अरविंदकडे नैतिकता आहे जोशीबुवा ,तो अदाणीच्या आणि अंबानिच्या इमानातुन फिरत नाही.

अरविंदकडे नैतिकता आहे म्हणूनच तो 'इंडिया टुडे'च्या विमानातून फिरतो.

नानासाहेब नेफळे's picture

20 Mar 2014 - 9:19 pm | नानासाहेब नेफळे

इंडीया टुडेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो त्यांच्याच व्यवस्थेने जाणार ना!
उद्या महाराष्ट्र मंडळ USA ने श्रीगुरुजीना भाषण द्यायला बोलावले तर ते स्वतःच्या खर्चाने जाणार की मंडळाच्या खर्चाने.?
'विका'सपुरुष कोणत्या न्यायाने अदाणीचे हेलिकॉप्टर वापरतात ते ही सांगा..कि दिले तर घ्या असा प्रकार आहे..

श्रीगुरुजी's picture

21 Mar 2014 - 2:33 pm | श्रीगुरुजी

ग्रेटथुंकर नामांतर करून परत आलेले दिसताहेत. डिसेंबर २०१३ मधील निवडणुकांच्या निकालानंतर ते उद्विग्न होऊन परागंदा झाले होते. आता नामांतर करून परत आलेले दिसत आहेत. पण नाव बदलले तरी विचार कसे बदलणार? असो.

एकतर इंडिया टुडे या कॉर्पोरेटचा कार्यक्रम घेऊन त्यांच्याशी जवळीक कशाला साधायची? आणि जर घेतला तर कार्यक्रमाच्या दिवशी दिल्लीत हजर न राहता जयपूरमध्ये का भटकायला गेले? आणि समजा गेले तर तिथून स्वतःची वाहनव्यवस्था (म्हणजे आम आदमी वापरतो ती रेल्वे, बस, टमटम, वडाप सारखी सार्वजनिक वाहतूक) का नाही केली? कॉर्पोरेटच्या चार्टर्ड विमानातून स्वतः जायचं, नंतर 'विमानात केजरीवाल बसला नव्हता, तर आम आदमी बसला होता' ('आज केजरीवाल मुख्यमंत्री नही बना है, आज हर आम आदमी मुख्यमंत्री बना है' च्या धर्तीवर) अशी मखलाशी करायची आणि शेवटी इतर लोकं कशी उद्योगपतींची हेलिकॉप्टर्स वापरतात म्हणून दुगाण्या झोडायच्या!

बादवे, इंडिया टुडे च्या कार्यक्रमात भाषण करू का नको? आणि नंतर त्यांचे विमान वापरू का नको? या प्रश्नांवर अरविंदने लोकांकडून एसेमेस मागवून त्यांचे मत मागविल्याचे ऐकले नाही. तसे काही केले असल्यास लिंक द्या.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2014 - 8:26 pm | श्रीगुरुजी

>>> अरविंदकडे नैतिकता आहे जोशीबुवा ,तो अदाणीच्या आणि अंबानिच्या इमानातुन फिरत नाही.

वाचून खूप हसायला आलं. केजरीवाल संबंधात आपणच काही दिवसांपूर्वी काय लिहिलं होतं ते विसरलेले दिसतंय. तुमच्या आठवणीसाठी ते खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा.
________________________________________________________________________________

केजरीवाल हा खोटारडा आहे हे
टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32
केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा ....

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥
न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥


.उत्तर द्या

____________________________________________________________________________

बॅटमॅन's picture

20 Mar 2014 - 3:11 pm | बॅटमॅन

आपचा जुना शिरस्ता आहे

बळंच???? काँग्रेस/भाजप इ. चा जुना शिरस्ता आहे म्हटलं तर ठीक, आप तर परवापरवा स्थापन झाली.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:12 pm | मंदार दिलीप जोशी

आहो जुना म्हणजे त्यांच्या सुरवातीपासूनचा. दिल्ली - उदाहरण

मारवा's picture

20 Mar 2014 - 3:01 pm | मारवा

1

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:03 pm | मंदार दिलीप जोशी

ह्या फोटोने काय सिद्ध होते? :D

हा फोटो दाखवितो की मोदी कधीही मुकेश अंबानी चा विरोध करु शकणार नाहीत.
मोडुन पडलेला कणा !
यात जणु मोदी अंबानींना म्हणत आहेत
पाठीवर हात ठेवुन नुसते लढ म्हणा ( निवडणुक )

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:20 pm | मंदार दिलीप जोशी

राजकारणात असं काही नसतं हो. जौद्या तुम्हाला नै समजणार्र.

