२६ ऑक्टोबर १९४७. हिंदूस्थानच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस. जम्मू-काश्मीर हे राज्य भारतात विलीन झाले.
पण जम्मू-काश्मीर म्हटलं की काही लोक नेहरु, लेडी माउंटबॅटन, युनोत प्रश्न नेणे याच गोष्टी रवंथ करत बसतात. त्यापलिकडे चर्चा जातच नाही.
म्हणूनच आज जम्मू-काश्मीरबाबत काही माहिती, विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
१. राज्याचे नाव 'जम्मू-काश्मीर' असे आहे. नुसते काश्मीर नाही. म्हणून इथून पुढे तसाच उल्लेख करुया.
२. अनेकांना काश्मीर हा या राज्याचा खूप छोटा भाग आहे हे माहित नसते. काश्मीरपेक्षा जम्मू आणि जम्मूहून लडाख मोठे आहे.
३. भारतात सामील झालेले हे सर्वात मोठे राज्य(संस्थान). जम्मू, काश्मीर, लेह-लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, तिबेटचा काही भाग असे ते बनलेले होते.
४. जम्मू-काश्मीर सुरक्षित तर भारत सुरक्षित - या राज्याला पाकिस्तान, अफगाणिस्तान, कझाकिस्तान(रशिया), चीन या देशांच्या सीमा भिडलेल्या आहेत (आज अफगाणिस्तान नाही कारण गिलगिट बाल्टिस्तान भारताकडे नाही) जम्मू-काश्मीरचे सामरीक महत्त्व फार आहे.
५. उद्या २०१४ मधे अमेरीका आपली सैन्य दले अफगाणिस्तानमधून काढून घेइल त्यावेळी तालिबानी मुजाहिदीन भारताकडे वळवण्याचा प्रयत्न असेल. या आक्रमणासाठी भारताची सिद्धता हवी.
६. जम्मू-काश्मीर बाहेरच्या भारतीयांना जम्मू-काश्मीरबद्दल पुरेशी माहिती नाही, हाही एक मोठाच प्रॉब्लेम आहे.
७. लोक जम्मू-काश्मीरला पर्यटकासारखे जातात. ठराविक ठिकाणे पाहतात नि परत येतात. काही जणांना इथे खायला काय मिळते, तर काही जणांना प्यायला काय मिळते याच्यात रस असतो. महिलांना काश्मीरी पोशाख घालून फोटो काढून घ्यायची हौस असते. इथली संस्कृती, इथला माणूस, इथला भूगोल समजून घ्यावा असे किती जणांना वाटते ! जम्मू-काश्मीर हा भारताचाच एक भाग आहे. जम्मू-काश्मीरात आपण पाहुणे नाही. याचा अर्थ इथल्या सुख-दु:खांशी आम्हीही समरस होण्याची गरज आहे. इथल्या निसर्ग सौंदर्यासाठी आम्ही इथे येतो. निसर्गसौंदर्य नसते तर आमचे जम्मू-काश्मीरवरचे प्रेम कमी झाले असते का ?
८. सगळे मुस्लिम भारतविरोधी नाहीत. अनेक गुज्जर हे पक्के भारतनिष्ठ आणि सेनेला मदत करणारे आहेत.
९. पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेखही पाकव्याप्त जम्मू-काश्मीर असाच व्हायला हवा - POJK .
१०. जम्मू-काश्मीरमधे आता कुणी हिंदू शिल्लक नाहीत असाही समज आहे. तो चूकीचा आहे. हिंदू तिथे आहेत. अतिशय लढाऊपणे राहताहेत. अमरनाथसारखी आंदोलने यशस्वी करताहेत.
११. मागच्या किश्तवाडच्या दंगलीचाही हिंदूनी जोरदार मुकाबला केला, ठोशास ठोशाने उत्तर दिले. पण यांना भारत वासीयांच्या पाठिंब्याची गरज आहे.
