तुम्हाला तारा तुटताना पाहायला आवडते का?

विदेशी वचाळ's picture
विदेशी वचाळ in जनातलं, मनातलं
7 Feb 2014 - 10:01 pm

तुम्हाला तारा तुटताना पाहायला आवडते का? असेलच ना? सगळ्यांनाच तसे ते आवडते. पण मला का कोण जाणे त्यात मोठी खीन्नता वाटते.

माझ्यासाठी तारा हे अनेक गोष्टींचे प्रतीक आहे.
ध्रुवाच्या त्या अढळ पणाचे प्रतीक म्हणजे तारा.
माझ्या मुलींची बापा कडून असणारी अपेक्षा म्हणजे तारा.
माझ्या आईची मुलाकडून असणारी अपेक्षा म्हणजे तारा.
मला भेटायला येणारी प्रेयसी म्हणजे चांदणी, म्हणजेच तारा.
मला माझ्या अनेक शिक्षका बद्दल असणारी भावना म्हणजे तारा.
आपल्याला आपल्या आयुष्या कडून असणार्‍या अपेक्षा म्हणजे पण तारा.

असा मी बराच वाहावत जाईन.

पण मला सांगा मग अशा या आढळतेच्या प्रतीक असणार्‍या सन्केतास तुटतान पाहून चांगले कसे वाटावे?

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

पण....

हे द्रुष्य बघायला नक्कीच आवडेल.

अहो, निसर्गाचा चमत्कार आहे तो!!!

तुम्ही ज्याला तारा म्हणताय तो खरेतर धुळीचा एखादा कण किंवा लहान दगड असतो.
तारे त्या तुलनेत सहस्त्रअब्जावधी पटीने मोठे असतात
तारा तुटणे कोसळणे हे शक्य नाही.
तार्‍यांचा स्फोट होतो. ते त्यानंतर मृत सुद्धा होतात.

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2014 - 12:41 pm | टवाळ कार्टा

तुम्ही "मेष"वाले का? ;)

माझे भाष्य हे एका दृष्या वर आहे. आणि त्या दृश्याने प्रेरित असलेल्या भावानांवर आहे. भावनाना साइन्स चे बंधन नसते हो वीजुभाऊ.

कारण तशा वेळेलाच मी तारे बघायच्या फंदात पडलेला असतो.

इतर वेळी डिकॅप्रिओच्या द बिच मधिल पुढिल वाक्यालाच मी प्रमाण मानतो. When you develop an infatuation for someone you always find a reason to believe that this is exactly the person for you. It doesn't need to be a good reason. Taking photographs of the night sky, for example. Now, in the long run, that's just the kind of dumb, irritating habit that would cause you to split up. But in the haze of infatuation, it's just what you've been searching for all these years.

कवितानागेश's picture

7 Feb 2014 - 11:46 pm | कवितानागेश

मला पहायला नक्की आवडेल.
कारण मी आजपर्यंत पाहिले नाही हे दृश्य.
-मुंबईकर माउ

माउ, दुध,लोणी,तूप इकडे डोळा ठेवायचे सोडुन तारा तुटताना पाहण्याचे काय म्हणतेस ? ;)

बादवे... मी २ वेळा तारा तुटताना पाहिला आहे.

शहरापासून दूर.. एखाद्या डोंगरावर मुक्कामाला जा.

निरभ्र आणि प्रदुषण्मुक्त आकाश असेल तर असे दृष्य सहज दिसते.

पाषाणभेद's picture

8 Feb 2014 - 3:44 am | पाषाणभेद

कोणाचे काय तर आमचे कायपण!

प्यारे१'s picture

8 Feb 2014 - 1:04 am | प्यारे१

बर्‍याचदा बघितलंय.

कहते है जब कोई तारा टुटता है तो किसीने फिरसे धरती पे जनम लिया है.
- हिन्दी चित्रपट प्रेक्षक.

लॉरी टांगटूंगकर's picture

8 Feb 2014 - 9:13 pm | लॉरी टांगटूंगकर

कहते है टूटते तारे को देखकर मांगी हुई मन्नत पूरी हो जाती है |

दुसरा हिन्दी चित्रपट प्रेक्षक.

हो आवडते. मोठे देखणे दृष्य असते.

आनन्दिता's picture

8 Feb 2014 - 1:15 am | आनन्दिता

खुपदा पाहीलंय.. मला नेहमीच आवडतं तुटणारा तारा पहायला...

