कॅलिडोस्कोप २

kurlekaar's picture
kurlekaar in जनातलं, मनातलं
14 Mar 2014 - 11:46 am

रसिकता
बेगम अख्तर समोर बसून आळवत्येय.
मला आठवतंय ते हिंदी चित्रपटांतलं मैफलीचं दृश्य –एक दोन श्रोते मनगटावरच्या गजरयाचा आस्वाद घेत उगाचंच माना डोलावताहेत, शेजारी किंवा हातांत ‘एकच प्याला.’ रसिकतेचा इतका कुरूप चेहरा इतर कुठं बघायला मिळत नाहीं.
पण या बरोबर मला आठवतोय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ मधला अमजदखान देखिल.‘शोले’तल्या या मोकाट सुटलेल्या गब्बरसिंगला रेंच्या या चित्रपटांत एका मवाळ, काव्य-संगीत-प्रिय नवाबाच्या रुपात बघायला प्रथम थोडं कठीण जातं. नंतर मात्र संगीताच्या पूर्ण आहारी गेलेला हा नवाब उमजायला लागतो. ही सुद्धा एक रसिकता, तीही टोकाची. तरी पण खरी वाटणारी—पटणारी.
.
Words and Pictures
Pictures are far superior to words while communicating about the visible world.. but on the other hand, only the words alone can be used for describing / expressing anything invisible and abstract like thoughts and ideas. And this world of thoughts and ideas goes larger and deeper as we go along.

सुचित्रा सेन
मालसं सौंदर्याचं लक्षण का म्हणतात ते सुचित्रा सेनचा चेहरा डोळ्यासमोर आणला की पूर्णपणे समजून येतं. कांही सुंदर चेहरे फार वेळ पाहवत नाहीत –जास्त पाहत राह्यलो तर स्वतःला हरवून बसू –असं कांहीतरी. पण या चेहऱ्यात एक अनाकलनिय कारुण्य दडलेलं मला जाणवायचं. हे देखिल एक कारण असू शकेल.
सुचित्रा सेन कडे फक्त सौंदर्य नव्हतं, त्याला सक्षम अभिनयाची देखिल जोड होती. मी दोन्ही ‘देवदास’ पहिल्येत. जुना देवदास पाहिल्यानंतर नवा देवदास पचवणं जड गेलं. पारो म्हणजे फक्त सुचित्रा सेन, बाकी कुणी नको—कुणीही.

पूर्णांक व अपूर्णांक
वीणा वर्ल्ड व म न से यांत बरंच साम्य आहे. वीणा वर्ल्ड केसरी मधून बाहेर पडलं तर म न से शिवसेनेतून. पण वीणा पाटील व राज ठाकरे या दोघांना आपापल्या क्षेत्रात स्वतःचं असं स्थान होतं नाहींतर त्या दोघांना असं स्वतंत्र होणं शक्य नव्हतं. येणारी दोन तीन आंतराष्ट्रीय प्रवास-वर्षे व निवडणुका ठरवतील की वीणा वर्ल्ड / केसरी व म न से / शिवसेना हा एक अपूर्णांक आहे का पूर्णांक.

भटक्या आणि ब्रिटीश नंदी
माझ्या लहानपणी ‘भटक्या’ या टोपणनावाने ‘नवशक्ती’त लिहिणारया स्तंभलेखकाचे लिखाण मला आवडायचं. हा माणूस नंतर शिवसेनेचा आमदार वगैरे झाला व कांही काळानंतर त्याने त्याचं लिखाण थांबविले. ‘भटक्या’ फक्त मुंबईवर लिहायचा. या महानगरांत त्याच्या दृष्टीने जे कांही वावगं दिसेल तिथं तो अचूक पोहोचायचा व त्यावर भरभरून व निर्भिडपणे लिहायचा.
अलीकडे ‘सकाळ’ मध्ये ‘ब्रिटीश नंदी’ या टोपणनावाने लिहिणारा स्तंभलेखक देखिल मला आवडायला लागलाय. एकतर विनोदाची झालर असलेलं इतकं सहजसुंदर ‘राजकीय उपहासात्मक’ लिखाण माझ्या नजरेत आत्तापर्यंत आलेलं नाही. ‘ब्रिटीश नंदी’ चं अजून एक वैशिष्टय म्हणजे तो प्रादेशिक उपभाषेचा बेमालूम वापर करतो; मग ती मालवणी असुदेत की वऱ्हाडी किंवा ‘पश्चिम महाराष्ट्रीय’. गेल्या महिन्यात त्याचा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री या दोघांतील मालवणी व कोंकणीतील संवाद तर खूप सुंदर होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा त्याचा अलीकडचा प्रत्येक स्तंभ वाचनीय.असतो. .

राजकारणचित्रपट

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

14 Mar 2014 - 1:26 pm | स्पंदना

पहिले तिन आवडले. म्हणजे मला झेपणारे आहेत म्हणा.
नंतरचे दोन्ही कळताहेत पण त्यावर टिकाटिप्पणी करावीशी नाही वाटत.

रसिकता.....अंधेरीचा इस्ट साईडचा बाहेर पडायचा रस्ता. खाचखळगे, त्यात भर म्हणुन वरुन पडणारा पाऊस. बाजुची सीडीची दुकाने किंवा टपर्‍या. खड्डे चुकवत सलवार वर धरुन चालणारी मी. रात्र. अन त्यातल्या एका दुकानातुन "ए अजनबी तू भी कभी आवाज दे कहीसे..." अगदी पहिल्यांदा कानावर पडलेलं गाणं.त्यात मागे वाजणारे ते डफ किंवा हलगीसारख चर्मवाद्य!! दिल गार्डन गार्डन...मी तेथेच जरा कडेला सरकून उभी. नवरा त्याच्या चालीने पुढे गेलेला,मग मागे वळुन माझा चेहरा पाहून तसाच येउन बाजुला भिजत उभा....नक्की कोण रसिक? तेथेच थबकणारी मी? की माझा हरवलेला चेहरा पाहून सगळ विसरुन मला वेळ देणारा तो?

रसिक तुम्हीच. तुमचा नवरा एक खूप चांगला नवरा.

ही छोटीशी भेट -
.
घरच्या घरी सरावासाठी.

आत्मशून्य's picture

15 Mar 2014 - 5:25 am | आत्मशून्य

ते जे जगतात तेच लिहित असावेत त्यामुळे डायरी तर हवीच हे आपणास प्रथम सुचले हां योगायोग नक्कीच नाही .

पक्या's picture

15 Mar 2014 - 1:55 am | पक्या

छान लिहिलयं. आवडलं

सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.