१२. भारतीयांची पराभूत मनोवृत्ती ही एक समस्या आहे. लढाईपूर्वीच आम्ही हरलो असे जाहीर करून मोकळे होतो. पाकिस्तानला का घाबरायचे कळत नाही. चीनचाही आम्ही अकारण बागुलबुवा करून ठेवला आहे.
१३. अनेक फुटीर नेते त्यांच्या लढ्याचे कारण 'काश्मिरीयत' किंवा 'काश्मीरी अस्मिता' असे सांगतात. मग प्रश्न पडतो एवढ्या काश्मीरी हिंदूंना का हाकलून दिले ? फुटीर नेत्यांकडे याचे उत्तर नसते. त्यामुळे हा 'काश्मीरीयत' चा लढा अजिबात नसून हिंदू - मुस्लिम ही डायमेन्शन त्याला आहेच.
१४. हिंदू अत्यंत लढाऊ - जी रॅपिड अॅक्शन फोर्स इतर ठिकाणी २४ तासात दंगे काबूत आणण्यासाठी प्रसिद्ध आहे, ती इथल्या हिंदूंपुढे हात टेकते. यात इथल्या माता भगिनीही अग्रेसर आहेत. (त्यांच्या लढण्याच्या पद्धती विचारल्यास खाजगीत सांगेन, इथे लिहित नाही) भारतीय सैन्याशी मात्र यांचे सख्य आहे. मिलिटरी आली की असेल ते हातातले शस्त्र हे लोक खाली ठेवतात. भारतीय किंवा हिंदू मिलिटरी हा एकमेव आधार आहे ही भावना सतत मनामधे असते. त्यामुळे मिलिटरीशी इथले हिंदू झगडा कधीच करीत नाहीत. मिलिटरीलाही या सगळ्याची जाणीव आहे.
१५. गिलानी, मीर वाईझ, यासिन मलिक यांना टीव्ही वरच्या प्रसिद्धिने मोठे केले आहे. अन्यथा आपापल्या गल्लीपलिकडे त्यांना कुत्राही विचारीत नाही.
१६. जम्मू-काश्मीरवर लेखकांनी असंख्य पुस्तके लिहिली आहेत. इंग्लिशमधे लिहिलेले स्टँडर्ड मानण्याची प्रथा आपल्याकडे आहे. शक्यतो भारतीय लेखक त्यातही अधिकृत कागदपत्रांचा आधार घ्यावा उदा यु. एन रीसोल्युशन्स, लोकसभेने घेतलेले निर्णय इ. ब्रिटिश, अमेरीकन लेखक दूर अशासाठी ठेवावेत कारण हे लेखक भारताचे हितचिंतक नव्हेत. सत्ता सोडताना भारत शक्य तितका कमकुवत रहावा ही इंग्रजांची इच्छा होती. जम्मू-काश्मीर भारतापासून तोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण महाराजा हरीसिंग यांनी जम्मू-काश्मीर भारतात सामील केल्याने ब्रिटिश, अमेरीकनांचे सर्व प्रयत्न वाया गेले. म्हणून तो सूड त्या लोकांनी एक तर युनोच्या माध्यमातून उगवला. उरलेला पुस्तकांच्या माध्यमातून उगवला ज्यात असत्य ठासून भरलेले आहे.
१७. सीमेवरच्या जनतेला आकर्षित करण्याचा चीन नेहमीच प्रयत्न करीत असते. पण लेह लडाखमधे त्यांना अजिबात यश आलेले नाही. लडाखमधल्या अगदी चीनी सीमेवरचे तरुणही २६ जानेवारी, १५ ऑगस्टला तिरंगा फडकवतात. पण केंद्र सरकारकडून त्यांना निरोप जातो झेंडा फडकवू नका. तुमचे झेंडावंदन पलिकडच्या चीनी सैनिकांना दिसते. त्यांना कशाला उगाच उचकवायचे ?
