जिजामाता उद्यान कट्ट्यासाठी सर्वांना सहकुटूंब आमंत्रण.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
18 Jan 2014 - 9:18 pm

भायखळ्याचं जिजामाता उद्यान.

जवळजवळ ५० एकर विस्तीर्ण परिसरावर दीडेकशे वर्षांपासून उभं असलेलं हे उद्यान मुख्यता प्राणिसंग्रहालय म्हणून प्रसिद्ध. इथे लोक येतात ते प्राणी-पक्षी बघायला. हल्ली तिथे फार थोडे प्राणी शिल्लक आहेत. मात्र प्राणिसंग्रहालय असलेल्या या उद्यानात अनेक दुर्मीळ आणि आगळेवेगळे वृक्षही आहेत, हे फार थोड्यांना माहीत असेल.

हे एक समृद्ध बोटॅनिकल गार्डनच आहे. निसर्गाने फुलांच्या रूपाने रंगांची मुक्त उधळण केली की इथलं वृक्षवैभव जास्तच खुलून दिसतं. अगदी न चुकवण्यासारखी ही रंगपंचमी निसर्गवेडे दर वर्षी बघतातच. आता फुलोरा यायला सुरुवात झाली आहे, मग रसिक मिपाकरांनाही तो बघायला नक्कीच आवडेल, म्हणून हा ‘भटकंती कट्टा’.

दिनांक : २६ जानेवारी २०१४

वेळ : सकाळी ९:३०

ठिकाण : जिजामाता उद्यान , भायखळा येथील तिकीटाची खिडकी.

साधारण वेळे नुसार कार्यक्रम.

सकाळी १० ते ११:३० पर्यंत झाडांची माहिती घेणे. त्या दिवशी माटूंगा येथील "उडिपी श्रीक्रुष्ण बोर्डींग" ह्या हॉटेल मध्ये फीस्ट आहे.जवळ पास १६ ते १८ पदार्थ ते १६० किंवा १८० रु.त देणार आहेत.त्यांनी १२ वाजेपर्यंत यायला सांगीतले आहे.तेथे जेवून मग कट्ट्याचे विसर्जन करण्यात येईल.खर्च प्रत्येकाने आपला आपण करायचा आहे.

दरवेळी आपण फक्त मिपाकरच भेटतो.ह्यावेळी आपण आपल्या कुटुंबासकट भेटू या.

मी आणि माझी बायको मुले नक्की येत आहोत.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुधांशुनूलकर's picture

18 Jan 2014 - 9:50 pm | सुधांशुनूलकर

काही दिवसांपूर्वी मुलुंड कट्ट्यादरम्यान उपस्थित मिपाकरांना मनातला विचार सहजच बोलून दाखवला होता, की या जानेवारी-फेब्रुवारीच्या दिवसात भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातल्या दुर्मीळ वृक्षांना फुलोरा येतो, तो बघायला आपण जाऊ या. कट्ट्याला उपस्थित मिपकरांनी ही कल्पना उचलून धरली आणि नंतर विमेनी कट्टा वृत्तान्तामध्ये या कल्पनेची ‘झाकली मूठ’ ठेवूनही, कट्टा वृत्तान्ताला प्रतिसाद देणाऱ्या (सूड, पैसा, जोशी’ले) मिपाकरांनी या ‘सस्पेन्स’ कल्पनेची वाट पाहत आहोत, असं लिहिलं. त्यामुळे मग हे मनावर घेऊन, सर्वेक्षण करण्यासाठी मी आणि विलासराव यांनी २९ डिसेंबरला उद्यानात एक चक्कर मारली. त्या वेळी विशेष फुलोरा आला नव्हता, पण नंतरच्या आठवड्यात मात्र फुलोऱ्याची चिन्ह दिसायला लागली होती. मग मुक्त विहारिंशी सतत संपर्कात राहून शेवटी २६ जानेवारी ही तारीख ठरवली आहे.
तेव्हा सर्वांनी स.कु.स.प. या.

सर्वांचाच,
सुधांशुनूलकर

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Jan 2014 - 1:43 am | विश्वनाथ मेहेंदळे

आयामिन !!!

या टायमाला बी चानस हुकनार बगा !

मुक्त विहारि's picture

18 Jan 2014 - 10:06 pm | मुक्त विहारि

आता तुम्हीच पुढचा कट्टा ठरवा....किंवा तुमच्या सोईने सवडीने बोलवा आम्ही सगळे नक्की येवू...

चांगल्या माणसांना भेटायला माझी नेहमीच तयारी असते.

आनंदराव's picture

19 Jan 2014 - 12:55 pm | आनंदराव

नक्कीच !

चांगल्या माणसांना भेटायला माझी नेहमीच तयारी असते.

माताय म्हंजे आमचा पत्ता कट. ;)

मुक्त विहारि's picture

27 Jan 2014 - 5:56 pm | मुक्त विहारि

भेटण्यासाठी तुमचा पत्ता नक्कीच कट केला आहे...

तुम्ही मिपाच्या बल्लवाचार्यांपैकी एक असल्याने तुम्हाला भेटण्यात नाही तर तुमचे अपहरण करण्यात जास्त इंटरेस्ट आहे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jan 2014 - 10:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

...नंतरच्या आठवड्यात मात्र फुलोऱ्याची चिन्ह दिसायला लागली होती.

या अनवट कट्ट्याला शुभेछा ! भरपूर फोटोंसकट वर्णन त्वरीत हवे हे नोंदवून ठेवत आहे :)

इन्दुसुता's picture

18 Jan 2014 - 10:16 pm | इन्दुसुता

कट्ट्यासाठी शुभेच्छा.
फुलोर्‍यांचे फोटो नक्की टाकावेत ( अशी विनंती )!

प्राणी म्हणजे चार पायांचे प्राणी आणि पक्षी म्हणजे पंखामुळे आकाशात ऊडता येणारे पक्षी असे सविस्तर लिहा. :)

दोन पायांचे चालतेबोलते प्राणी आणि पक्षी :) बघायला प्राणिसंग्रहालयात कशाला यायला पाहिजे? ते तर कुठेही दिसतात. कुठे ते वेगळे सांगायची गरज नाही आहे. :)

आधी सांगितल्याप्रमाणे, यावेळी मी विमेकाका येणार असतिल तरच येणार आहे. मला पुन्हा एकदा रिस्क घ्यायची नाही आहे.
आधीच सांगतो, यावेळी कट्टयाचा वृत्तांत लिहिण्याची जबाबदारी घेणे मला जमणार नाही.

आता नेहमीच्या सवयीप्रमाणे काही शंका…

११:३० पर्यंत भायखळ्याला जिजामाता उद्यानात थांबल्यावर १२ वाजेपर्यंत माटुंग्याला उडिपी श्रीकृष्ण बोर्डींग येथे पोहोचणे शक्य आहे का? नाही, तुम्ही वरती म्हणल्याप्रमाणे हॉटेल मध्ये फीस्ट असल्याने, आपल्याला जायला उशिर झाल्यास (पुणेकरांसारखा अपमान करून) हॉटेलमध्ये घेण्यास नकार दिला तर?

भेटण्याचे ठिकाण जिजामाता उद्यान, भायखळा येथील तिकीटाची खिडकी आणि भा.प्र.वे. सकाळी ९:३० आहे. काही कारणाने (रविवार, मरे चा मेगा ब्लॉक, गणराज्य दिनाची गर्दी इ.) चुकुन येण्यास उशिर झाल्यास काय?

जाताजाता, भारतात, २६ जानेवारीला गणराज्य दिनानिमित्त कोरडा दिवस आहे. त्यामुळे शनिवारी २५ तारखेला…

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Jan 2014 - 1:40 am | विश्वनाथ मेहेंदळे

११:३० पर्यंत भायखळ्याला जिजामाता उद्यानात थांबल्यावर १२ वाजेपर्यंत माटुंग्याला उडिपी श्रीकृष्ण बोर्डींग येथे पोहोचणे शक्य आहे का?

जवळच पर्शियन दरबार आहे. रौवार साजरा करु.

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 7:45 am | मुक्त विहारि

हा पण ऑप्शन चांगला आहे.

ज्यांना पर्शियन दरबारला जायचे असेल, ते तिथे जातील.

मी आणि माझे कुटुंबिय माटुंग्याला जावू.

मोक्षदा's picture

18 Jan 2014 - 10:53 pm | मोक्षदा

जिजामाता उद्यान कट्ट्याला शुभेच्छा.
मला त्याच वेळेस झेंडा वंदनासाठी जावे लागणार आहे.

बर्फाळलांडगा's picture

19 Jan 2014 - 12:18 am | बर्फाळलांडगा

येणार. किती सुरेख उपक्रम.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Jan 2014 - 1:37 am | विश्वनाथ मेहेंदळे

नक्की ???? या, वाट बघतो !!!

बर्फाळलांडगा's picture

19 Jan 2014 - 3:55 am | बर्फाळलांडगा

तोंड बघणे इतके सोपे नाही ते आरशात.....

प्रभाकर पेठकर's picture

19 Jan 2014 - 1:50 am | प्रभाकर पेठकर

कट्ट्याला दूरुनच शुभेच्छा...
पानाफुलांची आणि वृक्षराजीची ओळख करून घेण्यास खूप आवडले असते परंतु नाईलाज आहे.....

आताच १४ ते १७ जानेवारीला येथे मुंबई महानगरपालिकेचा फ्रूट फ्लॉअर ट्री शो झाला . खूप चांगली रोपे मिळतात .कोलकात्यापासूनचे नर्सरीवाले फळझाडे विकायला आणतात .पण यावर्षी शनि रवि आले नाहित . :(

श्रीरंग_जोशी's picture

19 Jan 2014 - 8:49 am | श्रीरंग_जोशी

या कट्ट्याची कल्पना आवडली.

भारताबाहेर असल्याने दुरूनच शुभेच्छा!! फोटोजसकट वॄत्तांताची प्रतिक्षा राहील.

ह्या निमित्ताने तो प्रत्यक्षात येईल.

उद्दाम's picture

19 Jan 2014 - 11:41 am | उद्दाम

एक मिपाकर आणि इतर ४-५ नॉन मिपाकर मित्र अशा ग्रुप आला तर चालेल का?

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2014 - 12:29 pm | टवाळ कार्टा

चायला बाडीगार्ड???

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jan 2014 - 1:11 pm | अत्रुप्त आत्मा

=))

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 6:16 pm | मुक्त विहारि

हा कौटंबिक कट्टा आहे.

तुम्ही एकटेच या किंवा तुमच्या जोडीदाराला घेवून या.

येण्यापुर्वी महाभारत मात्र नक्की वाचून या.

त्यात श्रीक्रुष्णाने दुर्योधनाकडे न जेवता विदुराकडे जेवण घेणे का पसंत केले? ह्याची फार सुंदर कारण मीमांसा केली आहे.

(बाय द वे.... इतर काही लोकांसारखे, तुम्हाला पण नीट वाचता येत नाही, असे दिसत आहे.)

बर्फाळलांडगा's picture

19 Jan 2014 - 7:36 pm | बर्फाळलांडगा

चिडू नका हो.

मुक्त विहारि's picture

20 Jan 2014 - 12:01 am | मुक्त विहारि

ह्यात चिडायचा काय संबंध?

असो....

आपण सुज्ञ आहातच ..... हे वेसांनलगे..

बर्फाळलांडगा's picture

20 Jan 2014 - 12:40 am | बर्फाळलांडगा

बाय द वे.... इतर काही लोकांसारखे, तुम्हाला पण नीट
वाचता येत नाही, असे दिसत आहे व् येण्यापुर्वी महाभारत मात्र नक्की वाचून या. ..... ही परस्पर विधाने कशाच्या भरात केली ?

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2014 - 12:57 am | टवाळ कार्टा

वाचता येत नाही, असे दिसत आहे व् येण्यापुर्वी महाभारत मात्र नक्की वाचून या. ..... ही परस्पर विधाने कशाच्या भरात केली ?

ते महाभारत वाचल्यावर कळेल :P

मुक्त विहारि's picture

20 Jan 2014 - 6:22 pm | मुक्त विहारि

अहो,

तो प्रतिसाद "उद्दाम" नावाच्या व्यक्तीला आहे, तुम्हाला नाही....

असो,

सुधांशुनूलकर's picture

20 Jan 2014 - 10:48 am | सुधांशुनूलकर

मिपा कट्ट्याला फक्त मिपाकरांनीच येणं अभिप्रेत आहे.

सर्वांचाच,
सुधांशुनूलकर

निवेदिता-ताई's picture

19 Jan 2014 - 1:08 pm | निवेदिता-ताई

शुभेच्छा...:)

जेपी's picture

19 Jan 2014 - 1:13 pm | जेपी

शुभेच्छा . फोटो आणी व्रुत्तांत एकत्रच येऊ द्या .

सोबत लहान मुले असतांना प्राणी व झाडे पाहुन २ निघणे शक्य आहे का ? ऊलटे केले तर ? आधी पोटोबा मग ....

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 7:14 pm | मुक्त विहारि

आधी पोटोबा मग ....

असे केले तरी चालेल.

पण सगळे मिपाकर काय म्हणतात ते बघू या.

फीस्ट्,फुलोरा आणि प्राणी , हे जर ३ कार्यक्रम असतील तर..

फुलोरा आणि फीस्ट वर्षातून कमीवेळा एकत्र येतात.प्राणी कधीही बघता येतात.

त्यामुळेच आम्ही, फुलोरा आणि फीस्ट अशी सांगड घातली.

शिवाय, संध्याकाळी ४ नंतर होणारी लोकलची गर्दी पण टाळायची आहे.

असा थोडा फार विचार करून हा कार्यक्रम आखला आहे.

चैदजा's picture

19 Jan 2014 - 7:47 pm | चैदजा

सोबत लहान मुले असतांना.
म्हणुन मी प्राणी देखील त्यात समाविशले. ४-६ वर्ष्याच्या मुलांना त्यातच जास्त रस.

असो. काही हरकत नाही. म्हणजे या मंडळीना घरी ठेऊन येणे क्रमप्राप्त.

अजिबात घरी ठेवू नका.

त्यांना पण आई-वडील हवे असतात.

आपण काही तरी सुवर्ण मध्य काढू...

बर्फाळलांडगा's picture

19 Jan 2014 - 7:55 pm | बर्फाळलांडगा

.

सुधांशुनूलकर's picture

20 Jan 2014 - 10:42 am | सुधांशुनूलकर

उद्यानात फारसे प्राणी-पक्षी उरलेच नाहीयेत. फुलोरा बघता बघता प्राणी-पक्षीही बघू. मुलांना प्राणी-पक्ष्यांचीही माहिती सांगू.
सकाळी येताना भरपूर न्याहरी करून येणं जास्त चांगलं. कारण उद्यानात कोणतेही खाद्यपदार्थ नेता येत नाहीत. (म्हणजेच, 'आधी पोटोबा' घरूनच करून यायचं.)
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मात्र जागोजागी आहे.

सर्वांचाच,
सुधांशुनूलकर

प्रदीप's picture

19 Jan 2014 - 7:15 pm | प्रदीप

विनोदी, अर्धवट माहितीवर आधारलेले धागे काढणार्‍या काही लोकांना बरोबर घेऊन जा, वाघाबिघांचे पिंजरे दाखवा. ह्या मंडळीस आत्मपीडनाची जबरदस्त संवय असल्याने पुढचे ते स्वतः आणि ते वाघसिंह बघून घेतील.

तदनंतर तुमचा कट्टा आनंदात पार पडावा :)

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 7:49 pm | मुक्त विहारि

"विनोदी, अर्धवट माहितीवर आधारलेले धागे काढणार्‍या काही लोकांना बरोबर घेऊन जा, वाघाबिघांचे पिंजरे दाखवा. ह्या मंडळीस आत्मपीडनाची जबरदस्त संवय असल्याने पुढचे ते स्वतः आणि ते वाघसिंह बघून घेतील."

मिपा वरची मंडळीच अशा लोकांना ठीक करतील.

बाय द वे,

वरील प्रतिसाद, प्रदीप ह्यांनाच आहे.

इतर सुज्ञ मंडळींनी अनावश्यक मध्येच लिहू नये.

हा 'बर्फाळलांडगा' नक्कीच कोणाचातरी डुआयडी आहे, जो संपादक मंडळाकडुन हाकलुन दिलेला आहे किंवा/आणि लाजेखातर केवळ महिनाभरापुर्वी याने आपला आयडी बदलला आहे.

संपादक मंडळ, माझा प्रतिसाद चुकीचा वाटल्यास अवश्य ऊडवा.

बर्फाळलांडगा's picture

19 Jan 2014 - 9:40 pm | बर्फाळलांडगा

संपादक मंडळ, माझा प्रतिसाद चुकीचा वाटल्यास अवश्य
ऊडवा.

सम चुकीचे वाटले म्हनून प्रतिसाद उडवत नाही रे. ते आक्शेपाहार्य असावे लागतात. थोड्याक्यात त्यात सम वर आक्षेप अथवा इतरांवर निसन्धिगद अर्वाच्य शब्दात चिखल फेक हावी अन्यथा माझेवर डु आयडी असल्ताचा बिन्बुडि आरोप तुला इथून निष्कासित व्हायला पुरेसा होता

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 9:49 pm | मुक्त विहारि

जाउ द्या हो....

बर्‍याच जणांची सही बरेच काही सांगून जाते....

दिपक.कुवेत's picture

19 Jan 2014 - 7:55 pm | दिपक.कुवेत

एक आगळावेगळा कट्टा होतोय ह्याचीच जबरदस्त उत्सुकता आहे. तेव्हा कट्टा झाल्यावर "फोटोसहित वर्णन" त्वरीत टंकावे हि विशेष विनंती.

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 8:10 pm | मुक्त विहारि

"कट्टा झाल्यावर "फोटोसहित वर्णन" त्वरीत टंकावे हि विशेष विनंती."

तुमच्या विनंतीचा नक्कीच मान राखल्या जाईल.

लीलाधर's picture

19 Jan 2014 - 10:23 pm | लीलाधर

मी पण येणार हजर

प्रचेतस's picture

19 Jan 2014 - 10:28 pm | प्रचेतस

सहकुटुंब काय रे लिल्या ;)

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 10:35 pm | मुक्त विहारि

ह्यालाच पुणेरी काड्या म्हणायचे का?

(अहो साहेब, जरा मस्करी करतोय हां.....तुम्ही रागावणार नाही ह्याची खात्री आहे.... नाहीतर उगाच मध्ये तोंड घालायला आम्हाला काही मुद्दामहून गहन विचार कर्रून हिमअस्वल चावलेले नाही, हे तुम्हास माहीत आहेच.)

संजय क्षीरसागर's picture

21 Jan 2014 - 1:46 pm | संजय क्षीरसागर

`चावलेले नाही' आणि `मुद्दामहून गहन विचार करुन'!! .....एका दगडात पक्षीच पक्षी!

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 10:31 pm | मुक्त विहारि

नक्की या...

लीलाधर's picture

19 Jan 2014 - 11:12 pm | लीलाधर

कोणी काही म्हणो लील्या येणार म्हंजे येणार काय ओ वल्लीदा काय म्हणताय ?

लील्या सौ. वैनिना अनाहिताचे सदस्यत्व मिळाले का बे?
;-)

लीलाधर's picture

20 Jan 2014 - 12:03 am | लीलाधर

मिळेल तेव्हा मिळेल णाही का? आणि काय कसा हैस ?

