"प्रायमेट नावाच्या पूर्वज प्रजातीपासून माणूस आणि ग्रेट एप प्रकारची माकडे उत्क्रांत झाली" आणि "ही उत्क्रांती डार्विनच्या सिद्धान्ताबरहुकूम हळूहळू होत गेली" हे दोन सिद्धांत शास्त्रीय जगतात आणि जनसामान्यात चांगले मान्यता पावलेले आहेत. एका शास्त्रीय संशोधनाला सुरुंग लावणारे इतर शास्त्रीय सिद्धांत मांडले जात नाहीतच असे नाही. पण वरच्या या दोन गोष्टी शास्त्रीय जगतात बर्यापैकी जम धरून बसलेल्या आहेत... किंवा खरेतर "आताआतापर्यंत जम धरून बसलेल्या होत्या" असेच म्हणावे लागेल.
कारण आता त्या गोष्टींनाही सुरुंग लावणारा सिद्धांत अमेरिकेतील जॉर्जिया युनिव्हर्सिटीतल्या डॉ युजीन मॅक्-कार्थी यांनी मांडला आहे. त्यांच्या सिद्धान्ताप्रमाणे माणूस चिंपँझी मादी आणि वराह नर यांच्या संकरापासून झालेला प्राणी असावा याला भरपूर शास्त्रीय पुरावा आहे.
डॉ युजीन मॅक्-कार्थी ही आसामी सामान्य शास्त्रज्ञ नाही. संकरशात्रातल्या जागतिक स्तराच्या मोजक्या तज्ज्ञामध्ये त्यांची गणना होते. त्याचे प्राणी-संकरावरचे मूलभूत संशोधन हजारो संशोधन लेखांमध्ये दुवे (रेफरन्स) म्हणून वापरले गेले आहे. त्यांच्या सद्याच्या या सिद्धान्ताला शास्त्रीय जगतात सावध पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी त्यासाठी दिलेल्या कारणपरंपरेची स्तुतीच होत आहे... त्यांना सरळ सरळ वेडा म्हणायला शास्त्रीय जगतात अजून कोणी पुढे आले नाही यावरून त्यांच्या सिद्धान्ताच्या शास्त्रीय भक्कमतेची आपल्यासारख्या त्याबाबतीत तज्ज्ञ नसलेल्यांनाही अप्रत्यक्ष कल्पना यावी.
त्यांच्या सिद्धान्ताच्या पाठिंब्यासाठी त्यांनी मांडलेले आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेले काही मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः
१. माणूस आणि चिंपँझी जनुकशास्त्राप्रमाणे जवळचे असले तरी त्यांच्यामध्ये खूपच फरक आहेत आणि ते का हे विशद करणारा दुवा म्हणून कोणताच प्राणी या दोघांमध्ये नाही.
२. चिंपँझीच्या जनुकांच्या जवळपासही येणार नाहीत अशी बरीच जनुके मानवात आहेत आणि ती जनुके वराहात आहेत.
३. मुख्य म्हणजे ही वेगळी जनुके इतर प्रायमेट्स मध्येही नाहीत... म्हणजे ती प्रायमेट, ग्रेट एप्स आणि सद्या मान्यता असलेल्या मानवाच्या पूर्वजांकडून मानवाला मिळणे शक्य नाही. त्यामुळे ती फार वेगळ्या प्राण्याच्या संकरातून मिळण्याची शक्यता सबळ बनते.
४. वराह व मानवाच्या जनुकीय साम्यांमुळेच हृदयाच्या झडपांचे, कातडीचे आणि मूत्रपिंडाचे रोपण किंवा मधुमेहाविरुद्ध वापरले जाणारे इन्शुलीन याकरिता वराह याच प्राण्याची निवड केली गेली आहे कारण काही जनुकीय साम्यांमुळे ते अवयव अथवा इन्शुलीन मानवी शरीर जास्त सहजपणे स्वीकारते (रिजेक्शन रिअॅक्शन कमी प्रमाणात होते). हीच गोष्ट जनुकशास्त्रीयदृष्ट्या वराहाला जवळचे आणि माणसाला वराहाइतकेच दूरचे असलेल्या कुत्रा, शेळी अथवा अस्वल या प्राण्यांबाबत शक्य होत नाही.
५. जनुकशास्त्रियदृष्ट्या बर्याच वेगळ्या असलेल्या प्राण्यांमधील संकर जरी नेहमीची गोष्ट नसली तरी प्रयोगशाळेत आणि निसर्गातही ही गोष्ट फार अशक्य अथवा अगदी फारच मोठा अपवाद नाही. डॉ युजीन मॅक्-कार्थी यांच्या Handbook of Avian Hybrids of the World या पुस्तकात पक्षीजगतातले ४,००० पेक्षा जास्त हायब्रिड्स नोंदलेले आहेत. येथे सस्तन प्राण्यांच्या अनेक संकरांची यादी व माहिती मिळेल.
६. संकरित प्राण्यांत वंध्यत्वाचे प्रमाण खूपच असते. जीव-इतिहासात असे बहुतेक संकर प्रजनन करण्यास असमर्थ असल्याने नष्ट झाले आहेत. आजही मानवात सर्वसाधारण प्राण्यांपेक्षा वंध्यत्वाचे प्रमाण लक्षणीय आहे. आधुनिक मानव जन्माला येऊन दोन लाख वर्षे लोटली आहेत. इतका काळ वंध्यत्व सुधारायला मिळूनही त्याचे इतके प्रमाण आहे म्हणजे सुरुवातीच्या काळात तर ते खूपच मोठे असले पाहिजे. संकराच्या सिद्धान्ताच्या बाजूचा हा एक अप्रत्यक्ष पुरावा आहे.