१८. जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवला की आम्हा भारतीयांना बोंबाबोंब करायला फार मजा येते. पण जम्मू-काश्मीरबाबतचे आमचे कर्तव्य तिथेच संपते. नकाशा केवळ कागदावर दुरुस्त न करता प्रत्यक्ष भूगोलही ठीक करावा असे आम्हाला का वाटत नाही ? सरकारला शिव्या देवून विषय संपत नाही. सुरु होतो.
१९. पाकिस्तानने जेव्हा जम्मू-काश्मीरवर आक्रमण केले त्यावेळी जे हिंदू पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधे राहीले त्यांना पुढे इस्लाम स्वीकारावा लागला. ज्यांना हिंदू धर्म प्यारा होता असे लोक भारताच्या जम्मू-काश्मीरमधे निर्वासित म्हणून आले. या लोकांच्या तिकडे घरे जमिनी होत्या. पुढच्या ४, ५ वर्षात पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आपण पुन्हा जिंकू त्यावेळी तुमची घरे, जमिनी तुम्हाला परत मिळतील असे आश्वासन या हिंदू निर्वासितांना सरकारकडून मिळाले. आज ६५ वर्षे होवून गेली. पाकव्याप्त जम्मू-काश्मीरही हाती आलेले नाही. त्यामुळे या हिंदू निर्वासितांना जमिनीही मिळालेल्या नाहीत. याहून भयाण गोष्ट म्हणजे यांना भारताचे नागरीकत्त्वही मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षण, नोकरी या कोणत्याही गोष्टी त्यांना करता येत नाहीत. जिवंत माणसे आहेत पण कागदपत्री नोंदच नाही. ६५ वर्षात ३ पिढ्या झाल्या प्रश्न सुटलेला नाही.
२०. महाराष्ट्रात नक्षलवादाची समस्या आहे म्हणून कुणी महाराष्ट्र प्रश्न असा उल्लेख करत नाही. छत्तीसगढमधेही नक्षलवादाची समस्या आहे म्हणून छत्तीसगढ प्रश्न असा उल्लेख करीत नाही.
मग जम्मू-काश्मीर बाबत काश्मीर-प्रश्न असा उल्लेख का केला जातो. There is a problem in JK but JK is not a problem.
२१. जम्मू-काश्मीरबद्दल अनेक गैरसमज आहेत. महाराजा हरीसिंग यांनी जम्मू-काश्मीर विलीन करायला उशीर लावला, त्यांना वेगळे राहण्याची इच्छा होती. वास्ताविक महाराजा हे अतिशय भारतनिष्ठ होते. १९३९ पासूनच त्यांची सामीलीकरणाची तयारी होती. त्यांच्याबाबतचे गैरसमजही ब्रिटिश-अमेरीकन लेखकांनी पसरवले आहेत. निर्णय घेण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री बलदेवसिंग, नेहरु आणि सरदार पटेल अशा तिघांची होती. त्यामुळे यश अपयश तिघांचेही आहे. नेहरुंनी प्रश्न युनो मधे नव्हे, युनोच्या सिक्युरीटी कौन्सिलमधे नेला. त्यामुळे युनोला हस्तक्षेपाची कोणतीही विनंती नेहरुंनी केली नव्हती. त्यामुळे इतर देशांमधे जशा युनोच्या सेना जातात तशा सेना जम्मू-काश्मीरमधे आल्या नव्हत्या. प्रश्न युनोच्या सिक्युरीटी कौन्सिलमधे नेल्याने युद्धबंदी करावी लागली. हे साफ झूठ आहे. युद्धबंदी त्यानंतर वर्षाने झाली. या काळात भारत, पाकिस्तान, जम्मू-काश्मीर अशा तिघांचे सेनाप्रमुख ब्रिटीश होते. जम्मू-काश्मीरचे पोलिसप्रमुखही