अजुन नाही ना? मग मिळाल्यावरच कट्टा वगैरे बर का? तोपर्यंत निट संसार करा.
आणि म्य़ा मजेत बघ. पार्टी कवा देणार ?

कोणता मी झेंडा घेऊ हाती हा प्रश्न २६ जानेवरीला तरी येणार नाही .

काही मुलांचे शाळेत झेंडावंदन असणार सकाळी .

संजय क्षीरसागर's picture

21 Jan 2014 - 1:48 pm | संजय क्षीरसागर

याला म्हणतात नांवाला जागणं!!

रोहन अजय संसारे's picture

20 Jan 2014 - 9:38 am | रोहन अजय संसारे

मी या वेळी यायचे नक्की तारवले आहे. तरी विंनती कि सगळ्या मिपा कारानी नवीन सभासदाला सांभाळून घ्यावे.

ऋषिकेश's picture

20 Jan 2014 - 10:57 am | ऋषिकेश

कट्ट्याचे निमित्त प्रचंड आवडले आहे.
घरी कओंतुंबिक कार्यक्रम असल्याने येता येणार नाही. मात्र हे फुलोरे बघायाला एक मुंबईवाॠ नक्कीच करेन येत्या दोन-चार आठवड्यात.

हा फुलोरा असतो कधीपर्यंत?

राही's picture

20 Jan 2014 - 12:47 pm | राही

राणी बागेत ऊर्वशी (Amherstia Nobilis) हा एक दुर्मीळ असा छोटा वृक्ष आहे. त्याची फुले अत्यंत सुंदर दिसतात. पण तो बहुधा मार्चमध्ये फुलतो.
शुभेच्छा.

सुधांशुनूलकर's picture

20 Jan 2014 - 1:58 pm | सुधांशुनूलकर

उद्यानात दोन अ‍ॅमहर्स्टिया आहेत. दोन्ही सध्या फुलले आहेत.

पण तो बहुधा मार्चमध्ये फुलतो.

तो जानेवारी-फेब्रुवारीत फुलतो.

सर्वांचाच,
सुधांशुनूलकर

राही's picture

20 Jan 2014 - 3:10 pm | राही

फुलला आहे का? वा छानच. वृक्षवेड्यांसाठी ही एक बातमी आणि पर्वणीच आहे.
राणी बागेत गेल्या काही वर्षांत मूळ झाडापासून दुसरे रोपटे तयार करून लावलेले आता चांगले तराराले आहे. बियाही क्वचित रुजतात असे गूगलवर आहे. मागच्या वर्षी एका वृक्ष-निरीक्षणभेटीदरम्यान एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यातही तुरळक फुले होती तेव्हा आमच्या मार्गदर्शकांनी तो मार्चमध्ये चांगला फुलतो असे सांगितले होते. अर्थात हवामानानुसार बहराचा काळ थोडा मागेपुढे होतोच.
गेल्या वर्षी नोवेंबरमध्ये उत्तर बंगालात पेल्टोफोरम वेड्यासारखा बहरलेला पाहिला होता.

यशोधरा's picture

23 Jan 2014 - 9:26 am | यशोधरा

वृक्षांचे फोटो टाकाल का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Jan 2014 - 11:56 am | विश्वनाथ मेहेंदळे

नाही !!!
;-)

प्रमोद देर्देकर's picture

20 Jan 2014 - 1:02 pm | प्रमोद देर्देकर

मुला बरोबर शाळेत झेंडावंदना साठी जायचे आहे, नाहीतर सह़कुटूंब आलो असतो. कट्ट्याला हार्दिक शुभेछा.
अवांतरः- आयला लय भारी हां! त्यांनी आत्ता पर्यंत जेवढे कट्टॅ काढले तेवढे सगळे कट्टे यशस्वी करुन दाखवले आहेत.
(ए कोण रे तो म्हणतोय की मु.विं.ना सं.पा.मं.ने कट्टा नियोजन अधिकारी करुन टाकावे. ( आमचे ही अनुमोदन))

प्रयत्न केल्या जाईल !! गुरुवारपर्यंत काय ते फायनल कळवतो.