माणसाच्या दोन लाख वर्षांच्या इतिहासात त्याच्या अनेक वंशावळी तयार झाल्या. त्यातील इतर सर्व नष्ट होऊन फक्त आता जिवंत असलेली एकुलती एक वंशावळ एकाच नर आणि मादीपासून (जेनेटिक अॅडम व ईव्ह) निर्माण झाली आहे हे तर सिद्ध झाले आहेच. इतर वंशावळी हळूहळू अस्तंगत होण्याचे वंध्यत्व हे एक महत्त्वाचे कारण असू शकते आणि केवळ योगायोगाने निर्माण झालेल्या काही उत्परिवर्तनांमुळे आपली आताची वंशावळ शिल्लक उरली आहे असेही असू शकेल. (हा इटॅलिक्समधला आपला माझा लॉजिकल अंदाज... एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीत आपलेपण दोन पैसे असले पाहिजेतच ना राव ;) )
७. डॉ युजीन मॅक्-कार्थींचा सिद्धांत केवळ शास्त्रीय ज्ञानावर आणि शास्त्रीय सारासारविवेकावर (लॉजिक) बेतलेला आहे, त्यामुळेच अजून तरी त्याला इतर शात्रज्ञांकडून सरळ सरळ आव्हान पुढे आलेले नाही किंवा त्याची चेष्टाही झालेली नाही.
प्रतिक्रिया
26 Jan 2014 - 5:39 pm | आयुर्हित
उत्तम लेख व विचार आहेत आपले!
आपल्या वेदात व पुराणात याचे उत्तम रीतीने वर्णन केलेले आहे, फक्त ते रूपकाच्या रुपात असल्याने बर्याच वेळेला,बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही.
ओळखा पाहू काय आहेत ते!
27 Jan 2014 - 12:32 pm | शैलेन्द्र
अतिशय उत्तम,
फक्त एकच प्रश्न आहे, सगळ्याच गोष्टी रुपकात का हो टाकल्या?
अजुन एक, डुकरांना डायबेटीस व्हायचा चान्स कमी असतो बरंका, शिवाय, डुक्कर हे डायबेटीस विरुद्ध लढ्यातील एक महत्वाचे हत्यार आहे.. नजर राहूद्या तुमची तिकडेही..
27 Jan 2014 - 5:15 pm | आयुर्हित
त्या काळी सर्व विद्या मुखोद्गत करणे अति आवश्यक होते.त्यासाठी लक्षात ठेवणे सोपे जावे म्हणून रूपकाची गरज पडायची.
क्षमा करा, मी फक्त दोन पाय असलेल्या व प्रगत मेंदू असलेल्या मानव प्राण्याचीच काळजी घेतो.प्रगत मेंदू हेच माझे साधन आहे.
27 Jan 2014 - 11:03 pm | शैलेन्द्र
अहो, प्रगत मेंदू असलेल्या मानव प्राण्याची काळजी घेण्याचेच डुक्कर हे एक साधन आहे..
27 Jan 2014 - 11:21 pm | आयुर्हित
आपण आपल्याया प्रिय अशा कोठल्याही प्राण्याचा/साधनाचा वापर करायला मोकळे आहात.आपणास कोणी अडवणार नाही.
27 Jan 2014 - 11:39 pm | शैलेन्द्र
आम्ही तर करणार बुवा डुकराचा वापर.. तुम्ही बसा रुपकं शोधत..
http://www.scientificamerican.com/article/pigs-porcine-diabetes-islet/
http://www.cmaj.ca/content/174/1/25.full
http://www.biotechlearn.org.nz/focus_stories/pig_cell_transplants/diabet...
http://globalnews.ca/news/728296/pig-cells-may-help-diabetic-patients/
वाचा जरा, सरळ भाषेत आहे, रुपक नाहीत..
29 Jan 2014 - 4:47 pm | मंदार दिलीप जोशी
तुम्ही उतम रित्या उत्क्रांत झाला आहात ;)
29 Jan 2014 - 5:52 pm | शैलेन्द्र
कस्स्च्चं हो.. गर्दीबरोबर चालत आलो..
26 Jan 2014 - 5:40 pm | प्यारे१
माणसाचं पार डुक्कर केलंसा की...
चला माणसाच्या काही ठराविक वागण्याचं थोडं तरी कारण सापडायला हरकत नाही आता!
27 Jan 2014 - 1:33 pm | आनन्दा
मी पण तेच म्हणत होतो.
26 Jan 2014 - 9:48 pm | प्रचेतस
रोचक संशोधन आहे.
26 Jan 2014 - 9:51 pm | मुक्त विहारि
वेगळी माहिती.
26 Jan 2014 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा
हम्म्म्म! बघू अता पुढे काय होतं ते! :)
27 Jan 2014 - 10:39 am | मदनबाण
ह्म्म्म...
अवांतर :-
yadā kadācij jīvātmā
saḿsaran nija-karmabhiḥ
nānā-yoniṣv anīśo 'yaḿ
pauruṣīḿ gatim āvrajet
TRANSLATION :-
While rotating in the cycle of birth and death again and again in different species because of his own fruitive activities, the dependent living entity, by good fortune, may happen to become a human being. This human birth is very rarely obtained.
संदर्भ :- Bhaktivedanta VedaBase: Śrīmad Bhāgavatam 8.22.25
27 Jan 2014 - 11:36 am | शैलेन्द्र
अतिशय उत्तम लेख,
उत्क्रांतीची प्रक्रिया ही अनेक सरमिसळीचा खेळ आहे हे आता हळूहळू मान्य होतय..
27 Jan 2014 - 11:36 am | शैलेन्द्र
अतिशय उत्तम लेख,
उत्क्रांतीची प्रक्रिया ही अनेक सरमिसळीचा खेळ आहे हे आता हळूहळू मान्य होतय..
27 Jan 2014 - 1:33 pm | मारकुटे
चला म्हणजे मी विचारवंतांना डूक्कर म्हणतो ते काही चुकीचे नाही तर.