ब्रिटीश होते. अखंड भारताचे सैन्यप्रमुखही ब्रिटिश होते. नेहरुंना सैन्याचे कोणतेच अधिकार नव्हते. त्यामुळे पाक आक्रमणाच्यावेळी जेव्हा जम्मू-काश्मीरचे प्राण कंठाशी आले त्यावेळी नेहरुंना माउंटबॅटनच्या अक्षरशः पाया पडावे लागले. तो सांगेल त्या अटी ऐकण्याशिवाय नेहरुंपुढे पर्याय नव्हता. युनोकडे जाण्याचा, युनोला मधे घालण्याचा माउंटबॅटनचा आग्रह होता. तो नेहरुंना मानावाच लागला त्याशिवाय माउंटबॅटनने सैन्याला आज्ञा दिली नसती आणि जम्मू-काश्मीर संपूर्ण गमवावे लागले असते. पण युनोकडे जातानाही नेहरंनी माउंटबॅटनला कात्रजचा घाट दाखवला. Intervention साठी नव्हे तर केवळ पाकिस्तानची आतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी व्हावी एवढ्यापुरताच तो युनोच्या सिक्युरीटी कौन्सिलमधे त्यांनी मांडला. त्याचा गैरफायदा युनोने घेतला नि यामधे नाक खुपसण्याची संधी शोधली. युनो हा अजिबात निष्पक्ष मंच नव्हता, तो ब्रिटिश, अमेरीका यांच्या वर्चस्वाखाली होता. भारताचे गुंजभरही हित करावे अशी त्यांची इच्छा नव्हती.
२२. आज गिलगिट बाल्टिस्तान आपल्याकडे नसल्याने आपल्याला अनेक तोटे होत आहेत. अफगाणिस्तान या भारताला मित्र मानणार्या राष्ट्राला आपल्या सीमा लागून नाहीत. इराण इराक आणि इतर अनेक अरब देश भारताचे मित्र आहेत. त्यांच्याशी जमिनीच्या मार्गाने व्यापार करणे अशक्य आणि खर्चिक झाले आहे.
या सगळ्या लिखाणानंतर कुणाला नेहरु, माउंटबॅटन, शेख अब्दुल्ला या चर्चेत पडायचे असेल तर ते केवळ इतिहास समजून घेण्यापूरते असावे. ही सगळी माणसे जावूनही आता अनेक वर्षे झाली. त्यामुळे त्यांना शिवीगाळ करण्याचा दुसरा अर्थ असा होतो, मग तुमचे बाप तुमचे आजोबा काय करत होते. की ते *ढ होते ? तसे नव्हते तर त्यांनी का काहीच केले नाही.
यापुढे जम्मू-काश्मीरविषयीच्या चर्चेची दिशाही वेगळी असेल. उद्या कुणी यासिन मलिक 'काश्मीरीयत' बाबत बोलेल तर त्याला तिथले हिंदू काश्मीरी नव्हते काय ? असा उलट प्रश्न करावा.
सैन्याने केलेले अत्याचार इ. मुद्दे कुणी काढेल तर त्याला अतिरेक्यांनी हिंदू स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराचा जाब विचारावा.
अतिरेक्यांना दिलासा पॅकेज, या बलात्कार्यांना जम्मू-काश्मीर पोलिसमधे नोकरी कशासाठी ? प्रशासनात मुस्लिमांचीच भरती का ? हेही विचारावे. जम्मूची लोकसंख्या अधिक असून काश्मीरला लोकसभा, विधानसभेत अधिक प्रतिनिधीत्त्व का ? ३७० कलमाचे आज नेमके स्थान काय ? यावरही विचार व्हावा.
जम्मू-काश्मीर भारतात सामील तर झाले, आता त्याच्या भारताबरोबर एकात्मतेसाठी आपल्याला काय योगदान देता येइल याचा प्रत्येकाने विचार करावा.
धन्यवाद !
प्रतिक्रिया
9 Nov 2013 - 5:31 pm | शिद
चांगला लेख आणी रोचक माहीती...
12 Nov 2013 - 12:52 am | श्रीरंग_जोशी
हेच म्हणतो.
