बसल्यानंतर ची मजा,

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
4 Jan 2014 - 4:48 am

बसल्यानंतर ची मजा,

दारू पिणाऱ्यानबरोबर बसण्याची मजा काही औरच असते. माझा मामे भावू आणि मेव्हणा अट्टल पिणारे. मी पीत नाही पण त्यांच्याबरोबर बसायला खूप आवडते. एक तर मी एक लंबर खवय्या, त्यात चकना आयटम चा चाहता.

बऱ्याच वेळा मित्रांबरोबर बार मध्ये गेल्यावर, मी पीत नाही हे ऐकल्यावर येणाऱ्या प्रतिकियांचा सामना केला आहे. काही लोक "काय गावन्ढळ आहे?" या नजरेने बघतात. काही लोक आजकाल असा माणूस असू शकतो यावर अविश्वास दाखवतात. काही लोक माझ्यावरच अविश्वास दाखवतात कारण अस्मादिकांचा चेहरा पाहून कोणीही मला अट्टल पिअक्कडच म्हणेल (त्याला इलाज नाही, देवाने जे रूप दिले त्याला आम्ही काय करणार म्हणा) असो.

तर बार मधील धुंद वातावरणाचा अनुभव/आनंद घ्यायला मी बर्याच वेळा मित्रांबरोबर जातो. आणि मग एक दोन पेग पोटात गेल्यावर जी काही मुक्ताफळे उधळली जातात ती तर लाजवाब. उदाहरणादाखल काही…

१) आपलं असं नाही, आपण म्हणजे एकदम हा…….

२) अरे काय करायची आहे ती जमीन ठेवून मला, तुला पाहिजे ना, दिली तुला चल. आपली जबान आहे, एकदा दिली म्हणजे दिली (बऱ्याच वेळेला या जबानी रेकोर्ड करून सकाळी ऐकवल्या आहेत.)

३) ऑफिस मधले प्रसंग मीठ मसाला लावून सांगणे - माझा बॉस बोलला, हे पूर्ण झाल्याशिवाय घरी जावू नकोस. मी बोललो "हड, आज थर्टी फर्स्ट आहे." आपण बॉसला तोंडावर सुनावतो … (खरी परिस्थिती वेगळीच असते)

४) अरे एवढे पाणी कशाला टाकतो, कच्ची मारना. सालं बोxत नाही दम आणि प्यायला बसलय…

५) मुलींची लफडी - अरे काय देवदासगिरी करत बसला आहेस. विचारून टाकना सरळ. मी विचारू का तुझ्या तर्फे? फोन लाव, आता विचारतो…(स्वत:च घोंगड भिजत पडलंय)

६) प्यायला बसल्यावर आपण पैश्याकडे बघत नाय. (प्रत्यक्षात बिल आल्यावर तुझ्याकडे किती आहेत… माझ्याकडे एवढेच आहेत… हे चालू होते) - मी पीत नसलो तरी मी पण त्यात भागीदार असतो. विरोध केल्यास आणखी मुक्ताफळे - "तुझं तोंड कोणी धरलं होत कारे भोसXच्या. बामन बनतोय भेंXX "

कार्यकम आटोपल्यावर तरंगणार्या सदस्यांना घरी सोडणे आलेच. कित्येक वेळेला घरी सोडून मागे फिरताच काही संवाद कानी पडतात - "तुम्हीहि तसले आणि तुमचे मित्रहि तसलेच…. "

इतरांना असे काही अनुभव आले असल्यास जरूर कळवा…

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

देव मासा's picture

4 Jan 2014 - 7:56 am | देव मासा

चालत चालत बार मध्ये जायचे , सरपटत सरपटत घरी यायचे , आज संध्यकाळ नंतर सांगतो अनुभव....

