लिझ्झी.... जगातील सर्वात सुंदर व्यक्ती

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Jan 2014 - 12:08 am

कोणीतरी सहज म्हणून यू ट्यूब वरची काही एक लिंक शेअर करते. केवळ ती शेअर करणारावर विश्वास असतो म्हणून मी ती लिंक उघडली. आणि आश्चर्याचा धक्का बसवा असा अनुभव येतो.
लिझ्झी - एक आगळी वेगळीच व्यक्ती. स्वतःला पूर्णपणे जाणून असलेली. स्वतःच्या कमतरतेवर मात करत ती बरेच काही सांगते. हा अर्थातवाचण्याचा नव्हे तर अनुभवन्याचा भाग आहे.
जीला जगातली सर्वात कुरूप व्यक्ती आहेस डोक्यात गोळी मारून आत्महत्या कर असे सल्ले मिळत होते.
ती स्वतःची कहाणी सांगते ते देखील कोणतीच सहानुभूती मिळवायला नव्हे तर तुम्हाला जगायचे बळ द्यायला.
हा व्हिडीओ बघितल्या नंतर आनंद सौंदर्य या सगळ्यांच्या व्याख्याच बदलुन टाकाव्या असे वाटते.
लिझी जीला एक दुर्धर व्याधी जन्मतःच आहे. ( या व्याधीत अंगावर मांस वाढत नाही ) डॉक्टरानी ती मुलगी कधीच वाढू शकणार नाही अशक्तच राहील असे सांगितले होते त्या सर्वांवर लिझ्झीने मात केली. तिच्या आईवडिलानी तिला नॉर्मल मुलांप्रमाणे वाढवले. शाळेत गेल्यानंतर इतर मुले तिला घाबरुन चेटकीन भूत असे म्हणु लागली. तिच्या आईवडीलानी लिझ्झीला कधीच न्यून वाटू दिले नाही. स्वतःचे वजन कधीच ६५ पौंडांच्या पलीकडे जाणार नाही. हे तीला माहीत आहे. डोळ्याने बाजुचे दिसत नाही याचे फायदे ती हसत हसत लिझ्झी सांगते. हे सर्व साम्गत असताना ती स्वतः बद्दल कुठेच न्यूनपणे बोलत नाही. लिझ्झी जे सांगते ते आपल्याला वेगळीच जाणीव / बळ देवुन जाते.

http://www.superstarmagazine.com/labelled-the-worlds-ugliest-woman-lizzie-talks-about-beauty-happiness/
हा व्हीडिओ इथे चढवायचा बराच प्रयत्न केला पण कोड मिळत नाही.

वावरविचार

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

11 Jan 2014 - 4:43 am | खटपट्या

नि:शब्द !!!!

इन्दुसुता's picture

11 Jan 2014 - 9:35 pm | इन्दुसुता

ब्रेव्ह इनडीड डझ स्टार्ट हियर!!!
विजूभाऊ धन्यवाद व्हिडिओ इथे दिल्याबद्दल.

स्पीचलेस! धन्यवाद विजूभाऊ!

बर्फाळलांडगा's picture

11 Jan 2014 - 9:59 pm | बर्फाळलांडगा

काय लायकी आहे आपली ?

पैसा's picture

12 Jan 2014 - 8:33 pm | पैसा

व्हिडिओ इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

विजुभाऊ's picture

13 Jan 2014 - 1:02 am | विजुभाऊ

खरे तर लिझ्झी ने ज्या पद्धतीने टीका पचवली. इतकेच नाही तर ती त्या सर्व टीकेला पुरुन उरली ते वाखाणण्यासारखे आहे.
लिझ्झीची कथा खरच इन्स्पिरेशनल आहे. व्होडीओ पाहिल्यावर आपण तिच्या धैर्या समोर अक्षरशः इस झाड की पत्ती वाटायला लागतो.

तुमचा अभिषेक's picture

26 Jan 2014 - 12:27 am | तुमचा अभिषेक

सही आहे.. स्मार्ट आहे मुलगी.. आपल्यातल्या मायनस पाँईटला बाजूला सारून, किंबहुना त्यालाच प्लस पॉईंट, आपली स्ट्रेंथ बनवून सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन बनलीय.. इन पॉजिटीव्ह मॅनर.. नक्कीच इन्स्पिरेशनल.. हॅटस ऑफ टू हर एन्ड बेस्ट विशेस ..