या विषयावर विक्रमी चर्चा खालिल धाग्यावर झालेली आहे.
इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
9 Nov 2013 - 5:51 pm | गजानन५९
लेख छानच आहे पण थोडा धूसर वाटत आहे एका भागात लिहिण्यापेक्षा ५/६ भागात लिहिले असते तर अजून जास्ती माहिती आली असती.
9 Nov 2013 - 5:57 pm | रमताराम
उदे गं अंबे उदे. गोंधळाला ये गं अंबे गोंधळाला ये.
9 Nov 2013 - 6:40 pm | वेताळ
हा प्रश्न युनोत नेण्यासाठी नेहरुची हतलबता का होती ह्याबद्दल नवीनच माहिती कळाली. बाकी खाजगीतले उत्तर आम्हाला पाथवली तर बरे होइल.
9 Nov 2013 - 7:07 pm | उद्दाम
हं ... अजून जरा मागे फ्लॅशब्याक न्या.
पानिपतच्या लढाईपत्तुर मागे जा. काही उत्तरे मिळतील ....
१७६० / ६१ ला पानिपताची लढाई झाली. पेशवे हरले काश्मीरवर अब्दालीची सत्ता आली. त्याकाळात धर्मांतर झाले.
पुढे १८२०-३० च्या आसपास शिखांकडे सत्ता आली. तेंव्हा काश्मिरातील मुसलमान बोलले, आम्हाला पुन्हा हिंदु करा. शीख राजानी ते मान्य केले. पण हिंदु धर्मातील ठेकेदारानी असे झाले तर आम्ही राजाला असहकार्य करु. असे सांगून ते धर्मांतर रोखले आणि मग दोन धर्मातील तेढ सदासर्वकाळ राहिली.. खरे आहे का हो हे?
संस्थान विलीन करणे हे कोण ठरवत होते? हाय्द्राबादच्या निजामाला पाकिस्तानात जायचे होते. पण जनतेला भारतात यायचे होते. तिथे जनतेचा निर्णय मान्य केला.
तर काश्मीरबाबत काय अवस्था होती? जनतेला कुठे जायचे होते? आणि राजाने घेतलेला निर्णय मात्र फायनल केला गेला.
सैन्याने केलेले अत्याचार इ. मुद्दे कुणी काढेल तर त्याला अतिरेक्यांनी हिंदू स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराचा जाब विचारावा. अतिरेक्यांना दिलासा पॅकेज, या बलात्कार्यांना जम्मू-काश्मीर पोलिसमधे नोकरी कशासाठी ?
अग्गोबै ! किती हो तुमची आकडेवारी पक्की !!!! जम्मू काश्मीर फ्रंटवर आपली जम्मू काश्मीर बटालियन लढते. त्यात ६० % मुसलमानच असतात आणि शहीद होणार्यातही त्यांचीच संख्या लक्षणीय असते.. नेटवर शोधून जरा हीही आकडेवारी लिहायची की !
10 Nov 2013 - 12:16 pm | मृत्युन्जय
जम्मू काश्मीर फ्रंटवर आपली जम्मू काश्मीर बटालियन लढते. त्यात ६० % मुसलमानच असतात
आयला म्हणजे ते काश्मीरी जनतेवर अत्याचार करणारे आणि मुसलमान बायकांवर बलात्कार करणारे सैनिक मुसलमानच असतात होय? नाही म्हणजे असले प्रकार तिथे होतात असे तिथले लोक म्हणतात म्हणुन विचारले.
9 Nov 2013 - 9:59 pm | विनोद१८
अवो उद्दामसायेब,
आपल्याला आपला अजून बराच मागे फ्लॅशब्याक न्यावा लागेल हं बर का ..... अगदी अकबरापर्यन्त, केवळ सोयीचा इतिहास नको. काश्मिरवर आक्रमण करुन ते सम्पूर्णपणे जिकणारा तो पहिला मोगल, तोपर्यन्त काश्मिरवर कोणात्याही मोगलाला पुर्णपणे सत्ता आणता आली नाही, त्याच्या राजवटीतच काश्मिरमध्ये इस्लाम फैलावला, तोपर्यन्त तरी लढाऊ काश्मिरी लोकान्नी किल्ला लढवला होता, धर्मांतर त्यानन्तर झाले तलवारीच्या जोरावर, ह्रदये जिन्कुन नव्हे हा इतिहास आहे.
