' माझ्या सासुबै ! '

जेनी...'s picture
जेनी... in जनातलं, मनातलं
15 Nov 2013 - 11:35 pm

" नमस्कार करते हं सासूबाई " कमरेतून जस खाली वाकून पायाला हात लावणार तोच सासू बै नी खांद्याला हात लावून " औक्षवंत हो " असं म्हणाल्याचं कानावर आलं ,मग मी पायाला हात न लावताच डोकं वर घेतलं ,म्हटलं आशीर्वाद मिळालाना ,झालं ना काम .एका हाताने त्यांच्या हातातली ब्याग स्वताहाच्या हातात घेत त्यांना " कश्या आहात? प्रवास व्यवस्थित झाला ना? " अशी विचारपूस केली .त्यावर थोडक्यातलं प्रवास वर्णन ऐकून आम्ही एअरपोर्ट मधून बाहेर पडलो .

येस्स ,सासूबै अमेरिकेला आल्यात माझ्याकडे .आमची ही दुसरीच भेट .कारण लग्न होऊन आठ दिवसातच आम्ही नवदाम्पत्य भारतातून इकडे परतलो .त्यामुळे मी सासुरवाशीण असली तरी सासूचा वास अजून काही घेतला नव्हता .
अर्थातच थोडी भीती आणि उत्सुकता होती सासू बद्दल .मी आणि मॅक दोघहि गेलो होतो त्यांना एअरपोर्ट वर आणायला.

कारमध्ये बसल्यावर सासू बै थोड्या रील्याक्स मूड मध्ये होत्या .मी आणि म्याक पुढे बसलो होतो . इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सासू बै एकदम
म्हणाल्या ," मक्या ?"
हा मक्या म्हणजे माझा नवरा ,मकरंद त्याचं नाव ,आई त्याला मक्या म्हणते ,बायको(मी ) त्याला मॅक.पूर्ण मकरंद अशी हाक आजवर कुणी मारलेली पाहिलेली ,ऐकलेली नाही .
तर ,
सासू बै : "अरे किती बारीक झालायस "
मक्या : " तू खूप दिवसांनी बघतेयस , "
सासू बै : " लग्नाचे फोटो बघ त्यात कसा तजेलदार दिसत होतास आणि आता पार सुकून गेलायस ,लग्न मानवलेल दिसत नै तुला "

मक्या : " चल आई ,काहीही काय "

संभाषण समाप्त .भयान शांतता .मी कशाला काय बोलू ,नायतर माझ्या स्वयंपाक कलेवर येवून घसरायच्या . मी आपली मस्त खिडकीतून बाहेर बघण्यात रमलीय ,मी काहीच ऐकलं नाही ,मी ती नव्हेच अश्या पावित्र्यात बसली होती .

माझा आणि सासुबैन्चा खुला सामना या आधी झालाच नव्हता .लग्नात तर दिवसभर मी त्यांच्या जवळ नव्हते आणि त्यानंतरचे आठ दिवस देव ,देवस्थाने ,पाहुणे ,पाहुणचार ,नातेवाईक ,शॉपिंग ,कोडकौतुक आणि शेवटी निघायची तयारी असे इतके बिज्जी गेले .त्यामुळे आम्ही दोघी समोरासमोर पहिल्यांदाच .

घरी आल्यावर सासुबैन्चा जेटल्याग चालू झाला .दोन दिवस दिवसभर झोपायच्या आणि रात्री ३ वाजता उठून बसायच्या .एक दिवस मॅक ने कंपनी दिली ,दुसर्या दिवशी मी .तिसर्या दिवशी त्या जरा लैनीत आल्या .

ह्म्म्म ,आत्ता खरी स्टोरी चालू झालीय :

सुरुवातीचे आठ दिवस व्यवास्थित गेले .एकदम मजेत नाही म्हणता येणार ,कारण मी थोडी दबकून असायचे .साफसफाई ठेवावी लागायची ,सकाळी लवकर म्हणजे अगदी साडे ६ लाच चहा करून हवा असायचा त्यांना .
माझा प्रॉब्लेम व्हायचा ना मग .मी ६ ते ७ जिम मध्ये असायचे .सासू बै आल्यापासून जिम तासाची मिनिटावर आली होती .१५/२० मिनिटं जिम मध्ये जावून मी ६:२० ला घरी .६:३० ला चहा सासू बैन्च्या हातात . त्या चहात वाकून वाकुन बघायच्या आणि मग प्यायच्या .काय बघायच्या देव जाणे . एक दिवस तर मी म्हटलंच " अहो साखर ,चहा पावडर इवन दुध सुद्धा घातलय ,बघून दिसणारे का ? विरघळून जाते साखर ,पावडर मी गाळली गाळनीने ".