*drinks* *DRINK* :drink:

खटपट्या's picture

4 Jan 2014 - 8:26 am | खटपट्या

*drinks*

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Jan 2014 - 8:36 am | कैलासवासी सोन्याबापु

मी पिण्यातुन स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे हल्लीच (आता कन्सल्टींग ला कोणी बोलवले तर काय ?? हे अजुन नाही ठरवलेले);) , आवडते वाक्य् म्हणजे

१. येड्या तु तर भाऊ न रे आपला
२. गाडीची चावी दे
३. मंग्या गाडी काढ आज ह्याची आ********

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jan 2014 - 9:16 am | ज्ञानोबाचे पैजार

वेगळ्या विषयावरचा धागा दिसतो आहे म्हणुन शिर्षक वाचुन मोठ्या उत्सुकतेने आणि अपेक्षेने धागा उघडला, पण दारुवरचाच अजून एक धागा बघून घोर निराशा झाली.

इरसाल's picture

4 Jan 2014 - 9:59 am | इरसाल

ज्ञापै तुम्ही "कु"ठे बसला होतात ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jan 2014 - 12:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

आम्ही कुठे कुठे बसलो होतो ही माहिती तुम्हाला नुसती मजा म्हणुन पाहिजे का त्या ठिकाणांना भेट देउन अनुभव घ्यायचे आहेत?

इरसाल's picture

4 Jan 2014 - 12:49 pm | इरसाल

आता आजोबांनी नातवाला काका म्हणावे ? काय जमाना आलाय.

बरं ते फकस्त मजा म्हणुन जाणुन घ्ययचे होते हो !

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jan 2014 - 1:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

इरसाल काका एवढा राग येत असेल तर यापुढे काका नाही म्हणणार तुम्हाला.

बरं ते फकस्त मजा म्हणुन जाणुन घ्ययचे होते हो !

मग त्या साठी जनरल नालेज आणि कल्पनाशक्ती यांचा संगम पुरेसा आहे.

इरसाल's picture

4 Jan 2014 - 2:07 pm | इरसाल

नाय तर उगा काय्बी धरुन बसायचे तुम्ही. काका मामा चालेल.
दुसरं म्हंजे आम्च्या कडे गनरल नालेज आणी कल्पना शक्ती नाही.
धन्यवाद.

मदनबाण's picture

4 Jan 2014 - 10:03 am | मदनबाण

प्यायल्या नंतर सामान्य माणसाचा सुपरमॅन होतो म्हणे... ;)

श्रीरंग_जोशी's picture

4 Jan 2014 - 10:10 am | श्रीरंग_जोशी

माझ्याकडून एक भर...

काही पेग पिऊन पोटात गेलेली ओठांवर येऊ लागल्यावर...

अरे तुला काय वाटतय, मला चढली आहे, अरे अजुन तर काही पिलीच नाही यार....;-).

आदूबाळ's picture

4 Jan 2014 - 1:42 pm | आदूबाळ

मस्त लेख!

अजून काही:

- अचानक आपण रफी / लता आहोत असा साक्षात्कार होऊन गाणी (विशेषतः संथ लयीतली / रागदारी बेस्ड) म्हणायला लागणे. मध्येच "काय दर्द आहे...वा..वा" वगैरे म्हणणे

- तरूणपणी माझ्याबाबतीत क्ष झालं रे, नाहीतर मी आज असतो (क्ष = घटना. उदा: रॅगिंग, प्रेमभंग, घरचा सपोर्ट नसणे | य = अचीवमेंट. उदा. मॅनेजर, डॉक्टर, प्रोफेसर)

- स्वतःबद्दलच्या वाट्टेल त्या छोट्या मोठ्या गोष्टीचा अभिमान जाहीर करणे ("आपण फक्त पांढरे शर्ट वापरतो...आपलं असं असतं...हां...")

- मराठी चित्रपटसृष्टीतल्या तारे - तारकांचं कोणाकोणाबरोबर "आहे" याची चर्चा करणे. (एका इसमाने मला मालिकांमधून काम करणारी एक सेमी-प्रसिद्ध अभिनेत्री आणि महाराष्ट्राचे एक भूतपूर्व महसूल मंत्री यांचं "आहे" असं सांगितलं होतं. अनेक प्रयत्नांनंतरही मला ते चित्र काही डोळ्यासमोर आणता येईना!)

बाकी आपापल्या जातीचा अभिमान आणि इतर जाती कशा "आम्हाला" ठेचून काढत आहेत, परदेश-द्वेष वगैरे विषय ऑल टाईम हिट्ट आहेत!

+११११

अभिप्रायाबद्दल धन्यवाद

अभ्या..'s picture

7 Jan 2014 - 3:33 pm | अभ्या..

आबा अजून तीन स्याम्पल.
एक वडापवाला बारमध्ये येन्ट्री करतानाच त्याच्या चायना मोबाइलवर फुल्ल व्हॉल्युम "नायक नही, खलनायक हुं मै" हे संजुबाबाछाप गाणे लावायचा. पूर्ण पिणे (अर्थातच लो कॉस्ट ओसी) होइपर्यन्त तेच गाणे रिपीट. महत्वाचे म्हणजे त्या गाण्यातील "मै भी शरीफोसा जीता मगर" या वेळीवर पेटंट हुंदका ठरलेला. गेले साताठ म्हैने रोज दोनदा(कमीतकमी) हा प्रकार चालूय.
दुसरा नग परवाच पाहण्यात आलाय. हे देवयानी प्रेमी आहेत. तिच्यासाठी कायपण म्हणत तेच गाणे २०-२५ वेळी रिपीट होते. प्रत्येक कडव्यानंतर "आय लव्ह यु देवयानी" हा डॉयलॉग. अ‍ॅडिशनल अ‍ॅक्शन म्हणजे वेटरांसहित बारमालकाला पण त्याच्या पैशाने पिण्याची ऑफर. :)
आणखी एक नग प्रत्येक गोष्टीत जगाला माझी किंमत नाही हा सिध्दांत प्रुव्ह करतात. वेटरने ग्लास दिले तरी "पुसून दिले नाहीस, कुणाला माझी किंमत नाही." मालकाने उधारी ठेवली नाही त्यालापण किंमत नाही. आमदारसाहेब समोरुन न बघता गेले. त्यांनापण माझी किंमत नाही. हे ठरलेले.

असल्या अनुभवांवर एक 'वित्तुत' ;) लेख यिऊन्द्या!

आदूबाळ's picture

7 Jan 2014 - 5:02 pm | आदूबाळ

विस्तुत लेख +१

दारु भरलेला ग्लास हातात घेऊन, "दारु आहे हातात, खोटं नाही बोलणार" ;)

- (बसायला आवडणारा) सोकाजी

"दारु आहे हातात, खोटं नाही बोलणार"

नाना नाना, असं नाही.
"अमृत आहे हातात" किंवा चकण्यातल्या शेंगदाण्याला "अन्न आहे हातात" असं म्हंतात हो. ;)

सोत्रि's picture

8 Jan 2014 - 2:59 pm | सोत्रि

अभ्या, बरोब्बर असावे!
पण मी जरा सोज्वळ प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला होता.

- (यापुढे 'अमृत आहे हातात' असे म्हणण्याचे ठरवलेला) सोकाजी

सुहास..'s picture

4 Jan 2014 - 2:06 pm | सुहास..

काही मिपाकरांच्या सवयी सांगण्यास हात वळवळतो आहे ...पण कट्रोलिंग !!

कॉकटेल कट्टेकरी ;)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Jan 2014 - 2:09 pm | प्रकाश घाटपांडे

आपण कस यौं पितो यवडी पिली तरी आपल्याला चढत नाही अशा गप्पा मारणार्‍यांना मी म्हणतो. यव्ढी पिली तरी चढत नसेल तर पानी प्या की! कशाला पैशे वाया घालवता?

सुहास..'s picture

4 Jan 2014 - 2:11 pm | सुहास..

अगदी शास्त्रोक्त ओ काका ;)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Jan 2014 - 2:24 pm | प्रकाश घाटपांडे

आता शास्त्रोक्त नाही शास्त्रापुरती!

अर्धवटराव's picture

4 Jan 2014 - 2:24 pm | अर्धवटराव

- गाडी मै चलाऊंगा (मै वर जोर देऊन)
- भाई ने (स्वतःला उद्देशुउ) बोला ******
- तु मेरा भाई है
- आज पुराना (इथे स्वतःचं नाव) मर गया... आज से नया (परत स्वतःचं नाव) पैदा हुआ
- आज से मैने उसे छोड दिया (तिने कधिच धरुन ठेवलं नव्हतं)
- जींदगीमे ऐसाहि होता है रे पगले/चुतीए (वगैरे वगैरे)
- आज जितनी है पैमानेमे उतनी नहि मैखानेमे (आणि तत्सम शेरोशायरी)

आणि बरच काहि...

शब्दांच्या मर्यादेत कसं बरं बसवताय ह्या अनुभवांना?
अनुभव हे अनुभव असतात. जातीनं हजर राहून अनुभवावेत. उगाच्च शब्दबद्ध वगैरे करु नयेत.
कधी स्वतःला कधी दुसर्‍याला केंद्रस्थानी ठेवावं. अनुभव घ्यावा.

वर्णनातीत! ;)

खटपट्या's picture

4 Jan 2014 - 10:19 pm | खटपट्या

हो बरोबर, अनुभव हे अनुभव असतात. ते प्रत्यक्ष हजर राहूनच घ्यावेत. शब्दांच्या मर्यादेत बसविणे कठीणच………

बॅटमॅन's picture

4 Jan 2014 - 10:36 pm | बॅटमॅन

लै मज्जा येते अशावेळेस. इतरांची मुक्ताफळे ऐकावीत आणि हळूच चखणा खतम करावा अन मग चखणा कोण खाल्ला यावरून उगा श्या घालाव्यात अन मज्जा बघावी =)) आपण सहावीत अस्ल्यापासून दारू पितोय वैग्रे वल्गना करणारे एका पेगमध्ये ओकतात त्यांना नंतर बघायला काय मजा येते आहाहाहा =))

खटपट्या's picture

6 Jan 2014 - 12:21 am | खटपट्या

*ROFL*

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Jan 2014 - 2:14 am | निनाद मुक्काम प...

विमान अधांतरी तरंगायला लागले की
हमखास ही वाक्य कानावर पडतात.
तू माझा खरा मित्र .
आजपासून दारू सोडली , किंवा हा माझा शेवटचा ग्लास ,
किंवा अचानक एखादा भावनिक होऊन रडायला लागतो.
त्याला समजावणे इतरांचे कार्य ,
उर्दू शेरोशायरी किंवा गझल सुरु होतात,
तोंडांत आपसूक शिव्या ,चावट बोलणी किंवा एखादे परिचयातल्या व्यक्तीचे गॉसिप असते.
जमाना खराब
तुझी माझी यारी मग ,,, अश्या धाटणी ची वक्तव्ये
पण मनातील मळमळ जी एरवी आपण चारचौघात न बोलत आतल्या आत कुढत बसतो ती अश्या क्षणी आपसूक ओठांवर येते..

.सध्यातरी फक्त दारू प्यायला बसल्यावर ह्या विषयीच लिहिले
बाकीचे पुढे कधीतरी ..Cheeky Smiling

माझीही शॅम्पेन's picture

5 Jan 2014 - 12:44 pm | माझीही शॅम्पेन

दारू चढल्यावर माणूस खरोखरच खर बोलतो की तो केवळ कल्पनाविलास आहे ?
बाकी हॉस्टेल मध्ये दारू पार्ट्यात एक गोष्ट लक्षात यायची ती म्हणजे जे लोकल मुले एरवी कधीच इंग्लीश बोलायची नाही ती एका सिप (पेग राहुद्या) मध्ये एकदम फाड-फाड तर्खर्ड्कर व्हयायची :)

चिरोटा's picture

7 Jan 2014 - 4:55 pm | चिरोटा

आणखी एक-
तिने(कॉलेजातली एखादी सुंदर मुलगी) मला विचारले होते पण मीच नाय म्हणालों.वेळ आहे कोणाला प्रेम करायला?

पैखाने मे बैठे थे मैखाना समझ कर...
पी लिया पानी पैमाना समझ कर... ;)

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2014 - 3:12 pm | टवाळ कार्टा

=))

पच्चीस सालसे चारमिनार पे बैठा हुवा हूँ, तुम मेरेसे पैखाना साफ कराते रे, माकी किरकिरी!!!

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jan 2014 - 3:48 pm | अत्रुप्त आत्मा

=))

सूड's picture

6 Jan 2014 - 9:13 pm | सूड

शिरा पडो !!

तिमा's picture

5 Jan 2014 - 8:41 pm | तिमा

'बसणे' या शब्दाचे मराठीत बरेच अर्थ आहेत. त्यातील प्रत्येक अर्थावर एकेक धागा काढावा अनुभवींनी. म्हणजे मग, मैखान्यापासून पैखान्यापर्यंत,सर्व विषयांचे ज्ञान मिळेल.

बॅटमॅन's picture

6 Jan 2014 - 12:42 am | बॅटमॅन

अग़दी हेच म्हणणार होतो पण तिमान्नी आदुगरच सांग़टलेलं आसतंय सग़ळं.

प्रसाद गोडबोले's picture

8 Jan 2014 - 1:28 pm | प्रसाद गोडबोले

मलाही वाटले होते काही वेगळ्या "बसण्या"वर हा धागा असेल म्हणुन

चिरोटा's picture

7 Jan 2014 - 3:37 pm | चिरोटा

आणखी एक टार्गेट म्हणजे सरकार,सरकारातले मंत्री.
१)मा**** नुसते पैसे खातात आणि लोकांना,देशाला भिकेला लावतात.
२)भर चौकात सगळ्यांना फाशी दिले पाहिजे.सौदी,आखाती देशांमध्ये असेच असते.
३)आपला देश कधीच सुधार्णार नाय्.आपण त्या लायकीचेच नाय.

)आपला देश कधीच सुधार्णार नाय्.आपण त्या लायकीचेच नाय.

तथाकथित इंटुक लोकही असेच म्हणत असतात. त्याला दारू पिण्याची गरज नसते.

परिंदा's picture

8 Jan 2014 - 1:07 pm | परिंदा

इंटुक म्हणजे काय?

बॅटमॅन's picture

8 Jan 2014 - 3:39 pm | बॅटमॅन

इंटेलेक्चुअल या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे तो. पण जण्रली त्याचा अर्थ अन्य सर्व लोकांना तुच्छ लेखून आपलाच जघनभाग सप्तरंगी आहे असे म्हणणारांस अन ती वृत्ती शब्दजंजाळाआड दडवणारे असा घेतला जातो.

कॅप्टन एक चीज-चेरी-पायनाप्पल लाओ.
अरे आज xxx आला नाही फोन लाव साल्याला बघ कसा झाडतो आता त्याला.

कपिलमुनी's picture

7 Jan 2014 - 4:59 pm | कपिलमुनी

चीज-चेरी-पायनाप्पल

शैंगदाण्याची पुडी आणि तांब्यभर पाणी एवढ्यातच मज्जा ओ ..बाकी नुसते पांचट

गवि's picture

8 Jan 2014 - 1:37 pm | गवि

हॅ हॅ हॅ..

काही निरीक्षणे:

१. मद्यपानप्रसंगावर आणि मद्यपान करणार्‍यांवर मजेशीर लेखन आणि चर्चा करणारे लोक मुख्यतः न पिणारे असतात. न पिणारे म्हणजे "स्पर्शही न करणारे" असे वाचावे. मद्यपान न करणे उत्तमच, पण या मद्यपानविषयक मजामजा सांगता-लिहीताना आपण स्वतः पीत नाही हे आवर्जून लिहायला ते विसरत नाहीत.. त्यामुळे विषयाच्या रंगतीला काहीच फरक पडत नसूनही.. (या धाग्याबाबतच नव्हे.. आतापर्यंतच्या वाचनावरुन निरीक्षण) ;)

२. मद्यपानप्रसंग आणि मद्यपान करणारे लोक हा मुख्यतः मद्यपान न करता चखणा खाणार्‍यांच्या आकर्षणाचा विषय असतो. प्रत्यक्ष मद्यपान करणारे फक्त मद्यपान करतात आणि आनंद मिळवतात. त्यांना मनोरंजनाकरिता अन्य लोकांची गरज नसते.

आता मद्याविषयी काही प्रगाढ विश्वासाने केली जाणारी विधाने.. (पुलंच्या "म्हैस" मधल्या "कॉफीत ट्यानिन नावाचं विष असतं" असं आत्मविश्वासाने ठासणारे मास्तर आठवा)

मद्याविषयी या निम्ननिर्दिष्ट समजुती "चमचाभर पिऊन टेस्ट बघणार्‍या" गटात जास्त असतात. पण प्रसंगोपात्त पिणार्‍यांच्या गटांमधेही या समजुती मोठ्या प्रमाणात मूळ धरुन असतात आणि त्यावर बसण्याप्रसंगी वेळोवेळी शिकवण्या दिल्या घेतल्या जातात. नवीन मेंबरे ज्येष्ठांकडून हे ऐकून प्रभावित होत असतात.

अ. कलर्ड (ब्राउन, रेड, सोनेरी) दारवा या क्लिअर दारवांपेक्षा "कडक" असतात.. जिन, वोडका वगैरे हार्ड नसतात.. व्हिस्की, रम वगैरे खरी स्ट्राँग ड्रिंक्स.

टीपः या सर्व दारवांमधे अल्कोहोलचं प्रमाण तंतोतंत सारखं असतं. (फ्लेवर्ड वोडकामधे तीनचार टक्के कमी, पण बाकी सर्वांत तसंच) एकूण चढणे हे पेयात असलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणात होत असल्याने यात स्ट्राँग आणि वीक असा काहीही फरक नसतो. तरीही तो फार गाढपणे मानला जातो. रंगीत मद्यात अ‍ॅडिटिव्हज असतात.. त्यामुळे दारु "चढण्यात" फरक पडत नाही, केवळ नंतर हँगओव्हरच्या वेळी मद्याच्या हँगओव्हरमधे या अ‍ॅडिटिव्हचे परिणाम अ‍ॅड होऊन जडपणा, मळमळ, अन्य रिअ‍ॅक्षन्स असा फरक पडू शकतो.

क. जिन वगैरेची किक हलकी असते. ती ड्रिंक्स बायकांसाठी असतात.. कारण त्यांना पार्टीत लगेच चढू नये.. सुखरुप घरी पोचल्यावर चढावी म्हणून हळूहळू किक देणारी ड्रिंक्स त्यांच्यासाठी असतात.

टीप: अल्कोहोलिक पेय प्यायले असता आपापल्या शरीररचनेप्रमाणे ठराविक प्रमाणात अल्कोहोल रक्तात उतरुन परिणाम दाखवतं. त्यामधे जिन घेतली तर तासाभराने आणि रम घेतली तर मिनिटभरात असा "टायमर" नसतो. जिन पुरुषांनी प्यायली तरी व्हिस्की-रमइतकीच चढणार. स्त्रियांना कोणतेही मद्य पुरुषांपेक्षा कमी प्रमाणात घेऊनही चढते कारण त्यांच्या शरीरांचा आकार आणि स्नायूंचा अंश पुरुषांच्या तुलनेत कमी असतो आणि अल्कोहोल प्रोसेस करुन शरीराबाहेर टाकायला लागणारे हार्मोन्सही कमी प्रमाणात असतात.

ड. वेगवेगळी ड्रिंक्स मिक्स केल्यास जास्त त्रास होतो. (जितकी प्यायची तितकी पी..काही होणार नाही.. पण व्हिस्कीने स्टार्ट केलायस ना? आता व्हिस्कीच पी.. मधेच वोडका नको. नंतर वाट लागेल.. नेव्हर मिक्स युअर ड्रिंक्स.. लक्षात ठेव. )

टीपः एकूण किती मिलीलीटर द्रव्य घेतले आणि त्यात किती टक्के अल्कोहोल होते यावर चढणे (सुरुवातीचा मजेचा भाग) अन त्याच समप्रमाणात उतरणे (हँगओव्हरचा त्रास) दोन्हीची तीव्रता ठरते. कोणत्या प्रकारची मद्ये घेतली आणि किती प्रकारची यावर नव्हे.

ई. बियर पिणारा एकदमच लिंबूटिंबू (ठीक आहे.. नको घेऊ ड्रिंक्स.. पण बियर तर घेशील?)
फ. मी फक्त बियर घेतो हां.. हार्ड ड्रिंक्स नाही.. (असे म्हणून चार स्ट्राँग बियर्स स्वाहा)

टीपः बियरमधे अल्कोहोलचे प्रमाण कमी असले तरी ती चार बाटल्या प्यायल्यावर एकूण अल्कोहोल कन्टेंट हा प्रमाणात हार्ड ड्रिंक घेणार्‍याच्याही वर चढतो. तेव्हा बियर किंवा वाईन म्हणजे "हार्ड" नव्हे हा एक गोड गैरसमज. फरक फक्त प्रमाणाचा असतो आणि बहुतांशवेळा बियर घेणारे चार बियर्सहून कमी घेतच नाहीत.

वरील सर्व टिप्पण्या भारतीय वातावरणाला लागू आहेत. कारण ४० ते ४२ टक्के अल्कोहोल कंटेंट हा सर्व "हार्ड" ड्रिंक्स मधे स्टँडर्ड आहे आणि त्याहून जास्त भारतात अलाउड नाही.

शिद's picture

8 Jan 2014 - 1:44 pm | शिद

एकदम अभ्यासपुर्ण प्रतिसाद... आवडेश.

प्रसाद गोडबोले's picture

8 Jan 2014 - 4:41 pm | प्रसाद गोडबोले

गवि , अभ्यास चांगला आहे !!

मग कधी बसुयात पंगतीला ;)

लॉरी टांगटूंगकर's picture

8 Jan 2014 - 11:42 pm | लॉरी टांगटूंगकर

कड़क प्रतिसाद!!! :D
बियर पिणारा एकदम लिंबूटिंबू वगैरे निरीक्षण खतरनाक आहे !!

अविनाश पांढरकर's picture

8 Jan 2014 - 5:44 pm | अविनाश पांढरकर

मस्त आहे प्रतिसाद!!!

खटपट्या's picture

8 Jan 2014 - 10:34 pm | खटपट्या

स्त्रियांना कोणतेही मद्य पुरुषांपेक्षा कमी प्रमाणात घेऊनही चढते कारण त्यांच्या शरीरांचा आकार आणि स्नायूंचा अंश पुरुषांच्या तुलनेत कमी असतो आणि अल्कोहोल प्रोसेस करुन शरीराबाहेर टाकायला लागणारे हार्मोन्सही कमी प्रमाणात असतात.

हे मैत्रिणीना सांगतो आता. चांगली माहिती

प्यारे१'s picture

9 Jan 2014 - 1:12 pm | प्यारे१

फारच 'खटपट्या' करत आहात! ;)

खटपट्या's picture

9 Jan 2014 - 11:59 pm | खटपट्या

*wink*

माझीही शॅम्पेन's picture

9 Jan 2014 - 12:53 pm | माझीही शॅम्पेन

_________/|\_____________

बाब्बो !!!

नेव्हर मिक्स युअर ड्रिंक्स

याचा संबंध अल्कोहोल कंटेंटशी नसून चवीशी असावा. म्हणजे थोडासा उसाचा फ्लेवर असलेल्या रमने सुरुवात केली असेल आणि मध्येच कडवट्ट व्हिस्की किंवा बेचव जिन प्यायली तर (किमान) चव बिघडून रसभंग होईल किंवा (कमाल) पोटात ढवळाढवळ होऊन वकार होईल.

-----

तसं बियरमध्ये व्हिस्की घालून पिणं हेही फेमस आहे. या प्रकाराला (का कोण जाणे) "रिक्षावाला" म्हणतात.

-----

अजून दोन समजुती / तर्‍हा:
- काळ्या रंगाच्या दारूत काळं सॉफ्टड्रिंक घालावं आणि पांढर्‍यात पांढरं. (मग कुरासाओ सारख्या निळ्या दारूत काय घालायचं भो? रॉकेल?)
- पेय-समारंभाला सुरुवात करण्याआधी ग्लासात बोट बुडवून चारी दिशांना थेंब शिंपडायचे. उपस्थित राहू न शकलेल्या आपल्या दोस्तांना "अर्घ्य" म्हणून!!

व्होडका आणि पाणी - किडनीला धोका
रम आणि पाणी - यकृताला धोका
व्हिस्की आणि पाणी - हृदयाला धोका
जीन आणि पाणी - मेंदुला धोका

म्हणजे गडबड दारूत नसुन पाण्यात आहे.
पाणी वाचवा… XXX प्या.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2014 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा

@म्हणजे गडबड दारूत नसुन पाण्यात आहे.>>> =)) खत्तरनाक! http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif