पहिल्या-वहिल्या रिसर्चचा अनुभव

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in जनातलं, मनातलं
16 Mar 2014 - 9:27 am

ARM…(advanced research methods)…MPH(Masters in public health) studentsच्या आयुष्यातली एक महत्वपूर्ण पायरी...आरोग्यप्राप्ती साठी अनेकविध पद्धती चा वापर हा विषय घेऊन मार्गक्रमणा सुरु झाली...भरपूर डोकेफोड करून आम्ही data collection साठी सज्ज झालो...ward no.22(ताडीवाला रोड,लुम्बिनीनगर) आणि ward no.54(वडगाव धायरी) यांची जबाबदारी येऊन पडली....इतकी नाना प्रकारची माणसं भेटली की सगळे किस्से सांगत बसलो तर स्वतंत्र कार्यक्रम करावा लागेल...पण काही गोष्टी मात्र खरच मनावर कोरल्या गेल्या...लुम्बिनीनगर मध्ये ४ दिवस जात होतो वरील कामासाठी...तिथे रोज एका जागी बसून जेवण करायचो....एका दिवशी तिथे पाणीच नव्हतं त्या भागात...म्हटलं पाहू काय करायचं ते..आधी डबा खावा...मी तिथे जाईपर्यंत त्या अशिक्षित (अथवा कमी शिकलेले म्हणू आपण हवं तर) माणसांनी; कोणतरी पोरगा आहे...survey करतोय असं म्हणत माझ्यासाठी खुर्ची पाठवली...२ मिनिटं होत नाहीत तर तोवर एक मुलगा पाण्याचा जग घेऊन आला...म्हणे “पप्पांनी द्यायला सांगितलंय”....
कसं विसरू मी हे??? मी जेव्हा स्वत:ला प्रश्न विचारला तेव्हा लक्षात आलं मी असा नसतो वागलो...माझ्या घरातून तो surveyवाला गेला, संपला मुद्दा...खूप लाज वाटली स्वत:ची...माणुसकी...हरवलीय ना?? कमी तरी नक्की झालीय...
तिथलाच अजून एक अनुभव.... “खान”आडनाव असलेल्या मुलाचा interview घेत होतो.. “धर्म कोणता?” असा प्रश्न विचारणा अनिवार्य होता म्हणून विचारला...तो हसायला लागला...म्हणे असं का विचारताय?... मी जे कारण होत ते सांगितलं...
तो: असं होय? मग लिहा मुसलमान...इथे कधी धर्म आठवायची वेळच येत नाही... आम्ही सगळे एकत्रच राहतो ना,मी चर्च मध्ये पण जातो..येशू बाप्पाची प्रार्थना पण येते आणि गणेशोत्सव तर आमचा आवडता सण.
Speechless,नि:शब्द केलं त्याने मला..काही दंगली आठवल्या,पण मी तो विषय सोयीस्कर रित्या सोडून दिला...माणसांना भांडायला वेळ नाहीये...भांडण लावून दिली जातात...

वडगाव धायरीत तर नवीन किस्सा...एका घरात गेलो तर “मी माहिती सांगू शकत नाही कारण मला वेळ नाही असं उत्तर मिळालं”,मी म्हटलं काकू प्लीज पंधरा मिनिटं द्या ना, तर आपल्या बंगल्याचं धाडकन लावून घेत; दारावरच welcomeचं तोरण हलवत त्या म्हणाल्या “अहो कळत नाही का?...काल संध्याकाळी माझा ‘होणार सून मी त्या घरची बुडलय,आता repeat telecast पाहतेय...आता वेळ नाही मला’...ते हलणारं तोरण पहात बसलो...चंद्रशेखर गोखलें यांची एक कविता आठवली...

“गच्च लावून घेतलेली दारं
आणि त्यावर welcomeचं तोरण,
हे कसलं दार बंद ठेवून
स्वागत करायचं धोरण?”
non-response च्या यादीत एक ने वाढ केली, अन मी चालू पडलो...
त्यानंतर एके ठिकाणी तर एक आजोबा-आजी २ तास गप्पा मारत बसले...अनेक विषयांवर...२ चहा झाले...२ दा कोचातून उठ्लेला खाली बसलो...संतप्त मैत्रिणींचे(माझ्या सोबत survey करत होत्या हं) आलेले फोन पाहिल्यावर पण ते म्हणे मग बोलाव कि त्यांना पण इथे..आता काय म्हणावं??

