मुद्राराक्षस या नाटकात मदनोत्सव उल्लेख आहे. वसंत ऋतूत सुंदर स्त्रिया [सर्व स्त्रिया स्वत:ला सुंदरच समजतात] आपल्या प्रेमी वर आम्र मंजरी फेकायच्या). कादंबरी या उपन्यास मध्ये कामदेवाच्या मंदिराचा उल्लेख आहे आणि पूजा करण्याचे वर्णन ही आहे.
१३व्या शतकातल्या होळीचे [दिल्ली सल्तनत] अमीर खुसरोने सुन्दर वर्णन केले आहे.
आज रंग है
ऐ माँ रंग है,
मोरे महबूब के घर रंग है।
दैया री मोहे भिजोया री
शाह निजाम के रंग में
कपडे रंगने से कुछ ना होत है
या रंग में मने तन को डुबाया री
दैया री मोहे भिजोया री
शाह निजाम के रंग में।
...
‘कपड्यांवर रंग टाकल्या ने काही होत नाही. मी तर शाह निजामच्या प्रेमाच्या रंगात भिजलो आहे.’
हिंदू असो व मुसलमान, तुर्क असो वा अरब इथे सर्व वसंत ऋतूत होळीच्या मस्तीत गुलाल उधळत आहे:
हजरत ख्वाजा संग खेलिए धमाल,
बाइस ख्वाजा मिल बन बन आयो
तामें हजरत रसूल साहब जमाल।
हजरत...
अरब यार तेरो बसंत मनायो,
सदा रखिए लाल गुलाल।
हजरत ख्वाजा संग खेलिए धमाल।
होळी सर्व भेदभाव विसरून आनंदाने रंग उधळण्याचा पर्व आहे. त्या काळात हिंदू- मुस्लीम भेदभाव विसरून लोक होळी खेळत होते. या सणाला धर्माचे बंधन नव्हते. आज ही आपण सर्वप्रकारचे भेद विसरून प्रेमाने व आनंदाने रंग उधळीत होळी खेळू.
सर्वाना होळीच्या शुभेच्छा.
प्रतिक्रिया
16 Mar 2014 - 10:54 pm | आयुर्हित
आज ही आपण सर्वप्रकारचे भेद विसरून प्रेमाने व आनंदाने रंग उधळीत होळी खेळू.
सर्वाना होळीच्या शुभेच्छा.
या निमित्ताने रंग बरसे, भिगे चुनर वाली रंग बरसे!
17 Mar 2014 - 8:59 am | राही
हे एक सूफी धारा व्यक्त करणारे गीत आहे. खुश्रो हा त्याच्या लिखाणातल्या संस्कृतिसंगमाविषयी प्रसिद्ध आहे. त्याचे गुरु म्हणजे सुप्रसिद्ध हजरत निजामुद्दीन चिश्ती अवलिया. हे अरब वंशाचे होते. हे संपूर्ण गीतच हजरतसाहेबांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची भावना व्यक्त करते. आपल्याकडे 'गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले, रामरंगी रंगले मन, कृष्णरंगी रंगले' हा अभंगही हाच भाव दर्शवतो. दिल्लीमध्ये त्या काळी होळीमध्ये रंग खेळले जातच होते पण या कवनातून हिंदू-मुस्लिम सगळेच होळी खेळत आहेत असा अर्थ निघत नाही. अरब यार हे संबोधन निजामुद्दीन साहेबांसाठी आहे. अर्थात स्वतः आमीर खुश्रो हा एक उच्च कोटीचा संत होता आणि धर्मभेदापलीकडे होता पण त्या काळातले दिल्लीतले सर्वच मुस्लिम तसे होते आणि होळी खेळत होते असे या कवितेतून ध्वनित होत नाही.
अवांतर : फाग किंवा बसंत साजरा करण्याची प्रथा पाकिस्तानी पंजाबमध्ये अजूनही टिकून आहे हे खरे पण तो उत्सव पतंग उडवण्याचा उत्सव म्हणून साजरा होतो. रंग फारसे खेळले जात नाहीत असे वाचल्याचे आठवते. आणि सनातनी लोक त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत असतात हेही वाचले आहे.
17 Mar 2014 - 9:36 am | विवेकपटाईत
कट्टर पंथी नेहमीच असतात. पण माझे बालपण जुन्या दिल्लीत गेले आहे वयाच्या विसी पर्यंत तिथे राहिलो आहे. अधिकांश मुस्लीम मुले आमच्या बरोबर होळी खेळायचे. बाकी पराजित लोकांचे धार्मिक श्रद्धास्थाने नष्ट करणे आणि त्यांना आपल्या धर्मात आणणे हे त्या काळातले सत्य होते. त्याला नाकारता येत नाही. पण सामान्य माणूस असा नसतो. अमीर खुसरोनी सामान्य जनतेच्या भाषेत सामान्य जानेसाठी आपले बहुतांश काव्य लिहिले आहे.
18 Mar 2014 - 11:47 pm | लॉरी टांगटूंगकर
अमीर खुसरोबद्दल अन् त्याच्या काव्यांबद्दल अजून लिहिल्यास वाचायला आवडेल. शुजात हुसेन साहेबांच्या आवाजात त्यांच्या काही रचना ऐकल्या आहेत, निव्वळ अप्रतिम असतात. इकडून तिकडून त्याच्याबद्दल थोडंफार वाचलंय.
जमवा बैठक अन् नक्की लिहा.
17 Mar 2014 - 9:26 am | जयंत कुलकर्णी
श्री. पगडींनी या सुफी मंडळींच्या कारवायांवर चांगला प्रकाश टाकला आहे. त्यांनी किती मंदीरे पाडून तेथे मशिदी बांधण्यास कसा हातभार लावला हे ही त्यांनी लिहिले आहे. त्यांचे तत्वज्ञान एक असे व वागणे एक असे. वागणे अर्थात धर्मांतर करण्यास (जनतेचे) अनुकुल असे. भागवत धर्म आणि त्यांच्या तत्वज्ञानात देवाणघेवाण झाली आही ही एक थाप आहे......
19 Mar 2014 - 3:40 pm | बॅटमॅन
जीवनसेतू नामक त्यांच्या सदाबहार आत्मचरित्रात याची उदा. आलेली आहेत. अलीकडे त्यांच्या कार्याची व्हावी तितकी चर्चा होत नाही हा केवळ दैवदुर्विलास.
28 Mar 2014 - 5:19 pm | पैसा
हे पद ऐकलं आहे. चांगलं लिहिलंय, आता संदर्भ बदलले असले तरी पण इतिहास आहे तो काही बदलता येणार नाही.