योगी पावन मनाचा

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
7 Jan 2014 - 5:41 pm

मुक्ता, नावाप्रमाणेच मुक्त असलेली निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपानाची ही सर्वात धाकटी बहिण. वयाने धाकटी असली तरी मोठमोठयांचा नक्षा आपल्या ज्ञानाच्या अधिकारावर क्षणात उतरवून टाकणारी ती तेजस्वी मूर्ती होती.

अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१ साली शुक्रवारी म्हणजेच इ. स. १२७९ ला जणू काही आदिशक्ती मुक्तेच्या रुपाने इंद्रायणीतिरी सिद्धबेटावर जन्माला आली. ज्ञानाने लखलख करणारी आकाशीची वीजच जणू चांदण्यांचा शीतल साज लेवून आपल्या ज्ञानी भावंडांना साथ देण्यासाठी भूतलावर अवतरली.

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या चार भावंडांमध्ये मुक्ता सर्वात धाकटी. परंतू आळंदीच्या ब्राम्हणांच्या सांगण्यानूसार जेव्हा त्यांच्या आई बाबांनी त्रीवेणी संगमात देहत्याग केला, तेव्हापासून या असाधारण कुटुंबाचे गृहिणीपणाची जबाबदारी मुक्तेवर पडली. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आले.

मुक्तेने आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. म्हणुनच तर पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला तिने अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे ज्ञानदादाचा मनावर बिंबवले. ही समजूत घालत असताना मुक्तेने उस्फुर्तपणे जे अभंग गायले तेच पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले. ताटीच्या अभंगात मुक्तेचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्तेने जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात.

-- १ --
संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥
तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥
थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥
रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥
ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- २ --
योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥
विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी ॥
शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥
विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ३ --
सुखसागरी वास झाला | उंच नीच काय त्याला ॥
अहो आपण जैंसे व्हावें | देवें तैसेंचि करावें ॥
ऐसा नटनाटय खेळ | स्थिर नाही एकवेळ ॥
एकापासुनी अनेक झाले | त्यासी पाहिजे सांभाळिले ॥
शून्य साक्षित्वें समजावें | वेद ओंकाराच्या नावें ॥
एकें उंचपण केले | एक अभिमानें गेलें ॥
इतकें टाकुनी शांती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ४ --
वरी भगवा झाला नामें | अंतरीं वश्य केला कामें ॥
त्याला म्हणूं नये साधू | जगीं विटंबना बाधू ॥
आपआपणा शोधून घ्यावें | विवेक नांदे त्याच्या सवें ॥
आशा दंभ अवघें आवरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ५ --
संत तेचि जाणा जगीं । दया क्षमा ज्यांचे अंगी ॥
लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥
इह परलोकीं सुखी । शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥
मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ६ --
एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले? ॥
उठे विकार ब्रह्मी मूळ । अवघे मायेचें गबाळ ॥
माय समूळ नुरे जेव्हां । विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥
ऐसा उमज आदिअंतीं । मग सुखी व्हावे संती ॥
चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ७ --
ब्रह्म जैसें तैशा परी । आम्हा वडील भूतें सारी ॥
अहो क्रोधें यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥
जीभ दातांनी चाविली । कोणें बत्तीशी तोडीली? ॥
मन मारुनी उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ८ --
सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥
बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥
जीव जीवासी पैं दयावा । मग करुं नये हेवा ॥
तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ९ --
सांडी कल्पना उपाधी । तीच साधूला समाधी ॥
वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥
पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥
एक मन चेष्टा करी । भूतें बापुंडी शेजारी ॥
अवघी ईश्वराची करणी । काय तेथें केलें कोणीं ॥
पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- १० --
गिरीगव्हारे कशासाठीं । रागें पुरवीली पाठी ॥
ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो कां द्वेषी ॥
घर बांधिलें डोंगरीं । विषया हिंडे दारोदारीं ॥
काय केला योगधर्म । नाही अंतरी निष्काम ॥
गंगाजळ ह्रदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- ११ --
अहो क्रोधे यावें कोठें । अवघे आपण निघोटे ॥
ऐसें कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥
ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥
वेळे क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥
ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

-- १२ --
अवघी साधन हातवटी । मोलें मिळत नाही हाटीं ॥
शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥
कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥
लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुदल ठायीचे ठायीं ॥
तुम्ही तरुनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

ज्ञानियांच्या राजाची समजूत घालण्याच्या निमित्ताने ताटीच्या अभंगांमधून जगाला ईतका मोलाचा संदेश देणारी चिमुरडी मुक्ता तेव्हा जेमतेम नऊ दहा वर्षांची असेल.

मुक्ता अतिशय स्पष्टवक्ती होती. एकदा ज्ञानदेवादी भावंडं पंढरपूरला गेली असताना तिथं त्यांना संत नामदेव भेटतात. त्यांना ज्ञानदेव नमस्कार करतात पण नामदेव त्याना नमस्कार करीत नाहीत. आपण ज्येष्ठ भक्त असल्यानं ज्ञानदेवांनी आपल्याला नमस्कार करणं योग्यच आहे, असं नामदेवाला वाटतं. ही गोष्ट मुक्ताईला रुचत नाही. ती नामदेवाला म्हणते -

अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाही गेला?
मान अपमान वाढविसी हेवा। दिवस असतां दिवा हातीं घेसी।।
परब्रह्मसंगे नित्य तुझा खेळ। आंधळ्याचे डोहळे का बाट जाले?
कल्पतरुतळवटी इच्छिली ते गोष्टी। अद्यापि नरोटी राहिली कां?
घरी कामधेनू ताक मागूं जाये। ऐसा द्वाड आहे जगामाजी।।

अशी नामदेवांची कानउघाडणी करुनच मुक्ताई थांबत नाही तर नामदेवांना भक्तीचं खरं मर्मच कळलं नाही, त्यासाठी योग्य गुरुपाशी जाऊन उपदेश आणि मार्गदर्शन घ्यायला हवं असा सल्लाही ती देते -

झालासी हरिभक्त तरी आम्हा काय? आंतुली ती सोय न ठाउकी।
घेउनि टाळदिंडी हरिकथा करिसी। हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे।।
गुरुवीण तुज नव्हेचि गा मोक्ष। होशील मुमुक्षु साधक तूं।
तुझ रुप तुवां नाही ओळखिलें। अहंतेतें धरिले कासयासी?

मुक्तेने केलेल्या या कानउघाडणीनंतर नामदेवरायांचा अहंकार निवला. त्यांनी विसोबारायांना आपला गुरु केले.