प्रसाद गोडबोले's picture

20 Mar 2014 - 3:26 pm | प्रसाद गोडबोले

कसलं अनुमान काढलय ...लोल =))))

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:19 pm | मंदार दिलीप जोशी

नुसत्या गप्पा मारून, टी व्ही समोर पत्रकार परिषदा करून आणि मेण बत्त्या मोर्चे काढून सरकार चालवता येत नसते. दैव देतं आणि कर्म नेतं हेच खरं. आपला मिळालेल्या अनपेक्षित जागा पाहून वाढलेल्या अपेक्षा आणि आता त्या लोकान्चे रोजचे नौटन्कि प्रकार पाहून लोक स्वत:च्याच थोबाडित मारून घेत असतील.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:20 pm | मंदार दिलीप जोशी

'आप'ले मरण : लोकसत्ता

"आप' काय करू पाहतो, याचा अंदाज येण्यासाठी त्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुद्दय़ांकडे लक्ष वेधायला हवे. सर्वप्रथम म्हणजे सत्तेवर आल्यावर केजरीवाल विजेच्या दरात पन्नास टक्क्य़ांनी कपात करणार आणि सर्व ग्राहकांना दररोज ७०० लिटर पाणी फुकट देणार! याच्या जोडीला भाज्यांच्या दरात ताबडतोब निम्म्याने कपात करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. नवी दिल्लीत जे जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते सर्वच्या सर्व नियमित करण्याचा केजरीवाल यांचा मानस आहे. (निदान या प्रश्नावर तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याची अपेक्षा ते करू शकतात. असो.)

हे सगळं ते कसं करणार?
किंबहुना, त्यांना ते करायचंही नसतं. कारण हे सर्व होणार नाही, हे त्यांनाही माहीत असतं. म्हणून मग विरोधाची भूमिका घ्यायची आणि आचरट मागण्या करायच्या किंवा वाह्यात आरोप करायचे. त्यात या निवडणुकीत केजरीवाल यांच्यासाठी आदर्श परिस्थिती होती. ते वाटेल त्याच्यावर वाटेल ते आरोप करू शकत होते आणि त्याला कोणीही प्रत्युत्तर देऊ शकत नव्हते. त्यांच्या विरोधात बाकीचे सगळे हतबल होते. कारण केजरीवाल हे सत्ताखेळातला अनाघ्रात पत्ता असल्यामुळे त्याचं काय करायचं, हेच कोणाला माहीत नव्हतं. आणि त्यात माध्यमांनी- बाकीचे सगळे कसे चोर आहेत, या भावनेला खतपाणी घालायचं ठरवलं असल्यामुळे केजरीवाल यांची ताकद आहे त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात अधिक वाटू लागली".

‘आप’चे प्रशांत भूषण अडचणीत! १५ एकर जमीन जप्त होणार

काश्मीरप्रश्नी बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेणारे आम आदमी पक्षाचे नेते अॅड. प्रशांत भूषण पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. शिक्षण संस्था चालविण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारकडून घेतलेली १५ एकर जमीन भलत्याच कामासाठी वापरल्याचा ठपका भ्रष्टाचारविरोधी पथकाने भूषण यांच्यावर ठेवला असून ही जमीन जप्त करण्याची शिफारस सरकारला केली आहे.

संजय क्षीरसागर's picture

20 Mar 2014 - 3:43 pm | संजय क्षीरसागर

माझी पोस्ट दुपारी १ वाजून २४ मिनीटांनी प्रकशित झालीये. विडिओ जवळजवळ दीड तासाचा आहे. तो शांतपणे पाहून मत बनवायला, पूर्वग्रहरहित मन असेल तर, किमान २ वाजून ५६ मिनीटं (तरी) व्हायला हवी होती!

मनपूर्वग्रहदूषित असेल तर वेळेचा प्रश्नच येत नाही (त्याला विडिओ कशाला पाहायला हवा?) घे कि-बोर्ड की दे प्रतिसाद (खरं तर `उचल कॉपी आणि कर पेस्ट', कारण सगळं मटेरीयल जुनंच आहे). इतके दीर्घ प्रतिसाद इतक्या कमी वेळात अशक्य आहेत. It only shows a biased mind. विरोधी मताबद्दल प्रश्न नाही पण त्यामागे विचार हवा. आणि प्रतिसाद देतांना हे देखिल लक्षात येत नाहीये की आपण मांडलेल्या अनेक मुद्यांचा उहापोह विडिओत ऑलरेडी झालायं आणि तो ही समाधानकारकरित्या.

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:49 pm | मंदार दिलीप जोशी

बरं :D

हा व्हिडीओ आधी पाहीलेला असू शकत नाही का? :P

प्रसाद गोडबोले's picture

20 Mar 2014 - 3:56 pm | प्रसाद गोडबोले

त्याला विडिओ कशाला पाहायला हवा?

>>> करेक्ट

ज्यांनी आधीच अभ्यासकरुन मतं बनवली असतील त्यांना व्हिडीयो पहायची गरज नाही. अर्थात आधीअभ्यासकरुन बनवलेल्या मतांना पुर्वग्रहदुषित म्हणु शकता आपण. किंव्वा बायसड माईण्ड म्हणु शकता !

शेवटी सगळा परसेप्शनस चा खेळ आहे ...

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 3:59 pm | मंदार दिलीप जोशी

अर्थात आधीअभ्यासकरुन बनवलेल्या मतांना पुर्वग्रहदुषित म्हणु शकता आपण.