मग त्यांचा मोर्चा माझ्या स्वयन्पाकाकडे वळला .दुपारच्या जेवणासाठी त्यांना चपाती आणि कोणतीही एक भाजी लागायची .मी चपातीचं पीठ मळत होती .तर सासू बै शेजारी उभ्या . मी नेहेमी प्रमाणे पीठ परातीत घेवून त्यात बदाबदा पाणी ओतलं न पीठ गदागदा हलवलं ,झालं ....तीन मिनिटात पीठ मळून चपाती लाटायला घेणार इतक्यात ,

सासू बै : अगं ते मळ तरी आणकी ,आणि केवढं बिलबिलीत .
मी ...(स्वताहावर खुश होत ) : अहो सासू बै मी रोज असच मळते ,आणि लाटता आली चपाती म्हणजे झालं ना "
पीठ मळायला तीन मिनिट आणि एक चपाती लाटायला १० सेकंद :)

सासू बै : हो ,आणि ती तीन मिनिट १० सेकंदाची चपाती खायला २० मिनिट . :-/

माझा सगळाच उत्साह मावळला . मी काहीही न बोलता चपाती भाजी केली .त्या जेवून शांतपणे झोपल्या .

नंतर तर रोज किचन मध्ये पाणी प्यायचं निमित्त करून यायच्या आणि गॅस वर शिजत असलेल्या भांड्यातल्या भाजीत वाकून वाकून पहायच्या .
मग उपदेश चालू . भाजीत हे घातलस का? त्याने भाजीला छान वास येतो ,ते का नाही घातलस ,चांगली चव येते ,तू ह्याव करत जा नी तू त्याव करत जा .. चालूच रहायचं .

बाहेर जाताना प्रत्येक वेळी त्याना सोबत यायचच असायचं .आठवड्यातून २ ते ३ वेळा मी किंवा मॅक किंवा आम्ही दोघही एकत्र त्यांना बाहेर घेवून जायचो ,तरीही माझ्यासोबत प्रत्येकवेळी यायचच आणि तेही " थांब ग ,मीही येते "अस डायरेक्ट धडकायच्या.विचारणारही नाहीत .आता सगळीकडे नेनं शक्य नसायचं ,मग प्लानच चेंज करावा लागायचा .

घर आवरताना तर आणखी वेगळच .आवरलेली बेडवरची चादर तिला खेचून ताणून ती चारी कोपर्यात परफेक्ट आहे का ते पहायचं ,डीश वॉशर मधली भांडी बाहेर काढून पुन्हा पुन्हा पुसत राहायच्या आणि " हे घास ,त्या मशनीत निट निघत नै ,इन मीन चार भांडी त्याला कशाला हवीय मशीन " .

माय्क्रोवेव ंमध्ये काहिहि गरम केलेलं त्याना आवडायचं नाहि . झोपताना अर्धा कप कोमट दुध पियुन झोपायची सवय आहे , पण ते दुध मायक्रोवेव मध्ये गरम करायचं नाहि , काय तर म्हणे त्या मशनीत फक्त भांडच तापतं , दुध तसच अर्धं गार न अर्धं उन . मग आनखी ३० सेकन्द लावा म्हटलं कि म्हणायच्या " नक्को , त्यापेक्षा गॅसवर २ मिन्टात पट्कन होतं हवं तसं ". गॅसवरचे २ मिनिट मायक्रोवेव च्या ३० सेकंदापेक्षा ' पट्कन ' असे होते त्यांचे.

घरात साडी नेसायच्या . बाहेर ड्रेस्स . साडीत सासुबै कन्फर्टेबल फील करतात आमच्या . पण ही साडी लाँड्री करायची नाहि . तीचं रेशीम खराब होतं . टब मध्ये बसुन धुवायची तीला . चार पाच वेळा ही साडी पाण्यातुन वीसळायची . ड्रायर लाहि नाहि लावु देत मग कर्टन रॉड वर नितळत ठेवायची . इथं बाथरूम ला ना उंबरा ना पाणी जायला होल . मग बाहेर आलेलं पाणी पूसत बसायचं .बॅकयार्ड मध्ये रश्शी बांधु का म्हणुन मॅकला विचारलं होतं त्या़नी . तो म्हणाला कुणीतरी कंप्लेन्ट करेल , कारण तीन घरांमध्ये बॅकयार्ड कॉमन आहे .

