मुक्त विहारि यांनी आधी टाकलेल्या घारापुरी कट्ट्याची तारीख आधी १ किंवा ८ मार्च ह्या गोंधळात अडकलेली होती. आता हा घारापुरी भ्रमंती कट्टा १ मार्च २०१४ रोजी करण्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे येथे त्यासाठी जाहीर धागा टाकत आहे.
कट्ट्याची सर्वसाधारणपणे योजना खालीलप्रकारे असेल.
पुण्याहून शनिवारी दि. १ मार्च रोजी मी, धन्या, सूड, नाद खुळा, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा असे सिंहगडने निघून साधारण ९.४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचू. तिथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत साधारण १०/१०.१५ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.
मुंबईकरांपैकी माझ्या माहितीप्रमाणे मुविकाका, स्पा, किसन शिंदे, दिपक.कुवेत,पिंगू शेठ हे नक्की येत आहेत. अजून कोणी मुंबैकर येणार असतील तर त्यांनी श्री मुवि यांना व्यनि करावा. तर पुणेकर इच्छुकांनी मला व्यनि करावा. सर्वांनीच १० पर्यंत गेट वे येथे जमणे अपेक्षित आहे.
तिथे फेरीबोटीचे तिकिट काढून घारापुरी येथे उतरून स्थलदर्शन, निवांत गप्पा टप्पा. मग साधारण संध्याकाळी ४/५ पर्यंत परत गेट वे ला येऊन मग फोर्ट, चर्चगेट परिसराची भटकंती असा ढोबळमानाने कार्यक्रम आहे. खादाडी पण अधूनमधून होत राहील. अधिक माहिती मुवि देतीलच.
आम्ही परतीचे रात्रौ ८ च्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आरक्षण केले आहे. त्यामुळे तसा बर्यापैकी निवांत वेळ आहेच.
चला तर मग मिपाकरांनो, एक मस्त भटकंती होऊन जाऊ देत.
प्रतिक्रिया
3 Mar 2014 - 12:08 pm | लीलाधर
पळपूट्या कुठचा अर्धवट मध्येच का निघूण गेळास रे ???!?
3 Mar 2014 - 12:16 pm | आत्मशून्य
यांच्या उपस्थितीने ३ना चे ५ स्टार १००% झाले. त्वरीत फटु वृत्तांत येउ द्यावेत.