सामान्य माणसे डुक्कर + चिपंझी.
विचारवंत डूक्कर^१२ + चिंपांझी
27 Jan 2014 - 1:40 pm | बाळ सप्रे
27 Jan 2014 - 4:47 pm | भाते
धन्यवाद एक्का काका, ऊपयुक्त माहिती पुरवलीत.
सोज्वळ शिव्यांमध्ये हा शब्द का वापरतात हे आज समजले. :)
27 Jan 2014 - 4:47 pm | रेवती
नवीनच माहिती.
27 Jan 2014 - 5:13 pm | ऋषिकेश
अतिशय रोचक संशोधन आहे!
तुमचे लेखनही मुद्देसुद आहे.
27 Jan 2014 - 7:28 pm | स्वप्नांची राणी
तुमचं लेखन वाचून नेहेमीच काहितरी नविन हाती लागत....मानवी स्थलांतराचा ईतिहास पण खूप आवडला...
27 Jan 2014 - 8:42 pm | जेपी
रोचक .
27 Jan 2014 - 9:38 pm | चिगो
म्हणजे आता पोर्क खणं म्हणजे कॅनीबलीझ्म ठरणार की काय? ;-)
रोचक लेख..
27 Jan 2014 - 11:10 pm | प्रसाद गोडबोले
=))
27 Jan 2014 - 11:07 pm | वडापाव
म्हणजे आता पोर्क खणं म्हणजे कॅनीबलीझ्म ठरणार
की काय? >>> +111
=))
1 Feb 2014 - 3:14 am | राघवेंद्र
+१११
27 Jan 2014 - 11:20 pm | पैसा
तसे रशियन्स अस्वलाला आपला पूर्वज समजत से काहीसे वाचलेले आठवले!
27 Jan 2014 - 11:59 pm | कवितानागेश
कुणाला थोडे मांजराचे जीन्सपण सापडले तर बघा हो. फार बरं वाटेल मला. ;)
गमतीदार संशोधन आहे.
28 Jan 2014 - 12:39 am | राजेश घासकडवी
नाही हो... कोणीही काहीही लिहितं आणि डेली मेल सारखा न्यूजपेपर त्याला पब्लिसिटी देतो. लेखकाचं नाव गूगल केलं असतं तर त्याच्या 'संशोधना'च्या चिंध्या उडवणारा हा लेख सापडला असता.
- या लेखकाने पीएचडी पूर्ण केल्यानंतर कुठच्याही प्रतिष्ठित संस्थेत रीसर्च केला नाही. (हा दोष नाही, केवळ संशय निर्माण करणारी परिस्थिती)
- आपलं संशोधन कुठच्याही प्रतिष्ठित पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये पब्लिश करण्यासाठी पाठवलं नाही.
- लेखन केवळ आपल्या वेबसाइटवर ठेवलं.
- शंभर वर्षांपूर्वीच चुकीच्या सिद्ध झालेल्या कल्पना वापरल्या
- डुकरं आणि मनुष्य यांच्यात जनुकीय साम्य तो काहीच दाखवत नाही
- किंबहुना काही वरवरची शारीरिक साम्यं दाखवण्यापलिकडे तो काहीच जनुकीय पुरावे देत नाही (स्वतः जेनेटिसिस्ट असूनही)
- थोडक्यात स्वतःकडे काही पुरावे नसताना, केवळ एक कविकल्पना तो मांडतो आणि आपल्या कल्पनेला मिळतेजुळते असे आणि असेच बारीकसारीक पुरावे तो शोधण्याचा प्रयत्न करतो.
असल्या भलत्यासलत्या कल्पना सत्य असू शकतील असा विश्वास ठेवण्याआधी त्या असत्य असू शकतील यावर अधिक विश्वास ठेवावा. कोणीतरी गारुडी येऊन 'बाई, हे औषध घ्या, तुम्हाला नक्की मुलगा होईल' असं सांगतो त्याबद्दल आपण कसा विचार करू? तसंच करावं.
28 Jan 2014 - 1:11 am | डॉ सुहास म्हात्रे
हा दावा अजून फक्त ६ महिन्यांपूर्वीचाच आहे. अश्या संशोधनाला विरोध तर अपेक्षित आहेच. त्या संशोधकाला सिद्धांत स्फोटक असल्याने त्याचे पुस्तक प्रसिद्ध करायला प्रकाशक मिळाल नाही म्हणून ते संशोधन त्याच्या वेबसाईटवर आहे, असे त्याचे म्ह्णणे आहे. मात्र त्याचे अगोदरचे पक्ष्यांच्या संकराचे पुस्तक छापलेले आहे आणि आंतजालावर विकत घेता येते.
पण अनेक मान्यवर पियर्स जून २०१३ पासून अजून गप्प आहेत. जरा त्यांचेपण विचार बाहेर येऊ द्यात... तोपर्यंत हा सिद्धांतच राहील. नंतर पाठीबा मिळाला नाही तर त्याचे हसे होऊन कचर्यात जाईल. पण जर अजून काही संशोधन होऊन पुरावे मिळाले तर क्रांतिकारी विचार ठरेल. अजून काही काळानंतरच चित्र जरा स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण प्रेक्षक बनून त्याचा मागोवा घेत मजा बघूया !
28 Jan 2014 - 1:18 am | डॉ सुहास म्हात्रे
हा धागा टाकायचा राहिलाच...
http://scienceblogs.com/pharyngula/2013/07/02/the-mfap-hypothesis-for-th...