अर्धवटराव's picture

8 Feb 2014 - 3:03 am | अर्धवटराव

आणि मनात कुठेतरी मॅ.म. सुचित्रा कृष्णमुर्तीची स्माईल चमकुन जाते. क्वचीत, शारुख त्याच सिनेमावर थांबला असता तर किती बरं झालं असतं, हे ही आठवुन जातं. (ओळखा पाहु कुठला सिनेमा :) )

रेवती's picture

8 Feb 2014 - 3:40 am | रेवती

कभी हं कभी नां.
या शिनेमात शाहरुख आहे हे लक्षातच आलं नव्हतं. आम्ही सुचित्रा कृष्णमूर्तीला पहायला गेलो होतो. बर्‍याच वर्षां
नी शारूकच्या या पहिल्या काही सिनेमांबद्दल काहीतरी वाचले तेंव्हा लक्षात आले.

अर्धवटराव's picture

8 Feb 2014 - 3:58 am | अर्धवटराव

शारुख टॉलरेबलच नाहि तर खुप आवडला होता या सिनेमात. सुचित्रा तर काय भन्नाट आवडायची. बाकी पब्लीकने पण मस्तं कामं केली होती. टिक्कु तलसानिया, नसिरदादा, गोगा कपूर... आणि त्याचा वॉस्को.

बाकी पब्लीकने पण मस्तं कामं केली होती
हेच म्हणते.

लहानपणी 2 -3 वेळेस पाहिलाय . गम्मत वाटायची .
नंतर ......मोठा झालो .

चिन्मय खंडागळे's picture

8 Feb 2014 - 4:25 am | चिन्मय खंडागळे

अरेरे! या धाग्याचे आम्ही केलेले हलकेफुलके विडंबन कुण्या संपादकाला खुपलेले दिसते!

सपांदकालाच नाही बर्याच जणाल खुपले .

(भावी संपादक) जेपी

कंजूस's picture

8 Feb 2014 - 8:20 am | कंजूस

नेहरुंनी पाहिला होता .
हिंदी चिनी भाई भाईचा
तारा तुटतांना .
मग हाही लगेच निखळला .

आणि आता ब्लैकबेरी आणि नोकिआ .

चिन्मय खंडागळे's picture

8 Feb 2014 - 9:06 am | चिन्मय खंडागळे

बर्याच जणाल म्हणजे तुम्हाल एकट्याल?

मिसळपावचे जुने धमाल वातावरण जाऊन सगळी बुळबुळीत भेंडीची भाजी उरली आहे असं कधीकधी वाटतं.

जेपी's picture

8 Feb 2014 - 10:27 am | जेपी

@खडांगळे साहेब ,
माझ्या प्रतिक्रीयेतील शुद्धलेखनाच्या चुका शोधण्यापेक्षा तुमच्या लेखात काय चुकल हे पाहिल असत तर धागा उडाला नसता . आणी तुमच्या मते जुने धमाल वातावरण आले असते .
( नविन मिपाकर) जेपी

चिन्मय खंडागळे's picture

8 Feb 2014 - 6:42 pm | चिन्मय खंडागळे

@जेपी आहेब,
धागाच न उरल्यामुळे आता पुन्हा वाचता येत नाही. तरीही आठवून पाहतो. त्या धाग्यात
अर्वाच्य शब्दप्रयोग, शिवीगाळ
कुणावर वैयक्तिक टीका
स्त्रियांना रुचणार नाही अशी भाषा
यांपैकी काहीही असल्याचं मला आठवत नाही. मग?
तुमच्या भावनांचा आदर करूनही विचारतो, की केवळ संपादनाचे (अधिकृत असो वा अनधिकृत) अधिकार मिळाले आहेत म्हणून कचाकच कात्री चालवत सुटणं कितपत योग्य आहे?
माझ्याकडून मी आता आवरतं घेतो.

जेपी's picture

8 Feb 2014 - 6:53 pm | जेपी

धागा मी पण वाचला नाही . फक्त मिपावर आहे कळाले आणी वाचनापुर्वीच उडाला .
बाकी मी भावी संपादक आहे सध्या नाही :-)
मी एक साधा प्रतिसाद दिला तुमी सिरिशली घेतला .
मी बी आवरतो बाकी काय असल तर खव मध्ये या .

आपल्याला तारा म्हटल्यावर अढळ पणाचा बोध होतो .सबब आपण आपल्या आयुष्यात अढळ राहाव्यात अशा सर्व गोष्टी तारा या स्वरूपात पहाता. अशा गोष्टी संपूच नये असे वाटते. उदा आपल्याला आईचे अढळ प्रेम मिळत रहावे म्हणून ती आपल्या अगोदर मरूच नये असे वाटेल पण हे निसर्गाला मान्य नसते.

