चला व्हिएतनामला १० : हो ची मिन् शहरातला टेट पुष्पमहोत्सव

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
23 Dec 2013 - 6:40 pm

==================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

...आज बर्‍यापैकी धावपळ झाली होती. पण आराम करायला वेळ नव्हता. ताबडतोप गरमागरम शॉवर घेऊन तरतरीत झालो आणि बाहेर पडलो. आज हो ची मिन् चे जगप्रसिद्ध टेट पुष्पप्रदर्शन पहायचे होते ना !

टेट हा चिनी चांद्र कालगणनेनुसार वर्षारंभाचा सण आहे. हा नववर्षसमारंभ सर्व व्हिएतनाममध्ये आपल्या दिवाळीच्या सणाच्या सारखा मोठ्या गाजावाजात साजरा केला जातो. मुख्य समारंभ तीन दिवसांचा असतो. पण या दिवसाच्या पुढेमागे साधारण पाच दिवस सुट्टी घेऊन लोक घराची साफसफाई आणि रंगगरंगोटी करतात. घर फुलांनी सजवतात. भेटीला आलेल्या नातेवाईक व मित्रांची खातीरदारी फळे व मिठाईने केली जाते. संपणार्‍या वर्षाच्या शेवटच्या दिवशी खास मेजवानी असते आणी सर्वजण रात्रीच्या बारा वाजेपर्यंत जागे राहतात आणि नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करतात. शहरा-गावांत जागोजागी फटाक्याचे दारूकाम व रोषणाई केली जाते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी लोक बुद्धमंदिर अथवा पॅगोडांना भेट देऊन उदबत्त्या लावून प्रार्थना करतात.

हो ची मिन् शहराचा एंगुएन हुए अव्हेन्यू (Nguyen Hue Ave) हा साधारण ४००-५०० मीटर लांबीचा सहा लेनचा आणि प्रशस्त दुभाजक असलेला रुंद हमरस्ता वाहतुकीस बंद करतात आणि तेथे व्हिएतनामच्या अनेक भागातून आणलेल्या सुंदर फुलांचा वापर करून सर्व रस्ता कलापूर्ण पुष्परचनांनी भरून टाकतात. चिनी प्रथेनुसार प्रत्येक वर्षाचा एक खास प्राणी असतो. २०१२ हे ड्रॅगनचे वर्ष होते त्यामुळे त्या वर्षी ड्रॅगनच्या प्रतिमांचा उपयोग अनेक कलाकृतींत होता. कलाकृती प्रेक्षकांना अगदी हात लावता येईल इतक्या जवळून पहायला मिळतील अश्या तर्‍हेने त्यांची आणि फिरण्याच्या पायवाटांची रचना केलेली होती. लोक अगदी मजेने त्या प्रदर्शनाचा लाभ घेत होते. हे प्रदर्शन पहायला केवळ संपूर्ण व्हिएतनामच नव्हे तर कंबोडिया आणि लाओस मधूनही लोक येतात असे मार्गदर्शकाने सांगितले. खेचाखेच गर्दी होती पण फुले तोडणे अथवा धक्काबुक्की करणे असला एकही गैरप्रकार दिसला नाही. रस्त्याच्या आजूबाजूला जेथे जागा मिळेल तेथे खाण्यापिण्याची आणि इतर विक्रीची दुकाने थाटलेली होती.

बाहेर पडलो आणि हॉटेलने प्रवेशद्वाराजवळ केलेली पुष्परचना दिसली...

हॉटेलसमोरच्या मुख्य रस्त्यावरच्या बांबू आणि फुलांपासून बनवलेले ड्रॅगन प्रेक्षकांचे स्वागत करत होते...

.

.

