ध्यास
इट्ट्ल इट्टल म्हनता, मन पार येडं झालं
ध्यास लागला नामाचा, मन खुळावून ग्येलं
हितं तितं सारीकडं, दिसे इट्टल सावळा
झाडा पाना फुलामंदी मज भासाया लागला
वाटे साजिरी फुलांनी, करू पूजा या द्येवाची
परी गोंधळ्ले मन, हितंतिथं दिसे तोचि
त्येच्या आंघुळीला वाटे, आणू वाईच गं पानी
पान्यातच उभा व्हता, सावळा गं चक्रपाणि
गंध उगाळाया हाती, घेतली ग मी सहाण
तिच्यामंदी श्रीखंड्याचे, देखिले गं म्या ध्यान
निवदासी आणाया, दूध ग्येले मी घरात
सोता गोकुळीचा कान्हा, उबा माज्या गोकुळात
कशी करू याची पूजा, मज इच्यार पडला
कसा द्येव हा इट्टल, आसंल संतांनी पूजिला
नको आंगुळीला पानी, नको त्याला पानं फुलं
ध्यान निरखता निसते, मन भक्तिसंगं झुलं
काय करू रे इट्टला, डोकं झालं सैरभैर
सुचला उपाय मनात, करू सदा नमस्कार
द्येव भावाचा भुकेला, नको उपचार तयाला
माजा सगळाचि भाव, तया चरणी अर्पियला
प्रतिक्रिया
20 Jul 2008 - 1:29 pm | सुचेल तसं
वा!!!!!!
छान कविता.......
http://sucheltas.blogspot.com
20 Jul 2008 - 6:26 pm | प्रमोद देव
कविता अतिशय उत्तम आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
21 Jul 2008 - 3:59 am | श्रीकृष्ण सामंत
कवित सुंदर आहे
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
22 Jul 2008 - 4:10 pm | विसोबा खेचर
द्येव भावाचा भुकेला, नको उपचार तयाला
माजा सगळाचि भाव, तया चरणी अर्पियला
वा! सुंदर रचना...
तात्या.
23 Jul 2008 - 12:26 am | प्राजु
बहिणाबाई चौधरींची आठव्ण झाली ही कविता वाचून...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Jul 2008 - 4:40 am | शितल
विठ्ठलाच्या नामाच्या गजरा जितका गोड वाटतो तितकी गोड कविता.
2 Jul 2016 - 6:33 pm | माहितगार
दिनेशांची ताजी कविता आरास... वाचल्या नंतर त्यांच्या जुन्या कविता चाळताना त्यांनी पोस्ट केलेली हि छान कविता वाचनात आली, म्हणून धागा वर काढत आहे.
2 Jul 2016 - 9:44 pm | अभ्या..
अरे वा दिनेशराव,
छानच लिहिता हो तुम्ही.
आवडली बरं का सावळ्या इठूची कविता.
।।जयजयरामकृष्णहरी।।
2 Jul 2016 - 11:21 pm | भरत्_पलुसकर
छान!