वाघ्या
नावातच कस दमदार व्यक्तिमत्व झळकत ना. अहो .....होताही तो तसाच दमदार, भरभक्कम , निधड्या छातीचा. तो दिसला की कोणाची बिशाद नव्हती त्याच्यासमोरुन चालण्याची. नावाप्रमाणेच अंगावर वघासारखे कातडे, झुबकेदार शेपुट, तिक्ष्ण नजर अन भुंकला तरी वाघाने डरकाळी फोडावी तसा आवाज. हो असाच होता आमचा इमानी कुत्रा 'वाघ्या'.
वाघ्या ची आमच्या घरात entry तशी मजेशीरच झाली. माझ्या बाबांना प्राण्याविष्ई खुप प्रेम, खास करुन कुत्रा अन मांजर अगदी उंदीर सुध्दा. (म्हणजे एकदा त्यांनी उंदरां साठी भजे पण आनलेत, हा भलेही ते पिंजर्यात यावे हा त्यांचा हेतु होता पण 'भजे'तेही उंदरा साठी). आणि माझी आई अगदी उलट तिला अजिबात घरात हे प्राणी आलेले आवडायचे नाहीत. माझे बाबा डॉक्टर आहेत. एकदा एक पेशंट घरी तब्येत दाखवायला आला. त्याच्या सोबत एक कुत्रा होता. असा मस्त कुत्रा पाहुन माझे बाबा खुश झाले त्यांनी त्याला जवळ घेतले, लाड केले, त्याला पोळी खाउ घातली (आई हे सगळ डोळे मोठे करुन बघत होती). तो पेशंट पण बघत राहीला करण वाघ्या सहसा कोणाला हात नव्हता लाउ देत पण बाबा जवळ सहज गेला. तपासुन झाल्यावर तो पेशंट निघुन गेला. दुसर्या दिवशी सकाळी बाबा जेव्हा फिरायला गेले तेव्हा त्यांना वटल की कोणीतरी अपल्या मागे येतय, बघतात तर काय तोच कुत्रा त्यांच्या मागे येत होता. बाबांनी त्या माणसाचा शोध घेतला पण तो कुठेच दिसला नाही. माझ्या बाबांना काय कराव ते सुचला नाही अन ते त्या कुत्र्याला हाकलु पण शकले नाही. त्यांच्या मागे तो आमच्या घरी आला. आईला न सांगता बाबांनी त्याला पोळी घातली. अन ती घेउन तो निघुनही गेला. बाबाना वाट्ला भुकेला होता म्हणुन आला असेल. रात्री बाबा जेवा क्लिनीक मधुन वापस आले तेव्हा तो पुन्हा बाबांच्या मागे आला, अन पोळी खाउन वापस गेला. ३-४ दिवस अस चालु होता. आईच्या हे लक्षात आल. रविवारचा दिवस होता बाबा घरीच होते . तेव्हा सकाळी तो कुत्रा बाबा सोबत आला खरा पण जायच नावच नाही. पोळी खाउन पण नाही. माझी आई तर काही बोललीच नाही. मग काय बाबानी मस्त त्याचे 'लाड 'केले, तो पण मान उंचावुन आरामात बसुन लाड करवुन घेत होता. प्रश्ण होता की त्याला म्हणायचे काय. त्याचा रुबाब अन अंगावरची वाघासारखी(तसाच रंग आणि तसेच काळे पट्टे)कातडी पाहुन आम्ही त्याला 'वाघ्या' नाव दिला आणि तो आमच्या घरात दाखल झाला.
वाघ्या आमच्या घरात दाखल झाला खरा पण त्याचा सामना माझ्या आईशी होता. तिने आम्हाला स्पष्ट् सांगीतल '' त्या कुत्र्याचे जे काही लाड करायचे ते अंगणात, घरात त्याला मी येउ देणार नाही''. आमचा नाईलाज होता. वाघ्या पण स्वाभीमानी माणसासारखा अंगणातच रहायचा. तिथेच झोपायचा, खायचा अन रात्र झाली की माहीत नाही कुठे गायब व्हायचा. त्याचा दिनक्रम मस्त सुरु होता. सकाळी बाबा सोबत फिरणे, आल्यावर 'शिळ्या पोळीचा' नाश्ता, दुपारी 'गरम' पोळी भाजी, मग झोप , संध्याकाळी खेळुन हुंदडुन आला की पुन्हा जेवण अन मग गायब. मलाही त्याचा हेवा वाटु लागला, अहो त्याला शाळा थोडीच करावी लागत होती. शेजार पाजारचेही विचारु लागले की कुत्रा कुठुन आणला म्हणुन. वाघ्या चा हा दिनक्रम तर चालायचाच शिवाय तो बाहेरुन जास्त घाण होउन आला की बाबा त्याची प्रेमाने ' आंघोळ्ही ' करुन द्ययचे.( लहान मुलांसारख मांडीवर घेउन टिळा वगैरे नाही लावायचे इतकच ). तो आनंद बाबांच्या चेहर्यावर साफ झळकायचा. अन उन्हात अशी मस्त अंघोळ आहाहा.............वाघ्या खुश. आई मात्रा अंगण घाण होतय म्हणुन ओरडायची. अन वाघ्या ''तुम्ही ओरडा हो कोण ऐकतय तुमच'' अशा थाटात अंग वाळ्वत बसायचा.
