प्रेमाच्या उगमी येथे,
सहजी कवित्व झरते
जे बोलत जातो मी ही
ते ते कवित्व होते
जरूरी ना काव्यगुणांची
श्वासासम सहजी येते
कुणी न करताही तेथे
ती-कविता होऊन जाते
उस्फूर्तता ही कैशी?,
प्रतिभेशी नाही घेणे
ते देवाजीच्या घरचे
सहजाचे साधे लेणे.
कधी हात तिचे दिसतात
मज मेहेंदी दिसून येते
स्पर्शाची अठवण का ही?
मग मनात उरुनी जाते?
शरीराचा गंध तसाही
मज वेडाऊनच जाई
शब्दांचे सरते काम
अन कविता केवळ राही
प्रेमाच्या गावापाशी
मी भिऊनी उभा आहे.
आकर्षणी सीमा रेषा
हलकीच मधेही आहे.
हे नकळत कैसे कोडे
ठरवून मनाला पडते?
सुटकेची आली वेळ
तरी सुटका कोठे घडते???
हव्यास अम्हाही ऐसा
तो तुरुंग मोहक आहे
जन्मोजन्मी प्रेमाचा
मी...कायमचा कैदी आहे.
प्रतिक्रिया
1 Dec 2013 - 6:57 pm | पक पक पक
प्रेमाच्या गावापाशी
मी भिऊनी उभा आहे.
आकर्षणी सीमा रेषा
हलकीच मधेही आहे.
एक्झेक्ट्ली... मस्त मस्त :)
1 Dec 2013 - 6:58 pm | प्रचेतस
अप्रतिम.
1 Dec 2013 - 7:08 pm | प्यारे१
सहीच्च्च्च!
1 Dec 2013 - 7:31 pm | पैसा
मस्त लिहिलंय!
1 Dec 2013 - 8:00 pm | संजय क्षीरसागर
या ओळी तर खासच :
1 Dec 2013 - 8:05 pm | वडापाव
मस्त!!! :)
1 Dec 2013 - 8:14 pm | जेपी
धन्य हो गुर्जी .
(कुठली स्यामली द्यावी या विचारात ) तथास्तु
1 Dec 2013 - 8:22 pm | राघव
आवडेश! :)
1 Dec 2013 - 11:09 pm | जेनी...
गुर्जि :)
2 Dec 2013 - 9:26 am | चाणक्य
'मोहक तुरुंग' विशेष आवडला. मस्त रचना. (अगदी खोल, आतमधून आली आहे बर का :-) )
2 Dec 2013 - 10:04 am | स्पा
वा बुवा वा
क लिवलय
2 Dec 2013 - 11:11 am | सस्नेह
प्
का वो ? प्यार किया तो डरना क्या ?
रच्याकने, कोण ही कविता ?
8 Dec 2013 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा
@ कोण ही कविता ?>>> मनात प्रेम आलं...... की भेटणारी! :)
2 Dec 2013 - 11:31 am | अनिल तापकीर
खुप सुंदर आवडली
2 Dec 2013 - 1:30 pm | यसवायजी
सुंदर..
2 Dec 2013 - 4:23 pm | सूड
मस्त !!
2 Dec 2013 - 4:27 pm | अमेय६३७७
खूप सुंदर, वाह.
2 Dec 2013 - 4:36 pm | बॅटमॅन
कविता आवडली. काही शब्दयोजना विशेष आवडली. मस्त हो बुवा!!!!
2 Dec 2013 - 6:52 pm | युगन्धरा@मिसलपाव
छान आहे कविता.
4 Dec 2013 - 8:47 am | चौकटराजा
तृप्ती गोड तरीही
नकोशीच वाटते
अत्रुप्त आत्म्याच्या ओठीच
कविता जन्म घेते !
4 Dec 2013 - 8:53 am | नाखु
बुवा$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$ स्पेशल
4 Dec 2013 - 10:53 am | मुक्त विहारि
"हव्यास अम्हाही ऐसा
तो तुरुंग मोहक आहे
जन्मोजन्मी प्रेमाचा
मी...कायमचा कैदी आहे."
हे तर खासच.
4 Dec 2013 - 11:00 am | विटेकर
उत्तम कविता ..
समिधा जुळविता जुळविता, पार्श्वभूमीवर मनात यमकं जुळविता की काय ?
4 Dec 2013 - 11:07 am | पियुशा
बुवा काय काय करता हो , कविता आवड्ली :)