भूक लागली होती तेव्हा प्रथम जेवून घ्यावं असं वाटत होतं तोच रस्त्याच्या एका टोकाला जरा धामधूम दिसली तिकडे गेलो. तेथे एका वाद्यवृंदाच्यासह एक चिमुकल्या पर्‍यांचा समूह प्रदर्शनाच्या उदघाटनाचा नाच करायला चुळबुळत उभा होता...

मग काय. पाय तिथेच थबकले. आम्हीपण बाकीच्या गर्दीत घुसून मोक्याची जागा मिळते काय याचा प्रयत्न करू लागलो. मोठ्या मुश्किलीने एक मस्त नाही पण टाचा वर करून दिसेल अशी जागा पटकावली. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू झाला...

.

.

तो कार्यक्रम संपेपर्यंत पोटात कावळे ओरडायला लागले होते त्यामुळे प्रथम पोटात पेट्रोल टाकल्याशिवाय हे लांबलचक प्रदर्शन बघायला शक्ती आणि मजा येणार नाही हे ओळखून त्वरित अगोदरच हेरून ठेवलेल्या एका खास व्हिएतनामी रेस्तराँ मध्ये गेलो. तेथे हू म्हणून गर्दी होती. जागा राखून न ठेवल्याने (माहीत कोणाला होतं?) पंचाईत झाली. पण एक स्वागतिका म्हणाली की "इथून जवळच चालण्याच्या अंतरावर आमची अजून एक शाखा आहे तेथे जाणार काय?" हो म्हटल्यावर ताबडतोप एका स्वागतिकेने बरोबर येऊन आम्हाला अगत्याने चौथ्या-पाचव्या मजल्यावरच्या त्या शाखेवर पोचवायची व्यवस्था केली. ही शाखा पहिल्यापेक्षा जास्त सुंदर निघाली. शिवाय उंचावरचे रस्त्याच्या बाजूचे टेबल मिळाल्याने प्रदर्शनाचे हे असे दर्शनही झाले...

जेवण संपल्यावर त्या स्वागतिकेचे विशेष आभार मानले. तर ती म्हणाली टेरेसवरून या प्रदर्शनाचा अजून जास्त चांगला नजारा दिसतो. चला मी तुम्हाला तिकडे नेते...

.

खाली उतरून आलो तेव्हापर्यंत बरीच गर्दी झाली होती आम्हीही त्या गर्दीत मिसळून प्रदर्शनाची मजा लुटू लागलो. ही तेथली काही चित्रे...

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

 ...

.

 ...
 ...

.

.

पाय दुखायला लागेपर्यंत भटकत राहिलो आणि या नकळत समोर आलेल्या सुंदर संधीचे सोने करून तृप्त मनाने हॉटेलवर पोहोचलो. दुसर्‍या दिवशी न्याहारीच्या जागेवरूनही परत एकादा त्या प्रदर्शनाकडे पहायचा मोह आवरला नाही...

तेवढ्या सकाळच्या वेळीही काही उत्साही मंडळी प्रदर्शनाला गर्दी करू लागली होती ! व्हिएतनाम कम्युनिस्ट असला आणि आधुनिक काळातल्या भयंकर युद्ध आणि नरसंहारातून गेला असला तरी लोक रुक्ष वाटले तर नाहीच पण घरे आणि सार्वजनिक जागांमध्ये त्यांच्यातील जितीजागती कलासक्ती सतत दिसत होती. परतताना विमानतळावरच्या चेकईन काउंटरचा ही देखावाही याची खात्री देत होता...

(समाप्त)

==================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

अनन्न्या's picture

23 Dec 2013 - 6:47 pm | अनन्न्या

यातले फोटो घेतले तर चालेल का? फार सुंदर आहेत फुले!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2013 - 6:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

जरूर घ्या आवडतिल ते फोटो.

अनिरुद्ध प's picture

23 Dec 2013 - 6:59 pm | अनिरुद्ध प

अप्रतिम !!!!!!!!!!!!!! आणि समाप्त असे वाचल्यावर सुन्दर सहलीचे स्वप्न जागे झाल्यावर बन्द पडते असे झाले.खरेच उत्तम प्रकाशचित्रे आणि उत्तम प्रवासवर्णन. पु ले शु.