असो!! अशा अनेक अनुभवांनी मला समृद्ध केलं..माणसं जवळून कळली...नाटकात उतरवायला नवीन characters मिळाली ... जुनेच colleagues नव्याने कळले...आणि मग एक विचारचक्र सुरु झालं...

हा फक्त research नव्हता,संशोधनापर्यंत सारं मर्यादित नव्हतं, life enriching अनुभव म्हटला पाहिजे.नवीन माणसं,नवीन politics,नवीन colleagues ,नवे रुसवे फुगवे.... सारंच कसं स्तिमित करणारं...
तोंडावर दारं बंद करणाऱ्या लोकांपासून,दुपारचं जेवण खाऊ घालणाऱ्यांपर्यंत...विविध माणसं,एकाच घरातील नाना प्रकृती...क्वचित प्रसंगी विकृती देखील.
तिथे कुणाचा धर्म नव्हता,कुठली जात नव्हती...येशू जितका ह्याचा तितकाच त्याचा...गणेशोत्सव समीरचा तितकाच सलीमचा..
गरजा कमी असणं हि काळाची खरी गरज असल्याची जाणीव...flat,बंगल्यांच्या बंद दारांमागे मनाची कवाडं,बुद्धीची भरारी,भावभावना सगळंच कसं कोंडलेलं...
साधी कडी नसलेल्या ८x८ च्या खोक्यात मात्र प्रत्येक भावना अस्सल..कुठला मुलामा नसलेली..वृत्ती मात्र मेंढरासारखी..कळपात राहण्याची...दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याची...
अर्थात प्रत्येक वाक्याला अपवाद सापडतीलच पण ते सुद्धा अपवादाचं अस्तित्व सिद्ध करण्यापुरते..
वाढत्या सरस्वतीमागे/लक्ष्मीमागे वाढत जाणारा अहंकार...संस्कार शिकवण्यात अग्रणी असणारे जेव्हा अपमानस्पद वागतात,तेव्हा “लोका संगे ब्रह्मज्ञान”या उक्तीची कल्पना येते...
एक अस्वस्थ करणारा प्रश्न,सुवर्णमध्य हा फक्त अपवादालाच?...मासिक उत्पन्न ३२,०००₹ सांगताना ४ वेळा विचार करणारे...अन ३०,०००₹ सांगताना बिनधास्त लिहा सांगणारे...लपवण्याची क्रिया त्यांना जमली नाही..सहज मनात येऊन गेलं..इतकं उघडपणे सगळं मांडाल तर income tax वाले कशाला धाड घालतील???....“झाकलेलं उघडून पाहण्याचा मोह होतो...”
एका क्षणी वाटू लागलं की उच्चभ्रू म्हणवून घेत आपण एक कोष विणलाय स्वत:भोवती,,,त्या कोषात गुरफटून गेलोय....इतके की तो कोष; हेच जग वाटू लागलंय....दारावर आलेल्या माणसाला हाकलून मी माझी privacy कशी जपली,हे मित्रांना सांगणं तुम्हाला जास्त precious वाटतं...पण मी एखाद्याला मदत केली...चांगलं काम केलं,हे सांगणं जीवावर येतं...
या दोन्ही कोषात डोकावण्याचा मोह अनावर झाला...वलयांकित अन वास्तवदर्शी असाही त्यात एक फरक आहे...इतर अनेक गोष्टींचा अभाव असताना मात्र माणुसकीचा गंध दुसऱ्या कोषात अधिक आहे.जगात चांगली माणसं आहेत यावर विश्वास आहे...
शिक्षणाने काही गोष्टी येतात...पण जगण्यासाठी लागणाऱ्या degrees मात्र वरून आणायच्या असतात.
तिथे आपली डिग्री फक्त घराबाहेरच्या नावाखालच्या छोट्या जागेत लिहिण्यासाठी(व.पु.काळे) .

मनाशी अनेक गोष्टी ठरवत,जगण्यासाठी मार्गदर्शन करत हा ARM प्रकार पुढच्या पायरीवर जाऊन पडला...data analysis…तिथले अनुभव असंच पुन्हा केव्हातरी....
रजा घेतो.....