जी गत भक्तराज नामदेवांची, तीच गत योगिराज चांगदेवांची. योगसामर्थ्याने चौदाशे वर्ष जगणार्‍या चांगदेवाचं कोरं पत्र पाहताच ती उद्गारली, "अरेरे... एव्हढी चौदाशे वर्ष जगूनही हा चांगदेव योगी कोरडाच राहीला.". याच कोर्‍या कागदावर ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या लिहून चांगदेवाला पाठविल्या. आणि या चौदाशे वर्ष म्हातार्‍या बाळाने चिमुरडया मुक्ताईला आपला गुरु केलं.

मुक्तेने केलेल्या अभंगांची संख्या मोजकीच असली तरी तिची अभंगरचना अतिशय प्रासादिक आणि रसाळ आहे. तिच्या अभंगांच्या ओळीओळीतून, शब्दाशब्दांमधून तिचा अध्यात्मामधील अधिकार, तिचे योगसामर्थ्य, तिची प्रौढ आणि प्रगल्भ जाण, तिचा आत्मविश्वास जाणवतो.

इ. स. १२९६ मध्ये ज्ञानदेव आणि सोपानांनी एकामागोमाग समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्याकुळ झाले. दोघेही तिर्थाटनास निघाले. उत्तर महाराष्ट्रात तापी नदीच्या तीरावर मेहून येथे ते आले असताना सोसाटयाचे वादळ आले. जोराची वीज कडाडली आणि निवृत्तीनाथांची सर्वात छोटी बहीण मुक्ताई गुप्त झाली. आदीशक्ती आपल्या मुळ स्वरुपात विलीन झाली.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jan 2014 - 5:44 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर!!

मूकवाचक's picture

7 Jan 2014 - 5:45 pm | मूकवाचक

_/\_

निरुपण ईज भावुकली सुंदर !!

( नान्या आठवला !! )

प्यारे१'s picture

7 Jan 2014 - 5:59 pm | प्यारे१

शतशः आभार आहेत धन्या तुझे!
साष्टांग नमस्कार मुक्ताईला नि तुलापण.

वाचनखूण साठवतो. आवश्यक तेव्हा (कदाचित रोजच) वाचावं लागेल. :)

अनिरुद्ध प's picture

7 Jan 2014 - 6:54 pm | अनिरुद्ध प

+१ सहमत

सूड's picture

7 Jan 2014 - 6:50 pm | सूड

वाचनखूण साठवली आहे.

संजय क्षीरसागर's picture

7 Jan 2014 - 6:51 pm | संजय क्षीरसागर

अत्यंत सुरेख लेख लिहीलायंस. लेखनातली संगती आणि भाषा मनाला स्पर्शून गेली. मनःपूर्वक अभिनंदन!

बर्फाळलांडगा's picture

7 Jan 2014 - 9:10 pm | बर्फाळलांडगा

अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाही गेला?
मान अपमान वाढविसी हेवा। दिवस असतां दिवा हातीं घेसी।।
परब्रह्मसंगे नित्य तुझा खेळ। आंधळ्याचे डोहळे का बाट जाले?
कल्पतरुतळवटी इच्छिली ते गोष्टी। अद्यापि नरोटी राहिली कां?
घरी कामधेनू ताक मागूं जाये। ऐसा द्वाड आहे जगामाजी।।

यशोधरा's picture

7 Jan 2014 - 6:58 pm | यशोधरा

धन्या, भारी!

प्रचेतस's picture

7 Jan 2014 - 7:03 pm | प्रचेतस

सुंदर :)

आतिवास's picture

7 Jan 2014 - 7:18 pm | आतिवास

लेख आवडला.
या निमित्ताने मुक्ताबाईंचे अभंग एके ठिकाणी वाचायला मिळाले.
आणखी अभंग कुठे आहेत? दुवा असल्यास किंवा पुस्तकाचं नाव माहिती असल्यास जरुर सांगा.

स्पा's picture

7 Jan 2014 - 7:19 pm | स्पा

अप्रतिम रे

शुचि's picture

7 Jan 2014 - 7:30 pm | शुचि

फार छान लिहीले आहे.

पैसा's picture

7 Jan 2014 - 8:12 pm | पैसा

अगदी छान आठवण करून दिलीस.

साक्षात ज्ञानियांच्या राजाला समजावणारी मुक्ताई, तिचा अधिकार काय असेल!

@आतिवास, मुक्ताबाईंच्या नावावर "मुंगी उडाली आकाशी" इ. कूटे आहेत. तिचे इतर अभंग http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/abhang/muktabai/index(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4.%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87.%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97).aspx इथे उपलब्ध आहेत.

बर्फाळलांडगा's picture

7 Jan 2014 - 8:37 pm | बर्फाळलांडगा

अभंगकलेचे गारुड मनावर नेहमीच आहे... राहील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jan 2014 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

किसन शिंदे's picture

7 Jan 2014 - 8:29 pm | किसन शिंदे

संतसाहित्याचा गाढा अभ्यास आहे तुझा, या चारही भांवडावर तु एक छान लेखमालिका लिहू शकशील. फक्त मुक्ताईवरच लिहून थांबू नको. ब्रम्हगिरीला ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना जेव्हा गुरू केलं त्या प्रसंगाचं तुझ्या तोंडून ऐकलेलं वर्णन चांगलं आठवतंय. त्याच्यावरही एक लेख लिहीच. :)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2014 - 1:56 am | अत्रुप्त आत्मा

+१ टू किस्ना!

__/\__

अर्धवटराव's picture

7 Jan 2014 - 8:56 pm | अर्धवटराव

__/\__

रेवती's picture

7 Jan 2014 - 9:40 pm | रेवती

sundar lihile aahe.

बॅटमॅन's picture

7 Jan 2014 - 9:53 pm | बॅटमॅन

बेष्टंय हे!!!

अशोक पतिल's picture

7 Jan 2014 - 10:32 pm | अशोक पतिल

जळगाव जिल्ह्यातील पुर्वीचे एदलाबाद हे तालुक्याचे ठिकाण ( आताचे मुक्ताइनगर ) येथे संत मुक्ताइ मंदिर ( समाधि ) तापी-पुर्णा संगमावर आहे .

मुक्ताईनगरला पुण्याहून कसे जायचे?

आळंदी (ज्ञानदेवांची समाधी),) त्र्यंबकेश्वर (निवृत्तीनाथांची समाधी) आणि सासवड (सोपानदेवांची समाधी) येथे दोन तीन वेळा जाऊन आलो आहे. मात्र मुक्ताईनगरला जायचा योग अजून आलेला नाही.

