सिडनीस्थित मिपाकर आहेत का कुणी?

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
4 Mar 2014 - 1:29 pm

समस्त मिपाजनांना नानबाचा नमस्कार.

शिक्षण आणि नोकरीनिमित्त मुंबई, इंदौर, पुणे असा प्रवास झाल्यानंतर नव्या संधीच्या शोधात गेल्या आठवड्यात सिडनी शहरी येऊन टेकलो. परदेशाचं अप्रूप, नव्याची नवलाई, स्वच्छता आणि टापटिपीचं कौतुक अशा टिपीकल विचारसरणीत सुरूवातीचे काही दिवस गेल्यानंतर आता हळूहळू रोजच्या वाटेवर रूळतोय.

पण अभ्यास आणि कॉलेजनंतर गप्पाटप्पा मारण्यासाठी, सुट्ट्यांच्या दिवशी भेटीगाठी करण्यासाठी कोणी आपलं मिळालं तर त्याचा शोध घेतोय. आहे का कोणी मिपाकर सिडनीत? माझ्या माहितीत सध्या सिडनीत अंदाजे १.५ लाख मराठीजन वास्तव्याला आहेत. त्यांपैकी कोणी मिपाकर असल्यास मला संपर्क करा. किंवा इतर मिपाकरांना काही माहिती असल्यास त्यांनीही ती दिल्यास आनंदच होईल.

नानबा.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

4 Mar 2014 - 2:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

माझ्या माहितीप्रमाणे अपर्णातै आहेत कि सिडनीत... चेकवा...

माझ्या माहितीप्रमाणे अपर्णातै आहेत कि सिडनीत... चेकवा...

मिक, अभ्यास वाढवा... अपर्णातै मेलबर्नात आहेत, सिडनीत नोहे...

आत्मशून्य's picture

4 Mar 2014 - 2:22 pm | आत्मशून्य

माझ्या माहितीत सध्या सिडनीत अंदाजे १.५ लाख मराठीजन वास्तव्याला आहेत

त्यांनाही मिपाकर बनवा. :)

मीनाक्षी होती म्हणे, आताचं स्टेटस माहिती नाही.

मारकुटे's picture

4 Mar 2014 - 2:29 pm | मारकुटे

मागच्याच महिन्यात मी सिडनीहून सिंगापुर अन मागच्या आठवड्यात सिंगापूरहून शांघाय आलो बघा...
मलाही गप्पा मारायला कुणी नव्हते... इंग्रजी बोलणारे मित्र मिळवले... त्यांच्या चकचकीत पणाचे बुरखे फाडले.. जै हो... आत सध्या चीनी भरभराटीतील फुटक्या बादल्या शोधत आहे...

नाना आणि त्याच्या बाता. =))
अनिवाश्यांबद्दल असलेली पोटदुखी काही सरत नाही. गेटवेलसून. ;)

नानबा हे तुम्हास उद्देशुन नाही हो. :D

प्रमोद देर्देकर's picture

4 Mar 2014 - 3:14 pm | प्रमोद देर्देकर

आँ प्रथमा तुझा मुंबई, इंदौर, पुणे असा प्रवास कधी झाला. आत्ता तर तु डोंबिवलीत होतास. इकडे मु.वि. बघ कट्ट्यावर कट्टे करत्यात.

शिवाय नाव बदलुन का बरे परदेशागमन करतोयंस. दया तु कुछ तो ग ड ब ड हौइ.

मुक्त विहारि's picture

4 Mar 2014 - 3:44 pm | मुक्त विहारि

चिंता करू नका....

नानबा असली मिपाकर आणि डोंबिवलीकर असल्याने, योग्य त्या वेळी तिकडे पण कट्टा होणार आहेच.

थोडा धीर धरा....

आम्हा डोंबिवलीकरांना कट्टी करून रुसण्यापेक्षा, कट्टे करत आनंद साजरा करण्यातच जास्त मज्जा वाटते.

बादवे, अद्याप आपण एका पण कट्ट्याला आला नाहीत.

कवितानागेश's picture

4 Mar 2014 - 3:19 pm | कवितानागेश

तुला मिपाला अ‍ॅक्सेस आहे ना व्यवस्थित? मग झालं की काम!! :P

प्रमोद देर्देकर's picture

4 Mar 2014 - 4:06 pm | प्रमोद देर्देकर

झालं गैरसमजाचा जन्म झाला. अहो मु.वि. साहेब मी त्यांना कट्ट्याला न येणं रुसण्या / फुगणं असे काहीच चिडवायचे नव्हते हो. मी त्याची टेर खेचत होतो. शेवटचे वाक्य बघा ना शिवाजी साटमचे C.I.D. च्या धर्तीवर बोललेलं. कारण त्याने नुकताच मी मि.पा वर आय डी बदलल्ला होता ना म्हणुन बोललो.
शिवाय तो मधंतरी मि.पा. वर दिसत नव्हता.
तुम्हाला राग आला असल्यास क्षमस्व. प्रथमा तुला पण क्षमस्व रे.

प्रथमा तुला पण क्षमस्व रे.

बास काय??