मांडणीविचार

प्रतिक्रिया

इथे कधी धर्म आठवायची वेळच येत नाही... आम्ही सगळे एकत्रच राहतो ना,मी चर्च मध्ये पण जातो..येशू बाप्पाची प्रार्थना पण येते आणि गणेशोत्सव तर आमचा आवडता सण.
Speechless,नि:शब्द केलं त्याने मला..काही दंगली आठवल्या,पण मी तो विषय सोयीस्कर रित्या सोडून दिला...माणसांना भांडायला वेळ नाहीये...भांडण लावून दिली जातात...

१०१% सहमत
खूप छान अनुभव लिहिलेत.

मृगजळाचे बांधकाम's picture

16 Mar 2014 - 10:44 am | मृगजळाचे बांधकाम

कोंबडी कमी आणि मसाला जास्त झालाय.बाकी ठीक आहे.अनुभव वाचायला आवडतील.वाट बघतोय

आदूबाळ's picture

16 Mar 2014 - 11:18 am | आदूबाळ

+१

टिंबंही जरा जास्तच पडली आहेत.

जॅक डनियल्स's picture

18 Mar 2014 - 7:10 am | जॅक डनियल्स

+१

आत्मशून्य's picture

16 Mar 2014 - 2:47 pm | आत्मशून्य

flat,बंगल्यांच्या बंद दारांमागे मनाची कवाडं,बुद्धीची भरारी,भावभावना सगळंच कसं कोंडलेलं...साधी कडी नसलेल्या ८x८ च्या खोक्यात मात्र प्रत्येक भावना अस्सल..कुठला मुलामा नसलेली..वृत्ती मात्र मेंढरासारखी..कळपात राहण्याची...दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याची...

काय बोलु...? तुमच्यासारखे लोक आहेत म्हणूनच मिपा खरोखर आवडते, अगदी पुन्हा पुन्हा. अन्यथा मेंढरांच्या वृत्तीची कमतरता नाहीच कुठे.

संस्कार शिकवण्यात अग्रणी असणारे जेव्हा अपमानस्पद वागतात,तेव्हा “लोका संगे ब्रह्मज्ञान”या उक्तीची कल्पना येते..

सांष्टांग दंडवत. नेमके हेच कारण आहे की मला लोका सांगे ब्रह्मज्ञान वाल्यांना खोडायला आवडते, पण सांगायला मात्र विषेश नाही.

वाक्य अन वाक्य बिनतोड आहे. माझा रविवार सत्कारणी लागला हा लेख वाचुन.

सस्नेह's picture

16 Mar 2014 - 3:41 pm | सस्नेह

अन विचारमंथन सही उतरले आहे. या वृत्ती तर सहज पहायला मिळतात.
...लोकांमधे मिसळाल तसे आणखी अनुभव येतील...

मीता's picture

17 Mar 2014 - 12:43 pm | मीता

खुप छान !!!

मुक्त विहारि's picture

17 Mar 2014 - 2:04 pm | मुक्त विहारि

आवडला...

अजून काही अनुभव असतील तर, जरूर लिहा....

राहवलं नाही म्हणून लिहितोय. माझ्या मते इथे नाण्याची अजून एक बाजू आहे. हे मध्यम वर्गीय जे असतात (मी included) ते यासाठीहि response देत नाही कारण त्यांना चोरी, फसवणूक याची भीती असते. मी जास्त जग पाहिलं नाही आहे पण at least वार्ड ४५ आणि २२ मधल्या रहिवाश्यांना याची थोडी कमी भीती असावी असं वाटते. दुसरं म्हणजे काही प्रसंग उद्भवला तर flat मध्ये कोणी मदत करायला येणार नाही पण तिथे तसे नसावे. जवळ जवळ राहिल्यामुळे असावे किंवा घरात काहीच लपवण्यासारखं (किमती) सामान नसल्यामुळे म्हणा तिथे दारं आणि मन मोकळे असतील. म्हणून हा राहणीतला विरोधाभास असू शकतो.

तुमचा अभिषेक's picture

17 Mar 2014 - 2:48 pm | तुमचा अभिषेक

सहमत आहे.
स्वता चाळ संस्कृती ते फ्लॅटसंस्कृती असा प्रवास नुकताच पार पाडल्याने स्वताच्या वागण्यातील बदलही अनुभवतोय थोडेफार. वागणे नाईलाजाने बदलावे लागते, विचार बदलू नयेत याचा प्रामाणिक प्रयत्न राहतो.