इरसाल's picture

8 Jan 2014 - 2:18 pm | इरसाल

पुणे ते भुसावळ रेल्वेने मग तिथुन बर्‍याच बस मिळतील मुक्ताईनगरला/एदलाबादला जायला.

अशोक पतिल's picture

8 Jan 2014 - 11:18 pm | अशोक पतिल

तुम्ही पुणे ते जळ्गाव्/भुसावळ व्हाया ऑरंगाबाद्,सिल्लोड मार्गे येवु शकतात् व भुसावळ येथून मुक्ताइनगर
( ३० कीमी ) जावु शकतात. जर पुने ते रावेर ने आलात तर भुसावळ ला उतरावे.

मुक्त विहारि's picture

7 Jan 2014 - 10:39 pm | मुक्त विहारि

सुंदर !

प्रसाद गोडबोले's picture

7 Jan 2014 - 10:55 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर !!

धनाजी राव सुंदर लिहिलय बरकां !

रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥
ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

क्या बात है !!

कवितानागेश's picture

8 Jan 2014 - 1:07 am | कवितानागेश

__/\__

लॉरी टांगटूंगकर's picture

8 Jan 2014 - 7:37 am | लॉरी टांगटूंगकर

सुरेख जमलंय, धन्या _/\_

नाखु's picture

8 Jan 2014 - 9:11 am | नाखु

ईतकी चांगली प्रतीभा (पुरचुंडीत) का व्यर्थ खर्च करता?????

मारकुटे's picture

8 Jan 2014 - 9:40 am | मारकुटे

सुरेख !

सुकामेवा's picture

8 Jan 2014 - 9:48 am | सुकामेवा

अप्रतिम............. एवढा एकच शब्द सुचतो आहे सध्या

भ ट क्या खे ड वा ला's picture

8 Jan 2014 - 9:56 am | भ ट क्या खे ड वा ला

सुंदर

रवींद्र भट यांच्या लिखाणाची आठवण आली.

खुपच सुरेख... छान वाटल वाचुन... प्रचिती आल्यासारखी वाटली :-)

बर्फाळलांडगा's picture

8 Jan 2014 - 12:42 pm | बर्फाळलांडगा

हे अभंग लिहले मुक्ताईने साक्षात ज्ञानेश्वरांसाठी.. तो त्यांचा अधिकार
सांगितली गीता श्रीकृष्णाने अर्जुनासाठी...तो ही त्यांचा अधिकार

तुम्ही आम्ही हे का वाचतो अन वरून छान आहे म्हणतो... ? थोडक्यात सांगणारा अन ऐकणारा ज्या भावावस्थेत आहे त्याचा संदर्भ नसूनही आपण त्याला अनुमोदन देतो. कारण मोठी गुंता गुंत आहे.

उदा.. जोकपाल हिशोबनिस समजतो तो ज्ञानेश्वर आहे अन मिपाकर त्याला छळणारि जनता म्हणुन तत्वज्ञान न पटुनहि तो फार छान आहे म्हणतो. काय विरोधाभास आहे.... प्रत्येकाचे कारण वेगळे आहे पण लिहणारा अन वाचणारा दोघेही चान चान म्हणत आहेत शंका येते ही तीच जमात का जी याच क्षणात तत्वापेक्षा अस्तित्व महत्वाचे म्हण्त जगणार आहे?

कवितानागेश's picture

8 Jan 2014 - 1:45 pm | कवितानागेश

'तत्त्वापेक्षा अस्तित्त्व महत्त्वाचं' हेच सगळ्यात सुरक्षित 'तत्त्व' आहे भाऊ! :)

कवितानागेश's picture

8 Jan 2014 - 6:33 pm | कवितानागेश

नीट सांगते. 'तत्त्वापेक्षा अस्तित्व मोठं' हीच गोष्ट एकदा तत्त्व म्हणून स्विकारली की, अस्तित्व राखण्याचा फायदा पण मिळतो आणि तत्त्व पालन केल्याचा आनंद (पक्षी: स्वतःचं कौतुक!) देखिल होतो!

काय स्विकारायचे हच फ़क्त पुन्हा पुन्हा तुम्ही ठरवणार तर विरोधी तत्वाग्यानाला माना
का डोलावता ? आणि खात्री देणार काय की तुमच्या अस्तित्वाचे तुम्ही निसंधिग्द मालक आहात.... याची ? लक्षात घ्या जेवायचा स्वतंत्र विभाग चालवणे इतके सोपे नाही आहे हो ते.

पैसा's picture

8 Jan 2014 - 2:05 pm | पैसा

तुम्ही आम्ही हे का वाचतो अन वरून छान आहे म्हणतो... ?

त्या क्षणी मुक्ताई, ज्ञानदेव, श्रीकृष्ण अन अर्जुन यांचा परीसस्पर्श वाचणार्‍या अन लिहिणार्‍या प्रत्येकाला होत असतो.

प्रत्येकाचे कारण वेगळे आहे पण लिहणारा अन वाचणारा दोघेही चान चान म्हणत आहेत शंका येते ही तीच जमात का जी याच क्षणात तत्वापेक्षा अस्तित्व महत्वाचे म्हण्त जगणार आहे?

याचं एकमेव कारण म्हणजे आपण सामान्य आहोत भाऊ! आपलं तत्त्व आणि अस्तित्त्व एकच असतं तर आपण ज्ञानोबांच्या जवळ पोचलो असतो ना!

स्पा's picture

8 Jan 2014 - 2:28 pm | स्पा

आपलं तत्त्व आणि अस्तित्त्व एकच असतं तर आपण ज्ञानोबांच्या जवळ पोचलो असतो ना!

वा वा
पैसा माउली

__/\__

बर्फाळलांडगा's picture

8 Jan 2014 - 2:30 pm | बर्फाळलांडगा

त्या क्षणी मुक्ताई, ज्ञानदेव, श्रीकृष्ण अन अर्जुन यांचा परीसस्पर्ष
वाचणार्या अन लिहिणार्या प्रत्येकाला होत असतो

इन सच केस जिवन भाउंचे लिखाण वाचताना त्यांचा स्पर्शहीआपल्याला होत असतो असे तुम्ही मानता काय?

