खूप प्रकाश आहे … अनेक दिवे झगमगत आहेत …. अशातच एखादी दीपमाळ लक्ष वेधून घेते
कारण नसत …. पण काहीतरी सुंदर वाटतं … एखादी सामायोसुचीत हालचाल … कुठलातरी रंग … जेंव्हा सगळंच चवदार वाटायला लागतं तेंव्हा एकच पदार्थ असा असतो कि जो आवडून जातो
बेगम अख्तरी बाई अशाच …
मी त्यांना प्रत्यक्ष बघितलाय किंवा ऐकलंय असं घडणच शक्य नाही … माझं तेवढं नशिबही बलवत्तर नाही …
पण
जगजीत सिंग , गुलाम अली साहेब , मेहेंदी हसन खान साहेब या अनेक लोकांच्या प्रकाशमालेतुन हा दिवा चटकन खुलून येतो ….
काही गोष्टींची करणे सांगायची नसतात तर प्रत्यक्ष अनुभव घ्यावा ।
उंच टोकावरून ढकल्यावर पायाला दोरी बांधलेली असूनही जो मरणाचा अनुभव मिळतो तो वर्णनातीत …
हाही अनुभव असाच ….
प्रतिक्रिया
9 Mar 2014 - 7:12 am | नगरीनिरंजन
सामायोसुचीत म्हणजे काय?