हान तिजायला! ये लग्गा सिक्सर

जर दिड तास वेळ नसला तर १ मिनिट २२ सेकंदांच्या खालच्या चित्रफितीत देखील अरविंदचे दिलखुलास बोलणे बघायला आणि ऐकायला मिळेल. (कुजबुज असल्याने कॅप्शन्स देखील वाचू शकता)....

मंदार दिलीप जोशी's picture

20 Mar 2014 - 4:55 pm | मंदार दिलीप जोशी

विकास, शप्पथ :D

गब्रिएल's picture

21 Mar 2014 - 1:40 pm | गब्रिएल

>>> अरविंदकडे नैतिकता आहे

ह्यो विरोध्कांचा कट हाय.

आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो.

कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D

कंटाळा कसा काय ह्या खेचराना येत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.बर मोदी भ्रष्टाचारी आहे असे मानले तरी ज्याचा भ्रष्टाचार सिध्द झाला आहे अश्या ए राजाविरोधात ह्याने उमेदवार का उभा नाही केला? महाराष्ट्रात फक्त गडकरी भ्रष्टाचारी आहेत मग शरद पवार काय साधुसंत आहेत काय? हा कधीच सोनिया गांधी किंवा राहुल गांधी विरुध्द बोलत नाही, मग ह्याची शेरकि दहाड आहे कि गधे का गायन?अरविंद हा एक वाघाचे कातडे पाघरलेला गाढव आहे. हा कोणत्या एका तत्वावर घट्ट आहे हे संजय क्षीरसागर तुम्ही आम्हाला आठवुन सांगा.

चिरोटा's picture

20 Mar 2014 - 6:06 pm | चिरोटा

हा कधीच सोनिया गांधी किंवा राहुल गांधी विरुध्द बोलत नाही

जावयबापूंचा भ्रष्टाचार, हरयाणामधील DLF चे जमीन घोटाळे 'आप'ने बाहेर काढले.जेट्ली वा स्वराज ह्यांनी नाहीत्(वर मुलाखतीत म्हंटल्याप्रमाणे ही सर्व माहिती भाजपवाल्यांनाही होती.)

अश्या ए राजाविरोधात ह्याने उमेदवार का उभा नाही केला

'आप' अर्थातच राजकिय पक्ष आहे.त्यांनी राजकिय फायदा बघू नये अशी अपेक्षा करणे जरा अती वाटते.वरच्याच चालीवर म्हणायचे तर राहूल गांधी,चिदंबरम्,शरद पवार ह्यांच्या विरोधात अडवाणी,स्वराज्,जेटली का नाही उभे रहात?

पण आपचे साधारण 35-40 सिटा लागायचा जर चमत्कार घडला तर मात्र सत्ताधारी 5 वर्षे सुखाने झोप घेऊ शकणार नाही हे नक्की.

नानासाहेब नेफळे's picture

20 Mar 2014 - 8:21 pm | नानासाहेब नेफळे

अनुमोदन, एकदा आप लोकसभेत गेली की मग या काँग्रेस+ भाजप युतीला बरोबर तडा जाईल.आपला निवडुण देणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.जयहिंद.

ही दिल्ली नाहीये, की बहुमत मिळवण्या इतक्या संखेचे उमेद्वार आपकढुन उभे केले जावेत. आपने तेव्हडी संघटना दिल्लीत निर्माण केली होती तसे इतर राज्यांबाबत अजुनही केलेले नाही. इतर राज्यात "आपची" डेवीड वर्सेस गोलायथ मधील डेवीड म्हणूनच "हवा" झाली आहे, एक प्रभावशाली संघटना म्हनुण न्हवे. इन शॉर्ट आप कॅन नॉट बी स्बस्टेनशीअल थ्रेट टु इवन इडिओट्टा, पापे.

मान्य आहे राहुल वर टिका म्हणजे त्याचे महत्वच। वाढवण्यासारखे आहे, पण म्हणून इतके टारगेट करायचे केजुला ? करणारच म्हणा कारण तो थ्रेट नाही, त्याचे सगळे उमेदवार जिंकले तरीही तो दिल्ली प्रमाणे सत्ता स्थापना करण्या इतपत मोठा नाही, ही खुणगाठ पक्कि आहेच आणी म्हणूनच फक्त त्याच्यावरच टिका करत राहुन मेडीयामधे अनुल्लेखाने कॉग्रेसची गेम करायची चालही.

पण तरीही ताक किती फुंकुन प्यावे याला खरे तर मर्यादा नको काय ? ज्या कोणाला केजरीवाल पंतप्रधान व्हायची स्वप्न बघत आहे असे वाटते अथवा हे खरेच तसे आहे असे वाटते त्याला वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा.

ही दिल्ली नाहीये, की बहुमत मिळवण्या इतक्या संखेचे उमेद्वार आपकढुन उभे केले जावेत. आपने तेव्हडी संघटना दिल्लीत निर्माण केली होती तसे इतर राज्यांबाबत अजुनही केलेले नाही.