तसेच तुम्ही सामान्य आहात तर असामान्यत्वा चा मोह आणि टिका एकाच वेळी कशी करू शकता ? सामान्य असणे चालुपणाचे लायसंस आहे काय ? जर आहे तर असामाँन्यत्वाचा सोस का पडला आहे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jan 2014 - 3:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

इन सच केस जिवन भाउंचे लिखाण वाचताना त्यांचा स्पर्शहीआपल्याला होत असतो असे तुम्ही मानता काय? हो तर ! त्यांच्या लिखाणाचा स्पर्श झाल्याशिवाय गुदगुल्या होउन तुम्हाला हसू येणं शक्य होतं का? :)

माणसे तितक्या प्रकृती हे तर खरे आहे ना? मग प्रत्येक शब्दाचा परिणाम प्रत्येक माणसावर प्रत्येक वेळी सारखाच कसा होईल. ज्ञानदेव आणि अर्जुन ही पण माणसेच होती त्यांना त्यांच्या परिस्थितित त्यांच्यापरिने काही कळले-उमगले असेल. पण त्या शब्दांत इतरांनाही बोध देण्याची ताकद आहे म्हणून ते लिहिले गेले आणि अनेक शतकांनंतरही इतरांनाही बोधपर होत आहेत / भावत आहेत म्हणून आजवर टिकून राहिले आहेत.

आता वाचणार्‍याच्या-ऐकणार्‍याच्या सामान्य-असामान्यत्वाचा प्रश्न जरा असा सोडवून सुटतो का ते बघा:

बीज (शब्द आणि त्यांचा भावार्थ) सकस आहे... पण तितकंचंपुरेसं नाही. ते बीज रुजतं की रुजत नाही आणि रुजलं तरी कितपत बहरतं हे ज्या जमिनीवर ते पडलंय तिच्या कसावर अवलबून असतं. आणि जर ते कातळावर पडलं तर काय होणार ते काय सांगाला हवंच का?

बर्फाळलांडगा's picture

8 Jan 2014 - 3:52 pm | बर्फाळलांडगा

कोणती गोष्ट परिस आहे अन कोणती निव्वळ लिखाण हे तुम्ही कोण ठरवणार ? आपण सामान्य आहोत हे एकदा मान्य केले की हां अधिकार आपण गमावत नाही काय ?

पैसा's picture

8 Jan 2014 - 5:40 pm | पैसा

तुमचा पहिला प्रश्न प्रामाणिक वाटला म्हणून माझ्यापुरतं उत्तर द्यायचा प्रयत्न केला. प्रत्येकाचं उत्तर तेच असेल असं नव्हे.

कोणती गोष्ट परिस आहे अन कोणती निव्वळ लिखाण हे तुम्ही कोण ठरवणार ?

हे विधान मात्र बरंच आक्रमक आहे. मुळात तसा अधिकार मला किंवा इस्पीकचा एक्का यांना आहे असा दावा आम्ही कोणीच केला नाही. त्यामुळे तो अधिकार गमावायचा प्रश्न येत नाही.

आपण सामान्य आहोत हे मान्य करण्यात कोणताही कमीपणा नाही. तसाच असामान्य व्हायचा सोस निदान मला तरी नाही. मात्र प्रत्येक सामान्य माणसातही थोडातरी असामान्यत्वाचा अंश असतो, दुसर्‍यात असेल तर त्याला तो जाणवतो. कृष्णाने किंवा मुक्ताईने सांगितलेली एखादी गोष्ट चांगली आहे हे कळायला माणूस ज्ञानदेव किंवा अर्जुन असला पाहिजे असं अजिबात नाही.

(अवांतरः शब्दांचे खेळ खेळण्याची आणि पोकळ वाद घालण्याची सवय असलेला एकजण मिपावर होता. तुम्हाला भाऊ म्हटलं तर आवडलं नाही. मग ताई म्हणू का? ते केवळ एक संबोधन आहे. तुम्ही माझे शत्रू आहात असं मला अजूनतरी माहिती नाही. तसं समजायला काही कारण आहे का? का तुम्हाला आत्मशून्य/ग्लिफ/अग्निकोल्हा/सिवाजी-द-बॉस यापैकी काही म्हणू? :) )

यशोधरा's picture

8 Jan 2014 - 6:16 pm | यशोधरा

मात्र प्रत्येक सामान्य माणसातही थोडातरी असामान्यत्वाचा अंश असतो, दुसर्‍यात असेल तर त्याला तो जाणवतो. >> वेल सेड.

कारण याधाग्याला ड़ोलावलेली मान पोकळ आहे हे वास्तव आहे बाकी तुमच्या व्यक्तिगत क्रोनिकल्समधे मला रस नसलेले विश्य्याला सोडुन इतर मुद्यांवर लिखाण करायचे प्रयोजन मला दिसत नाही म्हणून आपल्या इण्टुक शेप्ट्यापरमाने मी कोम्प्ली मेंट देत नाही म्हणुन मी आपला शत्रु ठरतो अथवा आपल्याला तुमी भाऊ मनाल्या चा राग आहे वगैरे गैरसमज दूर करने मला प्रायोजित वाटत्त्त नाही _/\_

करू देण्यापुर्वि ते विधान सामान्य माणसाला आहे हे स्पष्ट असून पुन्हा त्या प्रतिसादाचे सिलेक्टिव रीडिंग का करताय ?

गैरसमज स्वत:चा व स्त्रियांचा

इथे स्त्रिया अचानक कुठून आल्या? मी तर स्त्री हा शब्दच कुठे लिहिला नाही!!
:ROFL:

बर्फाळलांडगा's picture

8 Jan 2014 - 10:45 pm | बर्फाळलांडगा

:)

तुम्हाला विनोद कळतात ही फार चांगली गोष्ट आहे अन फक्त विनोदच कळतात असे असेल तर फार मोठे दुर्दैव.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jan 2014 - 9:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वतःला सामान्य जाहिर करण्यामागे बर्‍याचदा विनय दडलेला असतो... आणि स्वतःची ज्ञानी म्हणून जाहिरात करण्यामागे बर्‍याचदा आंधळे अहंकारी अज्ञान दडलेले असते... असे म्हणतात.

स्वतःला अज्ञानी समजणार्‍याचे मन त्यात पडलेल्या शब्दबीजाचा विचार करायला तयार असते... त्याच्यातल्या अर्थाचा शोधबोध घ्यायला तयार असते, म्हणून ते बीज रुजून वाढण्याची शक्यता असते. मी सर्वज्ञानी आहे म्हटले तर अधिक ज्ञानची काय गरज ?... मग नविन कोणत्याही शब्दांचा विचाराविना अव्हेर होतो. म्हणजे ते शब्दांची स्थिती खडकावर पडलेल्या बीजाचीच नाही काय?

असो. स्वतःला अज्ञानी समजून स्वतःचे ज्ञान वाढवत रहावे का सर्वज्ञानी समजून अचल डबके व्हावे हा ज्याच्यात्याच्या जाणीवेचा प्रश्न आहे. तेव्हा असोच !

सामान्यपणाची व्याख्या अस्तित्वापुढ़े तत्वज्ञान चुलीत घालणे ही आधीच स्पष्ट केल्या गेले आहे... आपण जर यात इनपुट्स देऊन वेगळेच वळ्न देणार असाल तर बुध्दिबळातिल बंड्या ठराल. अर्थात मी कोण हरकत घेणारा ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jan 2014 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

वळण??? मी तर "सरळ" अर्थ, जो मी पहिल्यापासून म्हणत होतो तोच अधिक स्पष्ट करायची गरज पडली म्हणून केला. पण बुध्दिबळातिल बंड्या वगैरे वरून तुमचे वाचन बरेच दिसतेय... म्हणजे अजूनही काही शब्द वाचताय... हे छानच आहे. म्हणजे याच्यापुढे उगाच चर्चा चालू ठेवून घाई करण्याची गरज नाही असे दिसते. रामराम !

त्याची कशाची तुलनाच नको. तेंव्हा थांबुयाच. Allthough I strongly believes in and respect the differences between people.... it just I can't stand those who can't do the same.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jan 2014 - 12:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

बर्फाळलांडगा's picture

10 Jan 2014 - 7:37 pm | बर्फाळलांडगा

पण चुकीच्या उतारीवर खेळलेला एक्का हमखास वाया जातो हा उपमर्द आपल्या बाबत घडू नये म्हणुनच थांबलो.

वरील पूर्ण प्रतिसादाशी सहमत.
थोडं दोन पैसे माझ्या अल्प माहितीप्रमाणे, आपण ज्ञानेंद्रिय नि कर्मेंद्रियं ह्या मार्फत मिळवतो ती माहिती नि त्याचं ठराविक वेळी ठराविक प्रकारे केलं जाणारं उपयोजन म्हणजे ज्ञान होय. प्रचंड माहिती मिळवणं हे हल्ली आवश्यक होत चाललं आहेच. किमान आपल्या क्षेत्रात आवश्यक असले ली माहिती वेळोवेळी अपडेट करत राहणं हे गरजेचंच बनलेलं आहे. मात्र त्या माहितीचा नेमका नि नेटका वापर कसा व्हावा ह्याबाबत आवश्यक विचार कधी कधी असतो, बर्‍याचदा नसतो अथवा उलट. (व्यावसायिक पातळीवर असतो, वैयक्तिक पातळीवर नसतो.
हे झालं व्यावहारिक बाबतीत.

सर्वज्ञानी अथवा सर्वज्ञ ह्या शब्दाचा खरा अर्थ जे जाणलं असता सर्व काही जाणलं गेलं असं काही जाणणाराला सर्वज्ञ / सर्वज्ञानी म्हणावं.
उदाहरणार्थ : जगातले यच्चयावत प्रकारचे, कलाकुसरीचे, वेगवेगळ्या नक्षीचे, सोन्याचे दागिने एका व्यक्तीला पहायला मिळणं शक्य नाही, शक्य झालं तरी (सगळे एकत्र आणलेच समजा तर) काल मर्यादेमुळे आवाक्यातलं नाही. मात्र सोने हा धातू आहे. ह्यापासून त्याप्रकारचे सगळे दागिने बनतात असं ज्यानं जाणलं त्याला सोन्याच्या बाबतीत सर्वज्ञ म्हणता येऊ शकतं.
सोनाराच्या दृष्टीनं अथवा चोराच्या दृष्टीनं (दागिना कुठला हे पाहत नाहीत, त्यातलं सोनं बघतात.) सोनं 'जाणणं' हे सर्वज्ञ पणाचं लक्षण आहे. तपशीलापेक्षा तत्त्वाकडं जास्त लक्ष दिलं जाणं अभिप्रेत.

एक धातू म्हणून सोनं. तसेच सगळे धातू असा विचार करता बराचसा भाग एका 'हेडींग' खाली येतो. लोखंड धातू नि सोने, प्लॅटिनम सुद्धा धातू. तसंच हे धातू, अधातू नि इतर सगळे 'मूलद्रव्य' प्रकारात गणले जावेत. असं करत करत एका लार्जर स्केलवर सगळ्याला आणून बसवलं तर त्याचं नाशिवंतपण लक्षात येतं. कधीतरी हे संपणार आहे, आपण ज्याचं मूल्या फार मानतो ते तसंच खरं आहे का असा विचार होतो नि आपलं हवं नको पण कमी कमी होत जातं.
एखाद्या ग्रहावर हिरे, पाचू वाळूसारखे पसरलेले असले तर तिथं वाळू सारखा उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारावी का? तिथं त्याची किंमत अगदी नगण्य असेल. (कदाचित हास्यास्पद वाटेल पण विपुलता ते दुर्मिळता हा एक महत्त्वाचा पात्रतानिकष लावला जातो)

इ ए म्हणतात तसं व्यावहारिक पातळीवर ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक ते परिश्रम केलेच पाहिजेत. मात्र त्या व्यतिरिक्त असणारी माहितीची अकारण वखवख कधीतरी थांबावी जेणेकरुन आपण स्वतःकडे पाहू शकू असा विचार वरच्या 'खर्‍या' सर्वज्ञपणामध्ये आहे. त्याचं डबकं करुन घेणं अथवा आळशीपणा ला मुलामा खचितच नव्हे. अध्यात्म शब्दाचा अर्थच शरीराला धरुन/ शरीरात दडून राहिलेला आत्मा असा आहे. त्या दृष्टीनं सर्वज्ञानी अथवा सर्वज्ञ शब्दाचा वापर व्हावा.

- १०० पूर्ण करण्याच्या हेतूनं टंकलेला प्रतिसाद

प्रचेतस's picture

11 Jan 2014 - 7:09 am | प्रचेतस

:)

धन्या's picture

11 Jan 2014 - 2:33 pm | धन्या

मी गीता प्रेस गोरखपूरची खुप पुस्तकं वाचली आहेत.

प्यारेंची लेखनशैली त्या पुस्तकांपेक्षा खुपच उजवी आहे.

प्यारे१'s picture

11 Jan 2014 - 3:15 pm | प्यारे१

लेखनशैली मरु द्या.
सेन्च्युरी काढून दिली.
चेकचं बोला का रोख देताय? ;)

धन्या's picture

11 Jan 2014 - 7:28 pm | धन्या

मी प्रतिसादांसाठी लिहीत नाही. प्रतिसाद मिळाले तर उत्तम नाही मिळाले तर त्याहून उत्तम. मी जे जे लिहितो त्यामगे काहीतरी "ट्रीगर" असतो. हा ट्रीगर माझ्याकडून लिहून घेतो. त्यामुळे माझं बरंचसं लेखन प्रासंगिक असतं.