सगळ्यात कहर म्हणजे ते गोमुत्र . सासुबै भारतातनं चक्क गोमुत्र अमेरिकेत घेऊन आल्या होत्या . मी म्हटलं वास कसा आला नाहि बॅग तपासताना ? तर म्हणे " असा कसा येईल वास? सेंट च्या बाटलीत बुडवुन आणलिय गोमुत्राची बाटली " ....त्यावर लेकानेही आईचं कौतुक केलं " बघितलस कसली हुश्शारेना माझी आई ! "
हे भगवान !
खरच,माझे भगवान आय मीन देव्हार्यातले इन मीन तीन देव रोज सकाळी त्या गोमुत्रात अक्षरशा न्हाऊन निघायचे. आणि आम्हि त्या वासात . :(

जाम गोची झाली होती . कामं संपता संपायची नाहित . शनिवार रविवार १० वाजेपर्यंत झोपायला मिळायचं नाहि .
नेटवर तासंतास टाइम्पास करायला टाइमच मिळायचा नाहि . जर्र्राशी लेट झालं उठायला कि बेडरूम चा दरवाजा आग लागल्यासारखा ठोकायच्या
तेहि विथ डायलॉग " काय गं , आज जीमाला दांडी क्का ? "

कितीहि काम केलं तरी " तुम्हाला काय कपड्याला मशिन , भांड्याला मशिन , लादि धुनं पूसनं भानगडच नै . आठवड्यातनं दोनदा वॅक्युम केलं कि झालं . जेवन बनवन काय काम नसतं " . हे वाक्य दिवसातनं एकदा तरी असायचच .

तंग आ चुकि थी मय :-/

शेवटी एक दिवस वैत्तागुन मॅकला म्हटलच
मी :" तु लग्ना आधी का नै सांगितलस कि तुझी आई इतकी कजाग आहे ते "
तो : " दुसरं ़काहिहि बोल , पण माझ्या आईला कजाग बिजाग बोलायचं नाहि "
मी : बर .
१० सेकण्दाची शांतता .
पून्हा .....
मीच : मग तु लग्नाआधी का नै सांगितलस कि तुझी आई जाम हेकेखोर आहे ते
तो " हे बघ पिहु माझ्या आईबद्दल तु असलं काहि बोलायचं नाहिस .
मी : बर .
आता यावेळी फक्त ३ च सेकंदांची शांतता अन लगेच पून्हा
मीच : मग तु का नै सांगितलस तुझी आई एक " अवघड प्रकरण " आहे म्हणुन
तो काहि बोल्नार तोवर पून्हा
मीच : हे बघ आता ह्या 'अवघड प्रकरणा ' त तु तुला हवा तो मी मला हवा तो शब्द घेऊ आणि संभाषण
पूढे ढकलु " :-/

त्यावर मॅक हसला आणि प्रेमाणं जवळ घेत म्हणाला " अगं थोडं समजुन घ्यायचं , आणि काहि नाहिच पटलं तर समजावुन द्यायचं तीला .
मग ़काय,तो इतकं लाडात युन बोल्तोय म्हणल्यावर मी २० मिनिटं माझी कंप्लेन्ट वाली रेकॉर्ड वाजवली . बीच्चार्याने कोपरापासनं हात जोडले न म्हनाला
" बाइ गं रोज झोपताना डोक्याला बाम लावुन दिल पण आईला समजाउन सांगणं माझ्याच्याने जमनार नाहि "
आणि सरळ एक उशी कानावर घेउन माझ्याकडे पाठ करुन झोपुन गेला . :(
मक्या रॉक मी शॉ़क्
मॅक मला प्रेमाने पिहु म्हणतो . बाकि सगळे पूजा . लग्नात मी नाव बदलु दिलं नाहि म्हणुन सासुबै नावच घेत नैत . बोलायचं असेल तर " अगं " नाहितर समोर येवुन डायरेक्ट विषयाला हात .