हे इतक्या खात्रीने कसे बोलावे?
सोमवारपर्यंत आपचे ३१७ उमेदवार उभे राहिले होते. महाराष्ट्रात सगळ्या ४८ जागांवर उमेदवार आहेत.
नी यापैकी कित्येक उमेदवार आणि त्यांनी राजकारणाबाहेर असताना केलेली समाजसेवा निव्वळ थोर आहे. तरीही इतकी खात्री!?

दिल्ली सोडून अन्य राज्यांत आपची अशी काय संघटना आहे ते पहायला आवडेल. त्या त्या ठिकाणचे कामसू इ. लोक आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न आहे, पण दिल्लीच्या तोडीचं काही आहे का? उगा भप्पार्‍यांवर किती विश्वास ठेवायचा?

विवेकपटाईत's picture

20 Mar 2014 - 8:06 pm | विवेकपटाईत

सर्वांच्या डोळ्यांवरचे झापड मे महिन्या अखेर उघडेलच. पण उशीर झालेला असेल. ज्याला राजा समजले तो प्यादाच निघाला. तवाकी नावाचा तरस

बरोबर आहे तुमचे! खाली बघा-
किंग मोदी
कोण कुणाला राजा समजतंय ते ही कळेल :)

विवेकपटाईत's picture

20 Mar 2014 - 8:18 pm | विवेकपटाईत

संजय जी, आपण पंचतंत्र वाचल आहे का? काकोलुकीयम् पंचतंत्रचा तिसरा भाग आहे. मग अरविंद बद्धल लिहा.

ते तवाकीचे सोडा हो. लालकृष्ण आणि अरुण नावाचे रेडे आणि सुषमा नावाची म्हैस महाबलीच्या पाठीत शिंग खुपसण्याच्या तयारीत आहेत ते बघा :)

श्रीगुरुजी's picture

20 Mar 2014 - 8:50 pm | श्रीगुरुजी

>>> India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही.

तुमच्यासारखे "आप"चे समर्थक केजरीवालांच्या मुलाखती व भाषणेच ऐकतात. त्यांची कृती व त्यांची नाटके एकतर तुम्ही बघत नाही किंवा बघून न समजल्यासारखे करता. त्यामुळेच ते बोलतात त्याच्यावर तुमच्यासारख्यांचा भाबडेपणाने विश्वास बसतो. "आप"च्या दुर्दैवाने इतर जनता केजरीवालांची उक्ती आणि कृती यांची तुलना करत असते. त्यामुळेच ते "आप"विषयी साशंक असतात.

विकास's picture

20 Mar 2014 - 9:12 pm | विकास

ह्या खुला संवादातील हा भाग पण बघण्यासारखा आहे.

आत्मशून्य's picture

21 Mar 2014 - 1:22 am | आत्मशून्य

भारतातील पहिलाच मुख्यमंत्री असावा जो ओबामास्टाइल डायरेक्ट लोकांच्यात मिसळुन खुला संवाद साधतोय, ऐकुन घेतोय.मान गये केजरीवाल, गर्मी तो औरोने महसुस की जो मफलर तुमने ओढाथा.

यशवंतरावांपासुन बारामतीकर काकांपर्यंत सर्व मुख्यमंत्री लोकांमधे अगदी त्यातलेच एक बनुन मिसळायचे. पवारकाका आजही मिसळतात. आबा पाटिल (मुख्यमंत्री नसले तरी गृहमंत्री तर आहेत) पण तसेच. दिल्लीचे साहेबसिंग वर्मा, गोव्याचे पर्रिकर... किती नावे घ्यावीत.

नेत्याचे नेतृत्वगुण, कर्तुत्व, पॉलिसी, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा (वाद देखील) करता येते. व्यक्तीमहात्म्याची भुरळ पडणं देखील योग्य... पण अशी भुरळ ?? असो.

पंतप्रधान उमेदवार म्हणून केजरिपेक्षा जास्त योग्य वाटतात हे मी एका धाग्यावर नमूदही केलेले आहे. आणी हे जितके सत्य आहे तितकेच आप हां विरोधी पक्ष म्हणून असावा असेच वाटते.

मला इन्केस मला भुरळ पडलीच असेल तर वैयक्तिक आवड निवड व देशाची गरज यातील फरकही माहीत आहे. तरीही ज्या वेगाने कजरी वर आला त्याच्या प्रसिध्दिची तुलना हिटलरच्या चढत्या कालखंडा सोबतच करावी वाटते. एका हार्मलेस व्यक्तीला टीकेचे असे धनी करणारे लोक बघितले की मात्र गंमत करायची विशेष लहर येते इतकच.

अर्धवटराव's picture

21 Mar 2014 - 3:43 am | अर्धवटराव

तसं मी जे काहि टंकलं ते केजरीसाहेबांच्या काळजीतुनच. लोकमतावर स्वार होण्याऐवजी हा बहाद्दर लोकभावनेवर स्वार होण्याची चिन्ह दिसताहेत. आणि खरच तसं झालं तर फार लवकर ते पायदळी तुडवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत तुडवल्या जातील जनतेची जाब विचारण्याची शक्यता व राजकारणाला मिळु लागलेलं स्वच्छ्तेचं परिमाण. तसंही, केजरीसाहेबांचा विस्तारणारा वर्तुळ बघितला तर साहेबांना लवकरातलवकर मखरात बसवण्याची घाई झालेले नव-बडवे दिसतील येत्या काळात(स्वतः साहेब देखील तोल सांभाळतील हा भरवसा वाटत नाहि मला). किमान जनतेने तसं करु नये हि इच्छा.