अर्थात लेखातल्या भावनाही पटल्या, प्रामाणिक उतरल्यात हे महत्वाचे.

विटेकर's picture

17 Mar 2014 - 2:53 pm | विटेकर

आवडले लेखन !
पण खरं सांगू का ? माणसासरखे बघण्यासारखा आणि संशोधन करण्यासारखा दुसरा विषय जगात नाही !
पु ले शु

प्यारे१'s picture

17 Mar 2014 - 3:04 pm | प्यारे१

बरं. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Mar 2014 - 6:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

flat,बंगल्यांच्या बंद दारांमागे मनाची कवाडं,बुद्धीची भरारी,भावभावना सगळंच कसं कोंडलेलं...साधी कडी नसलेल्या ८x८ च्या खोक्यात मात्र प्रत्येक भावना अस्सल..कुठला मुलामा नसलेली..वृत्ती मात्र मेंढरासारखी..कळपात राहण्याची...दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याची...

जबरदस्त आवडलं.

आतिवास's picture

18 Mar 2014 - 7:19 am | आतिवास

आपलं जग सोडून दुसरं जग पाहायला मिळणं - ही खूप काही शिकवणारी संधी असते; हे तुमचा लेख वाचून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. इतरही अनुभव जरुर लिहा ही विनंती.

प्रसाद१९७१'s picture

18 Mar 2014 - 12:25 pm | प्रसाद१९७१

म्हादेश्वर - तुम्ही कधी जात आहात लुंबिनी नगर मधे कायमचे रहायला?

flat,बंगल्यांच्या बंद दारांमागे मनाची कवाडं,बुद्धीची भरारी,भावभावना सगळंच कसं कोंडलेलं...

हे तुम्हाला कोणी सांगीतले? ह्याचा पण सर्वे करा आधी मग लिहा.

वडगाव धायरीत तर नवीन किस्सा...एका घरात गेलो तर “मी माहिती सांगू शकत नाही कारण मला वेळ नाही असं उत्तर मिळालं”,मी म्हटलं काकू प्लीज पंधरा मिनिटं द्या ना, तर आपल्या बंगल्याचं धाडकन लावून घेत;

तुमच्या फाल्तू सर्वे साठी इतरांनी १५ मिनिटे का वाया घालवावित? त्यापेक्षा झोप काढ्णे किंवा टीव्ही बघणे जास्त चांगले नाही का?
वर तुम्ही त्यांच्या बंगल्यात घुसुन चोरी केलीत तर काय भरवसा.

तुम्ही कायमचे झोपडपट्टीत रहायला जा, मग एक वर्षानी बोला

आगौ म्हाद्या रिसर्च करणार | त्याचा वृत्तांत लिहिणार |
प्रसाद जेव्हा उचकवणार | मज्जा येणार निश्चित ||

आगाऊ म्हादया......'s picture

21 Mar 2014 - 8:04 am | आगाऊ म्हादया......

प्रसाद भाऊ,अनुभव घेतलाय म्हणून लिहिलंय...मी हि अप्पर इंदिरा नगर मधेच राहायचो...पण जागा बदलली तशी वृत्ती exponentially नाही बदलली...
बाकी हे बरोबरे...जातो तिकडेच...असाही चेहऱ्यावरचा साळसूदपणा उपयोगी नाहीच आला..खी खी खी...
तुम्ही लिहित रहा...मला टक्के-टोणपे मारत रहा....हे सुद्धा आवडेल मला...कदाचित पुढचा लेख असाच online हितचिंतकांवर लिहिता येईल...

आगाऊ म्हादया......'s picture

21 Mar 2014 - 8:26 am | आगाऊ म्हादया......

मला लेखनाला प्रवृत्त करणाऱ्या सार्यांचे खूप आभार...नवीन नवीन अनुभव लिहित राहीन...तुम्हाला जो मसाला वाटला तीच माझी कोंबडी असू शकते....:-D

आपला आगाऊ म्हाद्या.

अमोल मेंढे's picture

21 Mar 2014 - 4:06 pm | अमोल मेंढे

म्हाद्या भौ तुम लिवते रहो...
हम वाचते रहेंगे...