उन्हाळा संपुन पावसाळा सुरु झाला तसा वाघ्या ला प्रोब्लेम झाला. बाहेर तो भिजु लागला. त्याच daily routine बिघडल. कधी नाश्त्या ला तर कधी जेवणाला हुलकावणी अस सुरु झाला. बाबा आणि त्याचा timing जुळतच नव्हता आणि आई त्याला ''घास'' घालत नव्हती. वाघ्याही हार खाणार्यातला नव्हता. आतापर्यन्त वाघ्या ला आमचा बाहेरच फाटक उघडता नव्हत येत पन म्हण्तात ना '' पापी पेट कुछ भी करवाता है'' वाघ्या कडी लावलेला फाटक कसा उघडायचा ते शिकला. फाटकाला गोल कडी होती तेव्हा तो बरोबर त्यात एक पाय अडकवुन फाट्क उघडायचा अन ''दिमाखात'' घरात शिरायचा. पण पुढचा प्रसंग तो हाअताळु नव्हता शकत. त्याला घरात बघुन हाकलाय साठी माझी आई जोरात ओरडायची(अतिशयोक्ति नाही हो पण १-२ वेळा शेजारचे पण धावुन आले), की तो पळुन जायचा. ४-५ वेळा झाल अस पण नंतर वाघ्या या प्रकाराला used to झाला. तो माझ्या आईला न जुमानता सरळ माडीवर जायचा आणि पाउस नाही लागणार अशा ठिकाणी बसुन रहायक्चा, की बाबा अल्यावरच खाली यायचा. आईची चिडचिड व्हायची. कारण तिच्या ''सवळ्यात'' याचा व्यत्यय यायचा ना. तर बाबांनी तिला समजावला की अग तो असला की मांजरी कमी होतील. अन मुख्या म्हण्जे फेरीवाले वगैरे चा त्रास पण कमी होइल. आईला थोडा फार पटल. पण खरी मजा तेव्हाच याय्ची जेव्हा आई त्याला खायला पोळी आणायची अन ती खाली टाकायचा वाघ्याला धइर नसायचा , तो उडी मारुन ती घ्याय्चा. अन भम्म्म्म्म्म पळायचा. वाघ्या खरच इमानी निघाला त्याला पेशंट कोण अन फेरीवाले कोण बरोबर समजु लागल . तो बाबांचे मित्र अन पेशं ट वर कधीच नाही भुंकला . बाकी 'फेरीवाले'' आणि ''पिउन फिरणारे'' यांना तो सोड्त नव्हता.
दिवस असेच जात होते. आई अन त्याच्यात थोदी दोस्ती पण झाली. म्हण्जे त्याने आईला मस्त मस्का लावला. आई देवळात जायला निघाली की हा पण सोबत यायचा. याला पाहुन सगळे आईला म्हणायचे ''काय मस्त कुत्रा आहे हो ताई, खुपच छान. '' आई पण दिमाखात सांगायची की तो आमचा 'लाडका' आहे. कुणावर भुंकाव आणि कुणावर नाही त्याला फारच समजत, मी कुठेही गेली तरी सोबत येतओ हा .वगैरे वगैरे.................. पाउस नसला की हा मस्त बाहेर ''हुंदडायचा'' आणि आई किंवा बाबा दिसले की त्यांच्या मागे धावत यायचा. पण कधी कधी हा मागे येउ नये अस वाटायच तेव्हा आम्ही त्याला चुकवत जाउ लागलो. म्हण्जे तो ज्या रस्त्यावर असेल ना त्या रस्त्यानी जात नव्हतो.
पण हेही त्याच्या लक्षात आल. तो आता अशा ठिकाणी उभा रहायचा की आम्ही कसेही गेलो तरी त्याला दिसायचोच. आणि तो मागे यायचा.त्यावेळी त्याच्या डोळ्यातले भाव ''लपाछपी ''खेळण्यार्या लहान मउलासारखे असायचे. नंतर तर त्याची इतकी सवय झाली होती की तो दिसला नाही तर आम्हालच चुकल्या सारखा व्हायच.
