(सदरचा लेख याला कविता म्हणावी की निबंध काही समजत नव्हते माझी मुलगी आरती दहावित शिकते तिने स्वता तयार करुन वाचयला दिला नि थक्क झालो. तिचे हे पहिलेच लेखन वाचुन खुप आनंद झाला. पहा आपल्याला कशी वाटते.)
कु. आरती आनिल तापकीर ,
भारती विध्यापीठ कन्या प्रशाला ,
कोथरूड ,पुणे
गाव- मुलखेड .
तु मैत्रीण नाहीस ,
मैत्रीतला पहिला शब्दच तु आहेस .
तु एक दिवस जरी शाळेला आली नाहीस कि असं की काही तरी घरीच विसरले .
तुझ्यासारखी मैत्रीण मिळण्यासाठी नशीबच लागते .
मैत्री करण्यासाठी प्रेम लागतं .
तू माझं जीवनच बदलून टाकलं आहेस .
मनातलं स्वप्न साकार करण्याची जिद्द दिली आहेस.
तु मला जीवन म्हणजे काय हे सांगितलंस,जीवन या शब्दाचा अर्थ काय आहे हे तूच सांगितलस.
मैत्री म्हणजे काय असतं हे तूच शिकवलंस वेळोवेळी तूच मला जागं केलंस .
वाईट मार्गाला जात असताना,
कानाखाली वाजवून तूच मला मागे ओढलंस.
मैत्री म्हणजे नुसतं प्रेम आणि गोडवा नसून त्या मैत्रीत कधीतरी कडूपणाही असावा लागतो.
कारण त्याशिवाय मैत्रीला खरा अर्थ उरत नाही.
तु मला जसं हसायला शिकवलंस ,
त्याच प्रमाणे कोणासाठी तरी रडायलाही शिकवलंस.
तु मला सोडून जाणार या विचारानेच हातपाय थरथरतात.
माहीत आहे… का?
आमच्यात तरी यालाच मैत्री म्हणतात .
मैत्रीत जर प्रेम असेल तर रक्ताच्या नात्यात अधिक एक होतं,
पण त्याच नात्यामध्ये जास्त कडवटपणा असेल तर,
त्याच रक्ताच्या नात्यामधून एक वजा होतं.
मैत्री म्हणजे एक दोर असते.
ती घट्ट बांधायची असते.
जसे इज्जत कमाविण्यासाठी खूप वेळ लागतो.
पण ती घालवायला एक क्षण पुरेसा असतो.
जिला खरोखर एखादी जिवाभावाची मैत्रीण असेल ,
तिला प्रत्येक क्षणाला भीती वाटत असते कि ,
आपल्या मैत्रीत एखादे वादळ तर येणार नाही ना ?
या विचाराने देखील जीव घुसमटतो.
या जगात कितीही श्रीमंत व्यक्ती असली नि तिला मित्र मैत्रीण नसेल.
तर ती व्यक्ती सर्वात गरीबच आहे .
कारण मैत्री हि पैश्यात कधीच मोजली जात नाही.
खरंच ……
तु भेटलीस,
मैत्रीचा अर्थ कळला,
कारण आजवर तुझ्यासारखी जीव लावणारी मैत्रीण कुठे मिळालीच नाही.
प्रतिक्रिया
28 Nov 2013 - 11:54 pm | अग्निकोल्हा
लेखन पटले.
29 Nov 2013 - 12:10 am | संजय क्षीरसागर
सुरेख व्यक्त केल्यात भावना.
29 Nov 2013 - 3:38 am | स्पंदना
वा!
मला खरतर तुमच कौतुक वाटत अनिल, कारण तुमची मुलगी इतक्या मोकळेपणाने तिच्या भावना तुम्हाला दाखवु शकते. नाहीतर टिनएजर्स बरच काही लपवुन ठेवतात.
मुलीच तर कौतुक आहेच, पण तुम्ही तिला योग्यरितीने वाढवता आहात याच जास्त कौतुक आहे.
29 Nov 2013 - 5:29 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत
29 Nov 2013 - 4:42 pm | जेपी
आवडल .
अंवातर - हा लेख इथे टाकण्यापुर्वी मुळ लेखकाची परवानगी घेतली आहे का?(ह घ्या )
भावी संपादक - तथास्तु
2 Dec 2013 - 11:18 am | अनिल तापकीर
सर्वांना धन्यवाद,
(शेकडो सभासदांपैकी फक्त पाच लोकांना एका मुलीचे कौतुक वाटले म्हणायचे )
असो,
2 Dec 2013 - 12:00 pm | गजानन५९
कौतुक सगळ्यांनाच आहे तापकीरजी पण उगाच जबरदस्ती कशाला करीत आहात आणि २/४ दिवस तर झालेत लेख कम कविता टाकून इथे
मुलीला जितके आयुष्य कळले तेवढे तुम्हाला समजलेच नाही असे खेदाने म्हणावे लागेल.
अवांतर :- तुम्ही किती जणांचे कौतुक करता हो तापकीर ? जरा ते पण सांगा कि
2 Dec 2013 - 2:32 pm | बॅटमॅन
कौतुक आपणहून केले गेले तर खरे. असे तोंड वेंगाडून कै फायदा नै.
2 Dec 2013 - 3:51 pm | अनिल तापकीर
वरिल वाक्य टाकुन मी शंभर टक्के चुकलो आहे तेव्हा सर्व सभासदांची मनापासुन क्षमा मागतो.
2 Dec 2013 - 3:57 pm | बॅटमॅन
वाखाणण्यासारखा आहे.