गुरु- एक मार्गदर्षक

राधा's picture
राधा in जनातलं, मनातलं
18 Jul 2008 - 7:47 pm

आज गुरुपौर्णिमा........... तेव्हा प्रथम माझ्या गुरुंना आणि श्रध्दा स्थनांना मी नमन करते.
प्रत्येक झण आपल्या जिवनात कोणाला तरी आदर्श मानुन पुढे चालत असतो. कोणी देवाला, कोणी गुरुला, कोणी एखद्या महान व्यक्तिला तर कोणि स्वतालाच. पण जीवनात सगळ्यांनाच मार्गदर्शनाची गरज असतेच. माझे आई-वडिलच माझे खरे गुरु आहेत . ज्यांनी मला या जगात 'जगण ' शिकवला. पण एकदा माझ्या एका गुरुनी मला एक गोष्ट शिकवली जी मझ्यावर खुप परिणाम करुन गेली ती मी तुमाला सांगते...........
मी शाळेत असतांना वर्गात एकदा 'सकाळी उठल्यावर प्रथम काय कराव....???' यावर चर्चा रंगली. प्रत्येक जण आपले मत मांडत होतं.
' प्रथम देवाच दर्शन (देवघरात जाउन)घ्याव' .
'कराग्रे वसते लक्ष्मी म्हणाव'.
'आईचा चेहेरा बघावा'.
'सरळ बथरुम मधे जाउन चेहेरा धुवावा'.
असे एक ना अनेक विचार मांडले जात होते. आमचा हा गों धळ ऐकुन आमच्या शिक्षिका वर्गात आल्या. आमचा चर्चेचा विषय ऐकुन त्या हसल्या व म्हणाल्या ,'आता मी माझ मत सांगु.' आम्ही सगळे त्यांच्या कडे बघु लागलो. त्या म्हणाल्या,
''सकाळी उठुन प्रथम आरशा समोर उभ रहाव, आपला 'अवतार' नीट करावा' , स्वताला नीत बघुन घ्याव न मग तुम्ही देवाच नाव घ्याव.''
आम्ही विचारल अस का....????? देवाचा किंवा आईचा चेहरा सोडुन स्वताचा चेहरा का बघावा.....??
तर त्या म्हणाल्या,'' आपला एखादा दिवस वाइट गेला ना की आपण सर्वप्रथम नकळ्त त्या व्यक्तिला दोष देतो ज्याचा चेहरा आपण सकाळी उठुन बघतो. बिचार्‍या त्या व्यक्तिचा काय दोष तुमचा दिवस वाईट गेल्यास. तेव्हा सकाळी उठुन स्वताचाच चेहेरा बघणे चांगले ना कारण आपल्या कर्माला आपणच जबाब्दार असतो. दुसरा कारण म्हणजे आपण जर आपला चेहेरा नीट करुन गेलो तर दुसर्‍यांना 'एक प्रसन्न चेहेरा' बघीतल्याचा आनंद होतो. आणि तिसरा म्हणजे तुमचा व्यस्थितपणा दिसतो'.
एवढा सांगुन त्याअ वर्गातुन निघुन गेल्या. पण त्यांचे वाक्य माझ्या मनातुन कधीच निघणार नाहीत. एका छोट्याश्या उदाहरणात त्या मला जगण्याचा एक नविन पैलु शिकवुन गेल्या.

धोरणविचार

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 Jul 2008 - 10:38 pm | प्राजु

उठल्या उठल्या आधी स्वतःचं दर्शन घ्यावं... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Jul 2008 - 12:19 am | llपुण्याचे पेशवेll

पण उठल्यावर स्वतःचा चेहरा बघण्याचे लक्षातच राहात नाही. बरेच वेळा तर अशी मृतवत झोप लागते की उठल्यावर प्रथम मी कोठे आहे हा प्रश्न पडतो. :)त्यामुळे माझ्यासाठीतरी उठल्यावर प्रथम मी कुठे आहे हे जाणून घेणे गरजेचं आहे. :)
पुण्याचे पेशवे

स्वप्निल..'s picture

19 Jul 2008 - 2:25 am | स्वप्निल..

बरेच वेळा तर अशी मृतवत झोप लागते की उठल्यावर प्रथम मी कोठे आहे हा प्रश्न पडतो. :)त्यामुळे माझ्यासाठीतरी उठल्यावर प्रथम मी कुठे आहे हे जाणून घेणे गरजेचं आहे.

पेशवे साहेब,
एकदम खरे...
..माझं पण असच आहे..एकदा झोपल्यावर काहि खरं नाही..:)

स्वप्निल..

विसोबा खेचर's picture

19 Jul 2008 - 12:44 am | विसोबा खेचर

माझ्या मते एखाद्या विषयाकडे बघण्याची जी काही एक खास नजर आवश्यक असते ती नजर आपल्याला गुरुकडूनच मिळते! ती नजरच मुख्यत: गुरुकडून शिकायची असते!

तात्या.

शितल's picture

19 Jul 2008 - 2:32 am | शितल

राधा लेख छान आहे.
पण देवाला नमस्कार करूनच आमचा दिवस चालु होतो
आणि तात्याशी १००% सहमत आहे.