काही अपरिहार्य कारणास्तव येणे शक्य होत नाहीये.

प्रसाद गोडबोले's picture

20 Jan 2014 - 2:49 pm | प्रसाद गोडबोले

या वेळेला नक्की भेटुया !! :)

स्वाती दिनेश's picture

21 Jan 2014 - 1:36 pm | स्वाती दिनेश

कट्ट्याचे निमित्त आवडले,
शुभेच्छा!
स्वाती

सन्दीप मुम्बई's picture

21 Jan 2014 - 3:17 pm | सन्दीप मुम्बई

राणीबाग जवळची हॉटेल

पर्शिअन दरबार - नॉन वेज खास करून बिर्याणी
Gloria हॉटेल - इराणी हॉटेल - चिकन बिर्याणी व पाणी काम चहा , सकाळी खिमा - नाष्ट्या साठी उत्तम ( my Fav )
भायखळाबेकरी - केक ,पुडिंग , बन मस्का , प्याटीस.

किंवा taxi ने सरळ माटुंगा गाठ , १० मिनिटात पोहचाल ,( नवीन उड्डाणपुल)

-संदीप

सचिन तेली's picture

23 Jan 2014 - 1:02 am | सचिन तेली

रिगल ब्रेकरी म्हनायचे आहे का तुम्ह्हाला ?

सन्दीप मुम्बई's picture

23 Jan 2014 - 1:23 pm | सन्दीप मुम्बई

पर्शिअन दरबार शेजारी भायखळा बेकारी

palace सिनेमा शेजारी , स्टेशनाला लागून रिगल बेकारी - दोन्हीही उत्तम

याच उद्यानात डॉ भाऊ दाजी लाड संग्रहालय सुद्धा आहे. पण बराच वेळ लागेल.

१. सुबोध खरे

२. सिधांशू नुलकर

३. मुक्त विहारि

४. अजया

काजुकतली's picture

23 Jan 2014 - 3:34 pm | काजुकतली

अरे, महापालिकेचे फळे आणि वृक्ष्जांचे प्रदर्शन पार पडले काय? यावर्षी लवकर ठेवले. २४-२६ जान किंवा फेब्रुअवारीचा पहिला आठवडा असे आयोजन अस्ते नेहमी. मला जायचे होते, यावर्षी चुकले.

ज्यांना फुलोरा पाहण्यात रस आहे त्यांचा १०-११.३० या वेळेत माहितीसकट फुलोरा पाहुन होणार नाही. मी अनेकदा गेलेय फुलोरा पाहायला. आणि १० वाजता सुरू करुन आम्हाला १ ते २ वाजलेत बाहेर पडायला.

सुबोध खरे's picture

25 Jan 2014 - 8:40 pm | सुबोध खरे

अहो मग तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करा की.

येणे शक्य नाही! कट्ट्याला शुभेच्छा!

:-( कट्ट्याचे निमित्त आवडलं. प्रचंड इच्छा असूनही २६ ला शक्य नाही. कट्ट्याला शुभेच्छा! १ फेब, ते १४ फेबच्या मधे कधी झाला कट्टा तर नक्की कळवा.

मुक्त विहारि's picture

25 Jan 2014 - 10:37 pm | मुक्त विहारि

व्यनि केला आहे.

"अजया" ताईंच्या उत्तराच्या अपेक्षेत....

जोशी 'ले''s picture

25 Jan 2014 - 11:52 pm | जोशी 'ले'

यायचं होतं ...पण शक्य नाहि, कट्ट्याला शुभेच्छा

शिल्पा ब's picture

26 Jan 2014 - 5:53 am | शिल्पा ब

छान. समजा काही पक्षी प्राणी असलेच तर त्याचे फोटोही टाका नंतर.

शैलेन्द्र's picture

26 Jan 2014 - 10:45 am | शैलेन्द्र

खुप प्रयत्न करुनही नाही जमलं.. नेमकं पुण्याला यायला लागलयं आज.. :(