लोटीया_पठाण's picture

20 Mar 2014 - 11:46 pm | लोटीया_पठाण

बोलायला काय माणूस काहीपण बोलतो, आणि त्यातून राजकारणी माणसाला तर वाट्टेल ते बोलायची जणू मुभाच असते. असल्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा याचं भान आपल्याला हवं.

तेहसीन पूनावालाचा प्रश्न आणि अपेक्षा ऐकून हसायला आलं...
:)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Mar 2014 - 3:00 am | निनाद मुक्काम प...

आपण ह्यांना पाहिलेत का

विकास's picture

21 Mar 2014 - 5:41 am | विकास

अजून एक मिळाले... असे किती असतील कोण जाणे... :) केजूसमर्थकांकडून काय उत्तर मिळेल ह्याची जाणीव आहे. पण तशी देखील करमणूक होते आहे...

गब्रिएल's picture

21 Mar 2014 - 1:41 pm | गब्रिएल

>>> अरविंदकडे नैतिकता आहे

ह्यो विरोध्कांचा कट हाय.

आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो.

कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D

अर्धवटराव's picture

21 Mar 2014 - 12:11 pm | अर्धवटराव

राजकारणात तरबेज होतोय (कि झालाय ?) हा माणुस.

गुजराथ का सच देखने गया था. त्यांनी जितका डाटा दिला गुजरात दौर्‍याचा, आणि ज्या घडामोडी झाल्या त्यादरम्यान... कोणि नि:ष्पक्षपणे अभ्यास करायला गेला तर खरच २-३ दिवसात इतका अभ्यास शक्य आहे काय? मला नाहि वाटत प्रॅक्टीकली शक्य आहे, अन्लेस तुम्ही अगोदर ठरवलं असेल कि काय "पहायचय" आणि काय सांगायचय. १०० गोष्टी ऐकवल्या मोदिंच्या विरुद्ध. एका अभ्यास दौर्‍यात त्यांना स्वतःहुन एक गोष्ट सुद्धा चांगली दिसु नये? मला नाहि वाटत. त्यांना गुजरात विकासाचय मॉडेलचं खरं रूप बघायचं होतं म्हणतात. मध्यंतरी मी एका टायर टु सिटी चा अभ्यास करायला घेतला होता. एकंदर कामाचं स्वरुप बघुन त्याकरता मला कमितकमि एक महिना लागेल असं एस्टीमेट समोर आलं. मी एक सर्व साधारण बुद्धीचा माणुस आहे. केजरीसाहेब माझ्यापेक्षा १० पट हुषार असावेत. तरीसुद्धा "गुजरात राज्याचं विकास मॉडेल" या पि.एच.डी. लेव्हलच्या अभ्यास विषयाला त्यांना किमान काहि महिने लागावे... अगदी डेडीकेटेड. अन्यथा २ दिवसाच्या ऑब्जर्व्हेशनमधे मोदीविरोधी केजरीवाल १० वाईट मुद्दे मांडेल व मोदीसमर्थक क्ष व्यक्ती १० चांगले मुद्दे मांडेल, मामला बराबर. त्यांच्या समोर काहि शिख शेतकरी रडले तसे कोणासमोर काहि शिख शेतकरी आनंदाने मोदिंचे गुणगान देखील गातील. काहि शाळा आणि दवाखान्यांची हालत खराब असेल तर काहिंची चांगलीही झाली असेल. केजरीवाल एक बायस्ड निर्णय अगोदरच ठरवुन गुजराथला गेले, त्याच दृष्टीकोनातुन त्यांना निवडक स्पॉट दाखवण्यात आले (कि त्यांनी स्वतःच ते निवडले) व तिथुन परतुन त्यांनी आपले बायस्ड निर्णय जनतेसमोर मांडले.
त्यांना खरच मोदिंना भेटायचं होतं काय? कॉमनसेन्स आहे कि भेटायचं असेल तर चप्पल पायात चढवण्यापुर्वीच त्यांनी मोदिंच्या संपर्क विभागाला मोदिंची उपलब्धता विचारुन घ्यावी. पण हे महाराज तडक निघाले. आणि अगदी मोदिंच्या गेटसमोर तमाशा होण्यापेक्षा पोलिसांनी अगोदरच हस्तक्षेप करुन त्यांना थांबवलं तर भारताच्या आतिथ्यधर्माची दुहाई द्यायला लागले. कमॉन सर...
यांच्या गाडीच्या काचा खरच मोदिंनी फोडल्या असतील? ऐन निवडणुकीच्या हंगामात अगदी युपी-बिहारचे राजकारणी देखील दहादा विचार करतील असं वागताना... कमॉन सर.

प्रश्नोत्तरे पण भारी झालीत. काहि उत्तरे खरच छान दिली साहेबांनी. सोमनाथ भारतींच्या प्रश्नावर मात्र विकेट आणि चेहेरा, दोन्हि पडले साहेबांचे. आणि जबरी पडले बरं का. ऊर्जा मंडळाच्या प्रॉफीटवर देखील काहि उत्तर नाहि साहेबांकडे. म्हणाले उद्या सांगेन. त्यांच्याकडे सर्वच डाटा उपलब्ध असावा अशी काहि अट नाहि म्हणा. पण ते गुजराथच्या विकासाचा अभ्यास करायला गेले होते ना... मग हा चांगला मुद्दा खरच दिसला नाहि त्यांना? कि बघायचच नव्हतं?
अपोझीशन पार्टीच्या लोकांना मोदि विकत घेतात म्हणतात... शक्य आहे... पण मरवा देते है?? गुजरात दंगलींबाबत मोदिंना जंग जंग पछाडणारं केंद्रातलं काँग्रेस सरकार १० वर्ष आपल्याच पार्टीच्या लोकांचं शिरकाण खपवुन घेतं? त्याहिपेक्षा भयंकर म्हणजे विरोधकांना खतम करण्यासारखा लोकशाहितला सर्वात गंभीर गुन्हा केजरीसाहेबांसमोर आला आणि त्यांचं हृदय पिळवटुन नाहि निघालं? अशावेळी त्यांच्याकडुन आपले बाकी सर्व प्रोग्राम रद्द करुन ताबडतोब आंदोलन करण्याची अपेक्षा होती. दिल्लीतल्या वेश्या व्यवसायाला थांबवायला आपण आंदोलन केलंत... इथे १० वर्षे शिरकाण चाललय-भलेही दुसर्‍या पार्टीच्या लोकांचं, दुसर्‍याच राज्यात- तरिही साहेबांना काहिच हालचाल करवली नाहि? इजण्ट इट स्ट्रेंज? आणि हा आरोप मोदिंवर करण्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्रालयाला जाब विचारण्याची गरज वाटली नाहि? कमॉन सर...
कॅगच्या स्पेशल बॉडीकडुन विजकंपन्यांचं ऑडीट होतं असं एकजण म्हणाला. तर हे साहेब म्हणतात कि प्रत्यक्ष्य कॅगकडुन का नाहि? अरे पण दुसर्‍या बॉडीकडुन ऑडीट होतय ना? त्यात काहि कमतरता असतील तर तुम्ही त्या समोर आणल्या का? त्यांचं विश्लेषण केलं का? कि जाहीरनाम्यात म्हटलय म्हणुन उगाच एक प्रोसेस वाढवायची? साहेबांनी पांच दिनमे ऑडीट के ऑर्डर निकाले म्हणतात... पाच दिवसात या दुसर्‍या ऑडीटच्या कमतरता समोर आल्या असतीलं असं मानुन चलु.

भारताच्या विकासाच्या मूलभूत गरजा उत्तम मांडल्या साहेबांनी. सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचाररहित राज्यकारभार... अगदी नेमकेपणानी मांडलं. उद्योग समुहांचे राजकीय लागेबांधे, त्यांच्यापुढे राजकारणी लोकांचं मिंधेपण, रिटेल क्षेत्र ओपन का करु नये वगैरे मुद्दे त्यांच्या दृष्टीकोनातुन व्यवस्थीत मांडले. देशात समुद्रमंथन चाललय, ट्रांझीशन फेजमधे देश आहे, आता नाहि सावरलं तर फार उशीर होईल, परिवर्तन घडवुन आणायला लोकांनी आता समोर यावं वगैरे संदेश देखील उत्तम मांडले. पण हे सर्व इतर पक्ष देखील म्हणतात.

काँग्रेस, भाजपला नाकारुन आआपचा पर्याय निवडायचं आवाहन देखील केलं. आपल्याला कुठल्याच पदाची अभिलाषा नाहि वगैरे पालुपद लावलं शेवटी, पण राजकारणी केजरीवालांना तसं म्हणावच लागेल.

एक अत्यंत महत्वाची गोष्ट मात्र दाद देण्यालायक. देश उम्मीद खो बैठा था. आम्हि ति उम्मीद परत जागवली हा त्यांचा दावा अगदी १०० % मान्य. मोदिंचे समर्थक देखील मोदिंना उम्मीद म्हणुनच बघतात. आआपच्या लोकांनी भाजप कार्यालयावर केलेल्या हुल्लडबाजीबद्द्ल देखील विनम्रतेने माफि मागितली. फुकटची मुजोरी केली नाहि.

थोडक्यात काय, तर विरोधी पक्षावर पोकळ टिका केली, देशाच्या प्रगतीच्या सर्वमान्य गरजा सांगितल्या, आपल्या चुकांवर पांघरुण घालु शकले नाहित, व आपल्या प्रचाराने समरोप केला. एका नवीन राजकीय पक्षाची टिपीकल मुलाखत.

क्लिंटन's picture

21 Mar 2014 - 12:46 pm | क्लिंटन

अगदी मनातले बोललात अर्धवटराव. जो माणूस गुजरातमध्ये खरोखरच विकास झाला आहे की नाही हे बघायला चार दिवसांचा (वरकरणी) अभ्यासदौरा काढतो तो अगदी पहिल्याच दिवशी तिथे गेल्यानंतर काही तासांमध्येच 'गुजरातमध्ये अजिबात विकास झालेला नाही' असे म्हणतो यात कोणालाच काहीच विसंगती वाटत नाही? हे विधान करण्यापूर्वी त्याने स्वत: दीड तास तरी अभ्यास केला होता की नाही अशी शंकाच वाटावी इतक्या लवकर त्याने गुजरातमध्ये 'अजिबात विकास झालेला नाही' हे विधान केले.आणि अशा मनुष्याने नाटकीपणे दीड तास काही बोलले तर त्यावर विश्वास टाकून देश चालवायची याची योग्यता आहे असे मानण्याइतका मी तरी भाबडा नक्कीच नाही. आणि संबंधित लेखक आणि इतर अनेक त्याने काहीही बोलले तरी त्यावर विश्वास कसा टाकू शकतात हे मात्र कळण्याच्या पलीकडचे आहे.याच न्यायाने यांना निळू फुले चित्रपटांमध्ये खलनायकाचे काम करायचे म्हणून प्रत्यक्षातही ते वाईट होते असे वाटायचे का?

दुसरी गोष्ट म्हणजे मोदींनी विकासाचे दावे केले की लगेच मोदी विरोधक गुजरात पूर्वीपासूनच विकसित राज्य आहे असे म्हणायचे.आता तर केजरीवाल म्हणतो की गुजरातमध्ये अजिबात विकास झालेला नाही.या दोन मोदी विरोधकांच्या बोलण्याची सुसंगती कशी लावायची?

रच्याकाने--राज ठाकरे सुध्दा गुजरातमधील विकास झाला आहे की हे बघायला आठ दिवस गुजरातमध्ये अभ्यासदौर्‍यांतर्गत गेले होते.

नानासाहेब नेफळे's picture

21 Mar 2014 - 1:14 pm | नानासाहेब नेफळे

एक आयआयटी एम.टेक. इंजिनिअर, IAS ऑफिसर ,आयकर विभागाचा माजी कमिशनर , ,मॅगसेसे पुरस्कार विजेता ,जनलोकपालसाठी सत्तेला लाथ मारणारा ,विलक्षण निर्भय ,निस्वार्थी असलेल्या व्यक्तीला गुजरातच्या विकासाचे(?) मुल्यमापन करायला चार दिवस बास झाले.

मैत्र's picture

21 Mar 2014 - 1:22 pm | मैत्र

,मॅगसेसे पुरस्कार विजेता ,जनलोकपालसाठी सत्तेला लाथ मारणारा ,विलक्षण निर्भय ,निस्वार्थी

या गोष्टींचा आणि मूल्य मापनाला लागणार्‍या वेळेचा संबंध स्पष्ट करून सांगता का?

मैत्र's picture

21 Mar 2014 - 1:26 pm | मैत्र

केजरीवाल आय ए एस नव्हते. आय आर एस म्हणजे रेव्हेन्यु खात्यात होते.
त्यामुळेच ते दिल्लीचे इन्कम टॅक्स जॉइंट कमिशनर होते.

आय ए एस केडरचे रँकिंग खूप वरचे असते. आणि इतक्या अनुभावावर सहसा कलेक्टर / अ‍ॅडिशनल कलेक्टर वगैरे पदे मिळतात.

या गोष्टींचा आणि मूल्य मापनाला लागणार्‍या वेळेचा संबंध स्पष्ट करून सांगता का?

कसं आहे कुठल्याकुठल्या मुलाखतींमध्ये, भाषणांमध्ये काहीतरी बोलणे यावरून तो मनुष्य किती चांगला पंतप्रधान होऊ शकेल अशी अनुमाने काढणारे केजरीवाल समर्थक असे कोणतेही बादरायण संबंध जोडून वाटेल ती अनुमाने काढायची क्षमता ठेवतात हे नक्की. असे काही विचारलेत तर ही मंडळी सोयीस्करपणे खोकून प्रश्नाला बगल देऊन मोकळी होतील. यांच्यापुढे लॉजिक चालत नाही हेच खरे :)

>>> अरविंदकडे नैतिकता आहे

ह्यो विरोध्कांचा कट हाय.

आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो.

कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D

चिगो's picture

21 Mar 2014 - 1:57 pm | चिगो

काही तपशीलातल्या चुका...
१.

एक आयआयटी एम.टेक. इंजिनिअर

- माझ्या माहितीप्रमाणे आणि विकीपिडीयावर लिहील्याप्रमाणे केजरीवालांनी आय आय टी, खडगपुर मधून ग्रॅजूएअशन केलंय. एम.टेक. ही पोस्टग्रॅजूएशन पदवी आहे..

२.