हा लेख त्या संशोधनाच्या विरोधात आहे. मला त्यातल्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचनीय वाटल्या :)
28 Jan 2014 - 9:40 am | राजेश घासकडवी
वैज्ञानिक ज्ञानाची प्रगती करण्याची प्रक्रिया अशी चालत नाही. म्हणजे कोणीही उठून अपुऱ्या पुराव्यांवर काहीतरी लिहील मग प्रस्थापित वैज्ञानिकांनी तो खोडून काढण्याचा प्रयत्न करावा ही अपेक्षा चुकीची आहे. तसं केलं तर वैज्ञानिकांना आपलं खऱ्या संशोधनाचं काम करायला वेळच मिळणार नाही. नवा सिद्धांत मांडायचा तर त्यासाठी भक्कम पुरावा गोळा करून तो त्या क्षेत्रात काम करणाऱ्या चार रिव्ह्यूअर्सना खोडून काढता येणार नाही अशा स्वरूपात मांडण्याची जबाबदारी ही मांडणाऱ्याची असते. या प्रक्रियेतून गेलेले विचार मग सर्व वैज्ञानिकांसमोर प्रसिद्ध होतात. जर इतरांनाही तो पुरावा मजबूत वाटला तर काही लोक त्या दिशेने बरोबर की चूक असं संशोधन करून बघतात. मग पाठिंबा मिळतो आणि सिद्धांत प्रस्थापित थियरीत सामावला जातो. पण पहिली पायरी चढता न आलेल्या विचारांना पाठिंबा द्यायचा की नाही हे प्रस्थापितांनी ठरवावं ही अपेक्षा बरोबर नाही. मी उद्या उठून म्हणेन की मला भारताच्या धावण्याच्या ऑलिंपिकच्या टीममध्ये जायचं आहे. तर ऑलिंपिक निवड समितीने मला का घेता येणार नाही याची कारणं देत बसणं अपेक्षित आहे का? वेगवेगळ्या पातळीवर स्पर्धा होतात, त्यात मी भाग घ्यावा, मी पुरेशा वेगाने धावतो हे सिद्ध करावं, मग माझा विचार होईल. तसंच आहे हे.
सिद्धांत या शब्दाने नावाजण्याच्या लायकीचं हे प्रकरण नाही असं माझं मत आहे. मी समजा म्हटलं 'मोहेंजोदाडोच्या जवळ मला एक प्लास्टिकची पिशवी दिसली याचा अर्थ मोहेंजोदाडो संस्कृतीत प्लॅस्टिक वापरलं जायचं.' तत्त्वतः हाही सिद्धांतच आहे. पण त्याला मी फारतर एक विधान म्हणेन.
तुम्ही दिलेली सायन्स ब्लॉगची लिंक छान आहे. त्यात लेखकाने म्हटलं आहे 'कदाचित त्याचंच बरोबर असेल आणि माझं साफ चुकलेलं असेल. त्याला एक प्रयोग करून हे सहज सिद्ध करता येईल...'
28 Jan 2014 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
मी त्या संशोधकाच्या बाजूने लढतोय असा तुमचा गैरसमज झालेला दिसतोय ! लेखाच्या शिर्षकातच मी तीन प्रश्नचिन्हे टाकली आहेत त्यावरून काय ते समजा.
मानवाच्या उत्क्रांतीबद्दल एक खळबळजनक सिद्धांत आणि तोही एका अमेरिकन युनिव्हर्सिटीत काम करत असलेल्या मान्यवर संशोधकाकडून केला गेलेला असल्याने मला त्याचे कुतुहल आहे. याकरताच ती गोष्ट मिपावर टाकली. विश्वास काय अधिक विचारही पियर्सकडून अधिक पुरावे मिळाल्यासच ठेवला जाईल. पण मी माझा छंद म्हणून यासंबद्धीची माहिती कोणताही पूर्वग्रह न ठेवता माझ्या अल्पमतीला जमेल तेवढ्या शास्त्रीय मार्गाने पडताळत राहीन, एवढेच. बघू काय होते पुढे ते !
28 Jan 2014 - 5:45 pm | राजेश घासकडवी
लेखातली वाक्यं, लेखावर आलेले काही प्रतिसाद पाहता अनेकांना या मांडणीत काही दम वाटत असावा असा समज होणं साहजिक होतं.
त्यावरून एक व्यापक मुद्दा डोक्यात आला - नवीन विचारांबद्दल ओपन माइंड ठेवायचं म्हणजे नक्की किती ओपन ठेवायचं? या प्रश्नाला खरं तर सरळधोपट उत्तर नाही. ते प्रत्येकासाठी थोडं थोडं वेगळं असतं. काही घरं सर्वांचं मनापासून स्वागत करणारी असतात, तर काही घरं सहसा इतरांना आत प्रवेश देत नाहीत. या दोन टोकांत प्रत्येक घर कुठेतरी बसतं. अर्थातच जितकं स्वागत करणारं घर तितकं चांगलं. पण तरीही अशी घरं देखील चोरांना किंवा पूर्ण अनोळख्याला 'या, चार दिवस राहूनच जा' म्हणण्याआधी विचार करतात. काहीही सत्य असू शकेल असं धरून चालणं म्हणजे दारात येणारा प्रत्येकजण भला माणूस असेल असं गृहित धरण्यासारखं आहे. विचारांचं स्वागत करतानाही तितक्या प्रमाणात सूज्ञपणा दाखवणं म्हणजे क्लोज्ड माइंड असणं असं नाही. किंचित स्केप्टिसिझम ठेवणं हे उलट चांगलं आहे.
28 Jan 2014 - 8:13 pm | स्वप्नांची राणी
माझ्या पुरता तरी डोळे उघडणारा प्रतिसाद...
Once a priest, always a priest असं नसत आणि Once a Thief, always a Thief असंही नसत...थोडक्यात ओपन माइंड म्ह्णजे पुर्वग्रहविरहीत माइंड. बरोबर ना?
28 Jan 2014 - 9:40 pm | पैसा
काहीजणांना सग्गळं कळतं पण वळत नाही. आणि काही लोक "लोकां सांगे ब्रह्मज्ञान" अशा प्रकारातलेही असतात. तेव्हा सगळीकडेच नेहमी डोळे उघडे ठेवून रहावे. म्हणजे थोडक्यात 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे'. काय?!
