सुमित्रा भावे आणि सुनिल सुकठनकर हे अवलिया दिग्दर्शक आहे हे तसं 'वास्तुपुरुष' पाहिल्यावरच लक्षात आलं होतं.... मग संहिता पाहिला आणि मत अगदी ठाम झालं ....
आणि नुकताच "अस्तु"चा हा ट्रेलर पाहण्यात आला
http://www.youtube.com/watch?v=NY3cNmtFmaA
(इथे व्हिडीयो दिसेल अशा प्रकारे लिन्क कधी देतात ?)
काय मस्त ट्रेलर आहे .... नुसता ट्रेलर पाहुनच इतकी प्रचंड उस्तुकता निर्माण झालीये की कधी एकदा हा पिक्चर रीलीज होतोय अन थेटर मधे जाऊन पाहतोय असं झालंय ( आम्ही भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे चे चित्रपट सोडुन बाकी सर्व मराठी चित्रपट थेटर मधे जाऊनच पाहतो :D इव्हन दुनियादारी ही थेटर मधे जाऊन पाहिला , अर्थात त्याचा पश्चात्तप झाला पण ते जाऊ दे ...अस्तु अस्तु)
हां तर ... अस्तु ... डॉक. मोहन आगाशे प्रमुख भुमिकेत ! मोहन आगाशे इतका तगडा दुसरा अॅक्टर (सध्यातरी )मराठी चित्रपटसृष्टी मधे कोणी नाही असं आपलं माझं वैयक्तिक मत आहे . मोहन आगाशे अगदी जैत रे जैत पाहिल्या पासुनच आवडायला लागले ... माणुस जान ओततो यार भुमिकेत ! ट्रेलर मधे ही मधे "आई ....भुक " एवढाच एक डायलॉग बोलताना ...येवढे दोनच शब्द बोलताना ...चेहर्यावर जे एक्स्पेशन्स आहेत ...निव्वळ अप्रतिम ! आमचे एक सर नेहमी म्हणायचे "Acting is not in the dialogues , not in the lines .... its 'between' the lines !" अगदी हे आठवलं !
इरावती हर्शे इतक्या वर्षांनी ही इतक्या संदर कशा दिसतात हे एक न उलगडलेलं ...
(घरी म्हणालो..... " इरावतीशी मी लग्न करायला तयार आहे " तर सौ. म्हणाल्या ..." धन्य ! अहो आपण दुसरीत असताना शांति सीरीयल लागायची ना त्यात त्यांनी काम केलय ... किमान अठरा वीस वर्ष मोठ्ट्या आहेत त्या आपल्या पेक्षा ! अरे तुरे काय ? अहो जाहो म्हण ! " =O )
हा ट्रेलर पाहुन तर ह्या चित्रपटात ह्यांचा रोल जबरदस्त असणार असे दिसत आहे ...
देविका दफ्तरदार ह्यांच्या अॅक्टींगचा मी संहिता चित्रपट पाहिल्या पासुन फॅन झालो आहे. आता ह्या चित्रपटात त्यांचा रोल किती मोठ्ठा असेल ह्या विषयी शंका आहे ...
बाकी अमृता सुभाष ह्या आपल्या जनरेशनच्या अलका कुबल आहेत असे आमचे उगाच्च पुर्वग्रहदुषित मत आहे (अलका कुबल म्हणजे आपल्या " ह्यांनी माझी खणा नारळाची ओटी उधलली टॅ टॅ टॅ "फेम हो =D ).... अर्थात हा चित्रपट पाहुन ते मत बदलावे लागेल असे सध्या तरी दिसत आहे ... बघुया
आता हे सगळं केवळ ट्रेलर पाहुन लिहिलय ...चित्रपट अप्रतिम असणार असं वाटतयं म्हणु अगदी न राहवुन लिहिलय ... आता चित्रपटाची वाट पाहुयात .... अस्तु अस्तु
प्रतिक्रिया
12 Feb 2014 - 11:21 am | यशोधरा
अर्रे काय सुरेख आहे हा प्रोमो!
मनापासून धन्यवाद! पाहणार. सगळे ताकदीचे कलाकार आहेत.
आणि ह्यासाठी शम्त!
12 Feb 2014 - 11:37 am | मनिष
मी PIFF मधे पाहिला हा चित्रपट. शेवट थोडा सपाट झाला असला तरी एकुण उत्तम आहे. अल्झायमर झलेल्या एका विद्वानाची गोष्ट आहे ही. मी माझा ब्लॉगवर थोडक्यात ह्या चित्रपटाविषयी लिहिले होते. उत्सुकता असल्यास ते इथे वाचता येईल.
12 Feb 2014 - 11:51 am | सौंदाळा
१००% सहमत.
याच वेळी आम्ही दुनियादारी कटाप करुन काटकोन त्रिकोण नाटक पाहीले. बॅटमॅननेपण नाटक छान आहे सांगितले होते. खरोखरच जबरा नाटक, मोहन आगाशे तर अफलातुन. परत बघायचा विचार आहे.
असो. ट्रेलर हाफिसातुन दिसत नाही. साधरण ष्टोरी काय आहे चित्रपटाची?
रिलिज झाल्यावर परिक्षण्सुद्धा जरुर लिहावे ही विनंती.
12 Feb 2014 - 11:57 am | आतिवास
मीही PIFF मधे पाहिला हा चित्रपट. सगळे कलाकार उत्तम असूनही चित्रपट तितकासा आवडला नाही. जे काही सांगायचं आहे, ते न सांगताच चित्रपट संपल्यासारखा वाटला. सुमित्रा भावे 'टच' नाही असं वाटलं मला. (हे मी आगाऊपणा करत त्यांनाही सांगितलं!!)
पण अर्थात मी फार कमी चित्रपट पाहते, त्यामुळे माझं मत काही 'जाणकाराचं' मत नाही.
12 Feb 2014 - 12:09 pm | अनुप ढेरे
'वास्तुपुरुष'ची पातळी 'संहिता'ने गाठली नाही असं माझं मत. बघुया हा कसा असेल?
12 Feb 2014 - 12:20 pm | अर्धवटराव
मागे तो देवराई बघितला होता... त्यानंतर नेमकं काय वाटलं होतं सांगता येत नाहि.
अवांतरः अमृता सुभाषचा 'त्या रात्री पाऊस होता' बघितला का? नसल्यास अवष्य बघा. अलका कुबलचं लेबल फेकुन द्याल :)
12 Feb 2014 - 1:27 pm | उगा काहितरीच
+1
12 Feb 2014 - 4:17 pm | प्रसाद गोडबोले
अजुन पाहिला नाहीये ... आता नक्की पाहीन .
12 Feb 2014 - 12:32 pm | मुक्त विहारि
हे असे सिनेमे, कधी येतात आणि कधी जातात, काही समजत नाही.
13 Feb 2014 - 1:11 am | खटपट्या
http://www.apalimarathi.com/ वर सर्व आहेत बघून घ्या
15 Feb 2014 - 10:46 pm | खेडूत
हे संस्थळ भारतात चालत नाही- म्हणजे मागच्या वर्षी तरी असं होतं.
16 Feb 2014 - 11:02 pm | अनय सोलापूरकर
देवराई मलाही झेपला नाही...
"आई ....भुक " सहमत. केवळ अप्रतिम.
17 Feb 2014 - 8:27 am | इनिगोय
आभार. जरूर पाहणार.
कलाकारांबद्दलच्या मतांशी सहमत!
17 Feb 2014 - 11:29 am | ऋषिकेश
अभिनय वगळल्यास अस्तु ठिक ठाकच आहे असे समजते.