मुक्त विहारि's picture

4 Mar 2014 - 4:36 pm | मुक्त विहारि

क्षमा कसली मागता?

तो वैचारीक विरोध होता.

तुम्ही त्याला वैयक्तिक घेवू नका.

आणि मध्यंतरी ते मिपावर न्हवते, कारण त्यांना ऑस्ट्रेलियात जायचे होते.त्यामुळे वेळ मिळत न्हवता.

बादवे,

नानबा ह्यांना मिपातर्फे योग्य त्या ठिकाणी सेंड ऑफ दिला आहे.

आम्हा चौघांचाच अचानक कट्टा (अर्ध्या तासाच्या पुर्वसुचनेमूळे, जास्त मिपाकरांना, बोलवता आले नाही.) आमच्या घरी छान पार पडला.

खायला काय होते, ते माहीत नाही.पण मस्त गप्पा झाल्या.

मी त्याची टेर खेचत होतो

छान...

प्रसाद१९७१'s picture

4 Mar 2014 - 4:12 pm | प्रसाद१९७१

दिड लाख मराठी माणसे कशी असतील सिडनी मधे? सिडनी ची लोकसंख्याच ४५ लाख आहे. त्यात दिड लाख मराठी कसे? मग काय सगळे भारतीय १० लाख आहेत का?

सिडनीला गेलाच आहात तर आता जिवाची सिडनी करुन या...!!!

१. स्ट्राथफिल्ड'ला साईबाबा मंदीर आहे तिथे दर गुरुवारी सायंकाळी ७.०० वा. आरती व भंडारा असतो. आरती मस्तपैकी मराठीतुन होते. मंदीरात बहुतेक ८०% लोक मराठी असतात. तिकडे काही ओळखी होतील का ते पहा.
२. नॉर्थ सिडनी'ला इस्कॉन टेंपल आहे तिथे पण एक चक्कर मारुन या.
३. मिन्टो'ला सगळ्याच देवी-देवतांचे एकत्र असे मंदीर आहे तिथे ११ दिवसांचा सार्वजनीक गणपती असतो ऑस्ट्रेलिया मराठी मंडळातर्फे. विसर्जनाचा सोहळा अगदी पाहण्यासारखा असतो. एकदम पुण्या-मंबई सारखा ढोल, ताशा, लेझिम पथक, इ. सकट.
४. डार्लिंग हार्बर'ला एक शनिवार सोडुन दुसर्‍या शनिवारी नयनरम्य अशी आतिशबाजी असते. तेथेच नॅशनल मेरीटाइम म्युजियम आहे बघण्यासारखे विनाप्रवेश फी.
५. जॉर्ज स्ट्रीट'वर कधी पण चक्कर मारली तर कंटाळा येत नाही. विकांताला तर धमाल असते. तिकडे '३ मंकीज' पब कम बार कम डिस्को आहे तो ट्राय करा.
६. कियामा ब्लो होल्स' ला जाउन निसर्गाची किमया अनुभवा.
७. नानटेंग चायनि़ज टेंपल.
८. ब्लु माऊट्न्स.
९. ........आठवत जाईन तसे अ‍ॅडवतो.

इरसाल's picture

5 Mar 2014 - 11:11 am | इरसाल

तेथेच नॅशनल मेरीटाइम म्युजियम आहे बघण्यासारखे विनाप्रवेश फी.

अजिबात जावु नका.

नानबा's picture

4 Mar 2014 - 5:38 pm | नानबा

जॉर्ज स्ट्रीट, पॅरामॅटाला माझी लेक्चर्स असतात, त्यामुळे तिकडे नेहमीच जाणं होईल. बाकी ठिकाणं एक एक करत बघेनच. माझ्या यादीत यॉर्क स्ट्रीट, मिल्सन स्वेअर, लुना पार्क, टारोंगा झू, रॉक आयलंड ही ठिकाणंसुद्धा आहेत.

अहो पण मिपाकरांचे काय? त्यांच्या माहितीसाठी धागा काढलाय हा..

यॉर्क स्ट्रीट, मिल्सन स्वेअर, लुना पार्क, टारोंगा झू, रॉक आयलंड

सिडनी ऑपेरा हाऊस पण यादीत जोडा.

बाकी मिपाकरांबद्दल काही माहीती नाही बुवा... मी तिकडे २०१०-२०११ ला होतो.

ओपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिज तर आहेतच...

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2014 - 7:21 pm | श्रीरंग_जोशी

नानबा - नव्या ठिकाणी स्थिरावत असल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा!!

तेथील स्थानिक मराठी मंडळाचे सदस्यत्व॑ अजुन घेतले की नाही.॑

http://www.marathi.org.au/marathi/ | https://www.facebook.com/MarathiMandalSydney

बादवे - १.५ लक्ष लाख मराठीजन हा आकडा अतिशयोक्ती वाटतोय.

प्रमोद देर्देकर's picture

5 Mar 2014 - 8:51 am | प्रमोद देर्देकर

खी क *lol*

लुना पार्क,

लुना वरुन आमचे सकाळ मुक्तपीठातले ज्यु. ब्रम्हे आठवले.