सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

फटू's picture
फटू in जे न देखे रवी...
24 Jul 2008 - 12:38 pm

जरी बसणार नाही या गोष्टीवर विश्वास माझा
लाभणार नाही मला पुन्हा जरी सहवास तुझा
मनाची मात्र तयारी अजून होत नाही माझ्या
सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

जेव्हा कुणी समोरून क्षणी निघून जातं माझ्या
जणू ती व्यक्ती तू असल्याचा भास होतो राजा
तुझी मुर्ती वसली आहे दोन्ही पापण्यांत माझ्या
सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

असलो जरी मी अफाट दुनियेमध्ये मिसळलेला
आतून मात्र मी आहे पुर्ण हरवलेला अन एकला
या एकाकी जगामध्ये मला सोडून गेली तू राजा
सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

जरी आजही होते पापण्यांची उघडझाप माझ्या
त्या पापण्यांवरची स्वप्नं तुझीच होती रे राजा
ती सारी स्वप्नं राज्य करतात क्षणांवर माझ्या
सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

तुझ्या त्या सहवासाच्या निखळ चांदण्यात सखे
भान हरपून अगदी विसरून जात असे स्वत:ला
केव्हाच सरलेत ते दिवस,जाणवतंय मला आता
किती अभागी मी, मुकलोय त्या स्वर्गसुखाला

माझ्या विचारांमध्ये,वेदनांच्या या जाणिवांमध्ये
आताचा क्षण हा फारच भयाण वाटतो आहे मला
ते मैत्रीचं निखळ हास्य, प्रेमाचा नाजुक धागा
हरवलेलं प्रेम व्याकुळ करत आहे या कातरवेळेला

जरी बसणार नाही या गोष्टीवर विश्वास माझा
लाभणार नाही मला पुन्हा जरी सहवास तुझा
मनाची मात्र तयारी अजून होत नाही माझ्या
सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

आठवणीत न हरवलेला,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्रेमकाव्यप्रकटन

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

24 Jul 2008 - 12:52 pm | अनिल हटेला


सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

छान आठवणीत रमवलत की राव !!!

( कोण ही राजा ?)

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अरुण मनोहर's picture

29 Jul 2008 - 7:54 am | अरुण मनोहर

त्या पापण्यांवरची स्वप्नं तुझीच होती रे राजा

एक भाव व्याकूळ करणारी कविता.

विसोबा खेचर's picture

29 Jul 2008 - 8:24 am | विसोबा खेचर

कविता फारच निराशावादी वाटली बुवा!

मजा नाही आली! :(

प्रामणिक मत, राग नसावा....

असो,

गावडेसाहेब, पुलेशु.......