मानव : चिंपँझी आणि वराह यांच्या संकरातून बनलेला प्राणी ???
"प्रायमेट नावाच्या पूर्वज प्रजातीपासून माणूस आणि ग्रेट एप प्रकारची माकडे उत्क्रांत झाली" आणि "ही उत्क्रांती डार्विनच्या सिद्धान्ताबरहुकूम हळूहळू होत गेली" हे दोन सिद्धांत शास्त्रीय जगतात आणि जनसामान्यात चांगले मान्यता पावलेले आहेत. एका शास्त्रीय संशोधनाला सुरुंग लावणारे इतर शास्त्रीय सिद्धांत मांडले जात नाहीतच असे नाही. पण वरच्या या दोन गोष्टी शास्त्रीय जगतात बर्यापैकी जम धरून बसलेल्या आहेत... किंवा खरेतर "आताआतापर्यंत जम धरून बसलेल्या होत्या" असेच म्हणावे लागेल.
कारण आता त्या गोष्टींनाही सुरुंग लावणारा सिद्धांत अमेरिकेतील जॉर्जिया युनिव्हर्सिटीतल्या डॉ युजीन मॅक्-कार्थी यांनी मांडला आहे. त्यांच्या सिद्धान्ताप्रमाणे माणूस चिंपँझी मादी आणि वराह नर यांच्या संकरापासून झालेला प्राणी असावा याला भरपूर शास्त्रीय पुरावा आहे.
डॉ युजीन मॅक्-कार्थी ही आसामी सामान्य शास्त्रज्ञ नाही. संकरशात्रातल्या जागतिक स्तराच्या मोजक्या तज्ज्ञामध्ये त्यांची गणना होते. त्याचे प्राणी-संकरावरचे मूलभूत संशोधन हजारो संशोधन लेखांमध्ये दुवे (रेफरन्स) म्हणून वापरले गेले आहे. त्यांच्या सद्याच्या या सिद्धान्ताला शास्त्रीय जगतात सावध पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी त्यासाठी दिलेल्या कारणपरंपरेची स्तुतीच होत आहे... त्यांना सरळ सरळ वेडा म्हणायला शास्त्रीय जगतात अजून कोणी पुढे आले नाही यावरून त्यांच्या सिद्धान्ताच्या शास्त्रीय भक्कमतेची आपल्यासारख्या त्याबाबतीत तज्ज्ञ नसलेल्यांनाही अप्रत्यक्ष कल्पना यावी.
त्यांच्या सिद्धान्ताच्या पाठिंब्यासाठी त्यांनी मांडलेले आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेले काही मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः
१. माणूस आणि चिंपँझी जनुकशास्त्राप्रमाणे जवळचे असले तरी त्यांच्यामध्ये खूपच फरक आहेत आणि ते का हे विशद करणारा दुवा म्हणून कोणताच प्राणी या दोघांमध्ये नाही.
२. चिंपँझीच्या जनुकांच्या जवळपासही येणार नाहीत अशी बरीच जनुके मानवात आहेत आणि ती जनुके वराहात आहेत.
३. मुख्य म्हणजे ही वेगळी जनुके इतर प्रायमेट्स मध्येही नाहीत... म्हणजे ती प्रायमेट, ग्रेट एप्स आणि सद्या मान्यता असलेल्या मानवाच्या पूर्वजांकडून मानवाला मिळणे शक्य नाही. त्यामुळे ती फार वेगळ्या प्राण्याच्या संकरातून मिळण्याची शक्यता सबळ बनते.
४. वराह व मानवाच्या जनुकीय साम्यांमुळेच हृदयाच्या झडपांचे, कातडीचे आणि मूत्रपिंडाचे रोपण किंवा मधुमेहाविरुद्ध वापरले जाणारे इन्शुलीन याकरिता वराह याच प्राण्याची निवड केली गेली आहे कारण काही जनुकीय साम्यांमुळे ते अवयव अथवा इन्शुलीन मानवी शरीर जास्त सहजपणे स्वीकारते (रिजेक्शन रिअॅक्शन कमी प्रमाणात होते). हीच गोष्ट जनुकशास्त्रीयदृष्ट्या वराहाला जवळचे आणि माणसाला वराहाइतकेच दूरचे असलेल्या कुत्रा, शेळी अथवा अस्वल या प्राण्यांबाबत शक्य होत नाही.
