नोकरी विषयी माहिती पाहिजे

वासु's picture
वासु in जनातलं, मनातलं
31 Dec 2013 - 10:42 am

मला एका सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे नोकरी पाहिजेल.

मी Oracle Database(SQL)मधे नोकरी शोधत आहे.

मी नोकरीच्या साईट वर माझा CV टाकला आहे, पण मला जे offer येतात ते सगळे हैदराबाद, चेन्नई नाहितर दिल्ली च्या. काय करावे काही कळत नाही राव.

मग मला मिपाची आठवण झाली, मिपा वर खुप सारे मन्डळी आहेत मला नक्की मदत मिळेल हि आशा.

मिपा वर जर कोणी सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे असेल आणि तिथे जर जागा शिल्लक असेल तर जरुर कळवावे हि विनन्ती.

आपल्या प्रतिसादान्ची वाट पाहेन. :-)

धन्यवाद.

नोकरीशिफारस

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

31 Dec 2013 - 10:53 am | वेल्लाभट

असं दालनच सुरू करावं हे मी आधी एकदा सुचवलेलं. म्हणजे काय, सगळ्यांना नोकरीच्या संधी आणि शोध दोन्हीसंबंधी आपापल्या गरजा पोस्ट करता येतील. नाही का. किंवा जस्ट धागे असले तरी बेस्ट. की बाबा, पुण्यातील नोकरी; मुंबईतील नोकरी... असं वर्गीकरण करून.

हम्म. नुसती दालन प्रत्येकाला.
राष्ट्रपती भवनात असेच कायतरी लै दालन आहेत म्हणे ;-)

वेल्लाभट's picture

31 Dec 2013 - 11:25 am | वेल्लाभट

म्हणजे मिपा राष्ट्रपती भवनासारखं आहे तर!
राष्ट्रपती कोण मग?

वासु's picture

31 Dec 2013 - 11:04 am | वासु

हो ना.... मलाही तसच वाटत

तुमचा अनुभव किती वर्षांचा आहे ????

वासु's picture

31 Dec 2013 - 11:06 am | वासु

मला ४ वर्षन्चा अनुभव आहे.

वासु's picture

31 Dec 2013 - 11:11 am | वासु

पण Oracle Database(SQL) मधे फक्त २ वर्षान्चा अनुभव आहे.

kulpras's picture

31 Dec 2013 - 11:38 am | kulpras

If any one interested please send resume @ prasanna.kulkarni@microsoft.com
.net technologies 3+ years exp.

पण मला तर Oracle Database(SQL) मधे exp आहे...???

कलंत्री's picture

31 Dec 2013 - 11:48 am | कलंत्री

माझ्या पुतण्याने वरद टॅलेंट नावाची प्लेसमेंट चे काम सुरु केले आहे. सध्या तो इमारत बांधणीसाठी काम करत आहे. आपण varadtalent@gmail.com वर आपली व्यावसायिक माहिती ( रिसुमे) पाठवू शकता.

वासु's picture

31 Dec 2013 - 2:12 pm | वासु

धन्यवाद... मी माझा रिसुमे नक्की पाठवेल.

अजुन एक विचारायच होत कि, ही प्लेसमेंट software साठी काम करते का???

मी माझा रिसुमे नक्की पाठवेल
पाठवा. पण तुमच्या 'रिसुमे'त एवढ्या स्पेलिंग/ग्रामॅटीकल मिस्टेक करु नका.
(हघ्या)

कलंत्री's picture

1 Jan 2014 - 3:00 pm | कलंत्री

सध्या जरी नसले तरी तुमच्या व्यावसायिक माहितीच्या आधारे तो प्रयत्न करेल. कदाचित नोकरीही मिळवून देईल.

वासु's picture

2 Jan 2014 - 11:19 am | वासु

धन्यवाद

काळा पहाड's picture

31 Dec 2013 - 12:40 pm | काळा पहाड

हे थोडंसं विषयांतर होतंय, पण बाहेर नोकरी करायला हरकत काय आहे? मराठी माणसांचा हा सगळ्यात मोट्ठा प्रॉब्लेम आहे. त्यांना नोकरी शक्य तर महाराष्ट्रातच हवी, पुण्यातली बेष्ट, सेनापती बापट रोड वर ऑफिस असेल तर दुधात साखर आणि कंपनी अमेरिकेला पाठवायला तयार असेल तर आंबा रबडी. अरे जा ना जरा बाहेरच्या प्रदेशात, घ्या अनुभव वेगळ्या परिस्थीतीत रहाण्याचा. मी ज्यांचा इंटर्व्ह्यू घेतला आहे, त्यांना मी एक प्रश्ण मी विचारतोच. लोकेशन चा काही प्रॉब्लेम आहे का. म्हणजे कंपनी जर दुसर्‍या देशात, प्रदेशात पाठवत असेल तर काही ऑब्जेक्षन्स आहेत का. बरेच लोक सांगतात की हो, काही प्रॉब्लेम नाही ते लाँग टर्म ला यु एस, यु के कुठेही जायला तयार आहेत. मग मी त्यांना सांगतो की प्रदेश म्हणजे चेन्नई, गुरगाव, कोची सुद्धा असू शकेल, ज्याला मात्र ते नकार देतात. हे सांगायलाच नको की अशा लोकांना मी सिलेक्ट करत नाही.

मुक्त विहारि's picture

31 Dec 2013 - 12:51 pm | मुक्त विहारि

योग्य मत.

+१११११११११११११११११११११११११११११.

पूर्ण सहमत. मराठी माणूस इतका संकुचित गेल्या चाळीसेक वर्षांतच झालाय. शेवटी लाँगटर्मला महाराष्ट्रात रहा पण तीनचार वर्षे बाहेर काढली तर नुकसान काही नाही उलट फायदाच आहे.

प्यारे१'s picture

31 Dec 2013 - 2:07 pm | प्यारे१

+१११११११११.

कुठेही जा. मजेत काम करा. आनंदात नि निरोगी रहा.

-सुरुवातीला आजचा दिवस काढायचा असं 'वन डे अ‍ॅट अ टाईम' केलेला प्यारे

नॉन रेसिडेन्षियल मराठी's picture

31 Dec 2013 - 2:59 pm | नॉन रेसिडेन्षिय...

अतिशय बरोबर ! अहो खुप सारे मराठी राह्तात बाहेर हि ! गुरगाव मदे किति दाख्वु ? मी स्वतहा ९ वर्शापासुन आहे इथे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Jan 2014 - 9:59 am | हतोळकरांचा प्रसाद

पैसा बोलतो… बाहेरच्या देशात पाठवला तर भारतातल्या चार पट पैसा मिळतो म्हणून तिथे त्रास सहन करायला काही वाटत नाही. म्हणजे निदान त्रास सहन करण्याला कारण तरी आहे. फक्त अनुभव म्हणून भारतात तरी दुसऱ्या प्रदेशात जाऊन राहणे काही फार आनंददायक नाही असे मला वाटते. मग पर्याय उपलब्ध असेल तर आपली सोय कशाला सोडावी. मी मैसूर व चेन्नईला राहून पहिले आहे, मजा नाही राव!!

अवांतर : आणि तुम्ही फक्त लोकेशन प्रेफ़ेरन्स मुळे रिजेक्ट करून अन्याय नाही का करत एखाद्या उमेदवारावर! (अर्थात तशी एचआर ची पॉलिसी किंवा सूचना असेल तर गोष्ट निराळी).

वासु's picture

31 Dec 2013 - 2:04 pm | वासु

बाहेरील प्रदेशातील अनुभव आले आहेत म्हणुनच चेन्नई, गुरगाव सारख्या ठिकाणी नको वाटत.

अनुभव १: हैदराबाद, चेन्नई ठिकाणाची भाषा कळत नाही. त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही.

अनुभव २. अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही.

अनुभव ३. फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने).

मग तुम्हिच सान्गा चेन्नई, हैदराबाद च्या ठिकाणी रहायला कस जमेल.

प्यारे१'s picture

31 Dec 2013 - 2:09 pm | प्यारे१

नाही जायचं ना?
नका ना जाऊ पाटील. का बांधून घालतंय का कोण 'जा'च नि जाच म्हणून?

इतके काही अवघड नाहीये. अनेक मराठी तर रहातात च आहेत पण मराठीं पेक्षा गुजराथी, पंजाबी, बिहारी, दिल्ली वाले खुप रहातात. त्यांना कसे जमते?

अनुभव १: हैदराबाद, चेन्नई ठिकाणाची भाषा कळत नाही. त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही.

हा तुमचा problem आहे. आधी लोक तुमचा बद्दल काहीतरी सिक्रेट बोलत असतील किंवा वाईट बोलत असतील हा तुमच्या मनाचा ग्रह आहे. त्याच्यावर तुम्ही काम केले पाहीजे.

अनुभव २. अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही.

तुम्ही जर कंपनीत काम करत असाल तर सर्व लोकांना कामापुरते इंग्लीश येत च असणार. रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला इंग्लिश कसे येत असेल? मग तुम्ही germany मधे जाउन कसे काम करणार?

फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने).

वर उल्लेख केलेली लाखो माणसे रहात आहेत, तुम्हाला काय प्रोब्लेम. हल्ली वडगाव बुद्रुक ला सुद्धा सर्व मिळते. हैद्राबाद, चेन्नई चा तर प्रश्न च नाही.

मला वाटते, तुम्हाला स्वताला बदलायची गरज आहे.

हैद्राबादेत अनेक करी सेंटर आहेत तिथे चपात्या, फुलके मिळतात. जेवणाचा काही प्रोब्लेम नाही. हैद्राबाद्-पुणे १२ तास प्रवास आहे.

मी तिथे २ वर्षे राहिलो आहे. मला तरी काहीच प्रोब्लेम नाही आला.

१ व २. हैदराबादेस तरी भाषेचा प्रॉब्लेम नसतो. चेन्नैबद्दल सहमत. पण भाषा शिकणे काही अवघड नाही. आणि मी हे वैयक्तिक मत म्हणूनच सांगत नाहीये. माझे लै मित्र आहेत ज्यांना भाषा विषयात वट्ट इंट्रेस नसून अन मातृभाषा नसूनही तेलुगु, बंगाली, कन्नड, इ. शिकलेत अन तेसुद्धा मजेमजेत वर्षभरात. त्यामुळे हा मुद्दा होऊच शकत नाही. बाकी सोडा, तंजावुरसारख्या ठिकाणी तमिळचा त न शिकताही चार वर्षे राहिलेला माझा बिहारी मित्र आहे. काय जास्त अडत नाही म्हटला.

३. तेवढे अ‍ॅडजस्ट करता येत नसेल तर कसं हो चालायचं, मी स्वतः बंगालमध्ये होतो दोन वर्षे अन बंगळुरात चारेक म्हयने. तांदळाचे पदार्थ अ‍ॅडजस्ट करणे सोप्पे आहे. बंगाली जेवण मात्र हॉरिबल असायचे-किमान राहायचो तिथले. पण तरी मार्ग होतेच. इतकेही काही अडत नाही.

अन शेवटी असं आहे, आपलं गाव सोडायचंच नसेल तर पुण्याच्या तुलनेत मुंबैमध्ये (किंवा उल्टं) कसं कायकाय नस्तं वगैरे सांगणारेही लै असतात. त्यामुळे असोच. :D

आनंदराव's picture

31 Dec 2013 - 2:25 pm | आनंदराव

आहो, या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक नजरेने पहा.
ईतर ठीकाणी गेल्यावर निरनिराळ्या स्वभावाच्या लोकांशी भेती होतात.
इतर. ठीकाणी , नवे खाद्यपदार्थ कुठे मिळतात ते शोधा. आणि लोक कय बोलतात तुमच्याबद्दल त्याचा विचार त्य्यांना करु दे कि. तुम्ही तो विचार करुन तुमच्या आयुष्यात येणार्‍या संधी का नाकारताय?
बाहेरच्या प्रदेशात गेल्यामुळे नविन लोकंना भेतल्यामुळे तुमचे आयुष्य अनुभवसंपन्न होइल.
चाकोरी सोडा हो.

नॉन रेसिडेन्षियल मराठी's picture

31 Dec 2013 - 3:08 pm | नॉन रेसिडेन्षिय...

सहमत !

नॉन रेसिडेन्षियल मराठी's picture

31 Dec 2013 - 3:07 pm | नॉन रेसिडेन्षिय...

गुरगाव सारख्या ठिकाणी काय अनुभव आले हो ? जे आम्हाला आले नाय अजुन ?

फक्त आणि फक्त तान्दळचे पदार्थ खावे लागतात्(नाईलाजाने).

मी राहीलोय ना चेन्नई मध्ये काही वर्षे. बाकी तुम्हाला अमेरिकेत रहायला जमते ना? मग चेन्नई का नाही? तिथे पण अ‍ॅडजस्टमेंट करावी लागते. इथे पण. अमेरिकेत किती वेळा बाहेर जाऊन पोळीभाजी खाऊ शकता? बाकी मी तुम्हाला चेन्नई मधली हॉटेल्स दाखवतो जिथे पोळी भाजी / रोटी सुद्धा मिळते. मी चेन्नइ मध्ये असताना एक मंत्र जपायचो. "भात हा जगातला सर्वात चविष्ट पदार्थ आहे". पहा वापरून फायदा होतो की नाही.

त्यामुळे तेथील लोक जर एखाद सिक्रेट (जेव्हा आपल्या बद्दल असेल) ते कळत नाही.

लोक तुमच्या बद्दल शिक्रेट बोलतात? आणि तुम्हाला ते काय बोलतात ते कळत नाही पण ते शिक्रेट आहे हे कळतं?

अर्ध्या लोकन्ना तर एन्ग्लिश पण नीट येत नाही.

महाराष्ट्रात येतं का अर्ध्या लोकांना इंग्लिश? मग तामिळ लोक रहातात का तिथेच यांना येत नाही म्हणून? का नाही तुम्ही तामीळ शिकत? पोडा..

मग तुम्हिच सान्गा चेन्नई, हैदराबाद च्या ठिकाणी रहायला कस जमेल.

सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते. डॉक्टर कोटणीस चीन मध्ये खडतर परिस्थितीत, फक्त कच्च्या भाज्या खाऊन रोग्यांची सेवा करत होते. आपले जवान -३० डिग्री तपमानाला सियाचीन ला ड्युटी करतात. तुम्हाला चेन्नई, हैदराबाद जमत नाही?

ब़जरबट्टू's picture

1 Jan 2014 - 3:21 pm | ब़जरबट्टू

सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते.

सावरकर राहिले होते, का डांबले होते ?

दाते प्रसाद's picture

2 Jan 2014 - 9:49 am | दाते प्रसाद

मी २००६ पासून हैदराबाद , चेन्नई , अणि बंगलोर मध्ये कामाकरता राहत /फिरत आहे.हैदराबादेत भाषेचा मुळीच प्रश्न आला नाही , उलट हिंदी भाषेमुळे काम करणं सोपं झालं.ज्यांना इंग्लिश येत नाही , त्यांना हिंदी तर नक्कीच येतं.
चेन्नैत सुध्दा भाषेचा फारसा प्रश्न आला नाही

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 Dec 2013 - 3:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

>>>मला एका सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे नोकरी पाहिजेल.>> अत्यंत विनोदी विधान. कुठे असतात बरे सॉफ्टवेअर कंपनी?
आजकाल क्लायंटकडुन पैसे मिळवुन देणारी x,y,z कामे करणार्‍या कंपनीच सर्वत्र सापडतील. त्या कामाला सॉफ्टवेअर म्हणायचे असल्यास म्हणा बुवा...असो. मी पण एका "सॉफ्ट्वेअर कम्पनी " मधे नोकरी करतो..तुम्हाला ईमेल व्यनि करतो ..cv पाठवा

दिव्यश्री's picture

31 Dec 2013 - 3:19 pm | दिव्यश्री

तुम्ही जर कंपनीत काम करत असाल तर सर्व लोकांना कामापुरते इंग्लीश येत च असणार. रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला इंग्लिश कसे येत असेल? मग तुम्ही germany मधे जाउन कसे काम करणार?>>> +१
जर्मनी मध्ये भाषेचा भयंकर problem आहे.... हॉस्पिटल्स मध्येही बरेच वेळा English न समजणारे,बोलणारे असतात.खूप त्रास होतो सुरवातीला ... :(

निखिल देशपांडे's picture

31 Dec 2013 - 6:17 pm | निखिल देशपांडे

Drupal Developer 2+ वर्ष मुंबईसाठी कोणी असल्यास मला व्यनी टाका.

निखिल देशपांडे

वासु's picture

2 Jan 2014 - 8:47 am | वासु

व्यनी टाका म्हणजे ???

vrushali n's picture

1 Jan 2014 - 3:58 pm | vrushali n

कुणाला मेनफ्रेम मधील ओपनींग माहीती असल्यास सांगावे,माझी बहीणील ३+ वर्ष मेनफ्रेम कॉग्नीझंट मधील अनुभव आहे.

मंदार कात्रे's picture

2 Jan 2014 - 9:02 am | मंदार कात्रे

व्यनि म्हव्यन्त्य सदस्याला व्यक्तिगत निरोप पाठवा...

सावरकर अंदमान सारख्या ठिकाणी वर्षोनवर्ष राहिले होते. डॉक्टर कोटणीस चीन मध्ये खडतर परिस्थितीत, फक्त कच्च्या भाज्या खाऊन रोग्यांची सेवा करत होते. आपले जवान -३० डिग्री तपमानाला सियाचीन ला ड्युटी करतात. तुम्हाला चेन्नई, हैदराबाद जमत नाही? काळा पहाड जी शी सहमत!

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Jan 2014 - 9:45 am | हतोळकरांचा प्रसाद

तुमचा रेसुमे पाठवा, मेल आयडी व्य. सं. वर टाकला आहे. पुण्यातील काही MNC कंपन्यांमध्ये अपलोड करेन.

सदासुखि's picture

2 Jan 2014 - 2:04 pm | सदासुखि

pharma field मध्ये महाराष्ट्रात ओपनींग आहेत का?माहीती असल्यास सांगावे..