वाघ्यात आणि आई मधे दोस्ती झाली खरी पण त्याच घरात येण तिला नाही पटायच. पावसाळा असेपर्यंत ठिक होता पन नंतरही तओ घरात याय्चा. आअम्ही सगळे मिळुन त्याला अडवाअयला जय्चो पण एखद्या ''जिमनॅस्ट'' सारखा तो हुलकावणी द्याय्चा व घरात शिरायचा. महत्वाच म्हणजे त्याला ज्यासाअठी घरात घेतला तो purpose तर
दुरच राहीला. अहो सग्ल्यांवर भुंकणारा हा ''वाघ'' त्या मांजरी समोर ''शेळी'' झाला हो. म्हण्जी सोबत वाढलेले कुत्रा मांजर भांडत् नाही हे ऐकल होता हो पण इथे तस नव्हता. मांजरीला पाहुन हा ''आशिक बनाया आपने........................'' वगैरे म्हणत शेपटी उदवायचा, गोल फिरायचा आणि ''जिवाभावाचे साथी'' असल्यासारखे ते दोघा सोबत दुध- पोळी खायचे. शेजारचे गमतीने म्हणायचे पण की ''आता वाजंत्री घेउन या ओ ..........ताई, यांच लग्न लावुन देउ आपण''. आई रागात बाबांना म्हणायची ''बघा आता सीन हा , यासाठी याला घरात घेतल ना......????''. पण आता बोलुन काय फयदा.
पण कालंतराने आईला पण त्याच्याशिवाय करमेनासे झाले. तो आला नाही की हिलाच काळजी कुठे असेल तो, दुसर्याकदे तर नाही ना गेला?, गाडी खाली तर नाही ना आला.........?, कोणी पकडला तर नाही ना........? असे एक ना अनेक. अन तो आला की जीव भांड्यात पड्यात पडायचा. गावाला जाताना ती शेजारच्या काकुना सांगुन जायची त्याला पोळी टाकायला. आणि फोन वर पण त्याची चौकशी करायची. यामुळे बाबा मात्र खुश होते(त्यांच्या मागची भुण भुण कमी झाली होती ना....).
आता वाघ्या आमच्या घरचा सदस्य झाला होता. म्हणजे ओळखीचे सुध्दा आमच्याकडे अल्यावर याची आधी चौकशी करायचे. त्याला इतका जीव नका हो लाउ असही म्हणायचे पण त्यसोबत आता ऋणानुबंध जुळले होते. माझ्या आईचे सुध्दा. अस वाटत होता वघ्या असाच्य सोबत रहावा अस वातु लागल. खास करुन ज्याचा कुत्रा होता तो पण म्हणाला की ''राहु द्या त्याला तुमच्याच कडे''. आताअ तर आम्ही बिनधास्त झालो की वाघ्या आता नाहीच जणार कुठे.
पण ''देव'' नावाच्या शक्तिला आम्ही विसरलोच. काळ भरला की तो प्रत्येक प्राणिमात्राला या भुतलावरुन घेउन जातो. मग कोणाची ईच्छा वगैरे काही नाही. झालही असच. वाघ्याच वय आम्हाला माहीत नव्हत. पण तो आत पहिलेसारखा चपळ नाही राहिला हे जाणवत होत. खायचा पण कमी. एकदा तर २-३ दिवस आलाच नाही. आईला हुर्हुर लागली पन कोणी तरी तिला सांगीतल की तो आहे सुखरुप. त्याला कसला तरी चामडीचा रोग झाल्याचेही बाबांच्या लक्षात आल. त्याचही औष्ध -पाणी झाल. अशातच काही कामानिमित्य आई अन बाबा दोघही ८ दिवस गावाला गेले. वाघ्या दोनदाच घरी आल्याच आमच्या नोकराने सांगीतल. बाबा रात्री आले तर वघ्या दिसला नाही. सकाळी क्लिनीक ला जाताना तो दर्वाज्यातच उभा होता. त्याची नजर 'निस्तेज' होती. बाबा गाडी काढायला गेले तर हा हटेच ना रस्त्यातुन. आई ला सांगुन बाबा निघुन गेले. आईने त्याला पोळी टाकली पण त्याने नाही खाल्ली. निघुन गेला तिथउन . रात्री बाबा यायच्ह्या थोडा वेळ आधी तो आला अन अंगणात पडुन राहीला. बाबा आले तेव्हा बाबां नी त्याला जवळ घेतले. त्याने बाबाकडे बघीतले आणि २ मिनीटातच मान टाकली. तो बाबा यायचीच वाट बघत होता जणु..........
आईला व आम्हाला सांगीतल तेव्हा तर काय कराव हेच सुचत नव्हत. श्वान पथकाची गाडी बोलावुन ''वाघ्या'' ल त्यांच्या स्वाधिन केला. काही दिवस तर आअम्हालच जेवण जात नव्हत. वाघ्याची सगळ्यात जास्त आठ्वण आईला येत होती कारण आम्ही आमच्या कामात गुंतलो पण ती त्याच्या आठवणीत गुंतली...............
बाबांनी वाघ्या सोबत १ मस्त फोटो काढला होता तो ते सग्ल्यांना दाखवायचे अन background ला आई त्याची स्तुती करायची...........