आपला अभ्यास जर पक्का नसेल तो प्रामाणिकपणे मनापासून करावा आणि हे असले प्रश्ण की दावे करुन तुम्हाला काय सुचवायचे आहे ??? स्वतन्त्र भारताने हैदराबादला एक व काश्मिरला दुसरा न्याय लावून त्यान्च्यावर अन्याय केला असे वाटते काय ??? किती हैदराबादी व काश्मिरी तुमच्याकडे त्याबद्द्ल तक्रार घेऊन आले होते ??? मला वाटते त्यान्च्यापेक्शा तुम्हालाच याचे अतीव दुखः झालेले दिसते, तुमच्या प्रतिक्रियान्चा रोख हा अतिशय कमअस्सल आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
उथळ प्रतिसाद देवून कोणत्याही लेखाचे / धाग्याचे गाम्भीर्य कमी करू नये तसेच नव-इतिहासकार होण्याचा प्रयत्न सुद्धा. तूर्त एवढेच.
विनोद१८
11 Nov 2013 - 8:39 am | सुनील
अवो विनोदसायेब,
आपल्याला आपला अजून बराच मागे फ्लॅशब्याक न्यावा लागेल हं बर का ..... अगदी रिंचनपर्यन्त, केवळ सोयीचा इतिहास नको.............
चौदाव्या शतकात कश्मिरमध्ये हिंदू राजा सहदेव याचे राज्य होते. शेजारच्या लडाखमध्ये एक बौद्ध घराणे राज्यकर्ते होते. लडाखमधील राजघराण्यातील कौटुंबिक रणधुमाळीत राजपुत्र रिंचन कश्मिरमध्ये पळून आला. सहदेवाने त्यास आश्रय दिला. लवकरच मंगोल टोळ्यांनी काश्मिरमध्ये हल्ला केला. घमासान लढाई झाली. मंगोल निघून गेले परंतु सहदेवाचा मात्र मृत्यू झाला आणि रिंचन गादीवर आला (आता रिंचन गादीवर कसा आला हे अवांतर आहे!)
रिंचन याने सहदेवाचा महामंत्री रामचंद्र याची कन्या कोटाराणी हिच्याशी विवाह केला. पुढे रिंचन याने इस्लाम धर्म स्वीकारला (हे अशोकाने युद्धात विजय मिळाल्यानंतरही बौद्ध धर्म का स्वीकारला, याइतकेच गूढ आहे). आता राजानेच इस्लाम धर्म स्वीकारल्यावर प्रजेनेही मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. मुघल येईस्तोवर बहुसंख्य प्रजा इस्लामधर्मिय झाली होती.
11 Nov 2013 - 9:07 am | उद्दाम
अग्गोबै, हे नवीनच समजले. पण खरे आहे असे वाटते. http://en.wikipedia.org/wiki/Rinchan
11 Nov 2013 - 10:41 pm | विनोद१८
ते जर सत्य असेल तर ते मान्य करावेच लागेल... मी सधारणपणे काही वर्षापूर्वी एका लेखात अकबराच्या कश्मिर आक्रमणाबद्दल वाचले होते ते लिहिले, मला त्याबद्दल काही म्हणायचे नाही, इथल्या काथ्याकूटाने इतिहास काही बदलणार नाही, तुम्ही लिहिलेत तसे सुद्धा असू शकेल. परन्तु माझ्या प्रतिसादाचा रोख निराळा आहे,
काही अस्तनीतले निखारे हे जाणीवपूर्वक पन्चमस्तम्भीयान्सारखे लिहितात त्याना जेथल्या तेथेच ठेचले पाहिजे असे माझे मत आहे, माझा प्रतिसाद पुन्हा वाचा म्हणजे ते लक्षात येइल.
विनोद१८
16 Dec 2014 - 12:00 pm | आशु जोग
जम्मू-काश्मीरच्या निवडणूकीचे काय...
कसे असतील निकाल आणि अनेक प्रलंबित विषय सुटायला सुरुवात होइल का
10 Nov 2013 - 10:45 pm | आशु जोग
आपण नकाशा नीट पाहिलात का !
11 Nov 2013 - 9:04 am | मुक्त विहारि
सध्या
मुझफ्फर नगर, संभाजीनगर (२/३ दिवसांपुर्वीच घडलेले रोशनगेट प्रकरण) , आझाद मैदानातील शस्त्र मुंब्र्यतून हस्तगत करण्यात आलेले अपयइ, ही प्रकरणे हॉट आहेत.
11 Nov 2013 - 9:09 am | उद्दाम
तेच तर!!! काश्मीर, बापूबाबा, नथुराम, ५५ कोटी .. हे सगळे चघळून चोथा झालेले विषय आहेत.
मी http://www.misalpav.com/node/26095 इथं सगळ्याच संस्थानांची कुंडली मांडून बसलोय , तर तिथे शुकशुकाट आहे. यान्ना नुसत्या एका काश्मीरवर टीआरपी हवा आहे. :)
12 Nov 2013 - 12:45 am | अत्रुप्त आत्मा
हम्म्म....!
12 Nov 2013 - 4:44 am | रमेश आठवले
१.सगळी परिस्थिती समजाऊन सांगितल्या नंतर खुद्द महात्मा गांधी नी भारताचे सैन्य काश्मीरमध्ये पाठविण्यास संमती दिली होती.
२.नेहरुंना mountbaten यांचेशी चर्चेत ठाम भूमिका घेणे कधीच शक्य न्हवते . कारण त्यांचे त्याच वेळी governor जनरल च्या बायकोशी प्रेमचाळे चालले होते. governor च्या गुप्तहेर जाळ्याने त्याला हि खबर दिली नसेल असे शक्य नाही.
३. नेहरू हैदराबाद राज्याच्या बाबतीत जसे वागले त्यावरून नेहरू यांची असली वृत्ती लक्षात येते.म्हणजे ते GJ च्या दबावा मूळे युनो मध्ये गेले असे मानण्याचे कारण नाही. युनो च्या security council मध्ये गेले कि general असेम्ब्लीत गेले हा फरक महत्वाचा नाही. दोन शेजारच्या राष्ट्रांचा वाद, स्वत:ची बाजू जोरात असताना, चावडीवर नेला हि त्यांची घोडचूक आहे.
४.वल्लभभाई पटेल यांना एकदा कुणीतरी विचारले कि त्यांना देशातला सर्वात मोठा राष्ट्रीय मुसलमान कोण वाटतो यावर त्यांनी एका शब्दात उत्तर दिले -जवाहर.
12 Nov 2013 - 7:47 am | सुनील
ब्वॉरं
अजून काही मुद्दे असतील तर तेही सांगून टाका. तेवढाच टैम्पास ;)
13 Nov 2013 - 8:51 am | उद्दाम
नेहरु कोण होते हे सांगायला दुसर्या कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही.
स्वत: नेहरुनीच लिहून ठेवले आहे.
By education I am an Englishman, by views an internationalist, by HEART a Muslim, and I am a Hindu only by accident of birth…' - JAWAHARLAL NEHRU
15 Nov 2013 - 2:15 am | रामपुरी
"by HEART a Muslim, and I am a Hindu only by accident of birt"
तरीच....
12 Nov 2013 - 2:01 pm | रमेश आठवले
हे घ्या तुमच्या टैम्पास साठी-
१. गोवा मुक्त करायचे ठरल्या नंतर भारतीय सेनेच्या तुकड्या गोव्यात शिरल्या व प्रगती करत असताना नेहरूंनी त्यांना परत फिरण्याचा हुकुम केला. तेन्ह्वा त्या तुकड्यांचे नेतृत्व करणार्या अधिकार्याने आता आम्ही अशा स्टेज ला पोचलो आहोत कि आता आम्हाला माघार घेणे अशक्य आहे असे उत्तर पाठविले आणि गोवा मुक्त झाला व भारताचा घटक होऊन प्रगती करत आहे.
त्या सेना अधिकार्याने नेहरूंच्या आदेशास वाटाण्याच्या अक्षता लावल्या नसत्या तर कदाचित गोव्याचे सुधा काश्मीर सारखे भिजत घोंगडे झाले असते.
या खेपेस नेहरूंच्या वर mountbaten किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा दबाव न्हवता.
२. नेहरूंच्या कालखंडा नंतर सिक्कीम चे भारतात १९७५ साली निर्विघ्नपणे विलीनीकरण झाले.
13 Nov 2013 - 10:41 am | सुनील
येऊदे अजून!!!!!
बादवे, पटेलांच्या अंत्ययात्रेला नेहरू गैरहजर हा मुद्दा सांगायचा राहिला वाट्टं ;)
13 Nov 2013 - 1:29 pm | आशु जोग
नेहरु शेख माउंटबॅटन यापलिकडे काही माहिती असेल तर सांगा
13 Nov 2013 - 1:30 pm | आशु जोग
इंग्रजांच्या काळात भारतात कित्येक संस्थाने होती. त्यामुळे भारताचा काही भाग संस्थानांच्या अधिपत्याखाली(Princely states),
तर इतर भाग थेट इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता.
जम्मू-काश्मीरचे महाराजा हरीसिंग यानी सामीलनाम्यावर सही केली आणि भारताने तो स्वीकारला तिथेच हा प्रश्न निकालात निघाला. कारण,
भारत वा पाकिस्तानात सामील होताना संस्थानातील प्रजेच्या मतावर काहीच अवलंबून नव्हते. संस्थानिक हवा तो निर्णय घेऊ शकणार होते. इथेच मेख होती. यानिमित्ताने भारतात खूप अनागोंदी माजेल, जेवढी संस्थाने तेवढी भारताची शकले होतील असा इंग्रजांचा अंदाज होता. पण भारताच्या नेत्यांनी विलीनीकरणाची जबाबदारी कुशलतेने हाताळली. अगदी जंजिर्याच्या सिद्दीनेही हैद्राबादच्या निजामाच्या मार्फत पाकिस्तानशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला होता. पण अलिकडेच निधन पावलेल्या मोहन धारीयांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या तत्परतेने जंजिरा स्वराज्यात दाखल झाला.
13 Nov 2013 - 2:29 pm | ग्रेटथिन्कर
छान माहीती दिलीत.
14 Nov 2013 - 12:23 am | अत्रुप्त आत्मा
हे वाचा...
http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5473893995665705541
म्हणजे या धागा इषयातले समदे कळेल
14 Nov 2013 - 2:25 pm | आशु जोग
धन्यवाद !
पुस्तकाबद्दल
14 Nov 2013 - 4:15 pm | आशु जोग
निवडणूकीच्या वेळी पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या जागांसाठीही भारताकडून नोटीफिकेशन जारी केले जाते
15 Nov 2013 - 1:36 am | आशु जोग
३७० कलम ही एक महत्त्वाची बाब आहेच. आज केंद्र सरकारने पारीत केलेली बिले तिथल्या विधानसभेच्या संमतीशिवाय लागू होवू शकत नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारच्या सर्व योजना दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देशाच्या इतर भागात झाला. पण जम्मू - काश्मीरमधे ३७० मुळे ते होवू शकले नाही. दुर्बल घटक म्हणजे महिला व मागास घटक.