उर्फ पु.ल. वरील शिर्षकातले नाव त्यांनीच "अपूर्वाई" ह्या त्यांच्या प्रवासवर्णनामध्ये फ्रांसच्या भेटीवर असताना घेतले होते. पु.ल. म्हंटल्यावर काही लांबलचक लिहून त्यांची ओळख वगैरे मी करून द्यावी ह्याची गरज नाही. पण मराठीतल्या विनोदाची उंची....सॉरी शुद्ध,निर्मळ,निर्भेळ विनोदाची त्यांनी गाठलेली उंची आजचे काही लेखक (त्याच्या पायथ्यापर्यंतही पोहचू शकत नसताना)गाठण्याचा प्रयत्न करताना पहिले की मला रावसाहेब आठवतात ते म्हणतात "बदला की वो चाऽऽऽल, ते दिनानाथ नाही का बदलले पण त्यांचा अधिकार होता म्हणतोय मी...." थोडक्यात आजचे लेखक "कोटीच्या" नावाखाली जे करतात त्याने खूप त्रास होतो.
पु.लनच्याच असामी असामी मध्ये एक वाक्य आहे "टॅकसी ड्रायव्हर सरदारजी असल्याने केव्हा फेट्यात राख घालून निघून जाईल हि भीती होती" किंवा मुबैकर पुणेकर की नागपूरकर मध्ये घरातली बोली आणि व्यासपीठावरील बोली हा फरक दाखवणारा उतारा. मी गडबडा लोळून हसलोय ह्या सर्वांवर...आपण सगळेच हसलोय मनमुराद...अशी अनेक वाक्ये जी वाचून किंवा पु.लंच्याच तोंडून प्रत्यक्ष ऐकून लक्षात राहिलेली आहेत. तुम्हालाही नक्कीच आठवत असतील.
माझी एक विनंती आहे तुम्हाला पु.लची जी वाक्य आवडली आहेत ती प्रतिसादरूपाने इथे मांडा.
कुणी कधीही केव्हाही हा धागा वाचला तर त्याला एक निर्भेळ, निर्मळ आनंद, समाधान मिळावे आणि धागा अजरामर सुरूच राहावा.
धन्यवाद
प्रतिक्रिया
30 Jan 2019 - 9:57 pm | गामा पैलवान
-गा.पै.
30 Jan 2019 - 10:10 pm | बबन ताम्बे
मलेशियात राहून चाळीस वर्षांनी हा मनुष्य असखलीत कारवारीत बोलत होता. नाहीतर आपले देशी लोक सहा महिन्यांसाठी इंग्लड अमेरिकेला जाऊन येतात आणि आल्यावर त्यांना मराठी वर्ड रिमेम्बर करायला डिफिकल्ट जातं.