28 Jan 2014 - 9:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही चर्चा पुढे चालवावी असे वाटत नव्हते. पण दोन्ही प्रतिसादात संशोधनप्रक्रियेवर बराच उपदेश वाचला. त्यावरून तुमचा संशोधनाचा बराच अभ्यास आहे असा अंदाज बांधला. म्हणूनच थोडेसे लिहीत आहे:
१. जर तुम्ही तुमचा प्रतिसाद संशोधकाच्या विरोधी असलेल्या एकुलत्या एका लेखावर न बेतता, मूळ संशोधन आणि इतर काही संशोधकांची मते विचारात घेऊन लिहीला असतात तर तो जास्त संतुलीत आणि शास्त्रीय झाला असता.
२. माझ्या लेखावरचा एकांगीपणाचा क्लेम तुमच्या सोडून इतर कोणाच्या प्रतिसादात दिसत नाही, तेव्हा गैरसमज कोणाचा झाला आणि घर-चोर वगैरे उदाहरणे कुठे आणि कितपत लागू होतात हे वर मुद्दा १ मध्ये नोंदलेली डॉक्युमेंट्स वाचून मग लेख (शिर्षकासह) व इतर प्रतिसाद वाचून नंतर ठरवल्यास ते जास्त शास्त्रीय ठरेल.
३. शास्त्रीय प्रक्रियेबद्दल मला थोडीबहुत कल्पना आहे, कारण माझ्या स्किलसेटमध्ये खालील काही क्षुद्र गोष्टी आहेतः
अ) ICH-GCP (Royal College of Physicians, London) आणि NIH-PHRP सर्टीफाईड क्लिनीकल रिसर्च इन्व्हेस्टीगेटर
आ) ICH-GCP ट्रेनर
इ) IRB पॉलिसी आणि रिसर्च सेंटर स्ट्रॅटेजी लिहीणे हा माझ्या व्यवसायाचा एक आवडता भाग आहे
ई) बहुराष्ट्रीय-बहुकेंद्रित शोधप्रकल्पांचे करार आणि आयोजन हा माझ्या व्यवसायाचा एक भाग आहे, इ.
आणि ह्या पार्श्वभूमीचा उपयोग कोणत्याही संशोधनाकडे पूर्वग्रह न बाळगता (ते अगदी विचित्र वाटले तरी) बघायला आणि त्याला माझ्या शास्त्रीय अल्पमतीप्रमाणे योग्य तेवढे (आणि तेवढेच) शास्त्रीय महत्व द्यायला उपयोग होतो.
असो. आपल्या संशोधनाबद्दलच्या ज्ञानाची कल्पना असल्यानेच इतके लिहावेसे वाटले. आता लेखात असलेल्या संशोधनाची चमक सोन्याची आहे की पितळेची याबद्दल माझा स्वतःचा काहीच दावा नाही पण खरे काय आहे हे लवकरच समजेल असे वाटते. कारण आताआता नामवंत पियर्स सावध भुमिका घेऊ लागले आहेत. म्हणजे काही दिवसात त्यांचे परखड विचारही बाहेर येतील असे वाटते. तोपर्यंत या विषयी "Watchful expectancy and masterly inactivity." हा मार्ग मला उत्तम वाटतो. नाही का?
28 Jan 2014 - 10:15 pm | राजेश घासकडवी
तुम्हाला उपदेश करण्याचा हेतू आहे असं वाटलं तर क्षमस्व. माझ्या स्केप्टिकल भूमिकेचं ते समर्थन होतं. आणि अशा कल्पनांबद्दल थोडं साशंक असणं म्हणजे ओपन माइंड नाही या आक्षेपाचं प्रीएम्प्टिव्ह खंडन होतं.
असो, तुमचं लेखन मी आवडीने वाचतो, आणि त्यातून मला बरंच काही मिळतं. तेव्हा गैरसमज नसावा.
28 Jan 2014 - 1:12 am | प्रभाकर पेठकर
लेख चांगला आहे. नविन माहिती मिळतेय. ती कितपत खरी मानावी शंकाच वाटते आहे. (त्या शास्त्रातलं कांही कळत नाही म्हणून).
28 Jan 2014 - 4:48 pm | विद्युत् बालक
फरक एवढाच आहे कि पूर्वी माणसे हे वेद वगैरे ला ब्रह्म ज्ञान मानायची सध्या गोऱ्या कातडीच्या किंवा फारिन मधील सरसकट "संशोधनाला(?) " ब्रह्मज्ञान मानतात ! खरे खोटे ब्रह्मालाच ठाऊक !
अवांतर : विकीपेडिया मधील लेख मराठीत भाषांतर किंवा चोप्य्पस्त करून इथे टाकले तर मिपाच्या धोरणात बसतील का ?
28 Jan 2014 - 9:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
माणसाची गोरी कातडी आणि माकडांच्या तुलनेने नगण्य केस या गोष्टी (जीन्स) वराहाकडून मानवात आल्या असे त्या गोर्याचे म्हणणे आहे ! :)
28 Jan 2014 - 9:44 pm | पैसा
अवांतरः भाषांतर करा पण शब्दशः नको. त्यात स्वतःची भर घाला.
महत्त्वाचे: दुसर्या कोणी चोप्य पस्ते केलेले असेल तर लिंक द्या. असे लिखाण आपण कॉपीराईट कायद्याच्या कक्षेत येत असेल तर ठेवू शकत नाही.
28 Jan 2014 - 5:01 pm | सौंदाळा
आता (जर पुढे हे संशोधन खरे ठरले तर) तथाकथित पुराणमतवादी म्हणतीलच की हे भारतीयांना खुप आधीच माहीती होते, विष्णुचा वराहावतार हा त्याचाच पुरावा आहे ;)
28 Jan 2014 - 5:53 pm | बॅटमॅन
अर्थातच ;)
28 Jan 2014 - 6:43 pm | सुबोध खरे
एका इंग्रज माणसाने सांगितले की आमच्याकडे खूप खोल खणले तेंव्हा एक तांब्याची तार मिळाली म्हणजे आमच्याकडे तेंव्हा तारा यंत्र होते.
