गेल्या आठवड्यात पाचवी यादी लागली आणि सकाळी साडेसहा वाजता एका पालकांचा फोन आला. नाव आहे यादीत. पण एक शंका विचारायची होती. या कॉलेजचे कॅरेक्टर कसे आहे हो?
ऍडमिशन म्हटलं की पालकांच्या हुशारीला मर्यादा पडतात आणि मूर्खपणाला सिमा उरत नाहीत. मी डॉक्टर नाही , सायकॅट्रीस्ट नाही,प्रोफेसर नाही.तरीपण या सर्व संबोधनांचा मालक आहे.कंठशोष करून हे सांगीतलं तरी पालक मंडळी ऐकत नाहीत.जनसंपर्काने साधलेल्या असंख्य अनुभवाचे पोतडे पाठीवर घेऊन हिंडणारा एक सर्व सामान्य पालक आहे मी. WHOमधलादोन वर्ष काउंसेलींचा आणि त्यानंतर एशीयाच्या एका प्रख्यात हॉसपीटलचा प्री अँड पोस्ट ऑपरेटीव अँक्झायटी काउंसेलर म्हणून दिवसाला सोळा सोळा तासाचा अनुभव मला पालकांची आणि विद्यार्थ्यांची अवस्था बघून स्वस्थ बसू देत नाही.जून जुलाई आणि ऑगस्ट बायको रोज दोन रुमाल खिशात ठेवते एक घाम पुसण्यासाठी आणि दुसरा अश्रू पुसण्यासाठी.
पुढच्या दोन वर्षाचे भाकीत आत्ताच करून ठेवतो.
नव्वद टक्के मार्कांनी पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या जागा जवळ जवळ त्याच राहणार आहेत,यावर्षी गूड कॉलेजच्या जागा अपूर्या पडल्या आहेत . दोन वर्षांनी पालकांचे पैसे अपूरे पडणार आहेत गूड कॉलेजच्या आयटी आणि काँप्युटरच्या इलेक्ट्रॉनीक्सच्या ऍडमिशन साठी.मला पण चिरंजीवांसाठी मनस्ताप झाला तो वेगळ्याच कारणासाठी.
ऑफीसमध्ये एक पालक भेटले .ते आत येत असतानाच त्यांच चेहेरा बघीतल्यानंतर खुर्चीचे दोन्ही हात घट्ट पकडले.उगाच ऑर्थोपेडीक सर्जनची धन नको म्हणून.
पहीले वाक्य. डॉक्टर माझ्या मुलाला गणिताचा डिसलेक्शीया झाला आहे.तुमचे नाव ऐकून आलो. आठवी पर्यंत सर्व ठिक होते.धरणी दुभंगल्याचा भास झाला. सर्दी खोकला मलेरीया ,काविळ हे होतात ऐकून होतो पण गणिताचा डिसलेक्षीया तो पण डायरेक्ट नववीत? शांतपणे विचारले डीसलेक्शीया चे निदान केले कुणी?
उत्तर आले शाळेच्या काऊंसेलरनी.
नारुचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा ही मोहीम माहिती होती पण तशी मोहीम शिक्षण मंडळानी काढली आहे काय?
आमचे लव्हाटे सर असला डीसलेक्शीया दोन फटक्यात बरा करायचे त्यांना डस्टरचा फळा पुसण्याचा एकेरी उपयोग मान्य नव्हता.असे शिक्षक होणे नाहीत.
हा गणिताचा डीसलेक्शीया नसून आळ्सेक्षीया असे निदान करून मी सरावाचे प्रिस्क्रीप्शन दिले. नंतर कळले की हे सद् गृहस्थ माझ्या उत्तराने निराश होऊन मुलाला सायकॅट्रीस्ट कडे घेऊन गेले तिथे काहीतरी गोळ्या इंजेक्षनची ट्रीटमेंट चालू आहे .देवनार कत्तलखान्यात चालवत नेल्या जाणार्या मेंढारांना सुद्धा एव्हढे असुरक्षीतता नसावी.
तारे जमीपर्(एक सुंदर कलाकृती )नंतर जरा मार्क कमी मिळाले तर डीसलेक्शीया शोधायचे खूळ तर मूळ धरत नाही ना?
जाता जाता: वरील पेशंटला संध्या़काळी आठ वाजता नंतर कोपरी पूलाखाली अंधारात दमयंती बरोबर पाह्यला.एकदा औषध नलगे मजला चा प्रादुर्भाव झाला की कसलं गणित आणि कसला अभ्यास.
प्रतिक्रिया
20 Jul 2008 - 6:01 pm | बिपिन कार्यकर्ते
सर, मस्तच लिहिले आहेत हो... खरं तर घाम फुटला आहे मला पण. आमच्या साठी 'दिल्ली अभी बहुत दूर है', पण आत्ताच ही अवस्था तर मग आमची पाळी येई पर्यंत काय होईल? बहुतेक आत्तापासूनच ४-५ रूमाल ठेवावे लागतील मला.
अजून येऊ द्या. पु.ले.शु.
बिपिन.
21 Jul 2008 - 8:07 am | प्राजु
सर, मस्तच लिहिले आहेत हो... खरं तर घाम फुटला आहे मला पण. आमच्या साठी 'दिल्ली अभी बहुत दूर है', पण आत्ताच ही अवस्था तर मग आमची पाळी येई पर्यंत काय होईल? बहुतेक आत्तापासूनच ४-५ रूमाल ठेवावे लागतील मला.
असेच म्हणते... आतापासूनच घाम फुटतो आहे.
लेखन आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jul 2008 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गणिताचा डीसलेक्शीया नसून आळ्सेक्षीया असे निदान करून मी सरावाचे प्रिस्क्रीप्शन दिले.
लै भारी !!!
अजून येऊ द्या सर असेच लेखन !!!
21 Jul 2008 - 10:34 am | सुनील
तारे जमीपर्(एक सुंदर कलाकृती )नंतर जरा मार्क कमी मिळाले तर डीसलेक्शीया शोधायचे खूळ तर मूळ धरत नाही ना?
बापरे! उठसूठ सायकियाट्रिस्टकडे जाण्याचे परदेशी खूळ आता भारतातही धुमाकूळ घालणार की काय?
(आळसेक्षियाने जर्जर) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Jul 2008 - 11:38 am | चेतन
मस्तच् लिहलयं
तुमच्या लेखाउलट आमची आई आणि बाबा शाळेत आले की आमची काही खैर नसायची. गुरुजींना सांगुनचं जायचे बडवायला.
तसे अभ्यासावरन् शाळेत जास्तं मार नाही खाल्ला पणं दंगा केल्याने बराचवेळा दिवसा तारे बघितलेत. (तारे जमिपर)
डीसलेक्शीयाचे खूळ नव्हते तेच बरे
जमिपर चेतन
अवांतरः पालकांची भाजीपेक्षा पालकांची भजी जास्त आवडले असते
21 Jul 2008 - 12:14 pm | श्रीमंत दामोदर पंत
मस्तच सर,
लै भारी..........
आजुन येउद्यात सर..............
मार्क कमी पडले म्हणून लगेच विद्यारथ्याना सायकियाट्रिस्टकडे सरखे सरखे जावे लगु नये म्हणजे मिळवले............
21 Jul 2008 - 1:25 pm | भडकमकर मास्तर
तारे जमीपर्(एक सुंदर कलाकृती )नंतर जरा मार्क कमी मिळाले तर डीसलेक्शीया शोधायचे खूळ तर मूळ धरत नाही ना?
जाता जाता: वरील पेशंटला संध्या़काळी आठ वाजता नंतर कोपरी पूलाखाली अंधारात दमयंती बरोबर पाह्यला.एकदा औषध नलगे मजला चा प्रादुर्भाव झाला की कसलं गणित आणि कसला अभ्यास.
सहमत...
एकदम बेष्ट लेख...लेखनशैली खूप इंट्रेस्टिंग आहे, आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने आलेले अनुभव असेच लिहा, धन्यवाद...
(मला आधी शीर्षक वाचून पाककृती वाटली म्हणून नंतर पाहू असे ठरवले...) :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Jul 2008 - 2:28 pm | विनायक प्रभू
आदरनीय विसोबा,
पोचतोय का? उपयोग आहे का?
प्रभु
21 Jul 2008 - 11:14 pm | वरदा
खरच हे असं सायकॅट्रीस्ट चं प्रस्थ वा॑ढणार की काय...
मस्तच लिहिलय तुम्ही..दिवसेंदिवस वेडे होणारे पालक आणि मुलं ...काही खरं नाही....
(शाळेत इतिहासाच्या आळसेक्षीयाने त्रासलेली)
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
22 Jul 2008 - 1:47 am | चतुरंग
मुलांचे शिक्षण, पालकांना भेडसावणार्या (खर्या/खोट्या) समस्या ह्यांबद्दलचा आपला एकूण अनुभवांचा साठा बराच असावा असे आपल्या लिखाणावरुन वाटते.
आपले निवडक अनुभव अधिक विस्ताराने येऊदेत असे म्हणतो. ह्या अनुभवातूनच आमच्यासारख्या लोकांना नक्कीच शिकता येईल.
माझा मुलगा अजून लहान असला तरी ही वर्षे झपाट्यात जातात, काही समजतही नाही आणि एकदम मुले १६ वर्षांची वगैरे झाली की आपण जागे होतो! मला तसे व्हायला नको आहे.
चतुरंग