हार्दीक शुभेच्छा . . .

अनंतसुत's picture
अनंतसुत in जनातलं, मनातलं
2 Jan 2014 - 10:50 am

आदरनीय व्यासपीठ ( फ़ बी ची टाईमलाईन ), कार्यक्रमास उपस्थीत प्रमुख पाहुणे (अपेक्षीत न्यु यीअर पार्टीचा पास कींवा पार्टनर न मिळाल्या मुळे नाईलाजास्तव घरी असणारी मंडळी) आणि माझ्या बंधु आणि भगिणीनो आज आपण इथे नेमके कशासाठी जमलो आहोत ह्याची तुम्हाला कल्पना आहेच (व्हॉट्स-ऍप, आणि एस एम एस ह्यांनी काल रात्रीपासुनच तसा धुमाकुळ घातलेला असेलच).
तर आज ३१ डिसेंबर, म्हणजे आज नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा देण्याचा दिवस (खरं पाहिलंतर रात्र). आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे कुणाचे तरी अख्खे एक वर्ष सुख, समॄद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ शकेल इतके सामर्थ्य आपल्या वाणीत नक्कीच नाही, पण भगवंताच्या कॄपेत नक्की आहे, त्यामुळे जाहीर हार्दीक शुभेच्छा देण्याची हिम्मत करीत आहे, तसही "होऊदे खर्च" ह्या टायटल खाली आजकाल कुठल्याही कारणाच्या हार्दीक शुभेच्छा देण्यास समाजाने तत्वत: मान्यता दिलेली आहेच,
तर आपणा सर्वास नविन वर्ष सुख, समॄद्धी आणि भरभराटीचे जावो, म्हणजे थोडक्यात रस्त्यावर कमी ट्रॅफीकचे, अविरत आणि भरघोस एम बी पी एस इंटरनेट कनेक्टीविटीचे (कलयुगात 'अंत' पाहण्याचे काम भगवंताने इंटरनेट कनेक्टीविटीला आऊटसोर्स केलं आहे म्हणे), ऑनलाईन शॉपींगमध्ये जास्तीत जास्त डिसकाउंटचे आणि ऑफरचे, कमीत कमीत हेअर लॉस, वेट गेन, पिंपल्स आणि इनकम टॅक्सचे, मुबलक गॅस सिलेंडर उपलब्धतेचे आणि किमान इंधन दराचे, इच्छीत पगारवाढीचे, सास-बहू रहीत डेली सोप्सचे, कमीत कमी स्क्रिपेड रियालिटी शोजचे, किमान अर्धे पैसे वसुल करणाऱ्या चित्रपटांचे आणि कमित कमी क्रिकेट सामन्य़ांचे जावो.
न्यु यीअरच्या शुभ मुहुर्थावर सालाबादा प्रमाणे, तेच तेच न्यु यीअर रिझोल्युशन न करता ह्या वेळी 'चेंज' म्हणुन काही नवीन न्यु यीअर रिझोल्युशन करावित ही नम्र विंनती,
स्वप्न पाहणाऱ्या मंडळींना निराश करण्याच माझा अजिबात हेतू नाहीये, पण स्वानुभवावरुन सांगतो, माझे मागच्या वर्षीचे न्यु यीअर रिझोल्युशन होते "स्वत:च्या डस्टर मध्ये, लेटेस्ट स्मार्टफोनच्या साह्याने नेविगेशन डायरेक्शन घेत, हातातील गेसच्या रिस्ट वॉचच्या बरोबर १० च्या ठोक्याला, पिंपरीच्या गुरुदेव श्टेशनरीवरच्या काउंटरवर गोल्डन फ्रेमचा रे - बॅन ठेवत मी कालनिर्णयचे कॅलेंडर विकत घेणार" ह्यातली कालनिर्णयच्या कॅलेंडरची शॉपींग उद्या मी नक्की करेन ह्यात शंका नाही.
सरकार जो पर्यंत स्वप्न पाहण्यास करमणूक कर लावणार नाही, तो पर्यंत पाढंरपेश्या समाजाने ती आवर्जून पाहावीत, त्याला न्यु यीअरच्या आंग्ल-मुहुर्ताची वाट पाहावी असा काही भारतीय घटनेत कायदा नाहीये. "आपण स्वप्न पाहावित बाकी देव पाहुन घेइल". पाहीलेलं प्रत्येक स्वप्न, मागितलेला हरएक नवस आणि उमलेली प्रत्येक आशा फळास येवो हीच इश्वरचरनी प्रार्थना . . .

अनंतसुत . . .

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे कुणाचे तरी अख्खे एक वर्ष सुख, समॄद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ शकेल इतके सामर्थ्य आपल्या वाणीत नक्कीच नाही, पण भगवंताच्या कॄपेत नक्की आहे
काय बोलता राव ! हे भगवंता ही जी काही वरती याचना केली आहे ती मी होलसेल मधे करत आहे आहे असे कॄपया समजुन घे ! आणि सगळं कसं अगदी होलसेल मधेच दे हो मला. ;) पाहीलेलं प्रत्येक स्वप्न, मागितलेला हरएक नवस आणि उमलेली प्रत्येक आशा फळास येवो हीच इश्वरचरनी प्रार्थना . . .
हे भगवंता इतकी शॉलिट्ट प्रार्थना तुला ऑलरेडी केलेलीच आहे तर...ती जरा जास्तच लक्ष देउन पूर्ण कर, म्हणजे काय ना... मी सुद्धा जरा चांगली स्वप्ने पाहिन म्हणतो ! ;) नवस पूर्ण करण्यातुन पाहिजे तर तुला जरा सुट देतो...पण उमललेल्या प्रत्येक आशेच "फळ" कसं मिळेल ते जरा बघ प्लीज. ;) मस्त पूर्ण पिकलेली,उत्तम गंध असलेली रसाळ "फळे" मला विशेष आवडतात हे कॄपया लक्षात असु दे. ;)

तुम्हालाही नववर्षाच्या हार्दिक शुभेछा

सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.