कुणी लिही म्हटलं की माझी प्रतिभा माझ्यावर रुसुन बसते. याच कारणामुळे कुठल्याही विशेषांकात माझं लेखन नसतं.

एव्हढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. :)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jan 2014 - 8:03 pm | अत्रुप्त आत्मा

__/\__ =))

प्यारे१'s picture

11 Jan 2014 - 8:11 pm | प्यारे१

:)

प्रसाद प्रसाद's picture

8 Jan 2014 - 1:34 pm | प्रसाद प्रसाद

धन्याशेट,
लेख अत्यंत सुंदर लिहिला आहे. दरवेळी ताटीचे अभंग वाचताना मुक्ताईच्या विचारक्षमतेचे आणि सोशिकतेचे एकूणच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. भावंडं काहीतरी अद्भूत होती हेच खरे!

हासिनी's picture

8 Jan 2014 - 2:28 pm | हासिनी

सुरेख! सुरेख अन् सुरेखच!!
खूप दिवसांनी सुंदर काही वाचायला मिळाल. धन्यवाद. :)

धन्या.. रसाळ आणि सुंदर लिहिलंयस.

मला मात्र मुक्ताईच्या कथा ऐकताना आणि तिची पार्श्वभूमी (जी इथेही उल्लेखलेली आहे) वाचून हे सर्व एक आदर्श बोधपर तत्वज्ञान न वाटता एका बालपण हरवलेल्या मुलीविषयीचा करुण भावच दाटत राहतो.

उदा. वयाच्या दहाव्या वर्षीच बालविवाह होऊन संसाराच्या चरकात ओढली गेलेली बालिका.. आणि ती अकराव्या वर्षी कितीही उत्तम स्वयंपाक करायला लागली असली तरी त्या पदार्थाने खाणार्‍या संवेदनशील माणसाच्या जिभेवर चव येण्यापेक्षा घशात आवंढाच जास्त यावा तसं.

आपल्या पोरांनी लहान वयातच काय पण वयाच्या सत्तराव्या वर्षीही असे आणि इतके प्रौढ अन पोक्त विचार करु नयेत अशी इच्छा मनात भरुन येते.

बर्फाळलांडगा's picture

8 Jan 2014 - 2:47 pm | बर्फाळलांडगा

मला कारुण्यभावाचि सातत्याने वाटणारी नेमकी हीच आहे की जो व्यथित आहे तोच करुण होउ शकतो... अन जो व्यथित आहे तो देव न्हवे

बर्फाळलांडगा's picture

8 Jan 2014 - 3:05 pm | बर्फाळलांडगा

जो व्यथित आहे तो देव न्हवे तर केवळ मनुष्यप्राणी होय....
आणि जो व्यथित मनुष्य आहे तोच मी फक्त विनोदी वाचतो अन गोष्टी सोप्या करतो म्हणता
म्हणता म्हणता या धाग्यातिल करुण रसावर अंतर्मुख होतो अन दाद देतो ती ही तितक्याच खुळचट पणाची असते जितका खुळचटपणा तो चेस मधील खेळात कार्लसन बाबत प्रेडिक्शन करणे असो वा काळ अनुभवत असताना अस्तित्वात नाही याची टिमकी बडवताना दाखवत असतो.

मनुष्याला ईश्वराची गरज अन अस्तित्व पटेल तोच खरा सुदिन!

प्यारे१'s picture

8 Jan 2014 - 2:50 pm | प्यारे१

असहमत.
भावना पोचतेय पण बालपण हरवणं वगैरे सापेक्ष आहे. एवढंच.

बर्फाळलांडगा's picture

8 Jan 2014 - 4:18 pm | बर्फाळलांडगा

सामान्य आहात ना मग लहानाग्यांच्या अस्तित्वावर आलेला घाला पाहून आपले मन
द्रवणार नाही हे मान्य.... पण त्यातही महान पणाची जी तत्वे ताटिच्या
अभंगात विषद केली आहेत त्यांचा सोस का , जी तुम्हाला पाळावयाची नाहित ?

जेंव्हा इथ मला भाऊ असं भाऊ तसं या धाग्याच्या तत्वाद्न्यानासंदर्भात म्हनतात तेव्हां इथला भाऊ म्हणुन घ्यायची
शरम बाळगावी की त्यांच्या निपक्श पाती नसलेल्या मातीची कीव करावी याचा गोंधळ उडतो

प्यारे१'s picture

8 Jan 2014 - 4:47 pm | प्यारे१

आपले म्हणणे वाक्यरचना व्यवस्थित असेल तर थोडंफार अशुद्धलेखन असून देखील मांडल्यास चालून जाईल.

वर आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते २-३ वेळा वाचून देखील मला उमजलेलं नाही.
इथेच अथवा खरड/व्यनि मार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत करायला हरकत नाही.

आभार.

भावना पोचतेय पण बालपण हरवणं वगैरे सापेक्ष आहे. एवढंच.

त्या चार भावंडांकडे "अवतार" म्हणून न पाहता माणसं म्हणून पाहा. तुम्हालाही त्यांचं हरवलेलं बालपण दिसेल.

प्यारे१'s picture

8 Jan 2014 - 5:23 pm | प्यारे१

बरं.
मात्र त्यातून साध्य काय होईल???

सगळं अनुकूल असताना देखील वेगळेपणानं प्रकाशणारी मुलं आज नाहीत का?
सचिन तेंडुलकरचं बालपण रमाकांत आचरेकरांनी हरवलं?
मारिया शारापोव्हा, विलियम्स भगिनी ह्यांची बालपणं हरवली?
१४व्या वर्षी कास्पारोव्ह्च्या विरोधात खेळणारा आत्ताचा वर्ल्ड चॅम्पियन (कार्लसन ना?)त्याचं बालपण हरवलं?
हे सापेक्ष आहे असं म्हणणं आहे.
नथिंग मोअर.
असहमती त्याहून जास्त वाटत असलेल्या अनाठायी करुणेला आहे.

माणूस म्हणून विचार करता त्यांचं महानपण अजून जास्त अधोरेखित होतं.
उत्तुंग प्रतिभा लाभलेली चार भावंडं असं म्हणा हवं तर!