महिन्याभरात सासुबैंनी चांगलाच दरारा निर्माण केला . मला मात्र पक्की सासुरवाशीन असल्याचा फील येउ लागला . जाम घाबरुन रहायला लागले होते मी . साधं बोलणहि होइना आमच्यात . सतत सासुबै उपदेशाचे डोस डॉक्टर असल्यासारख्या सकाळ दुपार संध्याकाळ न चुकता पाजायच्या न मी सीरियस पेशन्ट असल्यासारखं ते डोस चुपचाप प्यायचे .
कुणाशी बोलु कुणाला सांगु कळतच नव्हतं . मॅकला काहि सांगायला जावं तर तो बामची बाटली घेऊनच बेडरुम मध्ये एन्ट्री मारायचा . दीदीला सांगावं तर तिला सासुच नाहिय , मग तिला काय कळणार एका सासुरवाशीणीचं दुखः . आईला सांगितलं तर तिचं भलतच . तीचं लगेच तिच्या सुनेबद्दल चालु व्हायचं " हो ना ?? शमा मलाहि कुठे घेऊन जायला काचकुच करायची , काहि सांगायला जावं तर टांगायला न्यायची " सोल्युशन न मिळता गॉसिपेशन व्हायचं . आईला एक दोनदाच बोलली असेन मग परत बंदच केलं .

शेवटी जीम मध्ये एक मैत्रीण आहे , तिचं लग्न बर्‍यापैकी जुनं होतं .तिच्याकडे तिच्या सासुबै एवढ्या दिवसात एकदाच युन गेल्या होत्या . म्हटलं बघु खडा टाकुन काहि हाती लागतय का ते.

मग एक दिवस जराशी वेळ साधुन तिला सग्गं सगळं सांगितलं . मॅडम आधी माझं मांजर झालय हे पाहुन फिदिफिदि हसल्या न मग मोट्टा श्वास घ्युन म्हणल्या " लोक उगीचच म्हणतात घी अगर सिधे उंगली से नै निक्ला तो उंगली ढेडी करनी चाहिए , अरे मय तो बोल्ती हय कायको उंग्ल्या टेढ्या बिढ्या करत बसायचं ?? सिध्धे पाणि गरम करो न
घीचा डब्बा पाण्यात रख्खो " माझ्या तोंडाचा वासलेला 'ऑ' ? बघुन म्हणली " म्हण इथे बसती का नाय म्हाइत नाय पण घी ला टोकरुन टोकरुन काढन्यापेक्षा ते वितळवण्याचं वातावरण आजुबाजुला तयार करायचं मग ते आपोआप सुतासारखं सरळ होउन बाहेर येतं बघ "

च्यायला ़कसलं डोकय ना ?

झालं , त्या क्षणापासनं मी माझ्या मेंदुला कामाला लावलं .... वेगवेगळ्या शकली लढवायला सुरुवात ़केली , प्रत्येक प्रॉब्लेम पे तोडगा काढुन ठेवला , आता तो फक्त आमलात आणायचाच बाकि होता .........

त्या दिवशी मी जाम खुश होते .बामच्या बाटलीचीहि गरज पडली नाहि .. रोजच्या कचकचीवर सुचलेल्या ऊपायांवर एवढी खुश होते कि चिडुन ३६ च्या आकड्यात असणारे आम्ही दोघे ६३ च्या आकड्यात आलो होतो :P :D

़क्र म श ....

अवांतर : सासुबै प्लेअसे लेखावर थोडं गोमुत्र शिंपडुन द्याना :P

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

आठवणीतला अनमोल's picture

29 Nov 2013 - 5:18 pm | आठवणीतला अनमोल

" लोक उगीचच म्हणतात घी अगर सिधे उंगली से नै निक्ला तो उंगली ढेडी करनी चाहिए , अरे मय तो बोल्ती हय कायको उंग्ल्या टेढ्या बिढ्या करत बसायचं ?? सिध्धे पाणि गरम करो न
घीचा डब्बा पाण्यात रख्खो "

असा "मोलाचा सल्ला" देणार्‍या मैत्रिणी प्रत्येक सुनबाईंना भेटली तर कधिच सासूसुनेमध्ये भांडणे होणार नाहीत ह्याची पक्की खात्री......

जेनी...'s picture

2 Dec 2013 - 11:22 pm | जेनी...

सगळ्यांचे आभार ....
दोन्हि लेख वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार :)