एक तत्व नाम

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
2 Nov 2007 - 4:32 pm

आपल्या संतसाहीत्यात "नामाचा महीमा" सांगीतला आहे. एखादे नाव सतत घेतले तर त्यात तसे नाम घेणारी व्यक्ती आंतर्बाह्य समरस कशी होऊ शकते याचे हे उदाहरण :-)
---------
सोनियांनी देशासाठी गोळ्या झेलल्या - कोडा

[ Thursday, November 01, 2007 05:44:44 pm]

रांची
मटा ऑनलाइन वृत्त

सोनिया गांधी यांनी आपल्या देहावर गोळ्या झेलून देशासाठी प्राणाची आहुती दिली, त्यामुळे आपण सोनिया गांधी यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, अशी गोंधळलेली आदरांजली झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांनी वाहिली.

काँग्रेसजनांना सोनिया गांधीच्या इतके मागे पुढे करण्याची सवय झाली आहे की, त्यांना यत्र-तत्र-सर्वत्र त्यांना मॅडमच दिसतात. त्यातील अनेक महाशयांपैकी कोडा हे एक. म्हणूनच त्यांनी इंदिरा गांधींच्या २३ व्या पुण्यतिथीला काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चक्क सोनिया गांधी यांचा उल्लेख करून त्यांनाच आदारांजली वाहीली.

मुख्यमंत्र्यांनी अनावधानाने ही चूक केली. त्यांना खरं तर इंदीराजींनाच श्रद्धांजली अर्पण करावयाची होती, असे सांगून युपीएच्या एका नेत्याने कोडा यांना पाठीशी घातले. तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपला काँग्रेसची खिल्ली उडवण्याचा एक चांगलाच मोका मिळाला. सोनिया गांधी यांच्या आशिर्वादाने कोडा यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे ते दिवस रात्र त्यांचीच माळ जपत असतात, त्यामुळे असे भारतीय जनता पक्षाचे नेते रमेश पुष्कर यांनी कोडा यांची खिल्ली उडवली.

राजकारणविरंगुळा

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

2 Nov 2007 - 4:45 pm | आजानुकर्ण

मस्त बातमी. किस्सा मजेदार आहे.

स्वाती दिनेश's picture

2 Nov 2007 - 5:15 pm | स्वाती दिनेश

किस्सा मजेदार आहेच,शीर्षक ही आवडले.
स्वाती

यशोदेचा घनश्याम's picture

2 Nov 2007 - 4:59 pm | यशोदेचा घनश्याम

कोडांनी ऍकणार्यांना कोड्यातच पाडलं !

विसोबा खेचर's picture

2 Nov 2007 - 6:09 pm | विसोबा खेचर

म्हणूनच त्यांनी इंदिरा गांधींच्या २३ व्या पुण्यतिथीला काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चक्क सोनिया गांधी यांचा उल्लेख करून त्यांनाच आदारांजली वाहीली.

अहो चालायचंच! आमचे कोडासाहेब कदाचित ब्लॅकडॉगचे दोन-पेग रिचवून भाषणाला उभे राहिले असतील!:)

बाकी भाजपचं म्हणाल तर त्यांना हल्ली अश्या खिल्ल्या उडवण्यापलिकडे दुसरं काहीही काम राहिलेलं नाही. सध्या बरेचसे भाजपावाले सुशिक्षित बेकारात जमा आहेत! :)

आपला,
(इंदीराप्रेमी!) तात्या.

सहज's picture

2 Nov 2007 - 6:42 pm | सहज

अरेरे मुख्यमंत्री ह्या पदावर असलेली व्यक्ती असे बोलू शकते? It happens only in ... :-) (बर्‍याच ठीकाणी म्हणा)

"नामाचा महीमा" अगदी खरं विकासराव!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2007 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकासराव,
एक तत्व नामाचा किस्सा खास आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लबाड बोका's picture

2 Nov 2007 - 7:14 pm | लबाड बोका

म्याडम पायी म्याड झालेले डोके कमरेपर्यंत लवुन उभे असलेले
कान्ग्रेस लोक देशाची वाट लावत आहेत
चालायचेच

(म्याड नसलेला ) बोका

नंदन's picture

3 Nov 2007 - 2:10 am | नंदन

लोकसत्तेची आवृत्ती रायपूरमध्येही निघायला लागलीय असं दिसतंय :). मुख्यमंत्री महोदय बहुधा त्यातले अग्रलेख नियमाने वाचत असावेत.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

विकास's picture

3 Nov 2007 - 5:14 am | विकास

लोकसत्तेची आवृत्ती रायपूरमध्येही निघायला लागलीय असं दिसतंय :). मुख्यमंत्री महोदय बहुधा त्यातले अग्रलेख नियमाने वाचत असावेत.

एक सेकंद माझ्या डोक्यावरून गेले, पण नंतर हसायला आले! मस्त!