५. जनुकशास्त्रियदृष्ट्या बर्याच वेगळ्या असलेल्या प्राण्यांमधील संकर जरी नेहमीची गोष्ट नसली तरी प्रयोगशाळेत आणि निसर्गातही ही गोष्ट फार अशक्य अथवा अगदी फारच मोठा अपवाद नाही. डॉ युजीन मॅक्-कार्थी यांच्या Handbook of Avian Hybrids of the World या पुस्तकात पक्षीजगतातले ४,००० पेक्षा जास्त हायब्रिड्स नोंदलेले आहेत. येथे सस्तन प्राण्यांच्या अनेक संकरांची यादी व माहिती मिळेल.
६. संकरित प्राण्यांत वंध्यत्वाचे प्रमाण खूपच असते. जीव-इतिहासात असे बहुतेक संकर प्रजनन करण्यास असमर्थ असल्याने नष्ट झाले आहेत. आजही मानवात सर्वसाधारण प्राण्यांपेक्षा वंध्यत्वाचे प्रमाण लक्षणीय आहे. आधुनिक मानव जन्माला येऊन दोन लाख वर्षे लोटली आहेत. इतका काळ वंध्यत्व सुधारायला मिळूनही त्याचे इतके प्रमाण आहे म्हणजे सुरुवातीच्या काळात तर ते खूपच मोठे असले पाहिजे. संकराच्या सिद्धान्ताच्या बाजूचा हा एक अप्रत्यक्ष पुरावा आहे.
माणसाच्या दोन लाख वर्षांच्या इतिहासात त्याच्या अनेक वंशावळी तयार झाल्या. त्यातील इतर सर्व नष्ट होऊन फक्त आता जिवंत असलेली एकुलती एक वंशावळ एकाच नर आणि मादीपासून (जेनेटिक अॅडम व ईव्ह) निर्माण झाली आहे हे तर सिद्ध झाले आहेच. इतर वंशावळी हळूहळू अस्तंगत होण्याचे वंध्यत्व हे एक महत्त्वाचे कारण असू शकते आणि केवळ योगायोगाने निर्माण झालेल्या काही उत्परिवर्तनांमुळे आपली आताची वंशावळ शिल्लक उरली आहे असेही असू शकेल. (हा इटॅलिक्समधला आपला माझा लॉजिकल अंदाज... एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीत आपलेपण दोन पैसे असले पाहिजेतच ना राव ;) )
७. डॉ युजीन मॅक्-कार्थींचा सिद्धांत केवळ शास्त्रीय ज्ञानावर आणि शास्त्रीय सारासारविवेकावर (लॉजिक) बेतलेला आहे, त्यामुळेच अजून तरी त्याला इतर शात्रज्ञांकडून सरळ सरळ आव्हान पुढे आलेले नाही किंवा त्याची चेष्टाही झालेली नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम लेख व विचार!
अतिशय उत्तम,
सर्व विद्या मुखोद्गत करणे अति आवश्यक
क्षमा करा, मी फक्त दोन पाय
आपण आपल्याया प्रिय अशा
आम्ही तर करणार बुवा डुकराचा
तुम्ही उतम रित्या उत्क्रांत
कस्स्च्चं हो.. गर्दीबरोबर
माणसाचं पार डुक्कर केलंसा की.
मी पण तेच म्हणत होतो.
रोचक संशोधन आहे.
लेख आवडला...
हम्म्म्म! बघू अता पुढे काय
ह्म्म्म...
अतिशय उत्तम लेख,
अतिशय उत्तम लेख,
चला म्हणजे मी विचारवंतांना
गुगलवर हे असं काहीतरी सापडलं
अप्रतिम माहिती!
नवीनच माहिती.
अतिशय रोचक संशोधन आहे!
तुमचं लेखन वाचून नेहेमीच
रोचक .
आयला..
लोल
म्हणजे आता पोर्क खणं म्हणजे
:)
नवीन माहिती!
कुणाला थोडे मांजराचे जीन्सपण
नाही हो... कोणीही काहीही
हा दावा अजून फक्त ६
हा धागा टाकायचा राहिलाच...
अनेक मान्यवर पियर्स जून २०१३
मी त्या संशोधकाच्या बाजूने
लेखातली वाक्यं, लेखावर आलेले
माझ्या पुरता तरी डोळे उघडणारा
:)
ही चर्चा पुढे चालवावी असे
तुम्हाला उपदेश करण्याचा हेतू
नविन माहिती.
फरक एवढाच आहे कि पूर्वी माणसे
माणसाची गोरी कातडी आणि
अवांतर
आता (जर पुढे हे संशोधन खरे
अर्थातच
बिनतारी(wireless) संदेश वहन
तेवढंच नाही तर टिव्ही*दृष्टी
व्युत्पत्ती बरोबर, फक्त अगोदर
वरच्या टीव्ही*दृष्टी ऐवजी
हा हा हा