सुधीर कांदळकर's picture

23 Dec 2013 - 7:48 pm | सुधीर कांदळकर

स्वप्नात तर नाही ना मी?

शेवटचा शब्द फारच दुष्ट आहे. लेखमाला संपल्याची हुरहूर अपार आहे. पण वाचतांना मिळालेला आनंद अजोड आणि अवर्णनीयच.

शेव्वटच्या भागात क्लायमॅक्स छान जुळून आला.

धन्यवाद.

जेपी's picture

23 Dec 2013 - 8:25 pm | जेपी

आख्खी टुर मस्त झाली .मजा आली अगदी स्वतः फिरत फिरत असल्यासारखे वाटले.घरबसल्या सगळ व्हिऐतनाम फिरवुन आणलत . धन्यवाद .

ये पॅसेंजर लोक उतरुन घ्या . एक्का सायबांना पुढच्या टुरची तयारी करु द्या .

विलासराव's picture

23 Dec 2013 - 9:45 pm | विलासराव

व्हिऐतनाम फिरवुन आणल्याबद्दल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2013 - 10:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनिरुद्ध प, सुधीर कांदळकर, तथास्तु आणि विलासराव : आपल्या सहलितील सहभागाने माझीही मजा व्दिगुणीत झाली आहे !

अत्रुप्त आत्मा's picture

24 Dec 2013 - 12:31 am | अत्रुप्त आत्मा

अत्तीशय सुंदर झाली लेखमाला. http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif
आणी आजचा भाग म्हणजे तर.. माझ्यासाठी.......... http://www.easyfreesmileys.com/smileys/free-cute-smileys-271.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Dec 2013 - 10:00 am | डॉ सुहास म्हात्रे

फुलं म्हटल्यावर  हे बुवांकडून अपेक्षित होतंच :)

प्यारे१'s picture

24 Dec 2013 - 1:02 am | प्यारे१

मस्तच्च्च!

पण संपली????????

मोदक's picture

24 Dec 2013 - 3:34 am | मोदक

धन्यवाद!!!!

पुढील सहलीच्या प्रतिक्षेत!

आनन्दिता's picture

24 Dec 2013 - 4:36 am | आनन्दिता

फुलांचे ड्रेस.... कल्पनाच किती सुंदर आहे...

चौकटराजा's picture

24 Dec 2013 - 5:02 am | चौकटराजा

फोटो सारेच प्रत्ययकारी आहेत. प्रत्यक्ष गेल्यासारखे वाटतेय ! बाकी असाच एक फुलांचा महोत्सव ब्रूसेल्स या शहरात दरवर्षी भरतो. एका विशिष्ट रत्यावर पूर्ण रस्ताभर फुलांच्या रांगोळ्या काढतात.
आपल्या या मालिकेने न मळलेल्या वाटेचे दर्शन घडविलेय ॠणात राहाणे पसंत !

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Dec 2013 - 10:07 am | डॉ सुहास म्हात्रे

ॠण-बिण कसले साहेब ? मीच माझ्या सहलिंची उजळणी करून परत एकदा मजा घेतोय... ती सुद्धा मिपामित्रांच्याबरोबरच्या संवादासह. म्हणजे माझाच जास्त फायदा होतोय :)

ब्रुसेल्सचा फुलांचा कार्पेट बघायला पण आवडेल म्हणा ! हा आहे २०१३ चा कार्पेट...


(चित्र जालावरून साभार)

यसवायजी's picture

25 Dec 2013 - 8:46 pm | यसवायजी

सुप्पर लाईक्स..

अत्रुप्त आत्मा's picture

27 Dec 2013 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

@ब्रुसेल्सचा फुलांचा कार्पेट >>> आय...हाय..हाय...

साष्टांग नमन हे माझे पुष्पवेड्या ब्रुसेल्सकरा। :)

ड्रॅगनचे फोटू, फुलांचे कपडे, पुष्परचना असे सगळेच सुंदर आहे. या सुंदर मालिकेबद्दल आभार.

यसवायजी's picture

24 Dec 2013 - 7:49 am | यसवायजी

Aapale aabhar. PuDheel safar pratikShet.

प्रचेतस's picture

24 Dec 2013 - 9:18 am | प्रचेतस

सुंदर देशाची सुंदर सफर.
आता कंबोडिया आणि बाली सफरीची वाट बघतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Dec 2013 - 10:09 am | डॉ सुहास म्हात्रे

हो ची मिन् च्या विमानतळावर तर पोहोचलोयच. जरा फुरसत मिळाली की लगेच उड्डाण करायचंय कंबोडियाकडे. :)

मालोजीराव's picture

3 Jan 2014 - 6:46 pm | मालोजीराव

आंदो आंदो कंबोडिया आंदो :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Dec 2013 - 10:13 am | डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१, मोदक, आनन्दिता, रेवती आणि यसवायजी : अनेक धन्यवाद ! अशीच साथ पुढच्या सहलींतही असू द्या.

मृत्युन्जय's picture

24 Dec 2013 - 10:54 am | मृत्युन्जय

अरेरे समाप्त झाली ही सहल. फार सुंदर होती. पुढच्या सहलीच्या प्रतिक्षेत. फिरणे हा इएंचा अर्थप्राप्तीचा स्त्रोत असल्यासारखे इए फिरतात जगभर. त्यामुळे पुढची सहल लवकरच असेल अशी आशा आहे.

स्पा's picture

24 Dec 2013 - 11:05 am | स्पा

फारच सुंदर झाली सहल
पुढील लेखमालेच्या प्रतीक्षेत

नन्दादीप's picture

24 Dec 2013 - 11:06 am | नन्दादीप

सुंदर....

मी जेव्हा जेव्हा emotionally down असते तेव्हा मी नेहमी मिसळपाव वरचे आपले लेख वाचते आणि अपूर्वाई व पुर्वरंग वाचताना जो आनंद मिळतो तसाच आनंद मिळतो. अर्थात पु. ल. ते पु. ल.च म्हणा.

माझ्या office चा प्रोजेक्ट "vietin bank" मध्ये चालू आहे आणि काही colleagues नेहमी जात असतात आणि प्रत्येक वेळेला परत आल्यावर नुसती कटकट करत असतात कि vegetarian ची वाट आहे काही खायलाच मिळत नाही वगैरे. दोन दिवसांपूर्वी तुमची विएतनामच्या लेखमालेची link दिली. त्यांची तोंडे बघण्यासारखी झाली होति.

आता लवकर दुसरी लेखमाला सुरु करा. बाकी तुम्ही दोघेच फिरता का?

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2013 - 12:29 pm | दिपक.कुवेत

पुष्परचना तर फारच मोहक आणि विलोभनीय. पण हे काय ईतक्यात संपली? आता लवकर पुढल्या टुरचे डिटेल्स द्या.

पैसा's picture

24 Dec 2013 - 5:01 pm | पैसा

हे फुलांचे समुद्र बघून अगदी डोळ्यांचं पारणं फिटलं!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Dec 2013 - 5:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

मृत्युन्जय, स्पा, नन्दादीप, Madhavi_Bhave, दिपक.कुवेत आणि पैसा : धन्यवाद !

झकासराव's picture

3 Jan 2014 - 4:07 pm | झकासराव

अफाट आहात तुम्ही. :)

कवितानागेश's picture

3 Jan 2014 - 4:28 pm | कवितानागेश

डोळे निवले फुलं बघून. छान वाटलं. तो फुलाफुलांचा ड्रेस मस्तय.