यावर एक भारतीय पुराण मतवादी म्हणाला की आमच्याकडे खूप खोल खणले तेंव्हा काहीच मिळाले नाही म्हणजे आमच्याकडे तेंव्हा पण बिनतारी(wireless) संदेश वहन होते.
28 Jan 2014 - 9:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
तेवढंच नाही तर टिव्ही*दृष्टी नसती तर महाभारत कसं बरं पाहिलं, ऐकलं आणि लिहीलं गेलं असतं ? +D
* : टिव्ही --> टिव्य --> दिव्य असा अपभ्रंश झाला असावा असा अंदाज आहे... बॅटमॅन नक्की सांगू शकेल.
28 Jan 2014 - 11:04 pm | बॅटमॅन
व्युत्पत्ती बरोबर, फक्त अगोदर दिव्य, मग टिव्य अन मग टिव्ही असे पाहिजे. कारण दिव्यदृष्टीच्या आधारे टिवटिव करीत म्हणून टिव्य अन मग त्याचे पुढे टिवी झाले.
28 Jan 2014 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
वरच्या टीव्ही*दृष्टी ऐवजी दिव्य*दृष्टी असा बदल करायचा असं ठरवून दुसरी ओळ लिहीली आणि बदल करायच्या अगोदर उंदीर चालवला :)
28 Jan 2014 - 11:34 pm | बॅटमॅन
हा हा हा ;)
30 Jan 2014 - 1:58 pm | आयुर्हित
हा हा हा असे दात काढून हसणे किती सोपे असते नाही. हसा लेकांनो, हसा!
मला हसावे कि रडावे हेच काळात नाही!
पण कीव नक्की आली आपली, आपल्या अज्ञानामुळे.
29 Jan 2014 - 1:27 am | प्रसाद गोडबोले
अहो टीव्ही चा उल्लेख गीतेत सुध्दा येतो , उगाच मनाच नाही सांगत पुरावा आहे पुरावा ...हा पहा एक श्लोक>> दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२॥
पण काही विद्वानांच्या मते
दिव्य > टिव्य > टिवटिवाट > ट्विटर अशी व्युत्पत्ती आहे ... बहुधा महाभारतात लोकं ट्विट करत असणार आणि धृतशाष्ट्राचा नेटवर्क प्यॅक संपला असल्याने त्याने संजयाला सगळ्यांना फॉलो करायला लावले असणार ... असाही एक अंदाज आहे
:D
1 Feb 2014 - 1:45 am | बॅटमॅन
अगदी सहमत!!!!
गीतेत हर्षवर्धन राजाने रोमवर स्वारी केल्याचा उल्लेख आहे = रोमहर्षश्च जायते.
सर्वांनी चहा हा सनी नामक ब्रँडच्या स्टोव्हवरच करावा अशी गीतेची आज्ञा आहे.- सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो.
1 Feb 2014 - 1:46 am | बॅटमॅन
शिवाय चार जूनला वाढदिवस असलेल्या लोकांचा उल्लेखही आहे त्यात. - जन्मानि तव चार्जुन |
1 Feb 2014 - 1:15 am | आयुर्हित
अगस्तीऋषी,जे (श्रीरामाचे वडील असलेल्या)दशरथ राजाचे गुरु होते, त्यांनी रचलेल्या (लिहिलेल्या नव्हे) "अगस्त्य संहिता" ह्या ग्रंथातील मित्रावरूण(विद्युत)शक्ती बद्दल हा एक श्लोक:
संथाप्य मृणमये पात्रे ताम्रपत्रम सुसंकृतम|
छाद्येच्छीखिग्रीवेन चार्दाभी: काश्ठापाम्सुभी:||
दस्तालोष्टो निधात्वय: पारदाच्छादितस्तत:|
संयोगाज्जायते तेजो मित्रावरुणसंज्ञितम् ||
थॉमस एल्वा एडिसन ह्याने भरपूर रद्दीतील पुस्तके गोळा करून एक संग्रहालय तयार केले होते. व त्यातील काही लागलेले शोध, प्रयोग करून पुनः जगासमोर आणले आहेत.त्याने फक्त प्रयोग करून पहिले त्यामुळे १००पेक्षा जास्त शोध तो पुन्हा दाखवू शकला.
अजून एक उदाहरण:
"मोहन जो दडो" येथील संस्कृती संपूर्ण नष्ट होण्याचे एकमेव कारण तेथे झालेला अणुस्फोट आहे, याचा अर्थ त्याकाळच्या लोकांना याची पूर्ण माहिती होती.
आता बोला.
1 Feb 2014 - 4:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही तो एक इंडियाना जोन्सचा सिनेमा पाहिला आहेत का? न्यू मेक्सिकोमधेमधला एक प्रसंग आहे त्यात. हा हिरो जिथे असतो तिथे अणूस्फोट होतो. नेमका तेव्हा हीरो एका खोपटात लपतो म्हणून जगतो. बाकीचे सगळे गावकरी मरतात. कस्सला भयंकर सीन आहे ना? माझ्यातर अंगावर बै रोमांचच आले.
1 Feb 2014 - 12:30 pm | प्यारे१
>>> माझ्यातर अंगावर बै रोमांचच आले.
ऐला! बर्या आहात ना?
इतिहास पाहता हा उपहास'च' अपेक्षित आहे. ;)
अन्यथा रेसिस्ट कमेंट म्हणून समज देण्यात येईल. =))
2 Feb 2014 - 10:15 am | कैलासवासी सोन्याबापु
आयुर्हित, आपण मेन्षन केलेले हे सुत्र मी पण वाचले आहे ही "ड्राय बॅटरी" बनयाची विधी आहे, ह्याचा उल्लेख मी पण वाचला आहे, मुळात आपण भारतीय ह्यात मागे का ह्यावर माझे एक मत आहे
१. ज्ञान संक्रमणासाठी "मौखिक" मार्ग निवडला गेला :- त्याच्या मुळे त्या ज्ञानाला "जर्नलिस्टीक बेस" नाही (म्हणुन ते ज्ञान खोटे हे म्हणणे पण मला पटत नाहीच)
२. आपण भारतीय आधुनिक पाश्चिमात्य शोध जसे की टीवी, इत्यादी पाहुन ते आपल्या ज्ञानाशी कोरिलेट करायचा यत्न करतो , हे मात्र मला चुक वाटते, कारण हे करताना आपण एक तर स्वतःचे हसे करुन घेतोच त्या उप्पर प्राचीन भारतीयांनी केलेली शुद्ध विज्ञान (नॅचरल सायन्सेस) मधली प्रगती सुद्धा नजरंदाज करतो उहापोह महाभारतात टीव्ही अन न्युक्लियर बाँब होते का ह्या पेक्षा
१. आर्यभट्टाची गणिती सुत्रे
२. बौधयान सुत्रे ( ह्या भाऊ ने पायथॅगोरस च्या ही पहिले त्याचे थेरम शोधल्याचे सांगतात ) *चुभुदेघे
३. औषध अन शल्यशास्त्रात भारताची प्रगती
इत्यादी वर व्हावी अशी अपेक्षा मी बाळगतो
उरता उरला सिंधु संस्कृती चा प्रश्न तर इतिहासकारांत त्या बद्दल अनेकोअनेक प्रवाद अस्तित्वात आहेत अन परमाणु बाँब त्या गणतीत नाही
सिंधु संस्कृती च्या -हासा ची काही शक्य कारणे खालील प्रमाणे
१. अंतर्गत कलह :- जगातील इतर संस्कृतींत यज्ञ किंवा बलिवेदी वर आढळणा-या मानवी हाडांची संख्या (बळी) अन मोहंजोदाडॉ इथे सापडलेल्या हाडांच्या संख्येत असलेली विलक्षण तफावत
२. भौगोलिक कारणे :- तत्कालिन ग्लोबल वॉर्मिंग मुळे आलेले कॅटॅकॅलिस्मिक चेंजेस ज्याच्यामुळे ह्या विभागाच्या पर्जन्यमानात आलेला विलक्षण बदल ज्यामुळे बदलती पीक प्रणाली अन उपासमार अन त्यामुळे पसरलेले अराजक
३. नदीच्या पात्रात झालेले बदल (शिफ्टींग ऑफ रिव्हेराईन कोर्सेस) ज्यामुळे तहाने पोटी झालेला -हास (गुप्त सरस्वती नदी आजही राजस्थानात बाडमेर कडे भर वाळवंटात २०-२० फुटांवर पाणी देते!, कदाचित ह्या लोकांना ह्या मुळे पाण्यासाठी विहिरी खोदाव्या तरी कुठे हा प्रश्न पडला असावा)
४. साथीच्या रोगाने झालेले उच्चाटन (हा वाद क्षीण आहे)
त्या उपर तिथे सापडलेल्या कुठल्याही मानवी हाडावर न सापडलेले रेडियेशन चे ट्रेसेस हे आपला युक्तिवाद नल अँड व्हॉईड करतात.
मुळात अजुन सिंधु संस्कृती च्या भाषेचे "डी सायफरींग " झालेले नाही त्यामुळे त्यांनी नेमके लिहिले काय आहे हे आज ही आपल्या अंदाजाचाच प्रश्न आहे!!! सो अगदी आजही सिंधु संस्कृती ही जगातले एक गुढ कुतुहलच आहे
2 Feb 2014 - 1:00 pm | आयुर्हित
अणुस्फोटचे प्रमाण : दोन काळे दगड, ५० पट जास्त विकिरणे(Radiations), मुख्य रस्त्यावर पडलेले बाबा,आईच्या हातात हात असलेले मुलाचे सापळे.
संदर्भ:
David Davenport
Ancient Alien
ह्या स्फोटानंतर जी काही नवीन शहरे ती सिंधू खोरे पासून लांब ठिकाणी म्हणजे गंगा,यमुना व शरयू नदीच्या किनारी वसली आहेत, हेही महत्त्वाचे.
2 Feb 2014 - 5:29 pm | कैलासवासी सोन्याबापु
जर सभ्यता संपवणार मोठा स्फोट होता तर रेडीयेशन्स देणारे फक्त दोन दगड ? अजुन काही एव्हिडंस ? त्या उपर जर मुलाचा सापळा आईबापासोबत सापड्ला आहे तर तिथे " फ्लॅश एपिडेमिक" ची पण शक्यता असतेच असते ( स्वातंत्र्या पुर्वी नाही का प्लेग च्या साथीत पुण्यासारखी शहरे रिकामी झालेली, गावंच्या गावं एका रात्रीत गावठाण उठवलेली)त्या उपर जर मानवी शरीराला एखादा जंतु जीवाणु नवा असला तर त्याचे प्रोग्रेशन कसे होईल ह्याचे काहीच फिक्स नसते, ग्रीक उल्लेखांत आढळणा-या "अथेन्स च्या प्लेग" सारखेच हे काही असले तर ?
