प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Namdeo-dhasal/...
दलित चळवळीतील आक्रमक नेतृत्वाला भावपूर्ण श्रध्दांजली!!
प्रतिक्रिया
15 Jan 2014 - 12:38 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
श्रद्धांजली
15 Jan 2014 - 12:48 pm | प्यारे१
आदरांजली.
चेपुवर सतिश तांबेंनी लिहीलेलं. ग्रेस, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर नि आता नामदेव ढसाळ सगळे कॅन्सरचे बळी ठरलेत. :(
15 Jan 2014 - 1:14 pm | सोत्रि
विनम्र श्रद्धांजली!
-(विद्रोही)सोकाजी
15 Jan 2014 - 3:00 pm | पैसा
श्रद्धांजली. एका वादळाची अखेर.
16 Jan 2014 - 3:15 am | विजुभाऊ
श्रद्धांजली. एका वादळाची अखेर.
गेलेल्या बद्दल वाईट लिहु नये. मात्र त्यांच्या पत्नीने( मल्लीका अमर शेख) यानी ढसाळांच्याबद्दल एक कविता लिहीली आहे त्यात त्या म्हणतात " आता मी कुठल्याही वादळाला भुलणार नाही कारन मला कळून चुकलय सगळी वादळे शेवटी जमिनीवरच विसावतात).
तेंडुलकरानी "कन्यादान " या नाटकात ढसाळांच्या व्यक्तीरेखीचे कम्गोरे चांगले टिपलेत
15 Jan 2014 - 3:03 pm | सचीन
श्रद्धांजली
15 Jan 2014 - 3:27 pm | अत्रुप्त आत्मा
विनम्र श्रद्धांजली!
15 Jan 2014 - 3:39 pm | हासिनी
भावपूर्ण श्रध्दांजली!!
15 Jan 2014 - 6:57 pm | Atul Thakur
शेवटच्या दोन वर्षात त्यांना ऐकायचं भाग्य लाभलं होतं. त्यावरुन त्याकाळात त्यांची भाषणे आणि ते स्वतः किती लोकप्रिय असतील याचा अंदाज आला. ओघवती शैली आणि अधुनमधुन राजकारणावर मिस्कील शेरे. ते लोकांना अक्षरश: खिळवुन ठेवीत.
15 Jan 2014 - 8:35 pm | माहितगार
'आक्रंदतो आहे माझा जीव' म्हणून सामान्यांना साद घालणारे प्रस्थापितांना हादरा देणारे
''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...'' सम्यकाचे संदेश देणारे
'आकाशाचे झुंबर तुटून पडले'
विनम्र आदरांजली
15 Jan 2014 - 8:35 pm | माहितगार
'आक्रंदतो आहे माझा जीव' म्हणून सामान्यांना साद घालणारे प्रस्थापितांना हादरा देणारे
''सम्यकाचे बोट धरून निघालो आहे मी, निवार्णाकडे-निर्वाणम्-शांतम्...'' सम्यकाचे संदेश देणारे
'आकाशाचे झुंबर तुटून पडले'
विनम्र आदरांजली
15 Jan 2014 - 11:35 pm | अर्धवटराव
दलीतांच्या सामाजीक आणि राजकीय एकजुटीला बुद्धींचं आणि वास्तवाचं अधिष्ठान देण्याची क्षमता असणारा विचारवंत गेला :(
16 Jan 2014 - 2:11 am | बर्फाळलांडगा
.
16 Jan 2014 - 11:50 am | भिकापाटील
.
16 Jan 2014 - 4:53 pm | मदनबाण
श्रद्धांजली !