मीराताई's picture

13 Jan 2014 - 12:50 pm | मीराताई

ग्रेट.

इरसाल's picture

13 Jan 2014 - 1:08 pm | इरसाल

व्हिडो दिसत नाही पण वर्णनावरुन तिच्याबद्दलचा कर्यक्रम डिस्कव्हरीवर दाखवला होता पाहिलाय तो मी.

प्यारे१'s picture

14 Jan 2014 - 1:30 am | प्यारे१

हॅट्स ऑफ!
मीराताईंच्या परवाच्या लेखातला डिप्रेस्ड माणूस झटकन आठवला. जगण्यातली सहजसाध्यता, सुरक्षितता कदाचित आपल्या सारख्या नॉर्मल माणसांना 'पांगळं' बनवायला एक 'ढाल' ठरत असावी.

विजुभाऊ's picture

25 Jan 2014 - 8:50 pm | विजुभाऊ

मीराताई / प्रशान्त.
लिझ्झी बद्दल मी बर्‍याचजणाना साम्गितले.
आपण धट्टीकट्टी मणसे उगाच सबबी पुढे करत बसतो.
लिझ्झी ने तिच्या असामान्य दुर्धर व्याधीवर मात करुन पुढे आली ती इतकी आशावादी आहे की ती इतराना प्रोत्साहीत करते

स्वाती दिनेश's picture

26 Jan 2014 - 3:20 pm | स्वाती दिनेश

लिझ्झी आवडली,
नि:शब्द!
स्वाती

सुहास झेले's picture

28 Jan 2014 - 11:38 am | सुहास झेले

लिटरली स्पिचलेस !!!

वाचलेलं लिझ्झीबद्दल हल्लीच... हॅट्स ऑफ !!

मला कधी कधी हताश असे वाटायला लागले की लिझीचा व्हिडीओ यू ट्यूब वर पहातो.

राघव's picture

23 Oct 2023 - 2:25 pm | राघव

धन्यवाद विजुभाऊ! हा लेख सुटला होता.

याच अनुषंगानं एक कुठेतरी वाचलेली गोष्ट आठवली -

एक १० वर्षांचा लहान मुलगा. एका अपघातात त्याचा डावा हात खांद्यापासून जातो. आई-वडील आणि मुलगा सगळेच जवळ-जवळ डिप्रेशनमधे.
कुणाच्या तरी सल्ल्यानं, आई-वडील एका सेन्सेई कडे (मार्शल आर्ट्स गुरु) मुलाला घेऊ जातात. ते त्याची पाहणी करतात, त्याच्याशी जरा बोलतात आणि त्याला ज्युदो शिकवायला घेतात.
हळूहळू मुलगा आयुष्याला सरावतो, त्याला ज्युदोत गोडी लागते. पण बेसिक ज्युदो आल्यानंतर त्याचे गुरु त्याला फक्त एकच डाव शिकवतात. दुसरा कोणताही डाव ते त्याला शिकु देत नाहीत, करू देत नाहीत. मुलगा वैतागतो पण ऐकतो. काही वर्षांनंतर गुरु त्याला एक मोठी स्पर्धा खेळवतात. आणि तो जिंकतो! त्याला स्वतःलाही ते अनपेक्षीत असतं. गुरुंना विचारल्यावर ते सांगतात -
गुरू: "तुला ज्युदोतला दुसरा कोणता डावच येत नाही, त्यामुळे तू चुकुनही काही वेगळं करणार नाहीस. जो डाव तुला शिकवलाय तो ज्युदोतल्या अतिशय कठीण डावांपैकी एक आहे. त्यातल्या आक्रमण आणि बचावात तू आता जवळ जवळ निष्णात झाला आहेस. आणि त्यामुळं तुला हरवणं अशक्य आहे."
शिष्य: "असं कसं? मला तर डावा हातच नाही आणि इतर जण दोन्ही हात असूनही मला ज्युदोत हरवू शकणार नाहीत?"
गुरू: "होय, मी म्हणतोय ते खरं आहे. कारण या डावातल्या निष्णात व्यक्तीला हरवण्यासाठी एकच प्रतिडाव आहे आणि त्यासाठी त्या व्यक्तीचा डावा हात लागतो!"
एकुणात त्या मुलाची कमतरताच त्याची ताकद बनते!

अर्थात् ही कथा लोककथा असावी, खरी असेलच असं नाही. पण तरीही त्यातला गर्भितार्थ यत्किंचितही कमी होत नाही.