शब्दशः अर्थाने तारा तुटत वगैरे काही नाही. तो इतका मोठा असतो की तो दुसर्‍या तारका प्रणाली मधे शिरू शकत नाही. सबब आतापावेतो या भूतलावर तारा पडताना कोणी ही पाहिलेला नाही. " अरे तारा पडला ! तो पहा ! " अशी स्थिती माझ्या ६० वर्षाच्या आयुष्यात किमान दहा वेळा तरी आली आहे. हे पहाणे फार रंजक असते. पण जो पडतो तो तारा वगैरे तर सोडाच तर एखादा ग्रह देखील नसतो. अवकाशात फिरणारे अश्म वा अश्मकण धरतीच्या गुरूत्त्वात सापडले की खेचले जातात.वातावरणाशी घर्षण झाल्याने प्रकाशमान होतात. बाकी काहीही नाही,

प्रत्येकाला आकाशातील लुकलुकत्या चांदण्या/तारे पाहायला आवडते, व हे निरीक्षण इतके महत्वाचे आहे की त्यामुळेच कालगणना सुरु झाली आहे व आज आपल्या सर्वांच्या घरात/कार्यालयात/pc वर असणारे कॅलेंडर हा एक अविभाज्य भाग बनला आहे.

नितिन थत्ते's picture

8 Feb 2014 - 12:15 pm | नितिन थत्ते

मला "तारा तुटताना" म्हणजे हे वाटलं होतं.

wires

टवाळ कार्टा's picture

8 Feb 2014 - 12:42 pm | टवाळ कार्टा

यालाच "खोक्याबाहेरचे विचार" म्हणतात =))

यसवायजी's picture

8 Feb 2014 - 12:55 pm | यसवायजी

'तारा जुळणे - तारा तुटणे' टाईप वाटलं मला.
एक ग्राफिटी- लाईन मारताना जरा जपुन. तारा जुळल्या तर ठीक, नाहीतर कोळसाच ;)

तिमा's picture

8 Feb 2014 - 6:04 pm | तिमा

मला तर हे एका स्त्रीचे नांव वाटलं होतं.

इरसाल's picture

8 Feb 2014 - 4:09 pm | इरसाल

मला नाय आवडत.
इचिभैन लाइट जाते ना मंग तवा !

प्रसाद गोडबोले's picture

8 Feb 2014 - 11:53 pm | प्रसाद गोडबोले

१९ ऑक्टोबर २००१ ला उल्कावर्शाव होता , तसा तो मागल्या वर्षीही (२०००) होता पण तेव्हा लोकांचा फारच अपेक्षाभंग झान्याने २००१ साली फारच कमी लोक उत्सुक होते.

लोंब्या, हर्‍या नच्या ।ऋष्या शिवा आणि मी अशी ५ च माणसे आम्ही यवतेश्वरच्या पठारावर गेलो ... अक्षरशः सुन्न शांतता एक चिटपाखरु ही नव्हते ... संध्याकाळच्या वेळेला मॅगी बनवली शेजारच्या शेतातुन २-४ ज्वारीची कणसं काढुन आणली , हुरडापार्टीही झाली... आणि मग १०-११ च्या सुमारास शेकोटी शांत केली आणि निरभ्र आकाशा कडे डोळे लावुन बसलो ... आणि १२ वाजता जी आतिषबाजी सुरु झाली की काय सांगु .... मान हलवायची गरज पडत नव्हती सगळ्या बाजुंनी उल्का पडत होत्या .... निव्वळ अप्रतिम ...

एक उल्का पुर्वक्षितीजावरुन थेट पश्चिम क्षितिजा पर्यंत पडताना पाहिली .... तो क्षण मी आयुष्यात विसरु शकत नाही :)

तेव्हा पासुन मला तुटलेला तारा अर्थात उल्का पहायला प्रचंड आवडते !!

आता पुढील उल्का वर्षव कधी आहे ते पहायला हवे ...

प्रचेतस's picture

8 Feb 2014 - 11:57 pm | प्रचेतस

मस्त.
तसंही कुठल्याही अंधार्‍या ठिकाणाहून तासाला १०/१२ उल्का तरी दिसतातच तर बरेच वेळा संथपणे जाणारे कृत्रिम उपग्रह पण दिसतात.

माझीही शॅम्पेन's picture

9 Feb 2014 - 10:56 am | माझीही शॅम्पेन

+१०० .. अगदी , हे चमकदार उपग्रह पाहाताना माणसाची प्रगतीची झेप पाहून थक्क व्हायला होत ...

बॅटमॅन's picture

11 Feb 2014 - 7:19 pm | बॅटमॅन

२००८-०९ मध्ये राजगड माथ्यावरून उल्का पाहिल्या होत्या. लै जबराट अण्भव!!!!!