आपण उल्लेख केला आहे तो "पुरावा" नाही एक "संभावना" आहे कारण जोवर सिंधु लिपी डेसीफर होत नाही तोवर काही ही स्पष्ट नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. मला ह्या संभावनेवर ही अजुन वाचायला आवडेल जरा काही जास्त लिंक्स असल्या तर कृपया व्यनि करा ना
आपण केलेला शरयु गंगातटीच्या संस्कृतींचा उदय हे इतिहासात "रेडियल प्रोग्रेशन ऑफ सिविलायझेशन" असे म्हणवते, ते जगभरात सर्वत्र पहावयास मिळते अन त्याच मुळे त्याचा अन सिंधु -हासाचा काही संबंध असेल असे टेक्नीकली वाटत नाही
2 Feb 2014 - 5:44 pm | कैलासवासी सोन्याबापु
रेडियेशन फक्त दगडांवरच आढळले का ? सापळ्यांवर नाही का ? नसल्यास असा कसा (क्षीण) अणुबाँब होता जो दगडाला ५० पट रेडियेशन देऊ शकतो पण मांसाच्या आत घुसुन मानवी अस्थीं ना नाही ? रेडीयेशन च्या ट्रेसेस (नॉर्मल पेक्षा ५० पट म्हणजे बरेच जास्त आहे) वरुन तो कुठला किरणोत्सारी पदार्थ असल्याचे सिद्ध झाले ? जर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर ब्लास्ट तो ही परमाणु झाला आहे तर त्या ब्लास्ट मधे माणसे खलास झाली पण इमारती अभंग राहील्या ? कश्या ?? सिंधु संस्कृती आजही एक प्रचंड मोठे रहस्य आहे मानवी सभ्यतेचे हेच खरे.
2 Feb 2014 - 6:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
ब्लास्ट मधे माणसे खलास झाली पण इमारती अभंग राहील्या ? कश्या ??
हे न्युट्रॉन बांबच्या काही संकल्पनांत (डिझाईन) मध्ये हे शक्य असते.ही केवळ आधुनिक शास्त्रीय माहिती आहे आणि तिचा तसाच अर्थ घ्यावा. प्राचीन काळी अणुबाँब होते असा दावा करण्याइतपत त्याबाबतीत माझा अभ्यास नाही. :)
ढिसक्लेमर दिलंय, तरीसुद्धा आता पळतोच... ;)
2 Feb 2014 - 8:12 pm | आयुर्हित
रेडियेशन फक्त दगडांवरच आढळले का? : आता हे कुठे वाचेल/पहिले?
हे वाचा :हे दोन दगड(२:१० min वर बघा) तेथे फक्त उच्च तापमानामुळेच तयार झाले आहेत (The CNR lead a serious analysis that amazed the researchers: the objects brought by him appeared to be fused, glassified by a heat as high as 1500°C, followed by a sudden cooling)
एका सापळाहि आहे ज्यावर विकीरणचा परिणाम झाला आहे.
3 Feb 2014 - 7:23 am | कैलासवासी सोन्याबापु
ओहो!!! असंय व्हय!!! ह्या संभावनेवर अजुन वाचायला पायजे मग आता आम्हाला!!!
3 Feb 2014 - 1:22 pm | कवितानागेश
अशा काही ठिकाणी रेडिअशन आहे हे खरच आहे. पण कधीपासून आणि कशामुले आहे त्याबद्दल सम्शोधन सुरु असल्यानी खात्रीलायक माहिती अजूनतरी 'बाहेर' आली नाहीये.
... तोपर्यंत आपण 'चर्चा' करु!! ;)
28 Jan 2014 - 6:48 pm | सुहास..
म्हणजे एकुण काय ? सगळेच तारेत होते म्हणा की ;)
28 Jan 2014 - 10:31 pm | चिन्मय खंडागळे
हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' हा प्राणी इस्लामला निषिद्ध ठरेल काय?
28 Jan 2014 - 11:05 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
28 Jan 2014 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
28 Jan 2014 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा
@ 'मानव' हा प्राणी इस्लामला निषिद्ध ठरेल काय? >>> =)) खंप्लीट खपल्या गेलो आहे! =))
28 Jan 2014 - 11:50 pm | कवितानागेश
=))
=))
29 Jan 2014 - 12:16 pm | गब्रिएल
मग काय ? म्हनुन त्यांनी कदिपासुनच माणसं संपवायचं काम चालू केलाय नाय्का ?
29 Jan 2014 - 4:06 pm | प्रसाद गोडबोले
=))
29 Jan 2014 - 5:01 pm | टवाळ कार्टा
ज..ह..ब..ह..रा
30 Jan 2014 - 8:28 am | सुनील
इस्लामलाच काय पण ज्यूंनादेखिल निषिद्ध ठरेल! ;)
29 Jan 2014 - 12:28 pm | विनायक प्रभू
आमच्या सौ. ची सहमती स्विकारा.
29 Jan 2014 - 12:49 pm | पैसा
=))
29 Jan 2014 - 6:10 pm | परिंदा
पन चिंपाझी आनि डुक्कर यांचा संकर कसा झाला?
लयच ब्येशिक प्रश्ण हाय
30 Jan 2014 - 10:27 am | सुबोध खरे
चिंपॅन्ज़ी लय चावट असतय बघा. काय पण करतय.
30 Jan 2014 - 3:34 pm | प्रसाद गोडबोले
खरेकाका ,
www.misalpav.com/user/21410/authored ही तुमची स्वाक्षरी आहे का ?
कारण
हे असं वाचलावर , मला वाटलं की चावट चिंपाझी च्या करामती दाखवणारी लिन्क दीलीत की काय आपण ;) :D
30 Jan 2014 - 4:17 pm | कवितानागेश
मलापण तसंच वाटलं होतं. :P
30 Jan 2014 - 4:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
बघा आता सर्व डॉ मॅक-कार्थीच्या विरोधकांनो... अपघाताने अचानक काही अनपेक्षित परिणाम पुढे येऊ याचे हे उत्तम उदाहरण आहे !
31 Jan 2014 - 7:52 pm | चिन्मय खंडागळे
लोकहो, आंतरप्राणीय विवाहाचे हे भयंकर दुष्परिणाम पहा.
http://www.youtube.com/watch?v=OSDRbX0zK6o