अवतार म्हणून पाहून नुस्त्या व्यक्तिपूजेतून तरी काय साध्य होणारे? ज्ञानेश्वर काय किंवा मुक्ताबाई काय, चारही भावंडे अलौकिक प्रतिभावान होती.

पुढं काय? नुस्ते उसासे सोडून हाती काहीच लागणार नाही.

बाकी सचिन काय आणि कार्लसन काय, यांची तुलना ज्ञानेश्वरांच्या बालपणाशी अतिशय हास्यास्पद आहे. त्यांच्या आयुष्यात काय प्रसंग आले होते की ते उघड्यावर पडावेत? मेहनत हा एक भाग वगळला तर अन्य कुठल्याही पोरापेक्षा त्यांचं जीवन वेगळं नव्हतं, शिवाय फ्यामिलीचा भक्कम सपोर्ट होता त्यांना.

ज्ञानेश्वरादि लोकांना होतं का असं काही? आईवडील नाहीत, समाज नुस्त्या शिव्या घालतोय अन जिवावर उठलाय. या परिस्थितीत त्यांनी असामान्य धैर्य दाखवले. पण म्हणून त्यांच्या बाल्याबद्दल कुणाला करुणा वाटली तर तिला हास्यास्पद ठरवणे हे अवतार अवतार म्हणून होणार्‍या व्यक्तिपूजेइतकेच हास्यास्पद आहे.

पुढं काय हा प्रश्न तर कुठल्याही बाबतीत विचारता येतो. ततः किम्??????

मी त्यांना अवतार मानतो पण इथं तसं जात्याच म्हटलं नाही. वरच्या प्रतिसादात तसा कुठलाही उल्लेख नाही.
निव्वळ पूजा करुन काहीही होणार नाही ह्याची पूर्ण कल्पना आहे.

एखादा रोग असेल तर तो मलाच औषध घेऊन नि पथ्य सांभाळून (योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानं) बरा करावा लागेल ना की डॉक्टरच्या फोटोच्या दहा वेळा पाया पडून तसं. प्रत्येक माणूस प्रतिभावान तसा होऊ शकणार नाही कदाचित मात्र जशी ह्या चार भावंडांची अंतःस्थिती होती तशी मिळवू शकतो/ किंबहुना ती तशी होऊ शकते असं मानायला हरकत नाही.

मुळात असहमती होती मुळात बालपण हिरावलं जाण्याबद्दल नि असं काही होऊच्च नये ह्या करुणेबाबत.
ह्याचं कारण म्हणजे असं बालपण हरवलं जाणं नि तशी प्रगल्भता आल्याबद्दल कळवळणं हे आपल्याला आपल्या नजरेतून, आपल्या पातळीवरुन दिसणार्‍या गोष्टी आहेत. म्हणूनच ही सापेक्ष गोष्ट आहे असं म्हणालो.

२१ वर्षांच्या संपूर्ण चरित्रामध्ये एकदाच हा माणूस समाजावर रुसला नि त्याची समजूत मुक्ताईनं काढली. इतर प्रसंगां मधून असं कधीही जाणवत नाही. वरील चौघे ही लहान वयातच ह्या सगळ्याच्या पल्याड गेले होते असंच वरील अभंगांतून दिसतंय. आत शांतता नांदत असल्याशिवाय प्रतिभेचं इतकं उच्च दर्जाचं प्रगटन शक्य नाही/नसतं.

रेड्यामुखी वेद वदवल्याच्या चमत्कारानंतरच नमस्कार मिळणार्‍या समाजामध्ये अशा आईवडील नसणं, उघड्यावर पडणं ह्या घटनांतून 'आगीतून निघाल्यावर सोनं जास्त झळाळतं नि त्या सोन्याला जास्त किम्मत असते ( समाजाच्या दृष्टीनं )असं म्हणतात तशाच प्रकारचं काहीसं झालं हे निश्चित.

ते चौघेही जात्या अवतार मानले काय किंवा कुठल्यातरी एका वरिजिन पॉइंटनंतर मानले काय, फरक काहीच नाही. ते एक असोच.

मुळात असहमती होती मुळात बालपण हिरावलं जाण्याबद्दल नि असं काही होऊच्च नये ह्या करुणेबाबत.
ह्याचं कारण म्हणजे असं बालपण हरवलं जाणं नि तशी प्रगल्भता आल्याबद्दल कळवळणं हे आपल्याला आपल्या नजरेतून, आपल्या पातळीवरुन दिसणार्‍या गोष्टी आहेत. म्हणूनच ही सापेक्ष गोष्ट आहे असं म्हणालो.

२१ वर्षांच्या संपूर्ण चरित्रामध्ये एकदाच हा माणूस समाजावर रुसला नि त्याची समजूत मुक्ताईनं काढली. इतर प्रसंगां मधून असं कधीही जाणवत नाही. वरील चौघे ही लहान वयातच ह्या सगळ्याच्या पल्याड गेले होते असंच वरील अभंगांतून दिसतंय. आत शांतता नांदत असल्याशिवाय प्रतिभेचं इतकं उच्च दर्जाचं प्रगटन शक्य नाही/नसतं.

हीच तर मजा आहे. आज इतक्या वर्षांनंतर आपल्यासमोर फक्त ज्ञानेश्वरांचं वाङ्मय आणि काही पारंपरिक माहिती इतकंच उपलब्ध आहे. त्यांना त्रास थोडाही झाला नसेल याची ग्यारंटी काय आहे? जे आपल्याला वाटतं ते सर्व लोक आहे तस्सं कधी लिहितात का? किंबहुना जे जे काही वाटतं ते तरी पूर्णपणे लिहितात का?

संत झाले तरी 'सामान्य' लेबलवाल्या भावनांपासून साधकदशेत माणूस पूर्णपणे अलिप्त असतो असं नाही, उदा. तुकारामांच्या अभंगांतून वैफल्यात्मक वाटावेत असेही काही थोडे विचार आहेत. तुकाराम महान ठरले कारण ते वैफल्य उगाळत बसले नाहीत आणि पुढे गेले. हे आपल्याला कळतं कारण त्यांचे तसे अभंग आपल्यासमोर आहेत. ज्ञानेश्वर किंवा अजून कोणाचे तसे अभंग आपल्यासमोर नाहीत याचा अर्थ ती मधली फेज कधी आलीच नसेल असं आजिबात नाही.

त्यामुळे कुणाला कणव आली तर ती अस्थानी आहे असं मला वाटत नाही. शेवटी व्यक्तिपूजक धारणेतून "कणव आली, ततः किम्" असा प्रश्न आलाच तर तोही तितकाच निरर्थक आहे.

