किशोरी...

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in जनातलं, मनातलं
6 Jan 2014 - 9:28 am

जवळपास २४ तास झालेत पण अजून त्याचा विसर पडत नाही...
कित्येक वर्षांनी झालेली भेट...पुन्हा कधी होईल माहित नही...८२ वर्षांचे वय पण नं स्वरात नं वावरण्यात त्याचा मागमूस...

गेटवे ऑफ इंडियाचा परिसर ... आधीचा जमलेला भैरव आणि नंतर सुरु झालेला ललत....पाठीमागे २ तानपुरे आणि त्याच्याही पाठीमागून येणारी मंद सागराची गाज...
इतक्या वर्षांची तपश्चर्या प्रत्येक स्वरातून झिरपणारी...त्यातील श्रुतींचे वापर आम्हा पामरांच्या पार डोक्यावरून जाणारे...आपण हे सगळे ऐकतो आहोत अनुभवतो आहोत हि जाणीव लोपलेली ...
ललत संपला ...म्हणाव्या तश्या टाळ्या नाहीत...कारण श्रोते एकतर दिग्मूढ झालेले नाहीतर माझ्यासारखे डोळे पुसत...
अजून गाण्याचा आग्रह...आणि गाण्याइतक्याच गोड आवाजात...”ह्याच्या वर अजून काही रंगणार नही...ऐका माझं.. आता पुरे..” अशी आर्जवी विनंती...
त्याचं बरोबर “bhairavi is not for morning” अशी समोरच्या आगाऊ सूचनेला परखड फटकारा...

संपूर्ण २ तासात...कुठेही तबल्याचे दाण दाण ...ठाण ठाण नाही ...विनाकारण लांबलचक धीराकीत तीरकीत ची बरसात नाही ...चमत्कारिक तिहाया नाहीत.....श्रोत्यांच्या टाळ्या नाहीत आणि ती दाद खोट्या अदबीने स्वीकारण्याच्या अदा नाहीत....अहो...भरत कामतने एक साधा तुकडा लावला तर...’मारामारी नको रे “ अशी आर्जवी विनवणी... पण म्हणून वेळ आल्यावर लयकारीवरचे असाधारण प्रभुत्व सुद्धा अतिशय साधे पणाने गाण्याचे एक ‘अंग’ म्हणून आले... कुठेही काहीही ‘सिध्द’ करायचे नव्हते...

संजयासारखी ...हृष्यामि च मुहुर्मुहु अशी अवस्था....

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

रमेश आठवले's picture

6 Jan 2014 - 10:31 am | रमेश आठवले

किशोरी ताई यांच्या इतक्या चांगल्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या मेहफिलीचा आनंद घेऊ शकलात !
भैरवी ही कोणत्याही वेळेला बैठकीच्या शेवटी गाण्याचा प्रघात आहे पण ते बरोबर नाही असे मत कुमार गंधर्व यांनीही व्यक्त केले आहे.

पैसा's picture

9 Jan 2014 - 8:29 pm | पैसा

मस्त अनुभव! अजूनही किशोरी आमोणकर सलग इतका वेळ गाऊ शकतात? ग्रेट!

भैरवी रागाबद्दल असं वाचलेलं आठवतं की तो सकाळचा राग आहे. रात्रीची मैफल संपायला सकाळ व्हायची, त्यामुळे मैफिलीच्या शेवटी भैरवी गायची पद्धत पडून गेली. याबद्दल जाणकार लोक अधिक सांगू शकतील.

बर्फाळलांडगा's picture

9 Jan 2014 - 9:27 pm | बर्फाळलांडगा

नुसत्या वर्णनाने मंत्रमुग्धता आली आहे.

अर्धवटराव's picture

10 Jan 2014 - 2:54 am | अर्धवटराव

अगदी हेच म्हणणार होतो.

रमेश आठवले's picture

9 Jan 2014 - 11:47 pm | रमेश आठवले

भैरव आणि ललत हे दोन्ही पहाटे किंवा सकाळी गायचे राग गाउन झाल्यावर किशोरी ताईंनी भैरवी गाण्यास नकार दिला आणि “bhairavi is not for morning” असे त्या म्हणाल्या.

अत्रन्गि पाउस's picture

10 Jan 2014 - 9:30 am | अत्रन्गि पाउस

तसे स्पष्ट झाले नसल्यास क्षमस्व..

आम्ही संगीतनिरक्षर पण लेखन खरेच भिडले. खूप सुंदर.

नगरीनिरंजन's picture

10 Jan 2014 - 4:39 am | नगरीनिरंजन

असेच म्हणतो.
प्रत्यक्षात तिथे असतो तर असे वाटले असतेच याची खात्री नाही.

अत्रन्गि पाउस's picture

10 Jan 2014 - 9:33 am | अत्रन्गि पाउस

प्रतिसादांबद्दल धन्यवाद..
पूर्ण मैफिलीचे औदिओ रेकॉर्डिंग केले आहे...कुणाला हवे असल्यास व्य नि करावा...

स्पा's picture

10 Jan 2014 - 9:43 am | स्पा

झकासच

मला प्लिज मेल करा

lazyprass@gmail.com

अत्रन्गि पाउस's picture

10 Jan 2014 - 9:51 am | अत्रन्गि पाउस

९० एमबी कुठे कसे पाठवावे?

पैसा's picture

10 Jan 2014 - 9:56 am | पैसा

स्काय ड्राइव्हवर अपलोड करून ठेवा आणि ज्यांना हवे असेल त्यांना अ‍ॅक्सेस द्या.

लोटीया_पठाण's picture

10 Jan 2014 - 9:58 am | लोटीया_पठाण

mediafire.com इथे अपलोड करा अन आम्हाला लिंक द्या.

बर्फाळलांडगा's picture

10 Jan 2014 - 11:03 am | बर्फाळलांडगा

mediafire.com एकदम सोपे आहे. त्यावर अपलोड करून कृपया इथेच लिंक शेअर करा.

अत्रन्गि पाउस's picture

10 Jan 2014 - 10:10 am | अत्रन्गि पाउस

निश्चित करतो आणि कळवतो..

अत्रन्गि पाउस's picture

11 Jan 2014 - 8:46 am | अत्रन्गि पाउस

https://drive.google.com/folderview?id=0B3Q-JzTONoCDSDlJZlFod1VMY00&usp=...

टाकले आहे..जरा बघता का प्लीज डाउनलोड होतंय का?
आणि हो...मधल्या माझ्या कॉम्मेंत्स पण रेकोर्ड झाल्य....त्या मात्र इग्नोर माराव्यत ...

पैसा's picture

11 Jan 2014 - 8:55 am | पैसा

ऐकताही आली आणि डाऊनलोड होते आहे. तिचे एक्सटेन्शन mp4a आहे आणि nokia music manager मधे ओपन झाली. मस्तच!

तिमा's picture

11 Jan 2014 - 9:11 am | तिमा

'किशोरीताई' या माझ्या आदरस्थानाबद्दल असे भारुन टाकणारे लिहिल्याबद्दल! लिंक वरुन आता उतरवतोच ती मैफिल!

अत्रन्गि पाउस's picture

11 Jan 2014 - 9:55 am | अत्रन्गि पाउस

आनंद सुद्धा एकट्याने सोसवत नही :D

लॉरी टांगटूंगकर's picture

11 Jan 2014 - 3:49 pm | लॉरी टांगटूंगकर

मानलं यार, सहीच. आनंद वाटत रहा. खूप खूप धन्यवाद!!!!!

रमेश आठवले's picture

12 Jan 2014 - 3:45 pm | रमेश आठवले

अमदावाद मध्ये दर वर्षी तारीख १ ते १३ जानेवारी दरम्यान सप्तक या नावाचा शास्त्रीय संगीताचा महोत्सव होतो. त्याचे स्वरूप सवाई गंधर्व महोत्सवासारखे आहे.
ता. ११/१२ च्या रात्री सप्तक मध्ये तरुण आणि लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती ( पंडित अजय चक्रवर्ती यांची कन्या ) यांचे गाणे झाले. त्यांनी प्रथम राग अभोगी आणि त्यानंतर मांज- खमाज मध्ये एक ठुमरी सादर केली. त्यानंतर काही श्रोत्यांनी त्याना भैरवी सादर करण्याची फर्माईश केल्यावर, माझ्या नंतर अजून एक कलाकार आपली कला सादर करणार आहेत असे कारण सांगून भैरवी गाण्यास नकार दिला आणि आपले गाणे संपवले.
www.saptak.org/

अत्रन्गि पाउस's picture

4 Apr 2017 - 7:47 am | अत्रन्गि पाउस

अतिशय शोकाकुल अवस्था आहे आज

वरुण मोहिते's picture

4 Apr 2017 - 9:20 am | वरुण मोहिते

अत्रन्गि तुम्ही पण होतात त्या वेळी गेट वे ला . मी पण होतो . कुठल्यातरी बावळट श्रोत्याने आता हे गाच तुम्ही म्हणून आग्रह धरलेला . त्यावेळी एका वाक्यात ते जे काही बोलल्या त्यावरून तेज बुद्धिमत्तेचे दिसून आले .
श्रद्धांजली .