IAS ऑफिसर

- कधी? कसे? कुठे? ते आय आर एस अधिकारी होते.

३.

आयकर विभागाचा माजी कमिशनर

- त्यांनी आयकर विभागाच्या जॉईंट कमिश्नर पदाचा राजिनामा दिला. जॉईंट कमिश्नर आणि कमिश्नर मध्ये लै फरक असतो राव.. उद्या अंडर सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरी सारखेच म्हणाल. ;-)

आता पुढे..

जनलोकपालसाठी सत्तेला लाथ मारणारा ,विलक्षण निर्भय ,निस्वार्थी

- असं ते म्हणतात. असम्प्शन आहे हे..

गुजरातच्या विकासाचे(?) मुल्यमापन करायला चार दिवस बास झाले.

- भक्तीचा प्रश्न आहे शेवटी.. काय बोलणार?

अठ्ठावीस वेगवेगळ्या टीम पाठवल्या होत्या आप ने गुजरात भर हे केजरीवालांनी अनेकदा सांगितले आहे ते वाचले किंवा ऐकले नाही का?

की सोयीस्कर दुर्लक्ष केल्या जातय?

नानासाहेब नेफळे's picture

22 Mar 2014 - 5:53 pm | नानासाहेब नेफळे

आपच्या २८ टीम गुजरातच्या खोट्या विकासाचा दावा फोल ठरवत होते तेव्हा भाजपा फूकटच्या चहाची लाच देशाला देत होते, त्यांची टपरी आयोगाने उचलली तेव्हा आता केजरीवालांवर घसरले आहे.
भाजप जर एवढा प्रतिष्ठीत ,सुष्ट पक्ष आहे तर ज्या काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप इतक्या वर्ष केले त्याच काँग्रेसमध्ये चाळीस वर्षे घालवलेले जगदंबिका पाल यांना कसे चालतात?
रामकृपाल यादव ,जे लालु यादवांचे अत्यंत जवळचे सहकारी होते ते कसे या भाजपाला चालतात?लालू भ्रष्ट मग कृपाल कोण ,सुष्ट का?
युडुयुराप्पा ,जो भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भाजपने काढुन टाकलेला नेता ,इलेक्शन जवळ आले की परत भाजपात घेतला गेला ..का?
"भाजपात आला पवित्र झाला" आधी काय केले विसरुन जा .असा नियम आहे भाजपात?
अटलजी आणि आडवाणींच्या कारकीर्दीत' काळ्याला काळा म्हणायचे तरी धारिष्ट भाजपात होते परंतु नमो आल्यापासून आयपीएलच्या टीम प्लेअरचा जसा खरेदी लिलाव होतो ,तसा भाजपात चालू आहे. आयात केलेल्या उमेदवारांवर सत्ता मिळवायची वेळ मोदींनी भाजपात आणली आहे.

चिगो's picture

23 Mar 2014 - 5:04 pm | चिगो

//अठ्ठावीस वेगवेगळ्या टीम पाठवल्या होत्या आप ने गुजरात भर//

असतीलही, हो.. पण म्हणून केजरीवालांनी गुजरातमध्ये पाय ठेवल्याठेवल्या त्या टिम्सनी दिलेली माहिती 'क्राॅसव्हेरीफाय' केली की काय? की त्याची गरजच नाही 'आप'ची टिम आहे म्हटल्यावर? म्हणजे आतापर्यंत केजरीवालांना 'देवमाणूस' समजण्यासाठी भडमार होत होता, आता 'आप'ची टोपी घालणारा प्रत्येक चंगुमंगु देवमाणूस म्हणायचा?

साहेब, मी कोणालाच देव किंवा देवमाणूस मानत नाही.. हा माझा पर्सनल प्राॅब्लेम आहे म्हणा..

पिलीयन रायडर's picture

21 Mar 2014 - 1:43 pm | पिलीयन रायडर

प्रतिसाद पटला.. कारण हेच प्रश्न मलाही पडले होते..

१. विरोधी उमेदवाराचा "काटा काढल्या जातो" हा फार मोठा आरोप आहे. लोकांशी गप्पा मारताना जे ऐक्लं ते सांगितलं असा प्रकार वाटला.. त्यावर केजरीवालांनी काही पुरावे शोधले का?

२. इतक्या कमी वेळात "गुजरातचा काहीही विकास झालेला नाही" ह्या निष्कर्षावर पोहोचणे शक्यच नाही. खरं तर चांगल्या / वाईट कुठल्याच निष्कर्षावर पोहोचणे शक्य नाही. शिवाय जनरली गुजराथी लोक तरी मोदी आणि त्यांच्या मुळे आलेल्या बदलाचे मनापासुन कौतुक करताना दिसतात. आणि मी जेवढ्या भागात फिरले (अहमदाबाद, गांधीनगर, मोढेरा, अडालज..) तो तरी भाग उत्तम वाटला (रस्ते आणि इतर सोयींबाबत..). जी जी ठिकाणे पाहिली ती फारच उत्तम स्थिती मध्ये होती. गैरसोय अशी कुठेच झाली नाही हे खरं..