त्या चौघांचं कौतुक करायचं की तितकं डेरिंग दाखवण्याची कुणावर वेळ न येवो अशी इच्छा व्यक्त करायची?

माझ्या मते दोन्ही योग्य आहे.

प्यारे१'s picture

8 Jan 2014 - 7:31 pm | प्यारे१

म्हणूनच भावना पोचतेय पण सापेक्ष गोष्ट आहे(प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून वेगवेगळी दिसणारी गोष्ट) असं म्हणतोय.

बाकी वरचे ताटीचे अभंग थोडंसं साधक दशेचाच अनुभव देतात असं धारिष्ट्य करुन म्हणतो. रामदासांची करुणाष्टकं साधकदशेचंच वर्णन करवतात.
ज्ञानेश्वर महाराजांच्या उपलब्ध ऑथेंटिक चरित्र नि विपुल साहित्यामध्ये -ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, वरील प्रसंगाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वैफल्याची पुसटशी जाणीव दिसून येत असेल तर कृपया कळवावे. भावनांचं भावामध्ये दृढीकरण केलेले हे लोक आहेत. तो वेगळा विषय आहे. अवतार मानण्यामागे देखील पूर्वकर्म नि संचिताचा भाग असतो. तो देखील वेगळा विषय आहे.

मानवी पातळीवर विचार करताना सुद्धा गविंनी उगाच करुणेचा सूर लावलेला दिसला म्हणून बोललो होतो. ही कणव अस्थानी वाटते कारण गविंचा दृष्टीकोन पूर्णपणे भिन्न आहे. (त्यांनी उदाहरणाद्वारे ते दाखवलं आहे.) परिस्थितीवशात अत्यंत तडजोड करुन लग्न झालेली मुलगी नि मुक्ताई ह्यांची तुलना अस्थानीच आहे.

ह्यानंतर प्रतिसाद देईनच असं नाही.

माझा मुद्दा साधा आहे. अमुक एका गोष्टीचं वाङ्मयात प्रतिबिंब दिसत नाही असे म्हणायला आधार काय? ज्ञानेश्वरांबद्दल रिलायबल म्हणावी अशी जी माहिती आहे ती फार थोडी आहे.

करुणेचा सूरही उगाच लावला असं वाटलं नाही. संतांकडे पाहताना अमुकच एका दृष्टिकोनातून पाहण्याची जबरदस्ती कशाला? ज्ञानेश्वरी काय नि अमृतानुभव काय, तिथे पर्सनल अनुभव येण्याचा स्कोपच मुळात कमी आहे. वामनपंडितांनी तिथेही जळजळ ओकलेली आहे ते एक सोडून देऊ पण आय होप यू गेट द पॉइंट.

उपलब्ध चरित्रावरून अंदाज लावण्याला अंत नाही कारण आपल्याला जवळपास काहीच माहिती नाही.

मुक्ताबाई आणि परिस्थितीवशात लग्न करावे लागलेली मुलगी यांची तुलना मुद्दा कळावा म्हणून केलेली आहे. ती अस्थानी वाटत नाही.

ह्यानंतर प्रतिसाद देईनच असं नाही.

बरं मग????

प्यारे१'s picture

8 Jan 2014 - 8:00 pm | प्यारे१

>>> बरं मग????

वंदे मातरम म्हणायचं, सतरंज्या गुंडाळायच्या नि संघ विकीर! ;)

>>त्या चार भावंडांकडे "अवतार" म्हणून न पाहता माणसं म्हणून पाहा. तुम्हालाही त्यांचं हरवलेलं बालपण दिसेल.

सहमत. मला वाटतं ज्यांचं स्वतःचं बालपण अवेळी हरवलं असेल त्यांना जितकं हे प्रकर्षाने जाणवेल तितकं इतरांना जाणवायची शक्यता कमी आहे. अर्थात तितकं संवेदनक्षम असेल एखाद्याचं मन तर जाणवेलही पण शक्यता कमी आहे. ब-याचदा मोठेपण वाटणार्‍या गोष्टी वास्तविक पाहता त्या वेळी त्या व्यक्तीने आल्या प्रसंगाला तोंड द्यायला घेतलेला पवित्रा असतो. इतरांच्या दृष्टीने तो नंतर मोठेपणा होऊन जातो.

स्पा's picture

8 Jan 2014 - 2:57 pm | स्पा

आपल्या पोरांनी लहान वयातच काय पण वयाच्या सत्तराव्या वर्षीही असे आणि इतके प्रौढ अन पोक्त विचार करु नयेत अशी इच्छा मनात भरुन येते.

सहमत आहे. करुण कथा तर आहेच. पण

आपल्या पोरांनी लहान वयातच काय पण वयाच्या सत्तराव्या वर्षीही असे आणि इतके प्रौढ अन पोक्त विचार करु नयेत अशी इच्छा मनात भरुन येते.

बळंच? सत्तराव्या वर्षी पोक्त विचार करणार नैतर काय करणार ;)

असो. भावना समजली पण अकाली प्रौढत्व न येवो यापलीकडे काही दिसले नाही.

भावना समजली पण अकाली प्रौढत्व न येवो यापलीकडे काही दिसले नाही.

मेल्या.. काय हवंय आणि यापलीकडचं दिसायला..!!

ते "सत्तराव्या" शब्दामुळे एकदम "पालक अलर्ट" लागला ओ बाकी कै नै ;)

म्हण्णार होतो आलोकनाथ अलर्ट, पण मला मिपावर राहायचंय =))

कवितानागेश's picture

8 Jan 2014 - 6:27 pm | कवितानागेश

चरकात कोण नाही?
प्रत्येकजण कमीजास्त प्रमाणात भरडला जातोच.
पण भरडलं जाण्याचा आणि "शहाणपणाचा/ ज्ञानाचा" काय संबंध?
कुणी भरडलं जाउन गुन्हेगार होतं, तर कुणी करुणा जागी होउन ज्ञानी होतं....
कोण कुठल्या परिस्थितीवर कशी reaction देइल हेदेखिल कुणालाच माहित नसतं. ते random आहे.
मग कुणीही पोक्त= ज्ञानी होउ नये आणि प्रत्येकानी बालपणातच रहावं असं का?
शेवटी "शहाणपण" हीदेखिल मनुष्याचे एक less probable नैसर्गिक अवस्थाच आहे.
तिला विरोध का?

धन्या's picture

8 Jan 2014 - 6:34 pm | धन्या

कोट ऑफ द डे म्हणण्याईतका चांगला आहे विचार. :)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2014 - 6:51 pm | अत्रुप्त आत्मा

+१